१ वाटी साखर
पाऊण वाटी तूप
१ कप दूध ( आपण भरतात वापरतो तो चहाचा कप)
मैदा/ गव्हाचे पीठ साधारण अर्धा ते पाऊण किलो.
तळण्यासाठी तेल किंवा तूप.
मैदा नको असेल तर गव्हाच्या पीठाचेही छान होतात.
मैदा चाळून घ्यायचा.
परातीत किंवा मोठ्या भांड्यात साखर घ्यायची (पिठीसाखर नाही बरं का! ).
तूप गरम करुन साखरेत ओतायचे.
ते परातीत हाताची पाची बोटे पसरुन फिरवत रहायचे. एगबिटर असेन तर त्याने ही मिक्स करू शकता.
ह्यात थोड्या प्रमाणात साखर वितळते. ह्यात गरम दुध टाकायचे आणि आणि पुन्हा हाताची बोटे पसरवुन साखर विरघळेपर्यंत हलवायचे.
आता हात फिरवतच ठेवायचा आणि थोडे थोडे करुन मैदा टाकत जायचे.
जेवढा मैदा बसेल तेवढाच घालायचा. चांगले मळुन घेऊन लगेच लाटायला घ्यायचे.(थोडा वेळ ठेवून लाटायला घेतेलेत तर शंकरपाळे विरघळतात.)
थोडी जाडसरच पोळी लाटायची. लाटतानाच पोळीला पुड सुटल्याचे जाणवते.
शंकरपाळे कापून घ्यायचे. सगळे करुन झाले की मध्यम आचेवर तळायचे.
अगदी खुसखुशीत, छान शंकरपाळे होतात. शिवाय तूपकट होत नाहीत. तळायलाही जास्त तूप लागत नाही,
मापासाठी घेतलेली वाटी ही आपण भारतात वापरतो ती स्टीलची वाटी.
फोटो जुन्या मायबोलीत आहेच. दिवाळीसाठी केले की इकडे नवा फोटो देईन.
अरे वा, फराळाला सुरवात झाली
अरे वा, फराळाला सुरवात झाली पण ! ( कुकूची मदत असणारच )
सुरवात नाही अद्याप. होय तर.
सुरवात नाही अद्याप.
होय तर. कुकूची मोलाची मदत असते. करताना आणि केल्यानंतर सुद्धा.
हमखास रेसिपी आहे. माझ्या
हमखास रेसिपी आहे. माझ्या वहीमध्ये पहिल्या पानावर आहे.
पहिल्यांदा एकटीने शंकरपाळे केलेत ते याच रेसिपीने. आजवर कधीच चुकले नाहीत. बरे झालेस इकडे आणलीस.
हमखास रेसिपी आहे. माझ्या
हमखास रेसिपी आहे. माझ्या वहीमध्ये पहिल्या पानावर आहे.
पहिल्यांदा एकटीने शंकरपाळे केलेत ते याच रेसिपीने. आजवर कधीच चुकले नाहीत. बरे झालेस इकडे आणलीस.>>>>>>>>> हे असे प्रतिसाद वाचले की रेसिपी हमखास ट्राय केली जाते.. अर्थात ही रेसिपी ट्राय करायला आताच मिळणार नाही.. पण जेव्हा जमेल तेव्हा नक्की प्रयत्न करणार
(थोडा वेळ ठेवून लाटायला
(थोडा वेळ ठेवून लाटायला घेतेलेत तर शंकरपाळे विरघळतात.)>>>>>>> नलिनी माझे प्रमाण तुम्ही दिल्याप्रमाणेच आहे.पण दूधा ऐवजी पाणी घेते.पाणी +साखर+तूप एकत्र उकळून थंड झाल्यावर त्यात मावेल इतका मैदा घालायचा . २ तासांनी लाटायचे.कुरकुरीत न होता खुसखुशीत होतात.यावेळी तुम्ही लिहिल्याप्रमाणे
कणीक + दूध घालून पहाते.
