Submitted by राजसी on 8 December, 2014 - 02:21
In Bangalore, we suffer due to throat infection a lot. Usually I get infection at least 4 times in a year, by myself. If any family members catches it then it gets transmitted to others. If not an infection then it's a very bad sore throat.
If fever present then Doc writes antibiotics else just betadin / salt water gargles, some paracetamol, de-congestant, inflammation soother, cough syrup etc. prescribed as per the symptoms.
It's not any allergy.
Is there a way to manage the throat infection / sore throat ? ( Don't want to get it in the first place). Thanks.
Sorry for writing in English (my pc needs replacement. )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमची विपू बंद आहे आणि
तुमची विपू बंद आहे आणि तुमच्या नावासमोर तुम्ही 'हू केअर्स' लिहिलेले आहेत. त्यामुळे मनातले विचार तुमच्या विपूत लिहिता आले नाहीत. येथे ते विचार लिहिण्यास मी पात्र नाही, येथे डॉक्टरांनीच विचार लिहावेत. पण मायबोलीवरील तीन वैद्यकीय डॉक्टर्स एका विशिष्ट पानावर ('पुकारता चला हूं मै' च्या चालीवर) 'भडास काढ आपली' हे गीत म्हणत वावरत आहेत.
थ्रोट इन्फेक्शनपासून सुटका होण्यासाठी अनेक शुभेच्छा!
आठ दिवस झाले प्रचंड इनफेक्शन
आठ दिवस झाले प्रचंड इनफेक्शन झालंय... गुळण्या, गरम पाणी पिणं, वाफ घेणे काही व्यायाम ( जीभ बाहेर काढणे व इयर टू इयर हसणे) असे उपाय सुरु आहेत. इथले सल्ले मलाही उपयोगी पडतील.
अलिकडेच एका लेखात डॉ.
अलिकडेच एका लेखात डॉ. उज्ज्वला दळवी यांनी प्रतिजैवके ( अँटीबायोटीक्स ) वर फार भर देऊ नये असे लिहिले आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, हळद घातलेले दूध, गरम अन्न खाणे, थंड पेये व पदार्थ टाळणे, घराबाहेरचे अन्न टाळणे, तेलाबाबत कळजी घेणे ( परत परत न वापरणे ) असे काही उपाय आहेत.
मला सहसा होत नाही, पण घरी पुतण्याला सेप्टीलिनचा फायदा होतो, लहानपणापासून.
शिवाय, सुंठ, मिरी, दालचिनी किंचीत भाजून त्यांची पूड करून ते चाटण मधातून घेतल्यासही फायदा होईल.
एखाद्या पदार्थाची अॅलर्जी आहे का ? ते पण बघून घ्या.
बेफिकीर
बेफिकीर
ज्येष्ठमधनी खूप लवकर फायदा
ज्येष्ठमधनी खूप लवकर फायदा होतो. आवळा दाताखाली कचकच चावून तो रस शोषून घेतला की गळ्याला स्पर्श होतो. त्यानी घसा स्वच्छ होतो. मध आणि निंबू पाण्यात एकत्रित करुन ते गरम पाणी १५ मिनिट घोट घोट पित रहावे.
हे सर्व दर एक दोन तासाला केले की नक्की फरक पडतो. आणि हो वाटण केलेल्या मसाल्याच्या भाजीने सुद्धा घसा मोकळा होतो.
अॅलर्जी असलेला पदार्थ, कृती
अॅलर्जी असलेला पदार्थ, कृती टाळणे. गरम नंतर लगेच थंड किंवा उलट खाणे/पिणे टाळणे. betadine, hexadine, सॉल्ट वॉटर तर आहेतच, पण ठराविक वेदर मध्ये ठराविक वेळेलाच इन्फेक्शन असेल तर त्या वेदरमध्ये गरम मसाला असलेले पदार्थ किंवा बाहेर खाणे/बाहेरचे खाणे टाळा. एका मैत्रिणीला काळ्या मिरी आणि अननसामुळे त्रास व्हायचा.
भाजकी चिंचोकी चघळल्याने फायदा झाल्याचे ऐकीवात आहे.
ज्येष्ठ्मध, आवळा किंवा हे असलेले च्यवनप्राश ई. च्या नियमित सेवनाने फरक पडतो असेही ऐकले आहे.
