कॉर्न पकोडे

Submitted by स्वाती२ on 24 November, 2014 - 11:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ कप स्विट कॉर्न दाणे - मी फ्रोजन वापरते.
३/४ -१ कप डाळीचे पीठ
१ टी स्पून जीर्‍याची पावडर
तिखट किंवा हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे
मीठ चवी प्रमाणे
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

मक्याचे दाणे प्रोसेसर मधून भरड वाटून घ्यावे. मिरच्या वापरणार असाल तर त्याही या मिश्रणात घालून एकदा फिरवून घ्यावे. गरज वाटल्यास १-२ चमचे पाणी घालायला हरकत नाही. बोलमधे काढून घेवून त्यात जीरे पावडर आणि वापरणार असाल तर चवीप्रमाणे तिखट घालावे . आता त्यात एका वेळी साधारण १/४ कप अशा बेताने बेसन घालत मिक्स करावे. चमच्याने साधारण भज्यासारखे घालता येइल अशी कंसिस्टन्सी येइल इतपत बेसन घालून घ्यावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. कढईत तेल गरम करावे. चमच्याने तेलात पकोडे घालून मिडियम हाय आचेवर गोल्डन रंगावर तळावेत. हे पकोडे तेल पीत नाहित. तिखट चटणी, सॉस बरोबर किंवा नुसतेही छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
खाऊ तसे
माहितीचा स्रोत: 
माझी वही
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो हवेतच!

माझ्याकडून मिक्सरमधे भरड कधीच वाटले जात नाही. लगेच बारीक होते डाळ. हळूहळू मिक्सर फिरवले तर डाळ जाड राहते आणि जोरात फिरवले तर डाळ पेस्ट होते.

.

बेफी, Happy
मी नवखी होते तेव्हा एक बॅच ब्राऊन रंगावर तळली - करपवली - होती. त्यामुळे गोल्डन रंगावर तळणे अशी वहीत नोंद झाली.
मिनू, गव्हाचे पीठ वापरुन ट्राय करीन. एका पिल्लाला डाळीच्या पिठाची अ‍ॅलर्जी आहे. त्याच्यासाठी छान पर्याय मिळाला. धन्यवाद.

यात मैदा वापरणे योग्य होईल. एक उकडलेला बटाटा ,थोडा बारीक चिरलेला कांदा,आलंलसुण पेस्ट टाकल्यास आणखी तिखट चव येईल.

धीरज, कॉर्नचा गोडवा आणि मिरचीचा तिखटपणा हा कॉन्ट्रास्ट ही या पकोड्याची खासीयत. एकसंघ चवी ऐवजी चवींचे दोन थर अपेक्षित आहेत.

मी आजच बनवलेत...मस्त लागतात हे पकोडे..... मी कणीक वापरून केले. कांदा, आलं, कढीपत्ता पण घातला. मुलाला डाळीच्या पिठाची अ‍ॅलर्जी आहे. त्याच्यासाठी छान पर्याय मिळाला. धन्यवाद स्वाती२.