Submitted by saakshi on 15 January, 2015 - 04:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. तीळ - अर्धी वाटी
२.शेंगदाण्याचे कूट - पाव वाटी
३.गूळ - पाऊण वाटी बारीक किसून
४.तूप - ४ मोठे चमचे
५.वड्या थापायला २ ताटे
क्रमवार पाककृती:
१.एका मोठ्या कढईत तीळ कोरडे भाजून घ्यावेत. आच मंद ठेवावी कारण जास्त ठेवल्यास लगेच करपतात. हलका रंग बदलेपर्यंत भाजावेत आणि बाजूला काढून ठेवावेत.
२.दोन ताटांना मागील बाजूस तूप लावून ठेवावे.
३.कढईत तूप टाकावे आणि गूळ टाकावा. गूळ वितळला की आच बंद करावी.
४.लगेच तीळ आणि शेंगदाण्याचे कूट टाकावे. मिश्रण भरभर एकजीव करावे.
५.तूप लावलेल्या ताटांवर पसरावे. मिश्रण गरम असल्याने वाटीच्या तळाला तूप लावून त्याने पसरावे.
६.पसरल्यानंतर लगेच वड्या पाडाव्यात.
७.थंड झाल्यावर वड्या काढून घ्याव्यात आणि गट्टम कराव्यात.
हा फोटो:
वाढणी/प्रमाण:
खाल तितक्या... तिळगूळ घ्या गोड बोला :)
माहितीचा स्रोत:
स्वप्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यम्मी दिसत आहेत वड्या !
यम्मी दिसत आहेत वड्या ! संक्रातीच्या शुभेच्छा
मस्त दिसतायत! सगळ्याना
मस्त दिसतायत! सगळ्याना सन्क्रान्तीच्या गोग्गोड शुभेच्छा.
धन्यवाद जाई. , तुम्हालाही
धन्यवाद जाई. , तुम्हालाही संक्रांतीच्या शुभेच्छा
वड्या मस्त झाल्यात साक्षी.
वड्या मस्त झाल्यात साक्षी.
मस्तच
मस्तच
धन्यवाद रश्मी, सृष्टी,
धन्यवाद रश्मी, सृष्टी, दक्षिणा
छान दिसताहेत वड्या.
छान दिसताहेत वड्या.
मला गुळाच्या पोळ्या खूप
मला गुळाच्या पोळ्या खूप आवडतात पण करता येत नाहीत . कृपया कोणीतरी पा कृ सांगा
सारिका३३३ , अर्र हा धागा बघ
सारिका३३३ , अर्र हा धागा बघ http://www.maayboli.com/node/14369
छान दिसत आहेत वड्या
सॉरी सॉरी... केला चेंन्ज
कॉपी, पेस्ट करतांना गोंधळ झाला बहुतेक गं
माधुरी१०१ , अर्र तू दिलेला
माधुरी१०१ , अर्र तू दिलेला धागा बघ ग एक्दा
मस्त खुटखुटीत दिसताहेत वड्या!
मस्त खुटखुटीत दिसताहेत वड्या! पटकन एक उचलून तोंडात टाकावी असं वाटतय!
मस्तं!
मस्तं!
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
ह्या वड्या बघुन मला आईच्या
ह्या वड्या बघुन मला आईच्या वडयांची आठवण झाली. खुपच छान आहेत.
अतिशय सोप्पी रेसिपी. मोजुन १५
अतिशय सोप्पी रेसिपी. मोजुन १५ मिन मध्ये झाली. तुप आवडीचा पदर्थ असल्याने ४ ऐवजी ६ मोठे चमचे तुप घातले हा घ्या फोटो.
वड्या सुट्य सुट्य पण झाल्य
वड्या सुट्य सुट्य पण झाल्य बिनदिक्कत!
धन्यवाद भगवती आणि kulu kulu
धन्यवाद भगवती आणि kulu
kulu वड्या मस्त दिसत आहेत
वाह..काय कमाल दिसत आहेत
वाह..काय कमाल दिसत आहेत वड्या....करून बघणार...
गूळ कुठला वापरावा? चिक्कीचा
गूळ कुठला वापरावा? चिक्कीचा गूळ उपलब्ध नसल्यास काय पर्याय आहेत?
गूळ उकळताना किती वेळ उकळायचा? दोन तारी, तीन तारी पाक वगैरे भानगड असते का इथे?