!!श्री गणेशा !!
कोणीतरी तोंडावर उशी धरून माझा श्वास रोखला आहे आणि अचानक श्वास गुद्मारल्या सरका होऊन मी रात्री जागा झालो , आणि पाहतो तर रात्रीचे २.३५ झाले होते आणि मी एका भयानक स्वप्नातून हडबडून जागा झालो होतो , त्यानंतर पाणी पिउन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण डोळ्याला डोळा काय लागेना आणि अचानक मन हळू हळू भूतकाळात घडलेल्या त्या घटनेकडे जाऊ लागले
१२ ते १५ वर्षा पूर्वीची गोष्ट त्यावेळी मी साधारण १२ वर्षाचा असेन , पावसाळ्याचे दिवस होते मी असेन सातवीला , अमी सर्व भावंडे सख्खे चुलत मिळून ११ जन होतो , त्यामध्ये माझा नंबर ९ वा होता , पण हि सगळीच माझ्यापेक्षा धिप्पाड, कामाला दणकट , गावाकडील सर्व कामात तरबेज आणि पोहण्याच्या बाबतीत तर सर्वच बेस्ट स्विमर होते , आणि मी यांच्या विरुद्ध बारीक सडपातळ, घाबरट आणि पोहणे आणि माझा कधी दूर दूर पर्यंत संबंध नव्हता , आणि याला कारण हि तसेच होते दीड वर्षाचा असताना एका आजाराने मला ग्रासले होते त्यामुळे माझ्या मामा यांना मी अन्ना म्हणतो आणि आजी जिला मी आई म्हणतो यांनी मला मुंबई वरून कोल्हापूरला आणले , माझे उपचार कोल्हापूर मधील एका इस्पितळात झाले , येतील वातावरण आणि हवा पाणी मला चांगले मानवले त्यामुळे माझ्या अत्ति ने मला कोल्हापूर मध्ये मामा च्या घरी ठेवण्याचा सल्ला दिला आणि तो सर्व मताने मान्य पण झाला . अन्ना आमचा बँकेत नोकरीला होता त्यामुळे पगार मजबूत होता त्या काळात जवळपास ७००० रुपये असावा , घरात एक मावशी , (छोटा मामा हा साधारण माझ्यापेक्ष्य फक्त ७ वर्षाने मोठा असेल) आई, दादा (आजोबा ) आणि मामी असे मामाचे कुटुंब होते आणि या सर्वात सगळ्यात मोठ्या मुलीचा पहिलाच मुलगा, मी इकडे राहायला असल्यामुळे माझे खूप लाड होऊ लागले , घरात सगळ्यांचा लाडका होतो, कोणतीही गोष्ट मागीतल्यानातर मिळत असे , चांगले कपडे लत्ते, फीरण, चांगली शाळा अश्या सर्वच गोष्टी मला चांगल्या प्रतीच्या मिळत होत्या , कधीच कुठल्या गोष्टी साठी झगडाव लागत नवत. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत मी शैलाजी वनाजी शाळेत रविवार पेठ कोल्हापूर येथे होतो , त्यानंतर माझे मामांचे कुटुंबीय साने गुरुजी वसाहत इकडे नवीन घर घेऊन सगळेच स्थलांतरित झाले आणि रविवार पेठेतील घर एक बिल्डर ला develop साठी दिले . .
