1. खसखस - छोटी अर्धी वाटी
2. कांदा - एक लहान
3. हिरवी मिरची - एक
4. हळद - चिमुटभर
5. डाळीचे पीठ (बेसन) - अर्धा ते एक चहाचा चमचा
6. मीठ - चवीनुसार
7. तेल - २ - ३ चमचे
खसखस गरम पाण्यात अर्धा तास भिजवून शक्य तितके कमी पाणी वापरून छान बारीक वाटायची. कांदा व हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची.
मग वाटलेली खसखस, कांदा, मिरची, बेसन, हळद एकत्र करून जरा फेटल्यासारखे करावे.
तोपर्यंत लोखंडी / non-stick तवा गरम करायला ठेवावा. आता मिश्रणात मीठ घालून, तव्यावर तेल घालून, तापल्यावर, चमच्याने एक - एक चमच्याचे (माप /प्रमाण) वडे घालावेत.
ज्योत कमी ठेवावी. दोन्ही बाजूनी चांगले भाजून/तळुन घ्यावेत.
गरमच चांगले लागतात. सहसा वरण भाताबरोबर खातात.
बंगाली लोकांना व्हेज काहीतरी स्पेशल बनवणे कायम अवघड वाटते. नवीन लग्न झालं तेंव्हा सासुबाई "तुझ्यासाठी काय व्हेज बनवू?" अश्या विचारात / संभ्रमात हे वडे बऱ्याच वेळा बनवत.
मीठ ह्या वड्यांमध्ये जपून घालावे, नेहेमीच्या अंदाजापेक्षा कमी लागते.
हे वडे टिपीकल बंगाली निरामिष (शाकाहारी) रश्यामध्ये घालुन भाजी ही केली जाते. ह्या रश्यासाठी फोडणीला कलौंजी (shallot seeds), तमालपत्र, टोमेटो (किसलेला), ठेचलेले आले घालून तेलात परतावे. मग हळद (थोडी जास्त), लाल तिखट, धणे-जिरे पूड, मीठ व चवीला साखर असे सगळे पाण्यात मिसळुन पेस्ट बनवून टोमेटो मिश्रणात घालून जरा परतून पाणी घालावे. उकळी आल्यावर वडे सोडावे.
अरे, मस्त दिसतायत वडे. पाकृ
अरे, मस्त दिसतायत वडे. पाकृ पण मस्त. जरा हटके पाकृ आहे आश्विनी, धन्यवाद. रश्श्याचे पदार्थ आवडले. नेहेमीच खोबरे घालतो, या वेळेस वेगळे काही.:स्मित:
वा. खसखशीचा वापर बंगाली लोक
वा. खसखशीचा वापर बंगाली लोक फार कल्पकतेने करतात.
पण आम्हाला खसखस दुर्मिळ.. एकतर इथे मिळत नाही. गल्फ मधल्या सर्व देशात बंदी. सिंगापूरमधेही बंदी. इतकेच नव्हे तर त्यांच्या विमानातून न्यायलाही बंदी
वडे छान दिसतायत की
वडे छान दिसतायत की
छान दिसताहेत वडे.
छान दिसताहेत वडे.
अश्विनी, वेगळा प्रकार आहे.
अश्विनी, वेगळा प्रकार आहे. फोटो मस्तच आहेत. नक्की ट्राय करेन.
मस्त दिसताहेत. माझा अतिशय
मस्त दिसताहेत. माझा अतिशय आवडता प्रकार
नुस्ती मीठ मिरची घालून वाटलेली खसखस सुद्धा वरणभाताबरोबर मस्त लागचे तोंडीलावणी म्हणून (तेवढ्यात तळणाच्या कॅलरीज कमी ) - पोश्तो बाटा म्हणतात त्याला.
अरे वा, नविन रेसिपी आहे एकदम.
अरे वा, नविन रेसिपी आहे एकदम.
एवढी खसखस पोटात गेल्यावर
एवढी खसखस पोटात गेल्यावर मेंदू विश्रांती घेत नाही का?
मस्त आहे रेसिपी. नक्की करुन
मस्त आहे रेसिपी. नक्की करुन बघणार.
नंदिनी, सुरुवातीसुरुवातीला
नंदिनी, सुरुवातीसुरुवातीला होतं तसं. नंतर सवय झाली की काही होत नाही.
