नवीन वर्षाच्या टेनीस सिझनची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन सोमवार १९ जानेवारी पासून सुरू होते आहे.
पुरूष एकेरीत अग्रमानांकन ज्योकोला तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्सला मिळाले आहे.
ज्योकोला त्यामानाने सोपा ड्रॉ असून उपांत्य फेरीआधी स्पेनच्या फर्नांडो व्हर्डास्कोचे आव्हान येऊ शकतं.
माजी विजेत्या फेडररसमोर उपांत्यपूर्व फेरीत मरे तर उपांत्य फेरीत नदाल उभे ठाकू शकतात.
नदालची पहिली फेरी मिखेल योझुमीशी तर चौथी फेरी लुकास रसोल बरोबर होऊ शकते. फॅब फोरखेरीज वावरिंकाही विजेतेपदाच्या शर्यतीत असेल.
महिला एकेरीत सेरेना विल्यम्सला त्यामानाने कठीण ड्रॉ असून तिच्या मार्गात झ्वोनारेवा, यांकोविच येऊ शकतात. सेरेनाखेरीज शारापोव्हा, क्विटोव्हा आणि बुचर्ड विजेतेपदाच्या शर्यतीत असतील.
ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी हा धागा.
स्पर्धेच्या वेबसाईटची लिंक : http://www.ausopen.com/index.html
अमेरिकेतील टिव्ही शेड्युल : http://www.tennistours.com/australian-open/tv-schedule/
जितेगा भाई जितेगा .. !
जितेगा भाई जितेगा .. !
आमचा घोडा, नादाल, निशिकोरी,
आमचा घोडा, नादाल, निशिकोरी, मरे उतरत्या क्रमाने सपोर्ट करणार. उरलेल्यांना जिंकु अथवा मरु पण बूssss करू
तुम्ही बूऽऽऽऽ करा नाहीतर अजून
तुम्ही बूऽऽऽऽ करा नाहीतर अजून काही .. जो होना है वो होके ही रहेगा .. कब कौन कैसे हारेगा ये तो ना आँप बता सकते है ना हम ..
जितेगा भाई जितेगा .. ! >>>>
जितेगा भाई जितेगा .. ! >>>> सशल.. तुझा हँडसम तुझा भाई झाला का आता ?
आमचा घोडा, नादाल, निशिकोरी, मरे >>>> अरेरे ! (शेवटच्या नावाला)..
रच्याकने, सशलने ते 'खळबळजनक' विधान गेल्या ऑओलाच केलं होतं ना ?
>> खळबळजनक कुठलं रे
>> खळबळजनक
कुठलं रे कुठलं?
भाई कसा होईल आणि माझा हँडसम .. मी माझ्या इतर भाईंनां उद्देशून म्हणतेय तसं ..
मरेला अरेरे करू नकोस.
मरेला अरेरे करू नकोस. ससलबेनके भैय्याजी इतने नापसंद है की मरेला सुद्धा सपोर्ट करू शकतो एवढंच हायलाइट करायचं आहे
कुठलं रे कुठलं? >>> करीयर
कुठलं रे कुठलं? >>> करीयर संपलं वगैरे.. नंतर विंबल्डन जिंकलं की पण त्याने.. ते ही फेडररला ५ सेट्समध्ये हरवून.. !
ससलबेनके भैय्याजी इतने नापसंद है की मरेला सुद्धा सपोर्ट करू शकतो एवढंच हायलाइट करायचं आहे. >>>
अच्छा ते होय .. (चमन आला होता
अच्छा ते होय .. (चमन आला होता का ते वाचून? ;))
विम्बल्डन फायनल ला देव पाण्यात ठेवायला लावलेन की पण .. आणि युअ एस् ला काय झालं ते आठवतंही नाही .. :|
देव पाण्यात ठेवायला लागले तर
देव पाण्यात ठेवायला लागले तर ठिक आहे की.. करियर संपलं नाही ना ? ते महत्त्वाचं..
ह्या स्पर्धेसाठी बेस्ट लक दे आता..
नडाल ला पहिल्या फ़ेरीत
नडाल ला पहिल्या फ़ेरीत योझीनी?सुरुवातच खडतर होणार तर...
आणि पग्या जागा झाला...
आणि पग्या जागा झाला...
काल राफाची मॅच पहिली.. एकदम
काल राफाची मॅच पहिली.. एकदम फीट अँड फाईन वाटला आत्तातरी.. असाच फॉर्म टिकला पाहिजे.. !
इनसाईड आऊट फोरहँड भारी होते एकदम.
काला ८ सिडेड खेळाडू हरले म्हणे..
इवनोविक आणि लिसिकी गेल्या.
इवनोविक आणि लिसिकी गेल्या. आणखी कोण गेले?
कर्बर पण गेली.. बाकी बघावे
कर्बर पण गेली.. बाकी बघावे लागतील..
जोको ला सदध्या हरवणे खुप अवघड
जोको ला सदध्या हरवणे खुप अवघड आहे.
फिक्स फायनल मधे.
स्टॅन द मॅन सेमीज पर्यन्त :). जोकोला नाही हरवु शकणार.
नदाल काल खुप छान खेळला पण Q/SF पर्यन्त कसा खेळतो त्यावर त्याचे फायनलचे चान्सेस.
फेडेक्सचा काही भरोसा नाही, काल ओके ओके खेळला(तसा १-२ राऊन्ड्मधे तो स्लो खेळतो.).
नदाल-फेडेक्स (सेमी) .. फेडेक्स जिन्कलेले आवडेल .