पाचवीला मला साने गुरुजी येथील private मराठी शाळेत घातले , मी माझ्या वडिलांना खूप घाबरट होतो ते कधी कधी इकडे यायचे आणि मला घेऊन जाण्याबद्दल घरात बोलायचे , बालपणात अन्ना व मामी कडून मिळालेले प्रेम माया इतकी होती कि मला तर माझे आई वडील हे दुसरेच कोण आहेत याची कल्पना पण नसायची , पाचवीची परीक्षा दिली निकाल आला आणि मी त्या वर्षी दुसरा आलो होतो पहिल्यांदाच पहिला नंबर सोडला होता कदचीत शाळा बदल्या मुळे ही असेल , आणि त्याच वर्षी माझ्या वडिलांनी अन्ना व आजी ला सांगून टाकले कि अमी आता आमच्या पोराला गावी घेऊन जातो (माझ्या नंतर मला एक बहिण झाली व नंतर वडील मुंबई सोडून गावीच परत आले होतो कायमचे ) , अन्ना, आजी , आजोबा यांनी थोडासा विरोध केला पण त्यांच्या समोर मला सोडण्याशिवाय पर्याय नव्हता आणि अन्ना ला ही एक गोड मुलगी झाली होती त्यामुळे ही अन्ना ने जास्त विरोध केला नसावा . आणि लगेच दोन दिवसात माझी रवानगी कोल्हापूर मधून थेट किणी या माझ्या गावाच्या हक्काच्या घरी झाली .(किणी हे गाव कोल्हापूर पासून २२ कि मी वर आहे ते ही हायवे टच असल्यामुळे चांगल्या प्रकारे प्रगत व सुधारित आहे ) .
गावाकडील माझे घर म्हणजे लग्न घरातील वर्हाड होते , आजी आजोबा (वडिलांची आई वडील ) , त्यांना एकूण पाच मूले आणि २ मुली , त्यामध्ये माझे वडील ४ नम्बरचे प्रत्येक चुलत्याचे कुटुंब सदस्य कमीत कमी ४ आणि जास्ती जास्त ६ पर्यंत होते , माझ्यासहित अमी एकूण भावंडे ११ जन होतो आणि एकत्र कुटुंब पद्धती घरातील सगळी कामे वाटून घेतली जायची , जेवणासाठी दोन चुलत्या, धुणं आणि भांडी दोगिनी आणि साफ्सापाई एकीने अशी कामाची विभागणी होती , पण घरातील मुलांना ही तेवढीच कामे विभागून दिली होती , वैरण आणणे, पाणी भरणे, जळण गोळा करणे , डेरीला दुध घालणे , शेण घाण काढणे आणि मग राहिलेल्या वेळेत शाळा , शिक्षण , खेळ या गोष्टी असायच्या , आमच्या अत्ति पैकी एक अत्ति मुंबई ला असते तर दुसरी अत्ति आमच्या इथेच असायची तिच्या पूर्ण कुटुंबासहित सर्वात मोठी तीच अत्ति होती त्यामुळे तिचे नातू नात आमच्या वयाचे होते . आमची पाच कुटुंबे, अत्ति आणि तिचे कुटुंब आजी , आजोबा अशी सगळी मिळून ३४ लोक अमी एकत्र राहत होतो (लग्नाचे वर्हाड ) , त्यामुळे घराची परिस्तिति खूप बिकट असायची , सरळ आणि वेळेवर जेवण मिळत नसायचे , तर अन्गावर कपडे ही नीट नसायची, इतकेच काय तर पांघरायला आणि अंगावर घ्यायला मिळणारी गोधडी पण फाटकी आणि तोताकीच असायची तिघात एक गोधडी अंगावर घ्यायला मिळायची , मला गावाचे जीवन म्हणजे एक प्रकारची जेल झाली होती , कुठे ते मामा कडचे आरामदायी जीवन आणि कुठे हे गावाकडील adjustment जीवन , माझी सगळीकडूनच कुचंबना होत असे, कोणाचेच आई वडील मुलावर वैक्तिक असे लक्ष देऊन नसायचे कामेच इतकी असायची कि फक्त संध्याकाळी जेवतानाच काय ते आमच्यावर लक्ष असायचे , जीवन म्हणजेच एक प्रकारची कसरत झाली होती . मला एक सख्खा भाऊ आणि एक बहिण होती अमी तिघे सख्खे आहोत याची जाणीव पण थोडीशीच राहिली होती एकत्र कुटुंबामुळे .
