नमस्कार मंडळी
बृहन्महाराष्ट्र मंडळाचा 17 वा अधिवेशन सोहळा यंदा लॉस एंजलिस मधे 3-5 जुलै 2015 ला संपन्न होणार आहे
त्यामधे असलेल्या अनेक कार्यक्रमांपैकी एक सारेगम ही स्पर्धा या वर्षी ही आयोजित करण्यात आली आहे. नवीन उपक्रम म्हणजे या वेळी प्रौढांबरोबर युवा व बाल गट सुद्धा असतील. बाल गट: वय ६ ते १२, युवा गट: १३ ते १८ आणि प्रौढ गट: १९ आणि त्यावरील. त्यासाठी उत्तर अमेरिकेत ठिकठिकाणी असलेल्या महाराष्ट्र मंडळातून प्राथमिक पातळीवर स्पर्धा होतील, आणि त्यातील विजते २०१५ अधिवेशनाच्या मंचावर त्यांची गाणी सादर करतील. झी मराठी वाद्यवृंद आणि भारतातील मान्यवर परीक्षक आमंत्रित करण्यासाठी लॉस एंजेलिस बृमम २०१५ समिती प्रयत्नशील आहे. आपल्या परिसरातील गायक गायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सारेगम ही एक उत्तम संधी आहे. अंतिम विजेत्याना ब्रु.म.मं 2015 च्या भव्य मंचावर आपले गाणे सादर करण्याची संधी मिळणार आहे.
ऑस्टिन महाराष्ट्र मंडळाच्या प्राथमिक फेरीची तारीख 6 सप्टेंबर 2014 आहे. तरी ऑस्टिन जवळच्या इच्छुक स्पर्धकानी त्या मंडळाशी जरूर संपर्क साधावा.
स्पर्धेचे नियम, इतर मंडळांच्या प्राथमिक फेरीच्या तारखा व अधिक माहितीसाठी येथे पहा
http://bmm2015.org/convention-activitie/saregama/