Submitted by पियू on 11 October, 2014 - 10:57
माझ्याकडे मायक्रोमॅक्सचा अँड्रॉईड फोन आहे. त्यात विकत घेतांना मी २ जीबीचे कार्ड घातले होते.
आता मला ८ जीबीचे कार्ड घालायचे आहे.
सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे मी सगळे अॅप्स फोन मेमरीत मुव्ह (Move) करायचा प्रयत्न केला पण फोन मेमरीत इतकी जागा नाहीये (तरीपण पीसीला जोडल्यावर ते "1.25 GB Free of 1.86 GB" असं दाखवतंय. )
असो.. तर मी सरळ सरळ जुने SD कार्ड पीसीला जोडुन सगळा डेटा पीसीत घेऊन मग तो नव्या SD कार्डमध्ये कॉपी करुन घेऊ का? हि सेफ पद्धत आहे का? जुन्या SD कार्ड मधला डेटा जाणार नाही ना?
केवळ फोटो किंवा व्हिडिओ असते तर मी सहज बॅकअप घेतला असता. पण अॅप्सचा (जीमेल, गेम्स, वेगवेगळे रिमाईंडर अॅप्स, हेल्थ मॉनिटरींग अॅप्स इ. ) डेटा कुठे असतो माहित नाही. तो लॉस होण्याची शक्यता नाही ना?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
1.फोन मेमरीतला काही भाग
1.फोन मेमरीतला काही भाग अॅप्ससाठी राखून ठेवलेला असेल तो फ्रीम्हणूनच दाखवेल तिथे डेटा (फोटो वगैरे )बहुतेक नाही जाणार. 2.अॅप्स मेमरी कार्डवर आहेत ?
लॉस होण्याची शक्यता
लॉस होण्याची शक्यता आहे.
फोनचे मॉडेल कोणते आहे?
1.फोन मेमरीतला काही भाग
1.फोन मेमरीतला काही भाग अॅप्ससाठी राखून ठेवलेला असेल तो फ्रीम्हणूनच दाखवेल तिथे डेटा (फोटो वगैरे )बहुतेक नाही जाणार.
>> ओके.
2.अॅप्स मेमरी कार्डवर आहेत ?
>> हो.
फोनचे मॉडेल कोणते आहे?
>> मायक्रोमॅक्स युनाईट २ (मायक्रोमॅक्स ए१०६)
आता मी मोबाईल पीसीला जोडून सगळ्याच्या सगळ्या फाईल्स पीसीवर कॉपी करण्याचा प्रयत्न केला. पण काही अॅप्सच्या डेटा फाईल्सची नावे खुप मोठी (लांबलचक) आहेत. त्यामुळे त्या फाईल्स कॉपी होत नाहीयेत पीसीवर. यासाठी काय करू?
सगळ्यात सोपा उपाय टायटॅनियम
सगळ्यात सोपा उपाय टायटॅनियम बॅकप वापरायचा आहे. पण त्यासाठी फोन रूटेड लागतो.
तो असला तर नॅन्ड्रॉइड बॅकप घेऊनही चालते.
*
अॅप्स ची यादी करा.
जीमेल, फोनबुक, चा डेटा कधीच कार्डवर नसतो.
व्हॉट्सॅप चा डेटा कार्डवर आहे. त्याची काळजी करू नका. हवे तेवा जुने कार्ड टाकून पहाता येईल. व्हॉट्सॅपमधेच बॅकपची सोय आहे.
बरीच अॅप्स फोन मेमरीत इन्स्टॉल होतात अन त्यांचा डेटा कार्डवर ठेवतात.
जितकी अॅप्स महत्वाची वाटतील तितकी सेटींग्स->अॅप्लिकेशन्स मधे जाऊन फोन मेमरीत शिफ्ट करा.
बिन्धास्त कार्ड बदलून कोणती अॅप्स नीट चालताहेत ते पहा. अमुक अॅप महत्वाचे होते अन चालत नाहीये असे वाटले तर त्या अॅपच्या नावाचा फोल्डर जुन्या कार्डवरून पीसीवर अन तिथून नव्या कार्डवरल्या फोल्डरमधे कॉपी करा.
इतनी मगजमारी? ॲंड्राॅयडवाले
इतनी मगजमारी? ॲंड्राॅयडवाले अभिभी बादलोंतक पहुचे नहि क्या?