सगळेच भाऊ हे धाडसी आणि दणकट होते , पोहण्यात तर सगळेच तरबेज होते आणि या मध्ये मी मात्र भित्रा , नेबळत , पोहणे आणि माझा तर कदीच जवळचा संबध ही नव्हता हे सगळे मिळून रोज विहिरीलाच पोहून यायचे मी मात्र अंगणातच एक छोटी फारशी ठेऊन तिथे बादलीभर पाण्यात अंघोळ करायचो , गावाकडे लहानात लहान मुला मुली पासून ते मोठ्या लोकापर्यंत सर्वाना पोहत येत होते , बर्याच वेळेला मला भावांनी पोहायला येण्यास विचारले होते पण आयष्यात कदीच माझ्या पोह्न्याशी संबध आला नवता त्यामुळे धाडसच होत नवती , अगदीच वेळ पडली तर पाहण्यासाठी यांच्या सोबत पाय्गोंडा पाटील च्या विहिरीवर जायचो , पण पाणी बघून माझे डोळेच पांढरे पडायचे , ही मूले अगदी २५ ते ३० फुटावरून अगदी आरामात उद्या मारायचे विहिरीत फक्त बघूनच माझ्या पोटात गोळा यायचा , जवळ पास १० ते १५ दिवस फक्त पोह्त्याले बघूनच आनंद मानून मी परत जायचो , पण यांना होणारा आनंद बघून मला पण वाटू लागले कि आपण पण पोहायला शिकले पाहिजे आणि अथक विनावण्यानंतर मी पोहायला जाण्यास तयार झालो , माझा आत्ते भाऊ अजित दादा हा पोहायला शिकवण्यात तरबेज होता , पाठीला कॅंन बांधून पोहणार या शुल्लक अटीवर ४० ते ५० फुट खोल पाणी असणाऱ्या विहिरीत मी पोहायला शिकण्यास तयार झालो ,लढाई च्या पहिल्याच दिवशी कॅंन बांधून
पाण्याचा फक्त जवळच गेलो असेन तसा मला पोटात भीतीने गुड गुड वाजू लागले आणि माझी पचन संस्था या भीतीदायक कृत्याला सहन करण्याच्या तयारीत नव्हती हे मला कळून चुकले , मी घाबरून मागे हटणार तेवढ्यात मागून कोणीतरी मला उचलून गणपती बाप्पा मोरया म्हणत पाण्यात भिरकावून दिले , (थंडीच्या दिवसात अगदी अंगावर उब घेऊन पडलो असतना कोणी तरी फ्रीज मधील थंड पाणी आपल्या अंगावर ओतल्यावर ज्या प्रकारे आपण जागे होईन तस्य प्रकारची जाणीव झाली होती ) अगदी क्षणातच पाण्यात पडलो गेलो होतो जवळ पास ४ ते ५ फुट पाण्यात खाली पूर्ण शरीर बुडले गेले होते आणि एकाद्या मुलायम गोष्टीला जसे अलगद उचलतो तसे अलगद मी पाण्यातून आपोआप पाण्याच्या पृष्टभागावर उचललो गेलो , आणि तरंगू ही लागलो , पाण्यावर आपण
तरंगू शकतो फक्त याचा आनंद ही इतका झाला होता गावातील जीवन हेच चांगले जीवन अशी माजी समजूत झाली होती पण कृपा होती ती त्या बांधलेल्या कॅंन ची , पोहण्याला घाबरणारा मी पोहण्यात इतका आनंदी झालो कि रोज मी या सगळ्यांच्या आधी तयार होऊन पोहायला कधी जायचो विचारू लागलो होतो . जवळ पास ८ दिवस झाले असतील माझे पोहण्याच्या सरावाचे, माझ्या सर्वात जास्त आनंदापैकी पोह्ण्यातील आनंद द्विगुणीत असायचा .
( धाग्यातील अंतिम टप्पा )
जवळपास १० दिवस मी असाच कॅंन बांधून पोहत असायचो व कॅंन मूले आपण बुडत नाही अशी माझी एक भावना तयार झाली होती , त्याचाच परिणाम तो दिवस उजाडला ज्यासाठी हा धागा आज लिहिला जात आहे .
