Submitted by मंजूताई on 3 September, 2014 - 01:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पारी : - बिया व नाकाडे काढलेला पेंड खजूर २ वाट्या, दुध पावडर २ टीस्पून
सारण : - खोबर्याचा किस १/२ वाटी, मिश्र सुकामेवा बारीक चिरलेला १/४ वाटी, वेलदोडा/जायफळ आवडीनुसार, पांढरं चॉकलेट (मिल्की बार) ५
क्रमवार पाककृती:
खजूर व दुधपावडर मिक्सरमध्ये एकजीव करुन घ्या. खोबर्याचा कीस, सुकामेवा, चॉकलेट, वेलदोडा पूड एकत्र करुन घ्या. मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यात पारीचा गोळा एकसारखा पसरवून घ्या त्यात सारण भरून चहूबाजूने बंद करा. अलगद हाताने मोदक काढून घ्या.
वाढणी/प्रमाण:
अकरा मोदक झाले
अधिक टिपा:
चॉचॉमो हे स्पर्धेसाठी केले. पंचखाद्याचे (खजूर्/खारीक , खोबरं, खसखस, खवा व खडीसाखर)केले तर खसखस भाजून घ्या ती सारणात टाकू शकता किंवा वरुन लावू शकता. सगळे जिन्नस एकत्र करुन ही मोदक करु शकता.
- गुलकंद घालूनही अश्याचप्रकारे भरलेले, न भरलेले मोदक करु शकता.
माहितीचा स्रोत:
स्वप्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त पा.कृ. फोटो दिसत नाहियेत
मस्त पा.कृ.
फोटो दिसत नाहियेत मला.
मस्त्च.. पण फोटो दिसत
मस्त्च..
पण फोटो दिसत नाहियेत.
फोटो दाखवा प्लीज. रेस्पी
फोटो दाखवा प्लीज. रेस्पी चांगली वाटतेय.
छान ! ( फोटोच्या लिंक्स मलाही
छान ! ( फोटोच्या लिंक्स मलाही दिसत नाही आहेत. )
होय, रेसिपी छान वाटतेय पण
होय, रेसिपी छान वाटतेय पण मला ही फोटो दिसत नाही.
मस्त पा.कृ. फोटो फोटो फोटो
मस्त पा.कृ.
फोटो फोटो फोटो
छान वाटताहेत . नामकरणं जोरात
छान वाटताहेत :).
नामकरणं जोरात चालू आहेत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सगळ्यांना धन्यवाद! फोटो
सगळ्यांना धन्यवाद! फोटो दिसताहेत का सांगा
व्वा! मस्तच आणि फोटो तर
व्वा! मस्तच आणि फोटो तर तोपासु...
नक्की करण्यात येतील.
मस्तच दिसतायत
मस्तच दिसतायत
मंजू, फोटो दिसत आहे आणि मस्तच
मंजू, फोटो दिसत आहे आणि मस्तच रेसिपी आहे.
यम्मी मोदक
यम्मी मोदक
छान दिसत आहेत मोदक
छान दिसत आहेत मोदक
अप्रतिइम
अप्रतिइम
व्वा! मस्तच..........
व्वा! मस्तच..........
फोटो दिसत नाहियेत
फोटो दिसत नाहियेत![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)