मायबोली १८वा वर्धापनदिन

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मायबोलीने या गणेशचतुर्थीला १८ वर्षे पूर्ण केली (तारखेप्रमाणे आज १६ सप्टेंबर) आणि १९व्या वर्षात पदार्पण केले आहे. सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!!

गेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केले याचा हा एक मागोवा.

नवीन उपक्रम

जस्टप्रोमोडील्स.कॉम (www.justpromodeals.com) ही वेबसाईट जानेवारी २०१४मध्ये मायबोली वेबसमूहात सामील झाली आहे. वेगवेगळ्या सेल बद्दल, मर्यादित कालावधीसाठी स्वस्तात मिळणार्‍या वस्तूंबद्दल, कूपन्सबद्दल माहिती देणारी ही वेबसाईट आहे. वेगवेगळ्या उत्पादकांचे सेल वर्गवारीनुसार पाहण्याची सोय, जरी रविवारचे वर्तमानपत्र घेत नसलात तरी उत्पादकांचे कूपन घरच्या घरी छापण्याचीही सोय इथे आहे.

***

२०१२मध्ये बातम्या.कॉम ही वेबसाईट मायबोली समूहाचा भाग बनली. बातम्या.कॉमच्या साच्यावर आधारित हिंदी आणि कानडी या भाषांत दोन नवीन वेबसाईट सुरू करून महाराष्ट्राच्या अंगणापलीकडे पाय टाकण्याचं धाडस आपण केलं.

hindi.khabar.io - हिंदी.खबर.आयो - खबर आयो, समाचार लायो !

kannada.khabar.io - kannada suddi - ಕನ್ನಡ.ಖಬರ್.ಅಯೋ - ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿ ಆನ್ಲೈನ್

***

गूगल या कंपनीनं hwgo.com (Helping Women Get Online) हा सार्वजनिक हिताचा एक खूप चांगला उपक्रम सुरू केला आहे. इंटरनेटबद्दलची माहिती आणि महत्त्व सोप्या भाषेत सांगणं, इंटरनेटवरचा महिलांंना उपयुक्त वाटेल असा मजकूर दाखवणं, प्रत्यक्ष फोनवरून मदत करणं (Handholding) असं या उपक्रमाचं स्वरूप आहे. मायबोली या उपक्रमात सहयोगी म्हणून अधिकृतरित्या सामील झाली आहे. मायबोलीवरच्या वेगवेगळ्या उपयुक्त मजकुराचे दुवे (लिंक्स) या माध्यमाद्वारे जास्त महिलांपर्यंत पोहोचतील आणि इंटरनेटवरचा त्यांचा वावर अधिक उपयोगी आणि आनंददायी ठरेल, अशी अपेक्षा आहे.

***

मायबोली.कॉम

लेखनस्पर्धा २०१३ -

स्वातंत्र्यानंतर गेल्या पासष्ट वर्षांत अनेक व्यक्तींनी या देशाच्या भवितव्याला परिणामकारक आकार देण्याचा प्रयत्न केला. असंख्य घटनांनी देशाचं वर्तमान, भविष्य बदलवून टाकलं. ह्या विषयावर रोहन प्रकाशनाच्या सहकार्याने मायबोली.कॉमवर लेखनस्पर्धा आयोजित केली गेली. ज्येष्ठ संपादक श्री. आनंद आगाशे व सुप्रसिद्ध चित्रपटदिग्दर्शक व लेखक श्री. सुनील सुकथनकर यांनी परीक्षक म्हणून काम केलं. या स्पर्धेला मायबोलीकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.

गणेशोत्सव २०१३ -

गणेशोत्सव संयोजक समितीने २०१३चा गणेशोत्सव यशस्वीपणे आयोजित केला. लहान मुलांनी बाप्पाला लिहिलेले पत्र, मोठ्यांसाठी अनोखी पत्रलेखन स्पर्धा, पाककला स्पर्धा ही यावर्षीची वैशिष्ट्यं होती.

