मासे. (एक मध्यम मासा, किंवा तुकड्या) सुमारे दीड पाव (३००-३५० ग्रॅम)
भाज्या :
२-३ मध्यम बटाटे सोलून स्लाईस करून
१ मोठा टमाटा स्लाईस करून
बेबी कॅरट्स किंवा गाजराच्या स्लाईसेस, अर्धी वाटी
छोटा कांदा, उभा कापून (हा मूळ रेसिपीत नाही, मी घातला होता.)
लिंबाच्या सालासकट २-३ बारीक चकत्या.
एक मिरची (कमी तिखट) लांबट चिरून, बिया काढून. (जास्त जहाल असेल तर घेऊ नका. ढोबळी चालेल)
शर्मूला उर्फ मोरोक्कन मॅरिनेडसाठी:
अर्धी वाटी कोथींबीर, चिरून
असल्यास तितकीच फ्रेश पार्स्ले, किंवा थोडी अजून कोथींबीर + कोरडी पार्स्ले.
अर्धी वाटी टोमॅटो सॉस
पाव कप ऑलिव्ह ऑइल, किंवा तिळाचं तेल. (मी २-३ चहाचे चमचेच घेतलं)
१ लिंबाचा रस
२ चहाचे चमचे लसणाची पेस्ट : ८-१० पाकळ्यांची.
पाऊण चहाचा चमचा जिरं
पाव ते अर्धा चहाचा चमचा लाल तिखट
मीठ, मिरपूड, चवीनुसार.
(भाज्या/लसूण इ. भारतीय साईझनुसार)
अख्खा मासा असेल, तर चिरा देऊन घ्याव्यात.
माशाला / तुकड्यांना मीठ लिंबू लावून थोडावेळ बाजूला ठेवावं.
एका बोलमधे शर्मुलाचे सगळे घटक एकत्र करून घ्यावेत.
ओव्हन १८०-१९० डिग्री सेल्सियसला १० मिनिटे प्रीहीट करावे. टायमर = १ तास टोटल.
ओव्हन सेफ भांड्याला तेलाचा हलका हात लावून त्यात बटाट्याच्या चकत्या, कांदे पसरावेत.
त्यावर थोडा शर्मुला टाकावा. वर मासा ठेवावा. त्यावर उरलेल्यापैकी बराचसा शर्मुला पसरावा.
बाकी टमाटे, गाजर इ. भाज्या वरून रचाव्या, त्यावर बाकीचा शर्मुला घालून पॅनवर अॅल्युमिनियम फॉईल झाकावी व भांडे ओव्हनमधे ठेवावे.
१ तास कशीबशी वाट पहावी.
मग प्रतिक्षेस हे फळ मिळते :
थोडी रसरशीत डिश तयार होईल.
तिखट केली तर पोळी/ब्रेड /भाताबरोबर खाऊ शकता, पण नुसते वन डिश मील म्हणुनही खाता येईल. त्यासाठी थोडा बटाटा जास्त घालावा.
ओव्हन नसल्यास नुसती झाकण ठेवून शिजवता येईल असे वाटते, पण थोडी चव वेगळी येऊ शकते. करून पाहिल्यावर सांगा
सालासकट लिंबाने थोडी कडवट चव येते. आपल्याला आवडणार नाही असे वाटल्यास अगदी थोडीच लिंबाची साल घालावी. पण लेमन झेस्टची चव मस्त लागते यात.
काही लोक शर्मुलाचे घटक तेलावर थोडे गरम करून घेतात.थोडी जास्त खमंग चव येईल.
पाकृ भारी वाटतेय. करून
पाकृ भारी वाटतेय. करून पाहायला हवी. मासा कुठलाही चालतो का यासाठी?
इकाका, आधी मला वाटलं तुम्ही शर्मिला ऐवजी चुकून शर्मूला लिहीलंय. शर्मूला एकदम मि. इंडियाच्या फार्मूला सारखं वाटतंय.
अरे व्वा इब्लिस मस्त दिस्तेय
अरे व्वा इब्लिस मस्त दिस्तेय पाकृ.
मासा कुठलाही चालतो का >>> माझ्या मते नाही , कारण माशाला पाय नसतात.
गटगटेची (कडवे
गटगटेची (कडवे वाल+बोंबिल+गाजर+कांदा+टोमॅटो) बहिण दिसतेय शर्मुला...बोंबिल मुळातच रसदार असल्याने या रेसिपीत एकदम सूट होईल बघा.