Submitted by jaideep on 24 January, 2015 - 01:26
माझी १३ वर्षे वयाची मुलगी, english medium मधे शिकते. वाचनाची प्रचंड आवड आहे. पण सगळं वाचन english मधे. तिला वाचण्यायोग्य मराठी पुस्तकांची यादी हवी आहे.
अगदी लहान मुलांची पुस्तकं दिली तर ती कंटाळते.
घरात फक्तं मराठीच बोललं जातं, त्यामुळे भाषेचा तसा प्रश्न नसला तरी फार सहित्यिक काही तिला झेपणार नाही.
Please help.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१३ वर्षांची म्हणजे
१३ वर्षांची म्हणजे ७वी-८वीतली. तर मराठी शाळेतल्या त्या वर्गांना जी क्रमिक पुस्तकं असतात, ती आणा. मुलं आवडीने वाचतात. स्वानुभव. अगदी पहिलीपासून मी माझ्या मुलासाठी अशी पुस्तकं आणायचे.
तर मराठी शाळेतल्या त्या
तर मराठी शाळेतल्या त्या वर्गांना जी क्रमिक पुस्तकं असतात, ती आणा. >>> चांगली आयडीया आहे. मराठी वाचनाची आवड अगदी लहानपणापासूनच लावल्यास पुढे मग प्रश्नही पडू नये, जे त्या वयाची मराठी मिडीयमची मुले वाचतात ते सारे ते देखील वाचू शकतीलच ..
श्यामची आई - साने गुरूजी
श्यामची आई - साने गुरूजी
फिरण्याची आवड असेल तर
फिरण्याची आवड असेल तर वेगवेगळी प्रवासवर्णनं......
साद सहयाद्रिची भटकंती किल्ल्यांची.
बाईकवरचं बिर्हाड
इतिहासाची आवड असेल तर
श्रीमानयोगी
छावा
संभाजी
मृत्युंजय
स्वामी
रहस्यकथा आवडत असतील तर रत्नाकर मतकरींचे सगळे संच
गहिरे पाणी वगैरे
विनोदी वाचायचे असेल तर पु.ल. यांचे सगळे वाङमय
सुरुवात। मात्र श्यामची आईपासून करा प्लीजच.
श्यामची आई सुंदर पुस्तक ते
श्यामची आई सुंदर पुस्तक ते तिला अवश्य वाचायला द्या. तिला भा. रा. भागवतांची फास्टर फेणेची पुस्तके सुध्दा वाचायला आवडतील असे मला वाटते.
धन्यवाद सग्ळ्या
धन्यवाद सग्ळ्या प्रतिसादांबद्दल.
क्रमिक पुस्तकाचा प्रयोग मी आधीच सुरु केला आहे. बाकी ऐतिहासीक पुस्तकं घरी आहेतच, ती देतो तिला वाचायला.
बोक्या सातबंडे, विज्ञानाची
बोक्या सातबंडे, विज्ञानाची आवड असेल तर जयंत नारळीकरांची पुस्तके ( प्रेषित, वामन परत न आला इ.), रारंगढांग, तोत्तोचान. अजून आठवतील तशी भर घालेन.
विशिष्ट भाषेतील पुस्तके
विशिष्ट भाषेतील पुस्तके देण्यापेक्षा जो आवडीचा विषय असेल त्यातील कुठ्ल्याही भाषेतील (हिन्दी, मराठी, इंग्रजी, शाळेत फ्रेंच/ जर्मन असल्यास ते.) पुस्तके वाचली तर?
बरेच वेळा पालकांची धारणा असते की पाल्याला वाचायची इतकी आवड आहे की दिसेल ते वाचतात, तिला/त्याला विषयाचे असे काही नसते. पण जरा फाईन ट्यून झालात तर नक्कीच लक्षात येते की ह्या वयात थोड्याफार आवडी निर्माण झालेल्या असतात.
सीमंतिनी, मी पाचवी ते दहावी
सीमंतिनी, मी पाचवी ते दहावी अक्षरशः दिसेल ते आणि वाट्टेल ते वाचायचे! दुकानाच्या पाट्या, रद्दीचे कागद, भेळेचे कागद (एकदा केरसुणीला बांधून दिलेला पेपरचा तुकडा वाचत असताना रस्त्याने चालताना वेंधळेपणा केल्याने ओरडा खाल्ला आहे!) पण त्यावेळी जास्ती करून फक्त मराठी वाचन झाले याचे वाईट वाटते! इंग्रजी पुस्तके उपलब्ध नव्हती असं नाही पण गुणोत्तर फारच व्यस्त होतं! आता जेव्हा बरोब्बर उलट परिस्थिती आहे तेव्हा मी बरीच चूझी झाले आहे
पण तरी सगळ्या भाषांतील पुस्तके वाचावी ह्याच्याशी १००% सहमत!
त्यावेळी इंग्रजी पुस्तकांची
त्यावेळी इंग्रजी पुस्तकांची मराठी कुटूंबातील उपलब्धता मी समजू शकते.
१०-१५ वर्षापूर्वी मराठी समाजातील धारणा, संकेत आणि इंग्रजी पुस्तकातून मिळणारी माहीती याची सांगड नव्ह्ती. अगदी विशीतील मुलगी इंग्र्जीत प्रोतिमा बेदीचे आत्मचरित्र वाचते म्ह्णले तर आईची भुवई उंचावायची. परिस्थिती बदलत आहे हे चांगले आहे.