पावसाळ्याचे दिवस होते विहीरे पाण्याने तुडुंब भरल्या होत्या शेतातील कामे जोरात चालू होती , पाय्गोंड पटल्याचा मळ्यातच विहीर होती जिथे अमी पोहायला जायचो आणि त्या दिवशी पोहण्याचा आनंदाच्या भरात मी घरी कोणालाही न सांगता कुणीही मोठी मंडळी सोबत नसताना ४ एक लहान माझ्या वयाच्या मुली जी चांगली व स्वत पोहत होती आणि माझ्या आत्ते भावाची मुलगी प्रिया चोरून पोहायला गेलो माझा कॅंन पियीनेच बांधला , तो नीट बांदला गेला असेल कि नाही याची खात्री करण्याची गरज मनाला वाटलीच नवती कारण पोहण्याचा आनंद लुटण्याचा मोह होता . सगळी मूले एक एक करून विहिरीत उड्या मारू लागली होती पाणी काठोकाठ असल्यामुळे काही मूले तर विहिर्च्या शेजारीच एक झाड होते त्यावर चढून खाली विहिरीत उड्या मारू लागली होती , आणि मी साधारण ७ फुटाच्या उंचीवर एका फौन्डेषण वर उभा होतो ज्यावर विहिर्तील मोटार ठेवतात (पावसाळ्यामुळे मोटार काढून ठेवली होती ) आणि कसलाही विचार न करता ठोकली उडी पाण्यात , ५ ते ७ सेकंदात मी पाण्यावर तरंगू लागलो , विहिराचा जो किनारा होता तो माझ्यापासून जवळ पास ९ फुटावर असावा आणि अचानक जे होऊ नये तेच झाले , कॅंन नीट बांदला गेला नव्हता आणि उडी मारल्यावर पाण्याच्या दबावामुळे कॅंन सुटला आणि अचानक कोणीतरी खालून पाय ओडावे तसा मी पाण्यात खेचला जाऊ लागलो , सगळी मूले घाबरली पण कुणालाच काय करावे कळेना , पिया तर हललीच होती पूर्ण पाने घाबरली ती आणि अचानक ओरडा ओरड सुरु केली तिने , इकडे माझ्या नका तोंडात पाणी जाऊ लागले गटांगळ्या खाऊ लागलो कसाबसा गटांगळ्या खात खात मी ३ ते ४ फुट पुढे सरकलो होतो , मला धड ओरडता येत नव्हते, जीव वाचवण्यासाठी कसा बसा गटांगळ्या खात प्रयत्न करू लागलो होतो , श्वास रोखला जाऊ लागला होता , एक क्षण असे वाटले होते कि यमराज ने त्याचा दोर माझ्या दिशेने सोडला आहे आणि लवकरच मला जलसमाधी मिळेल आणि अवघ्या १२ वर्ष्यात माझ्या जीवनाची दोर कापली जाणार , तिकडे बाहेर पिया पळत पळत शेतातून रस्ता काढत ओरडत ओरडत पळू लागली होती, ते पाहून शेजारीच जय्गोडा च्या गोठ्यात वाद्दराचा मुक्क्या ,(मुक्क्या त्याचे नाव नाही तो जन्मजात मुक्क आणि बहिरा आहे त्यामुळे त्याला सगळी मुक्क्या ) गडी म्हणून कामाला होता त्याला काय झाले आहे हे ओरडण्या वरून कळले नाही पण ती घाबरून पळत जात आहे हे पाहून त्याला अंदाज आला काहीतरी घडत आहे तो अचानक सगळी कामे सोडून विहिरीकडे पळत आला आणि त्याने पाहिजे तर मी जवळ पास गेलोच होतो , अगदी मरण्याच्या फज्जा ला शिवालेच होते तेवढ्यात मुक्क्या ने एका झटक्यात मला पाहून विहिराच्या काठावरुनच सूळ मारून माझ्या पर्यंत पोहचला आणि माझा जीवरक्षका प्रमाणे त्याने मला अलगदच काही क्षणातच पाण्याच्या बाहेर काढले , मी बेशुद्ध होतो पण ठोके चालू होते , मुक्क्या ने प्राथमिक उपाय जे माहित होते त्याप्रमाणे मला पालथे झोपवून पाटीवर दाब दिला, त्यानंतर पोटावर दाब दिला आणि शक्य तितके पाणी बाहेर काढले , तोपर्यंत ही बातमी जयगोंड च्या कुन्त्या अक्का ने आमच्या घरी पोहचवली होती सगळे धावत धावत विहिरीच्या रस्त्याने येतात तोच मुक्क्या मला उचलून आणत होता लगेचच दवाखान्यात नेण्यात आले , पण डॉक्टरांनी तपासून सांगितले कि घाबर्ण्यासारके काही नाही त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढले आहे आणि श्वासोश्वास पण सुरळीत चालू आहे घाबरल्यामुळे तो बेशुद्ध आहे थोड्याच वेळात शुद्धीवर येईल .