फॅनबॉईज डोन्ट हॅव अॅन ऑप्शन
फॅनबॉईज डोन्ट हॅव अॅन ऑप्शन ऑफ एस्डी कार्ड्स आय थिंक
आपल्याला इंटर्नल मेमरी एक्स्पांड करायचा ऑप्शनच नाहिये. नाही का? मागे मागे फिरणं बंद करा ब्वा. बोअर व्हायला लागलंय आता.
हा प्रश्न विंडोज ८.१ मध्ये {
हा प्रश्न विंडोज ८.१ मध्ये { लुमिआ ६३० ,७३०}सोडवून टाकलाय अॅप्स कुठेही ठेवा. आणि डेटा क्लाउडमध्ये ७जीबी ,फोन मे ८जीबी.
दुसरा एखादा फोनवापरून ब्लूटुथने काम करून पाहिले का ?
माझ्यामते, जीमेल अन वॉअॅ चा
माझ्यामते, जीमेल अन वॉअॅ चा डेटा क्लाऊडवर असतोच, सो एकदा फोन वायफायवर कनेक्ट करून बॅकअप घ्या अन मग कार्ड बदला. काही झालं तरी क्लाऊडवर डेटा असेलच.
तुम्ही सरकारी अधिकारी, मोठ्या
तुम्ही सरकारी अधिकारी, मोठ्या हुद्यावर बैंकेत, सैन्यात, संरक्षण खाते, एटॉमिक एनर्जी वगैरेमध्ये असाल तर क्लाऊड स्टॉरिजपासून दूरच राहा.
अॅप्सचे डॉट एपीके फाइल्स
अॅप्सचे डॉट एपीके फाइल्स असतात ते पीसी मध्ये स्टोअर होउ शकतील की?
नाहि होत का?
Majha phone (xolo opus1000)
Majha phone (xolo opus1000) decrypt kelay but tyamule majha memory card ya phone madhe chalat nahi ani play store madhun downloading
Updating sudha hot nahiye kay karta yeil?
धागासोडूनचा मुद्दा संपादित
धागासोडूनचा मुद्दा संपादित केला आहे.
या विषयाकरता नवा धागा काढला
या विषयाकरता नवा धागा काढला तर बरे होईल. हा धागा हायजॅक नको. शिवाय माहिती गाडली जाईल.
>>तुम्ही सरकारी अधिकारी,
>>तुम्ही सरकारी अधिकारी, मोठ्या हुद्यावर बैंकेत, सैन्यात, संरक्षण खाते, एटॉमिक एनर्जी वगैरेमध्ये असाल तर क्लाऊड स्टॉरिजपासून दूरच राहा. <<
एफवायआय: वाॅटेवर ट्रॅवल्स थ्रु एयर, कॅन बी इंटरसेप्टेड. क्लाउड तो दूरकी बात है.
Remove the card from your
Remove the card from your phone and copy all the data to a new folder on your PC.
When you open the card on your PC, you will see "Android", "Recycler", "DCIM", etc.. folders along with other folders.
Once you copy all the folders frm old card to your PC, remove the card and insert new card. Now copy everything to the new card from your PC and put the card in your phone.
No need to cut paste or remove data from old SD card.
I recently did the same when I moved data from samsung galaxy to sony xperia.
Do not connect the phone to your PC and copy the data, it won't work for your apps. Only photos and songs, etc can be copied this way.
तुमच्या सगळ्यांच्या
तुमच्या सगळ्यांच्या सल्ल्यासाठी आभार.
मी घिस्यापिट्या पद्धतीने जुन्या कार्डवरील सर्व फाईल्स पीसीवर कॉपी करुन घेतल्या.
आणि मग त्या सगळ्या फाईल्स नवीन कार्ड मध्ये कॉपी केल्या.
जीमेल, हँगआऊट, गुगल सर्च हे तिन्ही डेटा क्लीअर केले.
माझे काम झाले. आभार.
वर प्रिती विराज यांनी सांगितलेला प्रॉब्लेम मलाही येत आहे. म्हणजे अॅप्स अपडेट करायला जाते तर फोन मेमरीमध्ये इनसफीशिअंट स्पेस असे सांगतेय. मी सगळे अॅप्स कार्डवर मुव्ह केलेत. तरीपण असे का? नवीन कार्डमध्ये भरपुर रिकामी जागा आहे. काय करु?
(यासाठी वेगळा धागा काढू का?)