सल्ला मेंडकेचा - प्रश्नावली
मेंडका ही स्वर्गातील एक शापित अप्सरा. स्वर्गलोक सोडून भूलोकी अर्धबेडकी-अर्धअप्सरा रूपात वावरण्याचा शाप तिला मिळाला आहे. दिवसातला काही काळ बेडकीच्या रूपात वावरणारी मेंडका उर्वरित वेळेत मात्र एक सौंदर्यवती, एक फॅशनिस्टा आहे. त्यामुळे तिचे सल्ले हे अप्सरेच्या व बेडकीच्या व्यक्तिमत्त्वांच्या एकत्रीकरणातून दिले गेलेले असतात. ‘मेंडकेचा सल्ला’ या सदरातील समस्यांची उकल सांगताना मायबोलीकरांनी हा परकायाप्रवेश साधायचा आहे व मेंडकेने 'वहिनीचा सल्ला' सदरातील प्रश्नांना जशी उत्तरे दिली असती, तशी या प्रश्नांची उत्तरे लिहून आम्हांला पाठवायची आहेत.
या दुव्यावर प्रश्न आहेत व तिथेच उत्तरे लिहिण्याची सोय आहे
अंतिम मुदतः ३१ ऑगस्ट २०१४
हितगुज दिवाळी अंक २०१४ नियमावली

|
प्रश्न भारी आहेत मेंडकेची
प्रश्न भारी आहेत

मेंडकेची सुप्पर कल्पना आणि इतके आचरट प्रश्न कुणाच्या डोक्यातून निघाले? माझा सादर विनम्र नमस्कार. _/\_
कैच्याकै भारी कल्पना आहे.
कैच्याकै भारी कल्पना आहे. नक्की सुपरडुपर यशस्वी होणार

आचरट प्रश्नांना जमेल तितकी भारी आचरट उत्तरं देणार
काय प्रश्न आहेत
काय प्रश्न आहेत
मेंडकाजी आगे बढो!!
माझा नंबर ५६७. बापरे इतका
माझा नंबर ५६७. बापरे इतका मागे आहे मी!
-गा.पै.
'सल्ला मेंडकेचा' या सदरासाठी
'सल्ला मेंडकेचा' या सदरासाठी एकापेक्षा अधिक प्रश्नांना उत्तरे द्यायची असल्यास सर्व प्रश्नोत्तरे एकाच प्रवेशिकेमध्ये समाविष्ट करावीत.>>> सर्व उत्तरे कम्पल्सरी नाही का?? ऑप्शनल टाकता येतील का प्रश्न?
हा हा हा मेनका मेंडक अप्सरा
हा हा हा
मेनका मेंडक अप्सरा बेडूक मेंडका ... आणि तिचे सल्ले आणि हे प्रश्न .. कल्पनाच भन्नाट आहे
मजा येणारेय हे सदर वाचायला !
भारी आहेत प्रश्न.. वरचं
भारी आहेत प्रश्न..
वरचं टेम्प्लेटपण मस्त आहे.
सीमंतिनी, 'मेंडकेचा सल्ला'
सीमंतिनी,
'मेंडकेचा सल्ला' सदरासाठी देण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक नाही. आपण एक किंवा एकापेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. मात्र एकाहून अधिक प्रश्नांची उत्तरे द्यायची झाल्यास आपल्याला ती एकाच प्रवेशिकेत भरून सुपूर्त करायची आहेत.
_/\_ अचाट प्रश्न आहेत... जरा
_/\_ अचाट प्रश्न आहेत...

जरा विचार करून काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा विचार आहे...
मस्त आहे मेंडका! गुलाबी गाल,
मस्त आहे मेंडका! गुलाबी गाल, पापण्यांची फडफड वगैरे वगैरे... फार भारी!!
मस्त आहे हे
मस्त आहे हे
प्रत्येक प्रश्नाचं सर्वात
प्रत्येक प्रश्नाचं सर्वात मजेशीर उत्तर अंकात प्रकाशित होणार - मान्य.
पण इतरांनी काय काय धमाल उत्तरे दिलीत ते अंक प्रकाशित झाल्यावर आठवड्याभराने का होईना मायबोलीवर वाचायला आवडेल. बघा जमतंय का.
अग बाबो.. कसले डेंजर प्रश्न
अग बाबो.. कसले डेंजर प्रश्न आहेत..
हो, हो...आशूडी +१००
हो, हो...आशूडी +१००
सॉलिड कल्पना आहे ही एक
सॉलिड कल्पना आहे ही
एक शंका:
>>>प्रत्येक प्रश्नासाठी आलेल्या उत्तरांमधून सर्वांत जास्त मजेशीर उत्तर या सदरात प्रकाशित केले जाईल<<<
हे ठरवणार कसे?
(कोणाला काय वाचून अधिक मजा वाटेल ते कसे कळणार?)
कसले धमाल प्रश्न आहेत!
मामी, आशू :- तुम्ही तर लिहाच
मामी, आशू :- तुम्ही तर लिहाच लिहा
मस्त कल्पना केश्विनी, मामी
मस्त कल्पना
केश्विनी, मामी वगैरेंसाठी अगदी सर्व्ह्ड ऑन द प्लॅटर!
घ्या दोघींनीही. तुमच्या अचाट कल्पनाशक्तीचा आदर राखूनच हे वाक्य लिहिले आहे! 
पण एकच प्रश्नाचे जास्त उत्तर
पण एकच प्रश्नाचे जास्त उत्तर द्यायची असल्यास काय करावे ?
'वहिनीचा सल्ला' लिहिलंय
'वहिनीचा सल्ला' लिहिलंय म्हणून फक्त स्त्रीआयड्यांची चर्चा चालू आहे का?
आपल्या फारएंडभाऊंना विसरू नका.
पण इतरांनी काय काय धमाल
पण इतरांनी काय काय धमाल उत्तरे दिलीत ते अंक प्रकाशित झाल्यावर आठवड्याभराने का होईना मायबोलीवर वाचायला आवडेल. बघा जमतंय का. >> +१०००००
सगळेच +१
सगळेच +१
उदयन, मग डुआयडींना कामाला
उदयन, मग डुआयडींना कामाला लावायचे
मी फारएण्डचं नव लिहिता लिहिता
मी फारएण्डचं नव लिहिता लिहिता थांबले
कृपया मला २०-३० डुआयडी काढुन
कृपया मला २०-३० डुआयडी काढुन द्यावेत
फारेण्ड, श्रद्धा, आशुडी,
फारेण्ड, श्रद्धा, आशुडी, मामी, डीजे, मैत्रेयी, मृण्मयी, साजिरा, कौतुक, अस्चिग यांच्याकडून भरीव सहयोग अपेक्षित आहे!!!!
(अजूनही वीर आहेत हां!!)
काय भारी प्रश्न आहेत ...
काय भारी प्रश्न आहेत ...
अचाट प्रश्न
अचाट प्रश्न आहेत...............:D

त्ये त्येवडं या धाग्याला
त्ये त्येवडं या धाग्याला म्येन प्येजवर टाकन्याचं बगा की!
Pages