अर्ध्या तासाने शुद्धीवर आलो ठीक ठक होतो यमराजाचा फंडा मुक्क्या ने माझ्यापासू तोडून मला जीवनदान दिले होते , मुक्क्या ने गावात वाहवाह मिळवली होती तसेच माझ्या घरच्याच मनात तर हिरोच झाला होता . असेच साधारण ८ ते १० दिवस गेले पुन्हा पोहायला जायला सुरवात झाली पण या वेळी सगळ्यात जास्त लक्ष माझ्या वर असायचे सगळ्याचे आणि अगदी १० च्या दिवशीच मला ही अदभुत कला अवगत झाली .............. कितीही खोल पाण्यात आपण स्वताला पाण्यावर तरंगत ठेवणे , जीवाचे रक्षण करणारी ही कला मला प्राप्त झाली होती पण एकदा मारण्याच्या फज्जा ला शिउन येउन अवगत केली होती .
मला जीवदान देणाऱ्या मुक्क्या चे मी आयुष्यभर आभारी तर आहेच शिवाय मला दुसरा जन्म देणारा तो एक जीवन दाताच होता , आज ही मी गावी गेलो कि मुक्क्या ची आवर्जून भेट घेतो त्याची विचारपूस करतो तो सध्या ४१ वर्षाच्या आसपास असेल पण आर्थिक परीस्तीतीत त्या आणि आत्ताच्या फारसा बदल नाही त्यामुळे मी माझ्या परीने त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो , उपकाराची परतफेड म्हणून नाही पण त्या जीवन राक्षकामुळे माझे आयुष्य आहे तर मला त्याच्या आयुष्यात जेवढे शक्य तितकी मदत करण्याची माझी जबाबदारी समजतो . त्यावेळी तो जर तिथे वेळेत आला नसता तर मी आज हा धागा तुमच्यासमोर कदीच लिहू शकलो नसतो .
त्यावेळच्या अनुभव आठवत आठवत माझा डोळ्याला डोळा लागला आणि सकाळी हा किस्सा मी माझ्या बायडी ला सांगितला .
मित्रानो पाणी हे जीवन आहे पण पाण्यासोबत मस्ती कधीच करू नका . ही माझ्या जीवनातील सत्यकथा आहे आणि काही गोष्टी ह्या दुसर्याच्या अनुभवातून ही शिकता . येतात
तरंगू शकतो फक्त याचा आनंद ही
तरंगू शकतो फक्त याचा आनंद ही इतका झाला होता गावातील जीवन हेच चांगले जीवन अशी माजी समजूत झाली होती
>>>>>
हे मात्र सहमत, हा तरंगण्याचा अनुभव गावाला जेव्हा घेतला तेव्हा असेच वाटलेय..
त्याचबरोबर बुडण्याचा अनुभव देखील घेतला आहे, अगदी मरण बघून आलोय!
