१) केल (सिंगापुरमधे ह्या भाजीला काईलान म्हणतात. चायना मधे चायनीज केल अथवा चायनीज ब्रोकोली अशीही नावे प्रचलित आहेत.)
२) बेसन पीठ - ४ चमचे
३) फोडणीचे साहित्य - मिरची, हळद, लसूण, कांदा, मोहरी, जिरे, मेथी, पंचपुरण
४) तेल
५) मीठ
१) केल पाण्याखाली धूवून नंतर नीट चिरुन घ्या.
२) चिरलेली केलः
३) फोडणीचे साहित्य निवडून/चिरुन घ्या. मी ओली हळद जास्त वापरतो. पुड सहसा वापरत नाही.
४) बेसन पिठ ताव्यावर भाजून घ्या किंवा कढईत भाजले तरी चालेल. आधी तावा/कढई मंदे आचेवर गरम होऊ द्यावा आणि नंतर चहूबाजूते तेल पसरले इतपत तेल टाकावे. असे केले की पिठ जळत नाही. पिठ भाजताना सतत हातातील सरट्याने पिठाला अरतपरत करत रहायचे. पिठाचा खरपुस वास यायला लागला की ते पिठ वाटीत काढून घ्यावे. जर आच बंद करुन कढईत वा ताव्यावरच पिठ ठेवले तर ते हमखास जळेल.
५) भाजीला फोडणी देऊन. भाजी शिजत आली की भाजीत बेसन घाला. भाजी आणि बेसन नीट मिसळवा. मंद आचेवर पातेल्यावर झाकण घालून एक वाफ आली की आच बंद करा. लगेच भाजी ढवळू नका. जेंव्हा वाढायला घ्याल तेंव्हाच परत पळीने एक हात फिरवा.
१) कच्चे बेसन घालू नका. त्यानी भाजी गच्च गोळा होते. शिवाय कच्चे बेसन खाऊन कदाचित पोट बिघडू शकते.
२) मी बेसनाच्या पदार्थात ओवा घालतो.
३) कोणत्याही भाजीला पीठ पेरायचं असेल तर जरा जास्त तेलाची फोडणी करायची.
(कॉन्व्हर्सली कधी चुकून जास्त तेल घातलं गेलं तर पीठ पेरायचं. )
४) चकलीचे पिठ उरले असेल तर तेही घालता येईल. पण पारंपरिक कृतीमधे बेसनचं असते.
५) भाजी ऑल्मोस्ट शिजत आली की पीठ पेरायचं, मग एक वाफ काढायची, आणि मग खरपुस आवडत असेल तर झाकण काढून थोडा वेळ परतायची - विशेषतः विकतच्या फाइन बेसनासाठी हे करावंच, नाहीतर खाताना पीठ घोळतं.)
वाह! मस्त दिसतेय भाजी. अत्यंत
वाह! मस्त दिसतेय भाजी. अत्यंत उपयुक्त टिप्स! बेसन भाजून घेण्याची आयडिया आवडली! बेसन कच्चं राहण्याच्या भीतीने मी पीठ पेरून भाज्या फारश्या करत नाही. आता भाजून घेऊन नक्की करून बघेन!
तयार भाजीचा फोटो छान दिसतोय.
तयार भाजीचा फोटो छान दिसतोय. पण माझं नाव माहिती स्त्रोतात का? मी तुला ही रेसिपी सांगितल्याचं आठवत नाही. इनफॅक्ट मी केलची भाजी आजवर केलेली नाही. फक्त सॅलडमध्येच खाल्लं आहे.
ह्म्म..आता पीठ भाजून घालून
ह्म्म..आता पीठ भाजून घालून केल्या पाहिजे भाज्या. पण कांद्याची पीठ पेरुन अशी भाजी करताना बेसन शिजायला वेळ नाही लागत. पटकन होते भाजी.
सायो, गुरुवारी सकाळी तुम्ही
सायो, गुरुवारी सकाळी तुम्ही टिपापावर चर्चा करत होता पीठ पेरुन भाजी कशी करायची त्याबद्दल. तो संदर्भ आठवला तर तुला तुझे नाव का अॅड केले ते लक्षात येईल. असो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
बी छानच आहे रेसिपी... फोटो तर
बी छानच आहे रेसिपी... फोटो तर अप्रतिम.
छान फोटो.. माझ्याकडे मर्यादीत
छान फोटो.. माझ्याकडे मर्यादीत बेसन असल्याने डाळ घालूनच करावी लागते.
काईलान तामिळ शब्द आहे का ?
मस्त! लवकरच केल केलं जाईल
मस्त! लवकरच केल केलं जाईल
आजच ही भाजी केली तुझ्या
आजच ही भाजी केली तुझ्या कृतीप्रमाणे. फारच मस्त झाली. नक्की परत करणार.
भाजी बघुन तोंडाला पाणी सुटल
भाजी बघुन तोंडाला पाणी सुटल
ब्रॉकली आणि केल एकच आहे का??
नाही दोन्ही भिन्न आहेत. पण
नाही दोन्ही भिन्न आहेत. पण ह्या भाजीला दोन्हीचे रुपरंग आहे
दिनेशदा, काईलान हे ह्या
दिनेशदा, काईलान हे ह्या भाजीचे चिनी नाव आहे.
आजच ही भाजी केली तुझ्या
आजच ही भाजी केली तुझ्या कृतीप्रमाणे. फारच छान झाली. धन्यवाद बी.
खूप मस्तं खमंग दिसतेय भाजी.
खूप मस्तं खमंग दिसतेय भाजी. ओली हळद वापरण्याची आयडिया आवडली.
अशीच भाजी ज्यांना बेसनाची आलर्जी आहे किंवा पचत नाही त्यांच्यासाठी मी मुगाचे पीठ वापरुन करते. अर्थात बेसन टाकून जेव्हडी चवदार लागते तेव्हडी नाही लागत पण एक बेसनाला पर्याय म्हणून मुगाचे पीठ ठीक आहे.
हमरे पिंपरी में मिलताच नही ये
हमरे पिंपरी में मिलताच नही ये भाजी!
फोटो छान!