मध्यंतरी एका पी.एच. डी च्या मुलाखतीला ( प्रेक्षक म्हणुन ) जाण्याचा योग आला. सध्या मी काही काळ नोकरी सोडुन छोटासा व्यवसाय सुरु केला आहे.
भरपुर वेळ आहे तेर पी.एच डी का करु नये असे मनात येते आहे.
माझी शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट आहे. काही कारणामुळे मला मास्टर्स डिग्री मिळाली नाही. अश्यावेळी पी. एच डी ला भारतात कुठे अॅडमिशन मिळु शकते का ?
अनेक युनिव्ह्र्र्सिटीज चे एलिजिबीलिटी क्रायटेरीया पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतात तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मात्र मास्टर्स डिग्रीचा उल्लेख करते.
यु.जी,सी नेमके काय म्हणते ?
व्यावसायिक अनुभवाचा काही फायदा मिलू शकतो का?
एम फिल साठी सुध्दा हाच क्रायेटेरीया आहे का ?
एम फिल करुन पी एच डी करणारे कोण असतात ? ते का जरुरी आहे ?
माझ्या केस मधे एम फील ला अॅडमिशन मिळाली आणि मी पास झालो तर पी. एच डी ला अॅडमिशन मिळेल का ?