बथुआ (भाजी) = १ जुडी (साधारण १/२ की)
हिरव्या मिरच्या = २
लसुण = १०, १२ पाकळ्या
कणिक = दिड ते दोन वाटया
ओवा, जिरे,तिळ, हळद, तिखट, मिठ, हिंग तेल अंदाजे..
हिवा़ळ्यात काही खास भाज्या अगदी काही दिवसच बाजारात दिसतात.. उदा. सरसो, बथुआ, हरबरा, शेपु ... या भाजा आरोग्या साठी खुपच चांगल्या असतात.. त्यातल्याच एका भाजीच्या पराठ्याची पा,कृ. आज सांगते आहे. हे पराठे चविला खुपच रुचकर लागतात..
सग़ळ्यात आधी, बथुआ खुडुन स्वच्छ धुवुन चिरुन घ्या.. आता कढईत तीन चमचे तेल घालुन १/२ च. जिरं घाला त्यात दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसुणाच्या पाकळ्या घाला.. दोन मि.परतल्यावर, चिरलेला बथुआ घाला. ५ मि. अरत परत करा आणि नंतर ५ मि.एक वाफ काढुन घ्या... फार शिजवु नका. थोडा क्रंच हवा..
आता हे सगळ मिक्सर मधुन गिरवुन घ्या.. आणि एका परातीत कणिक घेऊन वरिल सगळे जिन्नस आणि हा गिरवलेला बथुआ घालुन थालीपीठा साठी भिजवतो तसा भिजवुन घ्या... आता याचे नेहमी सारखेच पराठे करायचे...
गरम गरम बथुआ पराठे, साईचे घट्ट दही, लाल मिर्चीच लोणचं असेल तर अजुनच छान.. अन्यथा कुठल्या ही लोणच्या सोबत वाढा (मी आवळयाचे वाढले आहे)... उत्तम लागतात...
बथुआ + सरसो ची पण भाजी छान लागते.. तसेच पालक + बथुआ याची पातळ भाजी/ डाळ भाजी पण खुप चविष्ट लागते..
(No subject)
फारच तोंपासु
फारच तोंपासु
छान पराठे... मुंबईत या भाजीला
छान पराठे... मुंबईत या भाजीला बटवा म्हणतात. मधले पान जांभळे असते. याची ताकातली पातळ भाजी छान लागते.
फोटो ची लिंक कॉपी करून,
फोटो ची लिंक कॉपी करून, पाककृती संपादीत करुन त्यात पेस्ट करायची. म्हणजे मूळ पाककृतीतच फोटो राहतील.
मिरची बघून अमंळ घाबरलो गेलो
मिरची बघून अमंळ घाबरलो गेलो आहे.
बाकी बटव्याची भाजी आपली फेवरेट..
बटवा म्हणजेच चाकवत का?
बटवा म्हणजेच चाकवत का?
मस्त पाकृ! करुन बघण्यात
मस्त पाकृ! करुन बघण्यात येईल....
मस्त पा कृ. दा, बटवा म्हणजे
मस्त पा कृ.
दा, बटवा म्हणजे चंदनबटवा का?
लाष्ट फोटूतली मिरची एकदम
लाष्ट फोटूतली मिरची एकदम तल्वार साईज दिसतेय. नैतर किमान इतर वस्तू भातुकलीतल्या तरी असाव्यात
दा, बटवा म्हणजे चंदनबटवा
दा, बटवा म्हणजे चंदनबटवा का?>>> हो. चंदनबटवा ' हे नावच मस्त आहे.
बटवा म्हणजेच चाकवत का?>>>>> नाही. दोन्ही वेगवेगळ्या भाज्या आहेत.
बथुआ + सरसो ची पण भाजी छान
बथुआ + सरसो ची पण भाजी छान लागते.. तसेच पालक + बथुआ याची पातळ भाजी/ डाळ भाजी पण खुप चविष्ट लागते.>>>>>>> सायलीताई, कृती लवकर टाका.
छान पाककृती. शेवटचा फोटो
छान पाककृती. शेवटचा फोटो मस्तच.
ती मिर्ची जर मी संपुर्ण खाल्ली तर......, विचार करूनच ढिचक्यांव!!!!!!!
आभार सगळ्यान्चे..... दा
आभार सगळ्यान्चे.....
दा धnyvaad....
बथुआ भाजी मला नै माहिती ..
बथुआ भाजी मला नै माहिती .. फोटूवरुन बी कळून नै र्हायली पण पराठे टेम्प्टींग दिसताय
नरेश माने >> त्या मिरच्यांना डयरेक्ट गॅसवर / चुलीत निखार्यांवर भाजायचं मस्त .. मग त्याचे बारीक तुकडे करुन त्यात तसेच छोटे छोटे लसणाचे तुकडे टाकुन चवीपुरत मीठ आणि लिंबु पिळायचा .. एवढूस तेल टाकून भाकरीबरोबर खायला घ्यायची
आ भा र टिना.... बthuaa म्हणजे
आ भा र टिना.... बthuaa म्हणजे चंदन बthuaa म्हण देतात भाजीवाले..