कुरमुरे (एक मोठे पाकीट), भरपूर / आवडीनुसार लसूण, आवडीनुसार कढिपत्ता, आवडीनुसार/ चवीनुसार/ घरातल्या माणसांच्या वयोगटानुसार हिरव्या तिखट मिरच्या, हळद, मीठ, हिंग, मोहरी.
ऑप्शनल : शेंगदाणे, डाळे, सुकं खोबरं.
कुरमुरे नीट निवडून, पाखडून घ्या. कढिपत्ता नीट धुऊन सुकवून घ्या. मिरच्या धुवून, सुकवून बारीक कापा. डोळे चोळा ........ यचे असतील तर हात साबणानं धुवून घ्या आणि मग चोळा. लसणाचं म्हणाल तर घालाल तितका थोडाच. लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्या किंवा ठेचून घ्या.
एका मोठ्या कढईत कुरमुरे घालून व्यवस्थित भाजून घ्या. अधूनमधून चार कुरमुरे तोंडात टाकून पहात रहा. कुरकुरीत भाजले गेले, थोडा रंग पालटून सावळ्यावर गेले की परातीत पसरून काढा. (कुरमुरे पसरा.)
मग त्या कढईत २ ते ४ चमचे तेल घाला. त्यात मोहरी, हिंग, हळद, मीठ, लसूण, कढिपत्ता, मिरच्या घालून लसूण चांगला लाल होईपर्यंत परत परत परता. मिरचीच्या खकाण्यानं जीव हैराण झाला तर चिवडा झाल्यावर दुपारच्या चहाच्या वेळी बकाणे भरताना किती मजा येईल याचं स्वप्नरंजन करा. निरुपा रॉय या आद्यखोकलेश्वरीचं स्मरण करत गॅसपाशीच उभे रहा.
लसूण लाल झाला की त्यात भाजलेले कुरमुरे घालून पुन्हा पाच-सात मिनिटे परतत रहा. सर्व कुरमुर्यांना हळद लागली की गंगेत घोडं न्हालं असं समजून पुन्हा परातीत घालून थंड होऊ द्या. मग लगोलग चहा करायला घ्या. गरमागरम चहा आणि झणझणीत, लसणीच्या चवीचा गरमागरम कुरमुर्याचा चिवडा खाल्ला की आत्मा थंड होतो असा स्वानुभव आहे.
उरलाच तर गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
टाकणारे! धीर धरा.
१. पावसाळा संपल्याने ओले, चिकट, चेमट, खवट असे शब्द मोडीत निघाले आहेत. हा काळ चिवड्याचा.
२. शेंगदाणे, डाळे, खोबरं वगैरे वजनदार मंडळी कुरमुर्यांना हलके समजून त्यांच्यात न मिसळता डब्यात खाली बसणे पसंत करतात. दरवेळी डबा हलवून त्यांना बाबापुता करून वर आणावे लागते आणि हे करताना वर पंखा सुरू असेल तर (किंबहुना नसेल तरीही) काही कुरमुरे हवेत उड्या मारत जमिनीवर जाऊ बघतात. मी काय म्हणते... हवेत कशाला हे नसते उपद्व्याप? त्यापेक्षा माझं ब्रीदवाक्य लक्षात ठेवा : शेंगदाणे टाळा, कुरमुरे सांभाळा!
३. यात पनीर घातलेले नाही याची कृपया नोंद घ्या आणि पनीरकरता बटाटे, अंडी वगैरे ऑप्शन्स देऊ नका. कुरमुर्यांकरताही ऑप्शन्स देऊ नका. मुळात ऑप्शनच देऊ नका. जर ऑप्शन द्यायची इतकी खुमखुमी असेल तर वेगळी पाककृती लिहा.
मी पण आहे कुरमुर्याचा चिवडा
मी पण आहे कुरमुर्याचा चिवडा असेच बोलणारी
नवरात्रीत हा धागा रोज वर
नवरात्रीत हा धागा रोज वर काढलात तर खबरदार!
मी काढणार, मी मुद्दाम
मी काढणार, मी मुद्दाम काढणारच.:फिदी::दिवा:
भडंग चहात टाकुन च्या
भडंग चहात टाकुन च्या प्यायचा.. मस्त.. च्यावर तवंग येतो
धागा परत वर काढला. काय
धागा परत वर काढला. काय करणार, काल वेळ मिळाला नाही करायला, आज तरी जमेल का बघते,:फिदी: काय विनीता.:डोमा:
जास्त स्माईली आठवत नाहीत
जास्त स्माईली आठवत नाहीत उपासामुळे!
रेसीपी एक्दम कुर्कुरीत आहे पण
रेसीपी एक्दम कुर्कुरीत आहे
पण आमचे भडंग हो !
मी लसूण नाही घालत आता घालून बघेन
मस्त चिवडा मामी आणि कृतीचं
मस्त चिवडा मामी आणि कृतीचं एकदम खमंग चटकदार वर्णन..
आमचंही भडंगच, पण सगळं वाचून होईपर्यंत नाम में क्या रख्खा है असं झालं
तेलात बेसन टाकायची पद्धत
तेलात बेसन टाकायची पद्धत प्रथमच ऐकली.
मी मेतकूट घालते थोडं. रादर, मेतकुटाविना भडंग ही कल्पनाच करवत नाही.
बेसनानंही तोच खमंगपणा येत असणार जो मेतकुटानं येतो.
आणि हो, मी पण 'चुरमुर्यांचं' आणि 'भडंग'वाली
हुड हुड भडंग भडंग भडंग
हुड हुड भडंग भडंग भडंग भडंग!!!
मामी,
मामी,
Pages