१ १/२ कप ओट्स फुड प्रोसेसर मधे पीठ करुन
२ टीस्पून बेकिंग पावडर
१/२ टी स्पून मीठ
१ टे. स्पून साखर
३ १/२ टेबलस्पून तेल - मी कनोला वापरते.
३/४ कप दूध, हे रूम टेंपला असणे महत्वाचे. -
२ अंडी
१ टीस्पून वॅनिला इसेन्स
एका बोल मधे ओट्सचे पीठ, बेकिंग पावडर, मीठ अणि साखर वायर विस्कने एकत्र करुन घ्या. दुसर्या बोलमधे दूध आणि तेल एकत्र करा. त्यातच दोन अॅडी फोडून घाला. वायर विस्क वापरून छान बीट करुन घ्या. आता वॅनिला इसेन्स घालून नीट ढवळा आणि हे मिश्रण ऑट्सच्या मिश्रणात घाला. मोठ्या पळीने ढवळून घ्या. मिश्रण अगदी केक बॅटरसारखे एकजीव होणार नाही. काळजी करु नका. मिश्रण १० मिनिटे झाकून ठेवा. १० मिनिटानी नीट ढवळून घ्या. वाफल मेकर प्री हीट करत ठेवा. गरम झाला की पळीने मिश्रण घालून वाफल्स तयार करा.
मी स्किम मिल्क वापरले. आल्मंड मिल्क वापरले तरी चालेल. दूधाच्या जोडीला अंडीही शक्यतो रुम टेंपला असावीत. लहान मुलांसाठी, वाफल्सच्या मिश्रणात मिनी चॉकलेट चिप्स घालता येतील. चवीत बदल किंवा फेस्टिव करण्यासाठी चिमुटभर पंपकिन स्पाईस घातल्यास छान स्वाद येतो. हे वाफल्स छान फ्रीज होतात. सकाळी टोस्टरमधे गरम केले की झाले.
मस्तच! मुलांना खुप आवडतात,
मस्तच! मुलांना खुप आवडतात, बाहेरच्या पीठापेक्षा हे मस्त आहे.
ओट कुठले स्टील कट की रोल्ड
ओट कुठले स्टील कट की रोल्ड ओट्स? वॉफल्स ओटमुळे चिवट होतात का?
मस्त फोटो..
मस्त फोटो..
मस्त दिसतायत वॉफल्स.
मस्त दिसतायत वॉफल्स. कोपर्यात पांढरट का दिसतायत?
समहाऊ मला वॉफल आयर्नचं टेक्निक कधी जमलंच नाही. शेवटी वैतागून मी कचर्यात टाकली.
वॉव ! मस्त दिसतायेत..
वॉव ! मस्त दिसतायेत..
वॉफल आयर्नचं टेक्निक कधी
वॉफल आयर्नचं टेक्निक कधी जमलंच नाही >>> +१
धन्यवाद. सिंडरेला , रोल्ड
धन्यवाद.
सिंडरेला , रोल्ड ओट्स घेतले.
>>वॉफल्स ओटमुळे चिवट होतात का?>> नाही. दूध आणि अंडी रूम टेंपला असणे महत्वाचे.
>>कोपर्यात पांढरट का दिसतायत?>>
सायो, कोपर्यात बॅटर थोडे कमी झाले त्यामुळे वरच्या बाजूने कॉन्टॅक्ट कमी पडला त्यामुळे कडा कमी ब्राऊन झाल्यात.
ओके. मी आयर्न अजून फेकली नाही
ओके. मी आयर्न अजून फेकली नाही तेव्हा एक प्रयत्न करून बघेन. वॉफल्स खूप आवडतात त्यामुळे फ्रोजन खाते नाही तर आवडीच्या रेस्टॉरंटमधून प्याक करून आणते.
पाकृ आवडली. हेल्दी अन मस्त !
पाकृ आवडली. हेल्दी अन मस्त !
मस्त रेसिपी नक्की करून बघ्णार
मस्त रेसिपी नक्की करून बघ्णार !
सायो आणि सिंडी मी तर वॅफल्स मेकर च्या प्रेमात आहे अगदी थॅन्क्स्गिविंग ला अजून एक खरेदी केलिये.
पहिल्या चौकोनी वर वॅफल्स करताना बॅटर ओसंडून वाहत होते. मला नक्की माहित नव्ह्ते किती प्रमाणात मिश्रण घालायचे. नविन ब्लॅक अॅन्ड डेकर च्या सुचना फॉलो केल्यावर दोन्ही मस्त होताहेत.
फेकून देउ नकोस वॅफल आयर्न सिंडे....त्या वर सँड्विचेस ग्रिल करते. छोटे ऑम्लेट बनवता येते. कसाडियाज पण करते कधी कधी चिज वगैरे टाकून.र्फ्रेन्च टोस्ट पण.
बघायला हवं करून. ओट्स आणि
बघायला हवं करून. ओट्स आणि वॉफल्स दोन्ही आवडतात.
(आणि वॉफल आयर्नपण आवडते. :P)
डॅफो, त्यात ग्रिल बिल करायचं डोक्यात आलं नव्हतं. ट्राय मारणार नक्की.
छान आहे फोटो.
छान आहे फोटो.
त्या वर सँड्विचेस ग्रिल करते.
त्या वर सँड्विचेस ग्रिल करते. छोटे ऑम्लेट बनवता येते. कसाडियाज पण करते कधी कधी चिज वगैरे टाकून.र्फ्रेन्च टोस्ट पण>>संपदा, हे कसं करायचं?
ग्रेट आयडिया. हे नक्की करणार.
ग्रेट आयडिया. हे नक्की करणार.
Also can make waffles out of
Also can make waffles out of pesarattu batter. Masta hotat.
हं...छान दिसताहेत. चवीलाही
हं...छान दिसताहेत. चवीलाही असतीलच.
मस्त दिसतायत ...... सुंदर.
मस्त दिसतायत ...... सुंदर.
पण>>संपदा, हे कसं
पण>>संपदा, हे कसं करायचं?>
प्रिती,
वॅफल आयर्न चालू करून ग्रिन लाईट लागला की अंड्याचं कांदा टोमॅटो किंवा भाज्या घातलेलं मिश्रण घालायचं २ मिनिटात मस्त ऑम्लेट होतं.
अगं सोप्प आहे खूप बिना तेलाचं ऑम्लेट बनवता येतं नक्की ट्राय कर.
टॉर्टीया वर हवं ते फिलिंग घालून ग्रिल करता येतं.
भाज्या भरून सॅन्ड्विच ग्रिल करता येतं... आपण ब्रेड मधे बटाट्याची भाजी भरून करतो ती खमंग सँड्विचेस ग्रिल होतात
आय लव्ह वॅफ्ल्स