केळ्याचे लाडू

Submitted by दिनेश. on 1 September, 2014 - 05:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
आकारानुसार ७/८ लाडू होतील.
माहितीचा स्रोत: 
गणपती बाप्पा मोरया. तीच प्रेरणा.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसताहेत लाडू!

पाकृ मी उशीरा वाचली. गणपतीला आलेल्या केळ्यांचा दरवर्षीप्रमाणेच यंदाही केळेपाक केला.

नेवैद्यासाठी केले न फोटो टाकला आत्ता खाल्ला केलं अजून चाललं असतं

बापरे, पुर्ण प्रतिसाद दोन्-तिन्दा वाचला तेव्हा अर्थ लागला या वाक्याचा की केळं अजुन एक टाकलं असतं तरी चाललं असतं. Happy

>>नाही झंपी... केळ्याचे प्रमाण जास्त असल्याने केळ्याचीच चव लागते. ( म्हणून तर हे नाव दिलेय, नाहीतर रव्याचे लाडू नसते का लिहिले ? स्मित )<<<<<

हो ते पण खरच. आपलया डोक्यात किडा वळवळला म्हटलं विचारून घ्यावे. Happy

मी पण करून बघितले. १ वाटी केळ्याचे तुकडे आणि अर्धी वाटी रवा. दिनेशदा म्हणाल्याप्रमाणे अर्ध्या मिनिटाच्या आतच मिश्रण घट्ट झालं,आणि चुकून गोळा झाला. पण तो गार झाल्यावर लाडू वळता आले..चव छान होती कारण मला फक्त केळ्याचाच शिरा आवडतो पण थोडं कचवट वाटलं खाताना..का बरं असेल? रवा छान भाजून घेतला होता..

केळ हे फक्त खायला आवडत . केळ घालून शिजवलेली कोणतीच गोष्ट आवडत नाहि ( अपवाद : पूजेचा प्रसाद ) .
त्यामूळे माझी काट Sad

topasu.

गायू, रवा बारीक पाहिजे. आपल्याकडे काय नंबरने मिळतो माहीत नाही पण आपण शिर्‍याला वापरतो त्यापेक्षा बारीक हवा. आमच्याकडे एकाच प्रकारचा मिळतो.

स्वस्ति, पूजेच्या प्रसादाच्या जवळपासचीच चव लागते, पण तेवढे मऊसर नाहीत.

गायू, रवा बारीक पाहिजे. आपल्याकडे काय नंबरने मिळतो माहीत नाही>>>>>>>>> झीरो नंबरचा रवा.

गौरीच्या नेवेद्या साठी सौ. ने केले होते सगळ्याना खूप आवडले
सौ. तर्फे खास धन्यवाद
camera-cable चे काम झाले की फोटो टाकीन

रवा फुलला नाही की कच्कच लागतो! कमी आचेवर व्यवस्थित भाजला की तो फुलेल..
रेसिपी छान आहे पण तरी नुसत्या केळ्याच्या ओलाव्यात रवा फुलतो का?

आभार जम्बो, सानी.
हो प्राजक्ता, केळे पिकलेले असेल तर भरपूर पाणी सुटते आणि तेवढ्यात आरामात शिजतो रवा.

स्वस्ति.. शक्य असते तर मी नमुना पाठवला असता !

शिरा आवडिचा असल्याने आज केले, चव छान येते, शिरा-रवा लाडु याच्या अधली-मधली चव जाणवते. अगदी बारिक (० number) वापरला असल्याने अजिबात कचकच जाणवत नाही, पाव कप साखरेने फार गोडी येत नाही अजुन साखर घालाविच लागली ,लाडुचा आकार देता येइल पण त्याच फर्मनेस येत नाही अजिबात.
अजुन एक केळ घातल्याने सगळ चिकट होइल अस वाटल होत पण तस झाल नाही.

याला व्हेगन लाडु म्हणता येइल.

हा माझा झब्बू.

घरी बरीच केळी उरली होती. त्याना सद्गती देण्याच्या विचारात असताना ही पा. कॄ. आठवली.

मी थोडी मिल्क पावडरही घातली आहे. सोप्या रेसिपीसाठी धन्यवाद दिनेशदा.

Agadee jaast pikakelee nakot, mhaNaje garaachaa rang badalelaa nako, sahaj kuskatalee jaateel evaDheech asaaveet.

गेल्या काही दिवसांत ही कृती इतक्यांदा वर आली की शेवटी करून पाहिली. माझे लाडू बदाम खुपसताना तडे जायला लागले म्हणून काहींना तसंच ठेवलं. छान चव येते. कदाचीत अजून तूप घातलं तर दिनेशदांसारखे दिसतील पण हा तसा केळ्याच्या शिर्^याला लो कॅल पर्याय आहे असं म्हणायला हरकत नाही.

एंजॉय Happy

ladu.jpg

Happy वेका पाचर मारल्यासारखे काय डेंजर खुपसलेस बदाम! पण फोटो सुरेख आहे. लुसलुशीत झाले असावे लाडू.

ही मस्त कृती आहे. करून बघणार.

Pages