थँक्स नलु रेस्पी इकडे
थँक्स नलु रेस्पी इकडे टाकल्याबद्दल. प्रिंसेसचा प्रतिसाद वाचून हिंमत करू म्हणतेय. नाहीतर आतापर्यंत आयतोबाच आहे
देवकी +१ यात बदल फक्त हाच की
देवकी +१
यात बदल फक्त हाच की लगेच करा / २ तासाने करा / २ दिवस फ्रीजमधे ठेवुन करा छानच होतात
अर्रे व्वा, दिवाळी आली या
अर्रे व्वा, दिवाळी आली
या पद्धतीने करुन बघणार यंदा!
मस्तच!
मस्तच!
कोणी करणार असेल तर वाटी साखर
कोणी करणार असेल तर वाटी साखर अन कप दुध याचं कन्व्हर्जन एकच भांडी वापरुन करुन देइल का? म्हणजे तेच भांडं वापसुन किती साखर अन किती दुध ते? शक्य असल्यास किती मिली दुध अन किती ग्रॅम साखर पण प्लीज..
धन्यवाद सर्वांना! देवकी, हे
धन्यवाद सर्वांना!
देवकी, हे सुद्धा खुसखुशीतच होतात. मी अगदी जुन्या मायबोलीत कुरकुरीत शब्द वापरला आणि इथे तसाच कॉपी पेस्ट केला.
चिमुरी, आपण भारतात जी स्टीलची वाटी वापरतो ना ती घेते मी. एक वाटी साखर, पाऊण वाटी तूप, एक ते सव्वा वाटी गरम दूध. हे प्रमाण घेतले तर साधारण अर्धा ते पाऊण की. मैदा लागतो.
ओक्के नलिनी.. धन्स
ओक्के नलिनी.. धन्स
Ho.chanach hotat ase s.pale.
Ho.chanach hotat ase s.pale. mazehi hech praman aahe. Fakta kartana me pithi sakhar, tup, dudh food processor madhe ghalte te on karun mavel tasa maida ghalat jate.aapale shram ani vel donhi vachtat.
वर फोटो डकवलाय आज.
वर फोटो डकवलाय आज.
मस्तच नलिनी !! तुपा एवजी तेल
मस्तच नलिनी !! तुपा एवजी तेल वापरले तर चालेल का?
me_mastani, तूपाऐवजी तेल
me_mastani, तूपाऐवजी तेल वापरून पाहिले नाही कधी.
पण तळण्यासाठी तेल वापरते मी.
केवढे सुंदर एकसारखे तळले आहेत
केवढे सुंदर एकसारखे तळले आहेत शंपा. केले पाहिजेत आता
)लय भारी वेळेला धागा
)लय भारी वेळेला धागा सापड्ला. सन्ध्याकाळी ५-६ ला भूक चाळवते. काहीतरि तोन्डात टाकायला करायला हव असा विचार येत होता मनात. उद्याच करेन.
कणिक घालूनही खुसखुशीत होतात
कणिक घालूनही खुसखुशीत होतात का? कि मऊ पडतात?
रोचीन, कणकेचेही मस्त खुसखुशीत
रोचीन, कणकेचेही मस्त खुसखुशीत होतात.
हे असे.
वा! मस्त दिसतायत... आता हेच
वा! मस्त दिसतायत... आता हेच करून बघेन... त्वरित उत्तराबद्दल धन्स! केले कि कळवेनंच!
नलीनी मान गये, काल office
नलीनी मान गये, काल office मध्ये ही रेसीपी वाचली, सकाळी office मध्ये येण्याआधी केली पण, अतिशय खुसखुशीत झाले माझे शंकरपाळे!! All credit goes to you...... Thank you so much... मेरे नाम पे लागा १२ साल पुराना दाग ( शंकरपाळे बिघड्ने का) तुमने धो दिया... साबाना पण आवड्ले.(तसे त्याना मझ्या हातचे कमीच आवड्ते)
mi suddhaa pahilyaaMdaa
mi suddhaa pahilyaaMdaa shankara paale banavale te yaach recipe ne . Khup chhan hotaat ya paddhatine
नलिनी मी सुद्धा परवा केलेत..
नलिनी मी सुद्धा परवा केलेत.. ईतके छान या पुर्वी कधीच झाले नव्हते, त्यामुळे पा. कृ साठी अनेकानेक धन्यवाद..
फोटो उद्या नक्की देते.
करून पाहीन..
करून पाहीन..