दिवाळी अंक २०१३ -

मंजूडी (मंजिरी कान्हेरे) यांच्या नेतृत्वाखाली आपण २०१३चा अंक प्रकाशित केला. या वर्षीच्या अंकात लेखकांच्या कल्पनाशक्तीला, अनुभवांना, रसिकतेला रुचतील अशा उत्स्फूर्तपणे केलेल्या लिखाणाचा समावेश होता. आजपर्यंत अनेक लोकांनी वैद्यकशास्त्राला आणि पर्यायानं जनकल्याणाला आपलं आयुष्य वाहिलं आहे. याच 'वैद्यकशास्त्र' या विषयाला वाहिलेला एक संपूर्ण विभाग अंकात होता. सद्य परिस्थितीतील घडामोडींमुळे सामाजिक राहणीमान, कुटुंबव्यवस्था, राजकारण, समाजकारण, पर्यावरण, दळणवळण, मूलभूत सुविधा या व अशा अनेक गोष्टींमध्ये पुढील २०-२५ वर्षांत होणारे बदल कसे असतील, ते तसे का असतील आणि त्याचे सकारात्मक वा नकारात्मक परिणाम काय होतील, याचाही वेध यंदाच्या हितगुज दिवाळी अंकात घेतला गेला.

मायबोली माध्यम प्रायोजक -

यावर्षी संहिता, आजोबा, इन्व्हेस्टमेंट, पितृऋण या पारितोषिकविजेत्या चित्रपटांचे माध्यम प्रायोजकत्व स्वीकारले. अरभाट निर्मिती व नाटक कंपनी निर्मित 'दर्शन' या श्रीमती बी. जयश्री यांच्या गायनाच्या व मुलाखतीच्या कार्यक्रमाची, तसेच लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसाच्या मदतनिधीसाठी ’मराठी बाणा’ या कार्यक्रमाची माहिती ऑनलाईन माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवली. लहान मुलांमध्ये चित्रपटांविषयी गोडी निर्माण व्हावी, यासाठी कार्यरत असणार्‍या अरभाट चिल्ड्रन फिल्म क्लबचीही मायबोली माध्यम प्रायोजक आहे.

मदत समिती आणि स्वागत समिती -

सतत वर्षभर शांतपणे मदत समिती आणि स्वागत समिती काम करत असते. नवीन सभासदांना मायबोली कुटुंबात सामावून घेण्यासाठी या मंडळींचा महत्वाचा वाटा आहे.

संयुक्ता -

१४ जुलै २०१४ला संयुक्ता स्थापन होऊन ५ वर्षे पूर्ण झाली. आरोग्यसजग संयुक्ता करंडक आणि संयुक्ता प्रेरणा करंडक हे नवीन उपक्रम गेल्या वर्षभरात राबवले गेले. संयुक्ताच्या माध्यमातून निरनिराळ्या क्षेत्रांत काम करणार्‍या, चाकोरीबाहेरचे कार्यक्षेत्र निवडून त्यात यश मिळवणार्‍या स्त्रियांच्या मुलाखती मायबोलीवर प्रकाशित केल्या. जगभरातील संयुक्ता सदस्यांचे ऑनलाईन वॉकिंग / रनिंग संमेलन हेही एक विशेष वैशिष्ट्य. याखेरीज नेहमीचे उपक्रम - मातृदिन, महिला दिन, पितृदिन हे यशस्वीरीत्या पार पाडले. गेल्या काही वर्षांप्रमाणे यावर्षीही महिला दिनानिमित्त संयुक्ता सदस्यांनी खालील गरजू संस्थांना वस्तूरूपाने मदत केली -

१) शबरी सेवा समिती, ता. कर्जत, रायगड
२) भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, कुडाळ, जि. सिंधूदुर्ग
३) स्नेहालय, पुणे
४) सावली सेवा ट्रस्ट
५) निवासी अपंग कल्याण केंद्र , सटाणा
६) राधाबाई हर्डीकर प्राणिजात मंगल संस्था
७) अस्तित्व, पुणे
८) मैत्री, पुणे

मराठी भाषा दिवस -

या उपक्रमाचे हे सहावे वर्ष. मराठीसाठी आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाला खूपच छान प्रतिसाद मिळाला आहे. .