(कधीतरी किस्सा नक्की)
आपला अनुभव आवडला, आपण पुन्हा पोहायला शिकलात याचेही कौतुक
पाणी हे जीवन आहे पण
पाणी हे जीवन आहे पण पाण्यासोबत मस्ती कधीच करू नका .>>>> हे एकदम खरं.
ह्या जीवघेण्या प्रसंगातुन सहीसलामत बाहेर पडलात ही खरंतर ईश्वरकृपाच. अनेक अभागी लोकांच्या नशीबात मात्र असे होत नाही.
आपण पुन्हा पोहायला शिकलात
आपण पुन्हा पोहायला शिकलात याचेही कौतुक <<<< धन्यवाद , पुन्हा पोहायला शिकण्याशिवाय पर्याय हि नव्हता गावी सगळीच मुले विहिरीला पोहायला जायची त्यामुळे पुन्हा प्रयत्न करू असे मनाशी ठरवून गेलो पाण्यात उन्दाया.
नेक अभागी लोकांच्या नशीबात
नेक अभागी लोकांच्या नशीबात मात्र असे होत नाही. >>>>>> हो बरोबर, हे हि इतकच खर आहे .
सत्यकथा आवडली आणि सुरवातीचे
सत्यकथा आवडली आणि सुरवातीचे वर्णन आणि कथेचा !!श्री गणेशा !! पण
शेवटचे वाक्य पटले .तुमचा अनुभव भयानक रुप घेउ शकला असता.सुदैवी आहात, कारण आग, पाणी आणि वीज यांच्याशी उगाच (मस्ती)धाडसीपणा करु नये अर्थात असे केल्याने त्या व्यक्तीच्या जीवावर बेतु शकते.
चांगले लिहिलंय.. आता पोहता
चांगले लिहिलंय.. आता पोहता कि नाही ? फोटो पण चपखल आहेत.
सत्यकथा आवडली <<<<<<<<<
सत्यकथा आवडली <<<<<<<<< धन्यवाद सिनी .
चांगले लिहिलंय.. आता पोहता कि नाही ? >>>>>>>>> हो आता पोहतो मी आणि अगदी उत्तम रित्या
सत्य कथा आवडली...पुन्हा
सत्य कथा आवडली...पुन्हा पोहायला शिकलात हे खरचच कौतुकास्पद आहे..
<<<<पाणी हे जीवन आहे पण पाण्यासोबत मस्ती कधीच करू नका .>>>> अगदी खरे आहे.
<<<< फोटो पण चपखल आहेत.>>>>+1
सत्यकथा आवडली
सत्यकथा आवडली
सत्यकथा आवडली>>>>>>>>धन्यवाद
सत्यकथा आवडली>>>>>>>>धन्यवाद निल्या
अगदी अस्सल गावरान कोल्हापूरी
अगदी अस्सल गावरान कोल्हापूरी वातावरणातील कथाकथन. सत्यकथा असल्याने लिखाणाचा बाज असा झाला आहे की जणू काही लेखक विशाल किणीतील मारूती मंदिरा शेजारील कट्ट्यावर बसून इथल्या मित्रांच्यासोबतीने अनुभव विशद करत आहे. घटना खुलविण्याचे कसब छान आहे तुमचे. मी स्वतः स्वीमर असून अगदी पंचगंगेच्या शांत तसेच धो धो वाहाणार्या पुरातही पोहोलो असल्याने एखादा नवशिका मुलगा अचानक पाण्यात हातपाय झाडू लागल्यावर त्याची काय परिस्थिती होत असेल याची कल्पना चटदिशी येतेच.... ज्याच्यामुळे तुम्ही पाण्यातून बाहेर आला त्या मुक्क्याच्या रुपात गावातील एक व्यक्ती अगदी देवदूतासारखाच भेटली असे वाटणे साहजिकच आहे.
छान.. <<पाणी हे जीवन आहे पण
छान..
