यंदाच्या स्पर्धेचा विषय काहीसा विचार करायला लावणारा आहे पण त्यातून नवनिर्मिती करायला मिळाली..गरम करणे भाजणे,तळणे हे नेहमीचे पर्याय वगळून बाप्पासाठी अपूप म्हणजेच मोदक केले आहेंत.हे अपूप बनवायला सोपे आहेत तसेच पौष्टीकतेचाही विचार केला आहे.
अपूप बनविण्यासाठीचे साहित्य :--
१] ६ ब्राऊन ब्रेड च्या कडा कापलेल्या स्लाईस.
२] १० ते १२ नग बिया काढलेला खजूर..
३] २ चमचे मध..
४]२ चमचे गुलकंद .
५] ४ चमचे डेसिकेटेड कोकोनट.
६] १० त॑ १२ बदामाचे काप.
७] १ टी स्पून जायफळ-वेलची पूड.
८] १ टी स्पून खसखस .
९] मोदकाचा साचा.
हे आहे "अपूप "चे मुख्य साहित्य :--
ब्राऊन ब्रेड च्या ४ स्लाईस मिक्सरमधे बारीक करा आता बाकीच्या २ स्लाईस व खजूर मिक्सरमधे फिरवून घ्या.
एका बाऊल मध्ये ब्राऊन ब्रेड व खजूर चे मिश्रण काढुन घ्या त्यात जायफळ-वेलची पूड आणि मध घालून सर्व मिश्रण कालवून त्याचा गोळा तयार करा. ब्रेड व खजूराच्या ओलेपणावर मधाचे प्रमाण कमी-जास्त करा.
या मिश्रणाचे मोदकाच्या साच्यात बसतील अशा आकाराचे एकसारखे गोळे करा.
आता दुसर्या एका बाऊल मध्ये गुलकंद,३ चमचे डेसिकेटेड कोकोनट व बदामाचे काप चमच्याने एकत्र करा.या मिश्रणाचा गोळा तयार करा.मिश्रण ओलसर वाटले तर डेसिकेटेड कोकोनट चे प्रमाण वाढवा.
ब्रेड मिश्रणाइतकेच पण त्यापेक्षा आकाराने लहान असे सारणाचे गोळे तयार करा.
मोदकाच्या साच्याला आतून तूपाचा हात लावून घ्या.
१ चमचा डेसिकेटेड कोकोनट व खसखस दोन लहान प्लेट काढून घ्या
ब्रेड मिश्रणाचा गोळा डेसिकेटेड कोकोनट मधे घोळवून घ्या.
मोदकाच्या साच्याच्या आतल्या बाजूला सगळीकडे चिमुटभर खसखस पसरवा.
आता त्यात ब्रेड मिश्रणाचा गोळा ठेवून साचा बंद करा त्यात खालील बाजुने मिश्रण चारी बाजूला सरकवून मध पोकळ जागा करा .त्यात गुलकंदाच्या सारणाचा गोळा भरून वरुन कव्हरींग चे थोडेसे लावा.
अशा प्रकारे साच्यातील मोदक तयार करा.
मोदक बर्याच प्रकाराचे करतात..भारतात मोदकाला वेगवेगळ्या नांवाने संबोधले जाते."अपूप" हे संस्कृत नांव आहे.याविषयी आणखी संदर्भ शोधल्यावर असे कळले कि तांदूळाच्या आवरणामधे ,खोबरे ,गूळ ,साखर भरून त्या पासून बनवलेला गोड पदार्थ.याचा उल्लेख पुरीसारखा गोल आणि खोबर्याचे गोड सारण भरलेला गोलाकार असा पदार्थ आहे..अनारशालाही अपूप म्हटले आहे पण इथे स्पर्धेच्या अटीं-तटी तून हा आगळा वेगळा पण पौष्टीक मोदक केला आहे.हे पौष्टीक "अपूप" बाप्पाला विड्याच्या पानावर ठेवून मनोभावे अर्पण करीत आहे.
मी बघतच होते की ह्या
मी बघतच होते की ह्या गणेशोत्सवात सुलेखाची पाकृकृती कशी नाही.
छान. शुभेच्छा तुम्हाला. तळणं, भाजणं नसल्याने एक नविन रेसीपी आहे.
फोटो आल्याने संयोजक मोड़
फोटो आल्याने संयोजक मोड़ एडिटेड
यम्मी दिसतायेत अपूप . तोंपासु
झंपी--खूप खूप धन्यवाद. जाई
झंपी--खूप खूप धन्यवाद.
जाई -मलाही छान वाटतंय ! फोटो आताच टाकले आहेंत शब्द खूणात मायबोली गणेशोत्सव २०१४ लिहीले आहे .सूचनेसाठी धन्यवाद.
मस्त आहे रेसिपी.
मस्त आहे रेसिपी.
मस्तच.
मस्तच.
अप्रतिम. एकदम वेगळा प्रकार
अप्रतिम. एकदम वेगळा प्रकार
भारी आहे.
भारी आहे.
अपूप म्हणजे संस्कृतात अनारसे
अपूप म्हणजे संस्कृतात अनारसे ना ?
मोदक भारी दिसताएत.
मोदक भारी दिसताएत.
मस्त.
मस्त.
काय वेगळीच कल्पना आहे. मस्त.
काय वेगळीच कल्पना आहे. मस्त.
वा, अगदी छान कल्पक पदार्थ.
वा, अगदी छान कल्पक पदार्थ.
अनारसा व मोदक ह्या दोन्ही
अनारसा व मोदक ह्या दोन्ही तांदूळापासून बनवलेल्या पदार्थाना अपूप म्हणतात. अपूप नांवाविषयी वर स्पष्टीकरण लिहीले आहे.
खूप छान. मस्त कल्पना.
खूप छान. मस्त कल्पना.
कसला भारी लागत असेल
कसला भारी लागत असेल गुलकंदाच्या सारणाचा मोदक!
मस्त!
तुमच्या पाकृ नेहमीच छान व
तुमच्या पाकृ नेहमीच छान व ओरिजिनल असतात. कसले डिझाईनर मोदक दिसतायत!
स्पर्धेच्या नियमांनुसार अगदी
स्पर्धेच्या नियमांनुसार अगदी विचारपूर्वक आणि कलात्मकतेने केलेली पा. कृ.
तुमच्या पाकृ नेहमीच छान व ओरिजिनल असतात.>+१
स्पर्धेसाठी शुभेच्छा !
एकदम कातील दिसतायेत मोदक
एकदम कातील दिसतायेत मोदक
खुपच मस्त
थेंक्स फॉर धिस रेसीपी सुलेखातै
मस्त!!
मस्त!!
तोंपासु पाकृ. <बापाचा प्रसाद
तोंपासु पाकृ.
<बापाचा प्रसाद म्हणून प्रत्येकी एक तर हवाच.<> इथे बाप्पाचा करणार का?
मस्त!
मस्त!
मस्त दिसतायंत अगदी मोदक.
मस्त दिसतायंत अगदी मोदक. अतिशय कल्पक रेसिपी आहे ही
पाककृती आवडली. फोटोपण मस्तं
पाककृती आवडली. फोटोपण मस्तं आहे.
मस्त. कल्पक पाकृ. छान लागतील
मस्त. कल्पक पाकृ.
छान लागतील
मस्त !
मस्त !