अक्षरवार्ता -

नवीन पुस्तकांच्या ओळखीचा हा उपक्रम या वर्षीही तितक्याच सातत्याने चालू राहिला आहे.

वर्षाविहार २०१४ -

यंदा वर्षाविहाराचे १२वे वर्ष होते. यंदाचा हा मैत्रीचा सोहळा २७ जुलैला एस पी फार्म्स, पेण येथे संपन्न झाला. पुणे आणि मुंबई येथील मायबोलीकरांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने तयार केलेल्या टीशर्ट आणि बॅगेला सर्व मायबोलीकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यातून मिळालेल्या पैशातून 'ग्रीन अम्ब्रेला' या ठाण्यातील वृक्षसंवर्धनासाठी काम करणार्‍या संस्थेला मदत केली.

सोशल नेटवर्क आणि मायबोली:

गेली काही वर्षे आपण मायबोलीबाहेरच्या सोशल नेटवर्कवरही कार्यरत आहोत. मायबोलीबाहेरच्या वाचकांना या माध्यमातून मायबोलीवरच्या लेखनाची, प्रकाशचित्रांची ओळख आपण करून देत असतो. फेसबुकवरच्या मायबोलीच्या चाहत्यांची संख्या या वर्षी ९०,०००+ झाली आहे. या वर्षी आपण पहिल्यांदाच गूगल प्लस या नेटवर्कवरही कार्यरत झालो. गूगल प्लस या नेटवर्कवर मायबोलीच्या चाहत्यांची संख्या एका वर्षाच्या आत,
१,६०,००० वर गेली आहे. युट्यूब या माध्यमात आपण या वर्षी थोडे अधिक कार्यरत झालो आहोत.

बातम्या.कॉम

बातम्या.कॉमच्या साच्यावर आधारित हिंदी आणि कानडी या भाषांत दोन नवीन वेबसाईट सुरू करून महाराष्ट्राच्या अंगणापलीकडे पाय टाकण्याचं धाडस आपण केलं.

खरेदी विभाग

नवीन प्रकाशक/भागीदार (partners/providers) -

या वर्षात पुरंदरे प्रकाशन, मॅजेस्टिक प्रकाशन, साधना प्रकाशन, परचुरे प्रकाशन, अभिजीत प्रकाशन या नवीन भागीदारानी मायबोली खरेदी विभागात त्यांची पुस्तके विक्रीस ठेवली. मायबोलीवर विक्रीसाठी वस्तू ठेवणारे भागीदार एकूण ४७ झाले आहेत.

खरेदी विभागाचे काम पाहणार्‍या सौ. विद्या जोशी यांचे आभार.

जाहिरात विभाग

जाहिरात विभागात फार मोठे बदल झाले नाहीत. त्याला मायबोलीकरांचा उत्तम प्रतिसादही मिळतो आहे. विशेषतः विवाहविषयक विभागास या वर्षात भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. जाहिरात विभागाचे वेगळे फेसबुकपानही सुरू केले असून त्याला आतापर्यंत ४८००+ चाहते मिळाले आहेत.

कानोकानी.कॉम

या विभागात यावर्षी फारसे बदल झाले नाहीत.


इतर प्रशासकीय आणि कार्यालयीन कामे

याशिवाय हार्डवेअर / सॉफ्टवेअरची डागडुजी, सर्वरचे संरक्षण, बॅकप, लेखांची हलवाहलवी, साफसफाई आणि वर्गीकरण, मायबोलीवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणे, एखाद्याला डच्चू देणे ही कामे चालूच असतात.