निशिकोरी वि. अलमाग्रो सकाळी
निशिकोरी वि. अलमाग्रो सकाळी थोडी बघायला मिळाली. पहिला सेट निशीकोरीने जिकला पण दुसर्या सेट मधे निशीकोरी एक सर्विस ब्रेक डाउन होता. तरी निशीकोरी चांगल्या कॅट्रोल मधे होता. पुन्हा ब्रेक बॅक मिळवण्याच्या तयारीत होता. लॉंग रॅली मधे निशीकोरी जास्त चांगला खेळत होता. पहिला सेट संपे पर्यंत अलमाग्रो ने ८ ब्रेक पॉइंट मिळवले होते त्यातले फ़क्त २ त्याला कन्वर्ट करता आले निशीकोरीने मात्र ४ ब्रेक पॉइंट मिळवुन २ कन्वर्ट केले आणि सेट घेतला.
कमॉन फेडेक्स. (बहुतेक शेवटच
कमॉन फेडेक्स. (बहुतेक शेवटच वर्ष, एन्जॉय करा), नेक्स्ट घोडे, हुआन मार्टीन आणि स्टानिस्लाव.

पराग बर्याच दिवसानी खुशीत दिसतोय.
चॅनेल कुठले आहे?
चॅनेल कुठले आहे?
राफा पाचवा सेट लढवतोय !!!
राफा पाचवा सेट लढवतोय !!!
जिंकला ! तो दुसरा भारी खेळत
जिंकला !
तो दुसरा भारी खेळत होता.. शेवटी नदालचा अनुभव कामी आला.. शेवटचा सेट मस्त फिरवला..
जिंकला. हुश्श!!! मी शेवटचे
जिंकला. हुश्श!!! मी शेवटचे दोन सेट बघितले फक्त.
शेवटी नदालचा अनुभव कामी आला >>> +१
काल फेडरर च्या मागच्या
काल फेडरर च्या मागच्या वर्षीपा सून आणलेल्या अॅग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी बद्दल बोलत होते .. कर्टसी फेडबर्ग .. पण त्या इटालियन ने बरेच पासिंग शॉट मारले .. उसका क्या करेंगे?
मरे दोनाचे चार करणार म्हणे ह्यावर्षी ..
पसिंग शॉट मारयला लावुन
पसिंग शॉट मारयला लावुन अपोनंट्वर एरर फ़ोर्स करता येते. जनरली व्हॉली खेळणारा ज्या दिशेने बॉल मारला असेल त्या बाजुचे नेट जवळ जातो त्यामुळे अपोनंट्ला कमीवेळात कठीण अॅंगलमघे क्रॉस कोर्ट तरी मारावा लागतो किंवा नेट वर उभ्या असलेल्या खेळाडुच्या बाजुने जोरात पास करावा लागतो ज्या साठी फ़ेड्या सारखा खेळाडु वाटच बघत असतो. बर्याच वेळी बरेच खेळाडु पहिला पर्याय पसंत करतात आणि नेट मधे मारुन एरर करतात.
अप्रोच शॉट वीक असेल तर नेट जवळ जावुन काही फ़ायदा होणार नाही कारण समोरच्या खेळाडुला बराच वेळ मिळतो.
या स्ट्रेटेजीला अपवाद फ़क्त नडाल. नडाल कोणत्याही अॅंगल मघुन बॉल मारतो तरी तो नेट क्लीयर करतोच. त्याचा फ़ोरहॅंड टॉपस्पिन तर नेट्च्या सर्वात उंच भागावरुन १ फ़ूट वरुन जातो.
हेविट पाच सेटमध्ये हारला आज.
हेविट पाच सेटमध्ये हारला आज. रिव्ह्युजमध्ये तरी तो पहिले दोन सेट फार छान खेळला असं वाचलं. मी फक्त शेवटचा एक सेट येतजात बघितला ज्यात दोघं ठीकठाक खेळत होते असं वाटलं. बेकरने काही शॉट्स भारी मारलेले बघितले.
ह्यावेळचं कोर्ट शेड्युल
ह्यावेळचं कोर्ट शेड्युल काहीतरी विचित्र आहे.. ऑसी खेळाडूंना जरा जास्तच झुकतं माप आहे.. रॉड लेव्हर अरेनाला संध्याकाळचं सेन्शन हेविट आणि स्टोसुरच्या मॅचेस..!
हो, मला पण तेच वाटलं. सगळ्या
हो, मला पण तेच वाटलं. सगळ्या ग्रँड स्लॅम्सवेळी करतात तसं. इथे यु एस ओपनला अमेरिकन खेळाडू प्राइम टाइमला ठेवतात.
हो तसं होतच.. पण यंदा एकंदरीत
हो तसं होतच.. पण यंदा एकंदरीत प्रमाण जास्त आहे.. बाकीच्या ठिकाणी एक मॅच चांगला (पहिल्या पाच/सात मधला) खेळाडू आणि एक लोकल अशी ठेवतात..
हो, आज दुसरी मॅच (रेओनिकवाली
हो, आज दुसरी मॅच (रेओनिकवाली ) पण बोर होती.
यूरो, टेनिसच्या बाफवर स्पॅनिश
यूरो,
टेनिसच्या बाफवर स्पॅनिश आणि सर्बियन सोडून ईतर खेळाडूंच्या खेळाचे टेक्निकल अॅनालिसिस करणे निषिद्धं आहे. त्यातल्या त्यात स्वीस खेळाडुंचे तर...तौबा तौबा.
कराकी कुठल्याही खेळाडूच्या
कराकी कुठल्याही खेळाडूच्या खेळाचा टेक्निकल अॅनालिसिस, फक्त त्या आधी स्विसच खेळाडू भारी! , स्विस खेळाडूच भारी!, स्विस खेळाडू भारीच! वगैरे चष्मे काढून ठेवा म्हणजे झालं..
Pages