करवंदाचा गुळांबा

Submitted by मंजूताई on 20 August, 2014 - 04:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करवंद - १ पाव, सेंद्रिय गूळ - १ पाव

क्रमवार पाककृती: 

करवंद धुवून कोरडी करुन चार काप करुन चिरुन घ्यावे व त्यात बारीक चिरलेला गूळ मिसळून घ्यावा व १५ मिनीटे मुरु द्यावे. गॅसवर ठेवून शिजवून घ्यावे. शिजत आला की वर फेस्/बुडबुडे येतात, म्हणजे शिजलाय. चांगला शिजला म्हणजे वर्षभर टिकतो. रंग व चव अप्रतिम! ब्रेड, पराठा, पुर्‍यांबरोबर खायला छान लागतो.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

सीजनचं खावं असं आपल्या ऋजुता (आहार गुरु) म्हणतात म्हणून चटणी व हा गुळांबा केला.

माहितीचा स्रोत: 
सासूबाई करायच्या परसदारातल्या करवंदाचा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजु ताई, फोटो अगदी तोपासु...:)
मी पण करते पण साखरेचा, आता या वेळेला गुळाचा करीन..

ही करवंदे वेगळी आहेत का? म्हणजे डोक्यात घालतात ती का / पिकल्यावर काळी होणारी?
बाकी रंग मस्तच.

सगल्यांना धन्यवाद! हा सेंद्रिय गूल आहे रसायनविरहीत खजूराचा नाही.
दिनेशदा मला ह्याचा रंगच खूप आवडतो.
सायली गूलाचा छान लागतोच व हेल्दीही
देवकी ही करवंदे डोक्यात घालत नाही.

पाककृती छान आहे .
मी करवंदच्या सीझनमध्ये करुन बघेन.
करवंदे डोक्यात घालत नाही. Happy === काही ठीकाणी फुलांसारखे केसात घालतात.

कामिनी, सही, आवडल.

ही करवंदे मुंबईला जुलै /ऑगस्ट मध्ये मिळणार्‍या ओल्या खारकांसारखी दिसतायत मला. त्याला तुमच्या भागात करवंदे म्हणतात का ?

कामिनी, मनीमोहोर , आता ह्या गुलाबी रंगाच्या करवंदाचा (पिकलेल्या) सीजन आहे. साधारण जूलै महिन्यात हिरवी करवंद बाजारात येतात.

ही करवंदे सिंगापुरला सध्या आली आहेत. घरी गुळ सुद्धा आहे. मी नक्की करुन बघेन. पण पुर्‍या वगैरे मी नाही करणार.