मला ५-६ वर्षापासुन व्हेरिकोज-व्हेन्स चा त्रास आहे. मध्यंतरी आयुर्वेदिक ट्रिटमेंट घेतली होती. .त्याने काही दिवस बर वाटल. नंतर उजवा पाय खुपच दुखायचा.. चालतांना मधेच लॉक व्ह्यायचा. कलर डॉपलर केल तेव्हा थ्रंबोसिस झाल्याच कळल. त्यावेळी पण डॉ.च्या सल्ल्याने लीच थेरपिने आराम पडला.. ४-५ वर्षाने डाव्या पायातहि तोच त्रास [थ्रंबोसिस] झाला.. पण यावेळी एलो. डॉ. च्या सल्ल्याने इंजक्शन घेतले . आता थ्रंबोसिस नाही . पण गुढग्याच्या खाली पोटरी पर्यंत पाय दुखतोच..अकडतो . रात्री झोपेत पाय जवळ घेवुन झोपले तर लवकर सरळ होत नाही. जास्त वेळ उभ राहता येत नाही. पाय कडकच असतो. मालिश ने काही वेळ बर वाटत.. त्यात२००९ मधे एन्जिओप्लाटिही झाली आहे. बाकी तब्यत चांगली आहे. पायाचाच खुप त्रास आहे.तरी मी सकाळ- संध्याकाळी १- १.५ किलोमिटर फिरतेच.. कुणी काही मार्गदर्शन करु शकेल का?
व्हेरिकोज व्हेन
Submitted by प्रभा on 25 August, 2014 - 07:56
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फार छान होईल मार्गदर्शन
फार छान होईल मार्गदर्शन मिळाले तर! माझ्या आईला पण हाच सेम त्रास आहे. ती तर चालायला नकोच म्हणते.
योगा मधल्या विपरीत करणीचा
योगा मधल्या विपरीत करणीचा बराच फायदा होतो. म्हणजेच लेग्स अप द वॉल पोज.
http://yogashaastra.blogspot.com/2010/12/relief-for-varicose-veins-throu...
इथे विपरीत करणीचा फोटो पण आहे आणि नीट माहिती दिलेली आहे.
विपरीत करणी हे करायला पण सोपं आसन आहे. सर्वांना सहज जमेल असं.
अजून लिंक घ्या
http://www.yogajournal.com/poses/690
ह्या आसनाची अनेक व्हेरिएशन्स पण करता येतात. जमिनीवर झोपून पाय भिंतीवर उभे किंवा योग्य उंचीच्या कॉफी टेबल(टी पॉय)वर किंवा सोफ्यावर रेस्ट करून वगैरे वगैरे...
एखाद्या योग्य योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. च्या सल्ल्याने सुरुवात करा.
शुभेच्छा!
ओके शूम्पी नक्कीच करून घेईन
ओके शूम्पी नक्कीच करून घेईन आईकडून, धन्स!
धन्यवाद-- डीविनिता,
धन्यवाद-- डीविनिता, शूम्पी. आपल्या मायबोली वरील डॉ. ना हि विनंती करते कि त्यांनी मला उपाय सांगावेत. मी क्रेप-बन्डेज बांधुन फिरायला जाते. पण स्टॉकिंग्जनी त्रास वाटतो.. शूम्पी तुम्ही सांगितल्या प्रमाणे विपरीत करणी मेडीटेशन करेल. धन्यवाद.
माझ्या सासऱ्यांनासुद्धा सेम
माझ्या सासऱ्यांनासुद्धा सेम प्रॉब्लेम आहे. ते पुण्यातील खासगीवाले डॉक्टरांकडे treatment साठी जातात. फरक पडतोय त्यांना
शूम्पी +१ फक्त एक अवांतर
शूम्पी +१
फक्त एक अवांतर माहिती. विपरीत करणी ही मुद्रांमध्ये गणली जाते.
नमस्कार
नमस्कार
माझ्या आईचे आत्ताच varicose vain चे ऑपरेशन झाले.लेझर ट्रीटमेंट झाली पण तिला 2 आठवड्यांनी भरपुर त्रास होत आहे. अजुन दुसर्या पायाचे ऑपरेशन करायला डॉ.नी सांगितले आहे. काय करावे कळत नाही. ती दुखण्यामुळे घाबरत आहे. दुसरा काही पर्याय आहे का? पहील्या पायातुन ब्लीडींग पण झालेले म्हणुन लगेच ऑपरेशन करावे लागले. कृपया मार्गदर्शन करावे.
???
???
होमिओपथिक औषध घ्या. ओवर द
होमिओपथिक औषध घ्या. ओवर द काउंटर मिळतात.