सगळ्यांना मनापासून
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
नंदिनी, नाही इतके नाही खायचे गं, मी वरती चित्रांमध्ये दाखवले आहेत ना तेव्हडेच केले होते. ३-४ प्रत्येकी खाऊ शकतो. जास्त खाल्ले तर, मेंदूचे माहिती नाही, पण पित्ताचा (acidity) त्रास होवू शकतो (मला तरी होतो).
छानच!...
छानच!...
आवडली... अन सोप्पी ... करुन
आवडली... अन सोप्पी ... करुन पाहण्यात येईल...
छान लागत असणार हे. आमच्या
छान लागत असणार हे. आमच्या बंगाली शेजारीण नेहेमी कांदा आणी खसख्शीची भाजी करायच्या ती मला फार आवडायची. ती कशी करतात माहिती आहे का वरदा किंवा अश्विनी... ?
नाही माहित. पण कांदा खसखशीची
नाही माहित. पण कांदा खसखशीची भाजी विदर्भातही करतात म्हणे/ असे ऐकले आहे. आम्ही खसखस भाजीसाठी वाटण म्हणून वापरतो. आप्ण डाळीचे पीठ किंवा दाण्याचे कूट लावतो त्याप्रमाणे
खसखशीच्या ॉभाजीची रेसीपी
खसखशीच्या ॉभाजीची रेसीपी http://www.maayboli.com/node/48339
पोश्तो बोडा आवडला. हा प्रकार
पोश्तो बोडा आवडला. हा प्रकार पहिलून वाचला, बघितला.
वरदा, विदर्भात २४ वर्षं राहूनही मी कधी खसखशीची भाजी खाल्ली नाही. बाकरभाज्यांच्या वाटणात भरपूर खसखस घालतात हे माहिती आहे.
मृण्मयी, माझ्या एका नागपुरी
मृण्मयी, माझ्या एका नागपुरी एक्स-कलीगने सांगितली होती ही भाजी मला.
हायला.. इतकी खसखस खाऊन नक्कीच
हायला.. इतकी खसखस खाऊन नक्कीच झोप येणार, अश्विनी.. पण रेसिपी छान टेंप्टिंग दिस्तीये.. एकदम हटके.. ट्राय करीन..
>>माझ्या एका नागपुरी
>>माझ्या एका नागपुरी एक्स-कलीगने सांगितली होती ही भाजी मला.
भाजी होतच असेल. त्या बद्दल डाउट नाही. पण खरंच इतकी वर्षं नागपुरात राहूनही ही माहिती नव्हती आणि खाल्लीही नाही.
आमच्या बंगाली शेजारीण मध्य
आमच्या बंगाली शेजारीण मध्य प्रदेशातल्या सागरच्या आहेत. सागर आणि नागपूर तसे फार लांब नाहीत म्हणजे ती कांदा खसखस भाजी बंगाली ऐवजी एम पी ची खासियत असावी का?
धन्यवाद मंजू . मी तर तिथे
धन्यवाद मंजू . मी तर तिथे प्रतिसाद पण लिहिला होता. वय झालं काही म्हनता काही लक्षात राहात नाही
एक शंका -- वरील मापाने (
एक शंका -- वरील मापाने ( म्हणजे छोटी अर्धी वाटी खसखस ) प्रकाश चित्रात दाखवल्याप्रमाणे आठ वडया होतील की वाढणी प्रमाणात लिहील्याप्रमाणे २०- २५ होतील ? गोंधळ उडाला आहे. करुन बघण्याचा विचार आहे पण ७-८ च व्हायला हव्या आहेत. किती खसखस घ्यावी?
मनीमोहोर, मी वरच्या चित्रात
मनीमोहोर, मी वरच्या चित्रात साधारण एक टेबलस्पून किंवा किंचीत जास्त खसखस घेतली आहे. पण इतकीशी मिक्सर वर वाटली जाणे अवघड असु शकते. माझ्या कामवल्याबाईंनी पाट्यावर वाटुन दिली होती.
ओके, अश्विनी. धन्यवाद. करुन
ओके, अश्विनी. धन्यवाद. करुन बघते आणि फोटो टाकते. छान लागत असेल अस वाटतयं