मला सुद्धा दुखर्या घश्याचा
मला सुद्धा दुखर्या घश्याचा त्रास होतो. मि त्यावर AZICIP-५०० च्या तीन गोळ्या घेतो व त्याने फरक पडतो. एक ते दीड दिवसात घसा दुखायचं थांबतो. तीन गोळ्यांचे पाकीट medical स्टोर मध्ये मिळते. डॉक्टरांचे यावर मत ऐकायला आवडेल.
मी दिवसभर गरम पाणी पितो.
मी दिवसभर गरम पाणी पितो. त्यामुळे घसाला आराम मिळतो.
नुस्त गरम पाणी पिण्यापेक्षा
नुस्त गरम पाणी पिण्यापेक्षा निंबू आणि मध घालून पाणी पिल की अजून फायदा होतो. फायदा म्हणजे नक्की हा की कफ विरघळतो आणि तो बाहेर पडायला मदत होते.
काही दिवसांसाठी /
काही दिवसांसाठी / महिन्यांसाठी सेप्टिलीनच्या गोळ्या नियमित घेऊन बघा. हिमालया फार्मसीचे आयुर्वेदिक औषध आहे. मुलांसाठी सिरप मिळते पण त्यातली औषधे गोळीपेक्षा थोडी वेगळी असतात त्यामुळे मी माझ्या मुलाला जेव्हा देते तेव्हा मधातून गोळी कुटून देते.
हे औषध प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घेतले जाते. अॅलोपथी डॉक्टर्स मुलांना हे औषध प्रतिकारशक्तीसाठी लिहून देताना पाहिले आहे. तसेच एरवी कान-नाक-घशांच्या विकारासाठी दिले जाते.
दिनेश जी आणी अगो सेप्टिलीन
दिनेश जी आणी अगो सेप्टिलीन साठी अनुमोदन. बी तुझे पण बरोबर आहे. ज्येष्ठमधाने घशातली खवखव पण कमी होईल. कोमट पाण्याने घसा पन हळू हळू शेकला जाईल. थन्डीत पाणी प्यावेसे वाटत नाही, पण त्याने इतर प्रॉब्लेम वाढतात. त्यापेक्षा थर्मासमध्ये गरम पाणी भरुन ठेवा आणी ते प्या.
<<आठ दिवस झाले प्रचंड
<<आठ दिवस झाले प्रचंड इनफेक्शन झालंय... गुळण्या, गरम पाणी पिणं, वाफ घेणे काही व्यायाम ( जीभ बाहेर काढणे व इयर टू इयर हसणे) असे उपाय सुरु आहेत. इथले सल्ले मलाही उपयोगी पडतील.>>>
मला आयुर्वेदीक त्रिभुवन किर्ती रस च्या गोळ्या घेतल्याने फरक पडतो, टॉन्सिलचा त्रास देखिल बरा होतो, पहिल्याच गोळिने २ तासानंतर पासुन फरक जाणवायला लागतो.
Thanks all. I have been
Thanks all. I have been following some of the things mentioned above and came to know about few new things.
Befikir, my real first name is राजसी, but social networking site identity paranoia is so high in everyone's mind that no-one believes if someone actually puts real name forward. Hence who cares? I don't regularly check my vipu so disabled it as I don't want any misunderstanding because of non-communication.
थँक्स! मी जवळपास वरील
थँक्स! मी जवळपास वरील सुचवलेले उपाय करतेच आहे माझ्या एका मित्राने सुचवलेले उपाय आज करणार आहे... रात्री झोपतेवेळी आ/हाळीवाची गुळातली खीर खाणे व सरसोतेलात ओवा, मेथ्या व लसूण गरम करुन छाती, घसा व कपाळाला लावून पांघरुण डोक्यावरुन घेऊन झोपणे..
बेफिंना सकाळी दिलेले शाब्दिक
बेफिंना सकाळी दिलेले शाब्दिक टोले जरा जास्तच योग्य जागी बसलेले दिसताहेत. अगदी कळवळून लिहिलंय की कुठच्या कुठे कैच्या कै.
ओ बेफि, हे तुमचं बरळणं तुमच्याच मुक्ताफळांवर हलवा.
भडास काढणं, वगैरे खासगीत करत नाही ब्वा आमच्यात. मी तरी चव्हाट्यावर तिथल्यातिथंच वाजवतो. तेव्हा पब्लिकमधे असली स्टेटमेंट्स करून लोकांमधे गैरसमज पसरवायचे उद्योग करू नका. खासगी गप्पांची लपलेली पानं मायबोलीवर आहेत, अन ती जुन्या लोकांना पक्की ठाऊक आहेत. उगंच इथंतिथं 'इव्ह्स्ड्रॉपिंग' करून आपलीच निंदा ऐकू येणार, मग हे असलं लिहावं लागतं.
