Submitted by सायो on 6 September, 2014 - 21:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ अवाकाडो- मधे चिरून, बी काढून,
बेसील पानं- थोडी चिरून, थोडी अख्खी,
लिंबाचा रस- १ चमचा,
ऑलिव ऑईल- १ चमचा,
छोट्या टोमॅटोच्या चकत्या,
क्रंबल्ड फेटा चीज- लागेल तसे,
चवीपुरते मीठ, ताजी मिरपूड,
राय (Rye) ब्रेड स्लाईसेस- माणशी एक
क्रमवार पाककृती:
अवाकाडोतील बी काढून, आतील गर एका बोलमध्ये काढून घ्यावा. त्यात चिरलेली बेसील पानं, ऑलिव ऑईल, लिंबाचा रस, मीठ, मिरपूड घालून काट्याने मॅश करावं.
हे मिश्रण आता ब्रेडच्या स्लाईसेसवर लावून वरून फेटा चीज भुरभुरवून टोमॅटोच्या चकत्या आणि त्यावर बेसीलचं पान लावून लगेच खायला द्यावं.
वाढणी/प्रमाण:
माणशी एक स्लाईस- अंदाजे
अधिक टिपा:
मुळ रेसिपीत ब्रेड ग्रील्/टोस्ट करून घ्यायचा आहे. इथे चालणार नाही म्हणून केलेला नाही. तसंच बेसील पानं मिळत नसल्यास मिंट घालूनही चालेल. नॉनव्हेज आवडणार्यांनी वरून चिकन्/हॅम स्लाईस घालूनही चालेल.
पास्ता, सॅलड, सूपबरोबर चांगलं लागेल.
माहितीचा स्रोत:
एका मासिकात रेसिपी बघून फोटो काढला होता. तो फोटो बघून साधारण अंदाज आला.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोप्पीय .. मस्त फोटो टाक
सोप्पीय .. मस्त
फोटो टाक ना..
हे फोटो लागणारे
हे फोटो
लागणारे जिन्नस
फायनल प्रॉडक्ट
वाह! पटकन पार्सल कर
वाह! पटकन पार्सल कर

इकडे ये आणि ताजं खा.
इकडे ये आणि ताजं खा.
अरे वा .. ही आयडीया छान आहे
अरे वा .. ही आयडीया छान आहे .. फोटो आवडला ..
मस्त आहे सायो!!
मस्त आहे सायो!!
मस्त आहे.
मस्त आहे.
>>१ अवाकाडो- मधे चिरून, बी
>>१ अवाकाडो- मधे चिरून, बी काढून,
बेसील पानं- थोडी चिरून, थोडी अख्खी,
लिंबाचा रस- १ चमचा,
ऑलिव ऑईल- १ चमचा,
छोट्या टोमॅटोच्या चकत्या,
क्रंबल्ड फेटा चीज- लागेल तसे,
चवीपुरते मीठ, ताजी मिरपूड,
राय (Rye) ब्रेड स्लाईसेस- माणशी एक<<
वरील कृतीत, दोन प्रोसेस्ड पदार्थ. चीज आणि ब्रेड.
सही!
सही!
भारी आहेत फोटो. तो इमेज टॅग
भारी आहेत फोटो. तो इमेज टॅग कॉपी करून मूळ कृतीत पेस्ट कर की
ते संध्याकाळी करते. संयोजक,
ते संध्याकाळी करते.
संयोजक, इकडे डोकवा.
यम्मी दिसतंय. करायलाही एकदम
यम्मी दिसतंय. करायलाही एकदम सोप्पं.
मस्त दिसतयं!!!
मस्त दिसतयं!!!
मस्त वाटतेय रेसिपी! करून
मस्त वाटतेय रेसिपी! करून बघणार!!
छान रेसिपी. फोटो भारी
छान रेसिपी. फोटो भारी आलाय!!
मस्त ग्रील्/टोस्ट करून खाणार,.. .ह्या सोबत आवडीचे गरम गरम सूप . आहाहा
अवाकाडो माझा लाडका! तेव्हा
अवाकाडो माझा लाडका! तेव्हा करणारच! फोटो मस्त आलाय, कॉम्बो छान वाटतोय!
मस्त दिसतंय. ग्वाकामोली आणि
मस्त दिसतंय. ग्वाकामोली आणि फेटा चीज एकत्र छान लागेल असं वाटतंय
अगदी ग्वाकामोली म्हणता नाही
अगदी ग्वाकामोली म्हणता नाही येणार कारण त्यात कांदा, टोमॅटोही चिरून घालतात. मी काल डब्याकरता फेटाऐवजी मॉझरेल्ला घेऊन ग्रिल केलं सँडविच.
हो बरोबर, मीठ-मिरपूड आणि
हो बरोबर, मीठ-मिरपूड आणि लिंबाचा रस ही चव आठवून वाटले तसे.
हॉटेलात मिळणारं ग्वाकामोली नेहेमी थोडं अळणी असतं असं नाही वाटत का कुणाला ? घरी करताना त्यामुळे मी अगदी व्यवस्थित मीठ आणि लिंबू घालायचे त्यात
ग्वाकामोली नेहेमी थोडं अळणी
ग्वाकामोली नेहेमी थोडं अळणी असतं >>> मला तसंच आवडतं. अॅव्हाकाडोची क्रीमी टेस्ट बुजत नाही मीठ आणि लिंबु कमी घातल्यानं.
(No subject)
मस्त ग्रील्/टोस्ट करून
मस्त ग्रील्/टोस्ट करून खाणार,.. .ह्या सोबत आवडीचे गरम गरम सूप . आहाहा >> +१
छान यंट्री!
मस्त! फोटो सुरेख आलाय !
मस्त! फोटो सुरेख आलाय !
मस्त आहे. ग्वाकामोली नेहेमी
मस्त आहे.
ग्वाकामोली नेहेमी केलं जातं. आता एकदा हे करुन पाहिन.
मस्त आहे...........
मस्त आहे...........
आता एकदा हे करुन पाहिन.>>
आता एकदा हे करुन पाहिन.>> सावली, अॅव्हाकाडो कुठे मिळाला ते मला सांग.
सही! नक्कीच करणारच!
सही! नक्कीच करणारच!