आवळा त/टक्कू

Submitted by मंजूताई on 16 January, 2015 - 04:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवळे ६ मोठे, किसलेलं आलं २ चमचे, लिंबू १ चवीनुसार मीठ, तिखट, गूळ, फोडणीचं साहित्य - तेल, मोहरी हिंग, हळद, मेथ्या

क्रमवार पाककृती: 

आवळे धुवून कोरडे करुन किसून घ्या, इतर साहित्य व लिंबाचा रस घाला. फोडणी थंड करून घाला व हलवून एकत्र करा. चविष्ट त/टक्कू तयार.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

मीठ व्यवस्थित घातले तर बरेच दिवस टिकतो. आल्याचा स्वाद छान लागतो. कच्चा आवळा जास्त खाल्ल्या जात नाही व कोण्त्याही स्वरुपात आवळा खाल्लातरी त्याचे पौष्टीक गुणधर्म कायम राहतात.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी तरी लिहायची.
मी आत्ता रविवारीच घरातले आवळे चिरून त्यावर मिठ टाकून वाळवले.
उगाचच!
घरात खुप सारे आवळे होते आणि ते कोणीच न खाल्याने वाया जायला लागलेले म्हणून Uhoh

पुन्हा आणले तर नक्की करून पाहीन Happy

@रीया - आधी विचारायंच ना युवि/युसां Happy सोपी पाक्रु टाकु की नको विचार करत होते... आजच केला . टाकायला काय जातं...आवडली तर करतील..

ओक्के नक्कीच करणार, सुकवून झाले, सरबत करून झाले, लोणचे केले फोडी करून, पण व्हरायटी हवीच होती, तिचा हा मोठाच प्रश्न पडला होता.

गूळ किती लागेल अंदाजे?
हा अगदी बिगरी यत्तेतला प्रश्न आहे माहित आहे, पण आम्ही बिगरीवालेच असल्याने विचारून घेतेय Happy

वरदा - लिंबाएवढा घाल. गोड आवडत असेल तर अजून घाल. चव घ्यायची . ..अजून घालायची.. बरणीत भरायला उरलं तर भरायचं... Happy हाकानाका..

क्रमवार पाककृती:
आवळे धुवून कोरडे करुन किसून घ्या, इतर साहित्य व लिंबाचा रस घाला. फोडणी थंड करून घाला व हलवून एकत्र करा. चविष्ट त/टक्कू तयार.

>>

क्रमवार पाककृती जरा नीट लिहिली असती तर बरे झाले असते.

माझी बहिण किसलेल्या आवळ्याचा मुरब्बा करते पण त्यात ती साखर आणि वेलची इतकेच साहित्य घालते. मुरब्बा हिवाळ्याच्या कोवळ्या उन्हात ठेवते आणि मग तो वर ठेवला तरी अनेक महिने छान टिकून राहतो. जिभेवर अशा मुरलेल्या मुरब्ब्याची चव मस्त विरघळते. मी उद्याला प्रचि टाकेन.

बी - काही कृती तरी आहे का, क्रमवार लिहायला ! हा तक्कू नेहमी करते पण इथे टाकण्यासारखं काय? असा विचार करुन टाकली नाही पण खूप टेस्टी लागते ... म्हणून टाकली. जे चांगलं आहे ते इतारांना सांगावं..

अच्छा.. धन्यवाद. पण मला वाटत पाककृती सोप्या असल्या तरी त्याची कृती रितसर लिहावी. मला स्वतःला छोट्या पाककृती जास्त आवडतात आणि त्या करायला वेळ मिळतो म्हणून करुन पाहिल्या जातात.

मस्त रेसिपी. इथे ताजे आवळे मिळत नाहीत आणि फ्रोजन आवळ्याचा चोथाच जास्त होईल. त्यामुळे करता यायचं नाही.

बी, >>क्रमवार पाककृती:
आवळे धुवून कोरडे करुन किसून घ्या, इतर साहित्य व लिंबाचा रस घाला. फोडणी थंड करून घाला व हलवून एकत्र करा. चविष्ट त/टक्कू तयार.>> ही पाककृती क्रमवार असून नीट नाही तर काय आहे?
१. आवळे धुवून कोरडे करून किसून घ्या.
२. इतर साहित्य व लिंबाचा रस घाला.
३. फोडणी थंड करून घाला व हलवून एकत्र करा.

जिन्नस वेगळे लिहिलेलेच आहेत. ते नसते तर एकवेळ काय घालयचं याचा गोंधळ कळू शकतो.

मंजु फारच छान झालाय तक्कु. फक्त मी कैरी लोणचे मासाला घातला. आवळा खाण्याने प्रतीकार शक्ती वाढते याव्र माझा द्र्ढ विश्वास आहे. मी मोरावळा खात असे पण वाढत्या वया प्रमाणे खुप साख्रर नको असे वाटु लागले. त्यामुळे तक्कुचा मार्ग छानच. चव आंबट गोड असल्याने ब्रेड, दही भात, पोळी, पुरी कशाबरोबरही छान लागेल. धन्यवाद.

मी केला होता टक्कू. आवडला. दोन दिवस टक्कू खाउन मग तिसर्‍या दिवशी त्यात गरम तेलात कालवुन केप्र यांचा कैरी लोणचे मसाला घातला.

अमेझींग लागले आवळ्याचे टक्कू लोणचे. गुळामुळे एक स्पेशल चव आली होती. Happy

धन्यवाद मंजू.

मी आवळ्यात टक्कू असे वाचून, म्हणजे आवळ्यामध्ये टक्कू असे समजून काय प्रकरण आहे हे बघायला डोकावलो Happy
लोणच्यातला आवळा आवडतो.

माझी बहिण किसलेल्या आवळ्याचा मुरब्बा करते
>>>
याला बहुतेक मोरावळा बोलतात ना? म्हणजे कैरी / आंब्याचा करतो तो मोरंबा आणि आवळ्याचा केला तर मोरावळा ..
बाकी हा पण आवडतो. आणि मोरंब्यावर तर माझे अख्खे बालपण गेलेय. तो खात खातच लहानाचा मोठा झालोय. जेव्हा डब्यात नॉनवेज नसेल तेव्हा मोरंबा ठरलेलाच. आमरस खाणारे जसे मँगोला पिणार्‍यांना केविलवाण्या नजरेने बघतात, तसे मी डब्यात जॅम आणणार्‍यांना बघायचो Happy

हिंदीत मुरब्बा म्हणतात, ऋन्मेष. कुठला ते सांगावे लागते, आमला मुरब्बा, आम का मुरबा

Pages