सुधरा जरा!
(वरील प्रतिसाद ७+ मिळालेल्या बेफिकिर नामक आयडीच्या प्रतिसादासाठी आहे. धागाविषयाशी संबंध नाही. कुठली भडास कोण कुठे काढतंय ते समजण्यास सूज्ञ मायबोलीकर समर्थ आहेतच.)
धागा काय चर्चा काय! आम्ही
धागा काय चर्चा काय!
आम्ही आपलं आमचं वैद्यकीय ज्ञान वाढवायला इथे आलो तर बेफी वेगळीच धुणी धूत बसलेत.
सुधारा हो.
>>>सुधरा जरा!<<< इब्लिस,
>>>सुधरा जरा!<<<
इब्लिस, सल्ले स्वतःजवळ ठेवा. धन्यवाद
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=_iq-RVD4ZNU&feature=player_detailpage#t=51 मी यात दिल्याप्रमाणे पॉईंटस प्रेस केले.घशाची खवखव बंद झाली.सर्दीही गायब.तसेच गेल्या काही वर्षांत मी १ अपवाद वगळता सर्दी झाल्यास त्रिभुवन किर्तीच्या गोळया घेते.
बेफि, अहो सल्ले नाहीत,
बेफि,
अहो सल्ले नाहीत, शुभेच्छा आहेत त्या.
ज्येष्ठमध!! २ दिवस सतत चघळा,
ज्येष्ठमध!! २ दिवस सतत चघळा, घसा लगेच बरा होईल!
hhomoeopathy ghyaa
hhomoeopathy ghyaa
आमचे फॅमिली डॉक्टर एमडी
आमचे फॅमिली डॉक्टर एमडी आयुर्वेद आहेत. त्यांनी सांगितलेला एक घरगुती उपाय आम्ही नेहमी करतो. थ्रोट इन्फेक्शन होईल असं आपल्याला काही लक्षणांवरुन जाणवतं. तेव्हा हा उपाय केलात तर कदाचित इन्फेक्शन वाढत नाही. एका बशीत दोन-तीन चिमुटभर हळद घ्यायची. त्यात १०-१० जिरे टाकायचे. अगदी कळत-नकळत मीठ घ्यायचे.हे पदार्थ बशीच्या एका टोकाला आणून एकत्र करायचे पाणी कोमट करायचे. बशी तोंडाला लाऊन ठेवायची. आणि वरून हळूहळू त्या पदार्थांवर कोमट पाणी ओतायचे आणि ते प्यायचे. जोपर्यंत ते एकत्रित पदार्थ संपत नाहीत तोपर्यंत कोमट पाणी पीत राहायचे. असं दिवसातून तीन वेळा केलं तर फारच उत्तम. निदान झोपतांना अवश्य करावे. त्यावर परत पाणी प्यायचे नाही.
थोडीशी हळद आणि गुळ चांगलं एकत्र करुन त्याच्या हरबर्याच्या डाळीएवढ्या छोटुशा गोळ्या बनवायच्या. आणि साधारण तासा-दोन तासांनी चघळायच्या. शक्यतो गरम पाणी प्यायचे.
आल्याचा छोटुसा तुकडा तोंडात ठेवायचा. खोकला येईल असं वाटलं तर लगेच दाताखाली चावायचा आणि रस पिऊन घ्यायचा. तो तुकडा बराच वेळ तोंडात ठेवला तरी चालतो. फक्त फरक पडला म्हणून सतत आले खायचे नाही.
हे सगळे उपाय आम्ही करतो.
मोरोपंतांनी खोकला शमनार्थ एक
मोरोपंतांनी खोकला शमनार्थ एक आर्या रचली आहे , ती सोअर थ्रोटलाही चालते का हे एकदा पाहिले पाहिजे
'स्वस्त्री घरात नसता कण्डु शमनार्थ रण्डिरा खावी | तीही घरात नसता स्वहस्ते चिबुल्ली दाबावी ||'
रण्डिरा - साखर चिबुल्ली=
रण्डिरा - साखर
चिबुल्ली= कण्ठाचा उंचवटा- ऍडम्स ऍपल
कण्डु = खोकला