Submitted by kamini8 on 6 September, 2014 - 01:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ डाळींब
१ सफरचंद
१ पेअर
१ केळे
१ चिकू
१ काकडी
१ मोसंबी
१\२ नारळ
२ चमचे मणूके
७ बदाम
२ चमचे पिठी साखर
क्रमवार पाककृती:
सर्व फळे स्वच्छ धुवुन घ्या.
फळे पुसुन कोरडी करा.
त्याचे लहान तुकडे करा.
नारळ किसुन घ्या.
सगळ्या फळांचे तुकडे मिक्स करा.
पिठी साखर मिक्स करा.
झटपट प्रसाद नैव्यदासाठी तयार आहे.
वाढणी/प्रमाण:
आवडी प्रमाणे
अधिक टिपा:
यात गुळाचा पाक घालुनही करता येतो. आले तुकडे, काळमिरी पावडर घालुन करता येते. मध , सुंठ पावडर घालुन चवीत आवडीनुसार बदल करता येतो.
प्रमाण कितीही घेता येईल.
सफरचंद, केळे आधी कापले तर काळे पडतात.
माहितीचा स्रोत:
बाप्पाचा प्रसाद त्यात माझा बदल
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
ताट खुप सुंदर दिसत आहे..
ताट खुप सुंदर दिसत आहे..
सृष्टी धन्यवाद. मी रंगीत मोदक
सृष्टी धन्यवाद.
मी रंगीत मोदक बनवणार होते. मोदक साचा कोठे ठेवला तेच सापडत नव्हते. पदार्थ गरम करायचे नाही. हाताने नीट मोदकाचा आकार येत नव्हता. मग सारण चमच्याने खाऊन झाले. आजच पाककृती देवु शकते. गणपती दर्शनासाठी जायचे आहे. पुजेसाठी जास्त फळे आणली होती, म्हणुन ही सोपी आणि झटपट होणारी पाककृती केली.
कामीनी, रेसिपी आणि फोटो
कामीनी, रेसिपी आणि फोटो दोन्ही मस्त. जास्वंद, तगर आणि दुर्वांमुळे शोभा वाढलीय पदार्थाची.
छान! शुभेच्छा!
छान! शुभेच्छा!
सगळेच छान कामिनी, रेसिपी,
सगळेच छान कामिनी, रेसिपी, सजावट..
बाप्पा खुष होणार !!!!!!!!!!!
बाप्पा खुष होणार !!!!!!!!!!! !रेसिपी आणि फोटो दोन्ही मस्त आहे.
छान प्रकार !
छान प्रकार !
रेसिपी आणि फोटो दोन्ही मस्त
रेसिपी आणि फोटो दोन्ही मस्त आहे.