Submitted by आरती. on 6 September, 2014 - 02:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
खजूर - ४
लवंग - २
वेलची - २
सुक खोबर - एक छोटा तुकडा
विड्याची पान - २
तुम्हाला जेवढी मस्तानी पान बनवायची असतील तेवढी तुम्ही घ्या. आमच्याकडे खाणारी तोंड कमी म्हणून मी दोनच पान घेतली.
क्रमवार पाककृती:
१. खजूराच्या बिया काढून सुरीने छोटे तुकडे करून घ्या. हे तुकडे हाताने मळून गोळा करून घ्या.
२. वेलची आणि लवंगची पावडर खलबत्त्यात करून घ्या.
३. सुक्या खोबर्याची पाठ खरवडून किसणीवर किसून घ्या. थोड किसलेल सुक खोबर बाजूला काढून ठेवा.
४. खजूराच गोळा, वेलची आणि लवंगाची पावडर, किसलेल सुक खोबर एकत्र करून त्याचे छोटे लाडू करा.
५. किसलेल्या खोबर्यात लाडू घोळबून घ्या.
६. विड्याच्या पानावर हे गोळे ठेवा.
७. पान तयार करा व लंवगाने टोचा.
वाढणी/प्रमाण:
मस्तानी पान तुम्हाला जेवढे आवडते तेवढे खा. :)
अधिक टिपा:
१. ह्यात मसाला सुपारी, गुलकंद घालू शकता पण इथे मी वापरल नाही आहे.
२. लवंग ने टोचायच नसेल तर एक चेरी टुथपिकला लावून ते पानाला टोचा.
माहितीचा स्रोत:
मी
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा ! छानच लागत असेल हे पान !
वा ! छानच लागत असेल हे पान !
आरती, नियमानुसार शिर्षक बदल
आरती, नियमानुसार शिर्षक बदल आणि शब्द खुणांमधे मायबोली गणेशोत्सव २०१४, आता कशाला शिजायची बात या दोन खुणा टाक
पाककृतीसोबत प्रचि अनिवार्य
पाककृतीसोबत प्रचि अनिवार्य आहे तेंव्हा अनंत चतुर्दशीच्या आत प्रचि ही टाकावे लागेल
धन्यवाद दिनेशदा, तुमचा पहिला
धन्यवाद दिनेशदा, तुमचा पहिला प्रतिसाद बघून खूप छान वाटल आणि पान चवीला मस्त लागत.
अग प्रचि टाकतच आहे. शिर्षक बदलते.
आता कशाला शिजायची बात -
आता कशाला शिजायची बात - आरती.- मस्तानी पान
असं नाव हवं शब्दखुणा अपडेट कर. फायनल प्रॉडक्टचा फोटो टाक
मस्तच....
मस्तच....
मस्तच आहे पानं
मस्तच आहे पानं
छान. या पानाला कात, चुना
छान. या पानाला कात, चुना यांपैकी काही लावत नाहीत का?
दिसायला आणि चविलाहि छान.
दिसायला आणि चविलाहि छान. मस्त आरती.
छान दिसतेय मस्तानी आपलं पान
छान दिसतेय मस्तानी आपलं पान
पार्टीसाठी हिट्ट आयटम आहे
या पानाला कात, चुना यांपैकी
या पानाला कात, चुना यांपैकी काही लावत नाहीत का?<<<< नाही. तरीसुद्धा मस्त लागत.
सृष्टी, आसा, प्रभाकाकू, जाई धन्यवाद.
आरती , मस्त दिसतेय. वर चेरी
आरती , मस्त दिसतेय. वर चेरी लावायची कल्पना आवडली.
आरती छान दिसतेय पान.
आरती छान दिसतेय पान.
छान
छान
हायला! मस्तय.
हायला! मस्तय.
तयार पान एकदम मस्त दिसतंय.
तयार पान एकदम मस्त दिसतंय.
मनीमोहर, केशर, चिमूरी, झंपी,
मनीमोहर, केशर, चिमूरी, झंपी, तृप्ती आवटी धन्यवाद.
आरती खुप सही दिसतय पान...
आरती खुप सही दिसतय पान... खजुर घालुन पानाची कल्पना आवडली.
मस्त आहे मस्तानी कोणीतरी
मस्त आहे मस्तानी
कोणीतरी तांबूलाची कृती टाकेल असं वाटलंच होतं मला.
सही दिसतंय!
सही दिसतंय!
विड्याची पानं वेगळी कधी
विड्याची पानं वेगळी कधी बघितली नाहीत इथे. पानपट्टीवरूनच आणावी लागतिल बहूदा.
मिळालीच तर नक्की करेन. कात, चुना, सुपारी यातलं काहीच नसल्याने लहान मुलं पण खातिल.
मस्त.
मस्त.
मस्त !
मस्त !
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना