Submitted by पूनम पाटिल on 9 January, 2015 - 05:24
mazi mulgi 3 varshachi ahe....ti khanysathi far tras dete....fakat milk pahije asate tila....tichi hb level kami zal ahe....te vadhvnya sathi kay karu?tich milk intake from bottle kas kami karta yeil?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाटली बाबत बाकी सान्गतील,
बाटली बाबत बाकी सान्गतील, कारण माझी मुलगी दूध बाटलीने पीत नव्हती. उलट ती दूधच नको म्हणते. पण तुमच्या मुलीचे हिमोग्लोबीन वाढण्या साठी तिला टॉमेटोचे तुकडे ( कोशिम्बीर वगैरे) मीठ किन्चीत भुरभुरवुन, तसेच उकडलेले बीटाचे तुकडे वा त्याची दह्यात मीठ + साखर घालुन कोशिम्बीर द्या. दररोज चे जेवण परीपूर्ण द्या. म्हणजे वेगवेगळ्या डाळीन्चे वरण, पालेभाज्या-फळभाज्या ( आपण ज्या पद्धतीने मोठ्यान्करता करतो त्यातलीच तिला घाला), सुप द्या. अन्जीर ( ओले- ताजे आणी सुके असेल तर त्याचे तुकडे ), खारकान्ची पूड घालुन कणकेचे लाडु/ वड्या.
नाचणी मध्ये भरपुर्र लोह आणी कॅल्शियम असते. त्याची खीर, सत्व द्या. पालक आणी अळुची भाजी लोहाकरता उत्तम. दुसरी गोष्ट सगळे खाण्याची सवय लावा, नाहीतर मुले भयानक त्रास देतात. हे नको, ते नको यातुन पोषण होत नाही, तेव्हा भाजी खात नसेल तर पराठ्यात घालुन द्या. सवय करा.
मात्र मॅगी वगैरेची सवय लावु नका.
लिहायचे राहीले. घरात केलेले
लिहायचे राहीले. घरात केलेले ताजे ताक थोडे मीठ आणी साखर घालुन ( लस्सीसारखे) तिला देऊन बघा. ताकाने हिमोग्लोबीन वाढते. ( माझा स्वतःचा अनूभव आहे.) मात्र दही, ताक रात्री देऊ नये.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/42835
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी लोहाबरोबर प्रथिनांचीही आवश्यकता असते. कडधान्यांच्या उसळी द्या. मुले आवडीने खातात. पालेभाज्यांवर लिंबू पिळून मग द्या. म्हणजे लोहाचे शरीरात शोषण चांगले होते.
पालेभाज्या परतायला लोखंडी तवा
पालेभाज्या परतायला लोखंडी तवा वापरणे.
ओले खजुर , शेंगदाणे व गूळ रोज थोडे थोडे देणे
पालक ने फ़ार फ़ायदा होतो. पालक
पालक ने फ़ार फ़ायदा होतो. पालक चे पराथे किन्व पुर्या खायला द्या. नक्की फ़रक पडेल.....
पालक ने फ़ार फ़ायदा होतो. पालक
पालक ने फ़ार फ़ायदा होतो. पालक चे पराथे किन्व पुर्या खायला द्या. नक्की फ़रक पडेल.....
हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी
हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी लोहाची गरज असते.लोह कमी असेल तर हिमोग्लोबीन वाढता वाढत नाही लवकर.वर लिहलेल्या पालक (लोह असल्यामुळे )भाजीचा समावेश जेवणात करण त्यासाठीच आवश्यक.
अक्रोड,पिस्ता,चिकन लिव्हर चा ही उपयोग लोह वाढवण्यासाठी होतो.
मालती कारवारकरचे 'डॉ.मी काय
मालती कारवारकरचे 'डॉ.मी काय खाऊ" हे पुस्तक वाचा बरिच माहिती मिळेल.