Submitted by Sakshi M on 25 September, 2014 - 03:01
माझ्या घरी मी २ महिन्या अगोदर झेंडुचे झाड लावले होते... ते थोडे मोठे झाले त्याला पान सुध्धा फुटली पण अजुन त्याला फुले आली नाहि आहेत? कोणी मला सांगु शकेल का कि साधारण किती दिवस लागतात फुले यायला? आणि फुले येण्यासाठी कोणते उपाय करावे?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साधारण नवरात्रीत फुले यायला
साधारण नवरात्रीत फुले यायला हवी. झेंडूत दोन प्रकार असतात. एक फ्रेंच आणि दुसरा आफ्रिकन. फ्रेंच प्रकारात लवकर फुले लागतात, आफ्रिकन प्रकारात जरा वेळ लागतो. तरी २/३ महिने म्हणजे फार झाले. झाड जर झेंडूचेच असेल तर दिवाळीपर्यंत वाट बघता येईल.
थांबा कि जरा. मोठं तर होऊ
थांबा कि जरा. मोठं तर होऊ द्या झाडाला .
नर्सरीत खताच्या पिशव्या
नर्सरीत खताच्या पिशव्या मिळतात त्यातले अगदी थोडे टाकून पहा
दिनेशदा झाड झेंडुचेच आहे.पण
दिनेशदा झाड झेंडुचेच आहे.पण झेंडुची फुले मात्र कायब आहेत....
नर्सरीत खताच्या पिशव्या
नर्सरीत खताच्या पिशव्या मिळतात त्यातले अगदी थोडे टाकून पहा.....धन्यवाद डीविनिता
आता हा प्रयोग करुन बघते पाहुया फुले येतात का ते...
साक्षी, झेंडु ला फुल हमखास
साक्षी, झेंडु ला फुल हमखास येतात... आपण साधं निर्माल्य जरी झाडात टाकल तरी त्याच रोप तयार होऊन छान
फुलं लागल्याचा माझा अनुभव आहे... त्यामुळे निराश होऊ नका... दिनेश दा सांगतायत त्या प्रमाणे दिवाळी पर्यंत
फुल यायला हवी...:)
मोहिनिताई अजुन किती थांबु?
मोहिनिताई अजुन किती थांबु?
धन्यवाद Sayali Paturkar
धन्यवाद Sayali Paturkar
झाडाचा धर्म भ्रष्ट करा लगेच
झाडाचा धर्म भ्रष्ट करा
लगेच एका आठवड्यात फुल येतील
गेल्या वेळेस मी झेंडूची झाडं
गेल्या वेळेस मी झेंडूची झाडं लावली होती. खात बित काही घातलं नवता तरी छोट्या छोट्या झाडांना किती फुलं यायची . थांबा आता मीच झेंडूची झाडं लावते आणि बघते किती दिवसात फुलं येतात ते
Tumchya zadala uun bharpur
Tumchya zadala uun bharpur lagteka? Nasel tar aase hou shakte
सुभाषिणी... झाडाला ऊन भरपुर
सुभाषिणी... झाडाला ऊन भरपुर लागते.
त्या झाडाला चांगलं उन मिळतय
त्या झाडाला चांगलं उन मिळतय का
ख़त म्हणून ओला कचरा ही चालेल
माझ्याकडची झाडं ४-५ फूट उंच वाढतात
छान फुलं येतात
माझ्याकडे घरातल्या बाल्कनीत
माझ्याकडे घरातल्या बाल्कनीत दोनच मोठ्या कुंड्या आहेत आणि एकात बेसिल चं मोठं झाड आहे. तिथेच खिडकीत ठेवलेल्या वाळलेल्या फुलांमधली बी तिथे पडली की काय ते माहित नाही पण मध्ये फुगवटयावर उभ्या अगदी छोट्ट्या पाकळ्या आणि बाजूला फक्त मोठ्या रुंद आठ पाकळ्या असलेलं केशरी रंगाचं (पानंही झेंडूसारखीच आहेत) फूल येणारं रोप आपणहून आलं आहे. साधारण गणपतीत फुलायला लागलं आणि आता एकाच वेळेस सात-आठ फुलं झाडावर आहेत.. खत वगैरे काहीच घातलेलं नाही.. भाज्या धुतलेलं पाणी किंवा तांदूळ धुतलेलं पाणी मात्र घालते जमेल तेव्हा.. माझ्या खिडकीत ठेवलेली फुलं गेल्या पाडव्याला आणलेल्या झेंडूच्या (नेहेमीचा गोल फुलणारा झेंडू) तोरणापैकी आहेत. त्यामुळे हे फूल नेमकं कुठून आलं कळत नाही पण आपणहून आलं होतं म्हणून तसच वाढू दिलं होतं.. आता पाच वर्षाच्या लेकाचा फुलं मोजायचा रोजचा उद्योग झाला आहे.
झेंडुची झाड जर जमिनीत /कुंडीत
झेंडुची झाड जर जमिनीत /कुंडीत लावली असतील तर पाणी तोडणे हा एक खात्रीलायक उपाय आहे अस म्हणतात. काही झाडे पाणी तोडल्याशिवाय फुले/फळे लागत नाहीत.
सुरवातीला एक दिवसा आड पाणि घालुन बघा. झाड मरणार नाही इतकच पाणी द्या.
झाड जमिनीवर असेल तर हा उपाय लागु पडेल असे वाटते.
सोनचाफाजी मस्तच....
सोनचाफाजी मस्तच....
झाडाचा फोटो टाकल्यास कारण
झाडाचा फोटो टाकल्यास कारण समजण्यास मदत होईल
नविन, पाणी तोडणं हा फुलं
नविन, पाणी तोडणं हा फुलं येण्यासाठीचा उपाय असतो हे ऐकून आश्चर्य वाटलं. खरच कधी ऐकलं नव्हतं..