<<पाणी हे जीवन आहे पण पाण्यासोबत मस्ती कधीच करू नका.>>
पोहता येत असले तरी मस्ती करू नका. पट्टीचे पोहणारेदेखील पाण्यात बुडून मेले आहेत सांगलीच्या कृष्णेत...
लिखाणाचा बाज असा झाला आहे की
लिखाणाचा बाज असा झाला आहे की जणू काही लेखक विशाल किणीतील मारूती मंदिरा शेजारील कट्ट्यावर बसून इथल्या मित्रांच्यासोबतीने अनुभव विशद करत आहे.>>>>>>>मामा तुमी कधी किणीला आला आहात काय ?
घटना खुलविण्याचे कसब छान आहे तुमचे.>>>>>>> धन्स मामा .
पट्टीचे पोहणारेदेखील पाण्यात
पट्टीचे पोहणारेदेखील पाण्यात बुडून मेले आहेत सांगलीच्या कृष्णेत...>>>>>>> हो बरोबर आहे , कितीही पोहत येत असले तरी अति उत्साह नक्कीच नडतो .
मस्त
मस्त
विशाल....किणी घुणकीला येणे
विशाल....किणी घुणकीला येणे होत असे. छ.शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक कदमसर होते, त्यांच्याशी ओळख होती. शिवाय चाळके फॅमिलीही परिचयाची आहे.
चाळके फॅमिलीही परिचयाची आहे
चाळके फॅमिलीही परिचयाची आहे >>>>> म्हणजे ते शिक्षक आहेत (संजय चाळके ) ते काय ?
नाही. इचलकरंजीला मनोहर चाळके
नाही. इचलकरंजीला मनोहर चाळके आहेत....अपना बाजारचे मालक. त्यांचा मुलगा महेश याच्याशी माझ्या भाचीचे लग्न झाले आहे....याचे काका किणीघुणकीत शेती करतात. त्यांच्याकडे एकदा आलो होतो, लग्नाच्यानिमित्ताने.
अपना बाजारचे मालक.>>>>> अपना
अपना बाजारचे मालक.>>>>> अपना बाजार तर वाटार मध्ये आहे अमी तिथूनच घरातले राशन भरतो . त्याचे मालक माझ्या वडिलांच्या चांगल्या परिचयाचे आहेत .
सत्यकथा आवडली.
सत्यकथा आवडली.
धन्स ------- उदय आणि चप्स
धन्स ------- उदय आणि चप्स (हर्ष _)
चांगलं लिहिलंय विशाल
चांगलं लिहिलंय विशाल
गावाकडच्या आयुष्याच्या गोष्टी वाचणं हा एक आनंद असतो. मग कुणाच्याही असो.
लिहीत रहा.
चांगलं लिहिलंय विशाल
चांगलं लिहिलंय विशाल स्मित
गावाकडच्या आयुष्याच्या गोष्टी वाचणं हा एक आनंद असतो. मग कुणाच्याही असो.
लिहीत रहा.>>>>>>>>धन्स सई ताई ,,,,,,, नक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करत जाईन.
सगळंच लिखाण आवडलं खूप.
सगळंच लिखाण आवडलं खूप.
सगळंच लिखाण आवडलं खूप.
सगळंच लिखाण आवडलं खूप. >>>>>>>>>> धन्यवाद दक्षिणा ,,,,,मंडळ आपले आभारी आहे ,
अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहून मला आणकी एकादे लिखाण करावेसे वाटत आहे .!!!
छान कथालेखन!
छान कथालेखन!
सत्यकथा आवडली. लिहित रहा..
सत्यकथा आवडली. लिहित रहा..
सत्यकथा आवडली. लिहित
सत्यकथा आवडली. लिहित रहा..>>>>> हो नक्की
धन्यवाद !!!!!!
खुप सुंदर सत्यकथा.
खुप सुंदर सत्यकथा.
सत्यकथा आवडली. लिहित रहा..
सत्यकथा आवडली. लिहित रहा.. >>>>१
Pages