गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546
प्रसंग :
विचारल्यावर काय उत्तर मिळणार याचा अंदाज अंजूला होताच की मी तुला ह्या नजरेतून कधी पाहिलेच नाही..आमच्या घरी आंतरजातीय विवाह मान्य नाही.. एक वेळ खून माफ होईल पण आंतरजातीय विवाह नक्कीच नाही. आपण फक्त चांगले मित्र राहूया. अश्या ह्या मुलामध्ये बिचारी अंजू जीव गुंतवून बसली होती .. आणि तो याची मजा अनुभवत होता. शेवटी त्याला धीर करुन विचारले.. तेव्हा त्याने हो ही म्हंटले नाही व नाही ही. अंजू अधांतरी आयुष्य जगत होती. आणि आज अशी ही कातर वेळ जी त्याच्या आठवणीने तिला वेड लावत होती. अंजूला सारख वाटत होत की तो कुठेतरी आस पास आहे. कपाळावर सरकलेला केसांचा कोंबडा हाताने सारखा करत शीळ घालत गाण म्हणत आहे. त्याचे अथांग डोहासारखे मधाळ डोळे आपल्याकडे रोखून बघत आहेत. आपल्या श्वासांनी ऊर धपापतो आहे. त्याच्या बाहुपाशात विरघळून जावंसं वाटत आहे... त्याच्या कपड्यांवरच्या उंची पर्फ्यूमचा दरवळ तिला धुंद करत असे. तिचे मूळचे गुलाबी सौंदर्य त्याच्या सहवासात अधिकच खुलत असे. लोकांनाही त्यांची जोडी म्हणजे अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटत असे.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
विचारल्यावर काय उत्तर मिळणार
विचारल्यावर काय उत्तर मिळणार याचा अंदाज अंजूला होताच की मी काही अक्कल गहाण टाकली नाही तुला होकार द्यायला.आमच्या घरी आंतरजातीय विवाह मान्य नाही.. एक वेळ खून माफ होईल पण आंतरजातीय विवाह नक्कीच नाही. आपण फक्त लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहूया. अश्या ह्या मुलामध्ये बिचारी अंजू गळ टाकून बसली होती .. आणि तो याची थ्रील अनुभवत होता. शेवटी त्याला धीर करुन विचारले.. तेव्हा त्याने हो ही म्हंटले नाही व नाही ही. अंजू अधांतरी आयुष्य जगत होती. आणि आज अशी ही कातर वेळ जी त्याच्या गडगंज पैशाच्या विचाराने तिला भुरळ पाडत होती. अंजूला सारख वाटत होत की तो कुठेतरी आस पास आहे. कपाळावर चापून-चोपून बसवलेला झुबकेदार केसांचा विग एका हाताने सावरत, दुसर्या हाताने माणिकचंद गुटख्याचा बकाणा भरत, मोबाइलवर चाळे करत आहे. त्याचे भोकरासारखे बटबटीत डोळे आपल्याकडे रोखून बघत आहेत. आपल्या कुटील कारस्थानांच्या विचारांनी आपले करारी डोळे चमकत आहे. त्याच्या पाठीत खंजीर खुपसावासा वाटत आहे... त्याच्या कपड्यांवरच्या उंची पर्फ्यूमचा दरवळही तिला नष्ट व्हावा असे वाटत असे. तिचा मूळचा धूर्त स्वभाव त्याच्या सहवासात अधिकच क्रूर होत असे. लोकांनाही त्यांची जोडी म्हणजे अगदी साप व मुंगुसाचा जोडा वाटत असे.
(No subject)
शेवटची लाईन खतरा फुसकन
शेवटची लाईन खतरा फुसकन हसायला आले.
साप मूंगूस
(No subject)