मायबोलीचे कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून सगळ्या खर्चाचा ताळेबंद ठेवणे, प्राप्तिकर आणि विक्रीकर यांचा परतावा सादर करणे यासारखी महत्त्वाची कामे (अमेरिका आणि भारत दोन्ही देशांत) वेळच्या वेळी पार पाडली.

***

विविध समित्यांवर काम केलेले मायबोलीकर -

मदत समिती - रुनी पॉटर, नंद्या, मंजूडी

लेखनस्पर्धा २०१३ - अमितव, इन्ना, चिनूक्स, जिप्सी, सशल, फारएण्ड

गणेशोत्सव २०१३ -

संयोजक - भारती.., चैतन्य दीक्षित, Chaitrali, पेरु, रीया, सानी, साती, सुहास्य
सल्लागार - रूनी पॉटर

दिवाळी अंक २०१३ -
संपादक मंडळ - मंजूडी, अमित वर्तक, शुभदा परांजपे, मिलिंदा, जाई, पुलस्ति, विजय देशमुख
सल्लागार - आरती रानडे, अल्पना खंदारे
मुखपृष्ठ - स्वप्नाली मठकर, मिलिंदा
दृक्‌श्राव्य विभाग - अमित वर्तक ,विजय देशमुख
रेखाटने आणि अंकातील सजावट - अल्पना, मिनोती, डॅफोडिल्स, नीलू, मंजूडी, मिलिंदा, अमित वर्तक, पुलस्ति, जाई, भाग्यश्री नचिकेत सरदेसाई-भानस
मुद्रितशोधन - शुगोल, सिंडरेला, मैत्रेयी, सायो, नंदन, बिल्वा, आनंदयात्री, भारती बिर्जे डिग्गीकर, अरभाट, चिनूक्स, पुलस्ति, मंजूडी, आर्फी
देवनागरीकरण सहाय्य - मृण्मयी, अश्विनी के

संयुक्ता व्यवस्थापन - अरुंधती कुलकर्णी, संपदा, पौर्णिमा, अल्पना, बिल्वा, डॅफोडिल्स, पूर्वा, मो, वत्सला, श्रुती

मराठी दिवस २०१४ - जाई. नियती, मामी, हर्पेन, उदयन..

महिला दिन २०१४ - बिल्वा, मवा, अरुंधती कुलकर्णी, पौर्णिमा, प्राची, प्राजक्ता पटवे-पाटील, बस्के, मंजूडी, मो, वत्सला, वेल, श्रुती, संपदा

वर्षाविहार / टीशर्ट २०१४ - मयूरेश , anandmaitri, नील., हिम्सकूल, योकु, मुग्धानन्द, घारुआण्णा, MallinathK, कविन, मंजूडी, विवेक देसाई, राखी.., शुभांगी., राजू७६, पौर्णिमा, अरुंधती कुलकर्णी, पिन्कि ८०

माध्यम प्रायोजक - मंजूडी, अनीशा, श्रद्धा, पराग, सशल, योकु, चिनूक्स, नंदिनी, मृण्मयी, नंद्या, बिल्वा, क्ष, अश्विनी के, महागुरु, अरभाट, साजिरा, रसप, harshalc

***

एखादे नाव नजरचुकीने राहून गेले असेल तर क्षमस्व.

***
विषय: 
प्रकार: 

छान आढावा. Happy यंदा बर्याच नव्या योजना अंमलात आल्या असे दिसते. अभिनन्दन आणि शुभेच्छा.

>>>> मराठी दिवस २०१४ - जाई. नियती, मामी, हर्पेन >>> उदयन यांचं नाव राहिलं आहे.

मस्त आढावा.
मायबोलीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आगामी उपक्रमांसाठी भरघोस शुभेच्छा!

Pages