जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व पात्रांकडून जातिवंत, खराखुरा व जिवंत वाटेल असा अभिनय काढून घेण्यासाठी घरात एखादी पिवळी धामण सोडावीशी वाटत आहे.. पण 'एका निष्पाप धामणीला कंटाळवून कंटाळवून मारले' असा आळ सर्पमित्रांनी घेतला तर करायचे काय ह्या विचारात थंड बसलेलो आहे.

-'बेफिकीर'!

रविवारी महाएपिसोड आहे, माई दोघांना झापताना दाखवल्या आहेत प्रोमोमध्ये....
विश्वासघात केलात, आताच नातं तरी खर आहे का...अशी २-३ वाक्य पाहीली सर्फींग करता करता

मी बघते पण नेमका तो एपिसोड मिस झाला बहुतेक, आधी त्याच्या बाजूने बोलत होते सगळे आता त्याच्या बायकोच्या बाजूने झालेतं.

त्या सावर्डेचं नक्की काय झालं ? कोणी नीट पाहीलं का ? मी बघते पण नेमका तो एपिसोड मिस झाला बहुतेक, आधी त्याच्या बाजूने बोलत होते सगळे आता त्याच्या बायकोच्या बाजूने झालेतं.

+१

सावर्डेची बायको एकदा देसायांच्या घरी फोन करते आणि अमितदादांशी बोलायचंय, असं मेघनाला सांगते. मेघना निरोप देते. मग अमितदादा आणि अर्चू तिची बाजू ऐकायला जातात आणि परत येतात, तेच मतपरिवर्तन होऊन.... कारण सावर्डेची बायको सांगते की तिचं तसं काही प्रेमप्रकरण नाहीच्चे!! तिचा शाळेत असतांना एका मुलावर क्रश असतो. तो तिला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनात भेटतो, म्हणून सहज ती त्या क्रशविषयी सावर्डेला सांगते. तेंव्हापासून त्याच्या डोक्यात संशयाचं भूत बसतं आणि तो तिला त्रास देतो. त्याचा छोटा मुलगापण अमितला सांगतो म्हणे, की बाबांना समजवा.. ते आईला फार त्रास देतायत...

ही आहे सावर्डेची कथा.. ही माईला सांगतांना अमित एक गोष्ट राखून ठेवतो, जी नंतर बायकोला सांगतो.. ती म्हणजे, सावर्डेची बायको म्हणते, की नवर्‍याच्या रोजच्या कटकचीमुळे तिला आता त्या शाळेतल्या मित्राविषयी खरंच आकर्षण वाटायला लागलंय... Uhoh

असो, अमितच्या बायकोवरुन आठवलं, हल्ली तिने होसूमीयाघचे संवाद लिहिणं बंद केलेलं दिसतंय, कारण आता तिच्याऐवजी मुग्धा गोडबोलेचं नाव दिसतं..

बाकी, सुमोला जे शब्द उच्चारता येत नाहीत, ते सारखे सारखे तिच्या तोंडी घालण्याचं काय कारण? ज्ञानामृत ऐवजी सारखी न्यानामृत, न्यानामृत करत असते... इतकं खटकतं ते कानाला, की बस... तिला 'ळ' चा उच्चारही नाही जमत. नशीब ते अक्षर असलेला कुठला शब्द तिला फार उच्चारायला लावत नाहीत...

तिला 'ळ' चा उच्चारही नाही जमत. नशीब ते अक्षर असलेला कुठला शब्द तिला फार उच्चारायला लावत नाहीत...<<<

Lol

डेझी Biggrin

बेफि, ती "कळलं का?" हे "कयलं का?" असं विचारते... ह्या पण डायलॉगला भरपूर स्कोप आहे, पण जास्त ऐकावा लागत नाही, हे नशीबच.. Happy

अहो ती 'आदित्य' ही हाक अशी मारते जणू आदित्य आयुष्यात प्रथमच कोणालातरी प्रपोझ करत आहे आणि तो त्या पात्रतेचाही नाही आहे.

सुकन्याला "सगळ" हा शब्द पण म्हणता येत नाही... आभाळमाया मध्ये तिच्या तोंडी कायम आपण सग्गे हे दोन शब्द होते आणि संवाद लिहीणार्‍याने जणु खुन्नस असावी अश्या प्रकारे "सगळे" हा शब्द तिच्या डायलॉग्जमधुन सतत कसा येईल हेच बघितल होत...

आद्या गोसाव्या सोबत गाठी जमल्या
आता उद्यापासून ढोलकी आणि चोमडी यांच्यातला गुंता
ठोम्बि सून घुमीची घुमीच राहणार
पिंपाला उद्या धार लागणार
नानाची बुद्धी गहाण पडणार, त्याच्या लेक्चर ला उद्यापासून किमत शुन्य

मी काल रात्री नऊच्या आत जेऊन घेतला आणि दुसर्या खोलीत दबा धरून बसलो
पण दहाच्या नंतर मात्र मातब्बर प्रेक्षक वर्गाचा पोपट झाल्याचे कानी आले
नक्की काय झाले याची मात्र खबरबात नाही

माझी सुरुवात गेली सालाबादप्रमाणे. पण अर्चुने ती पेटी एकदाची दाखवली वाट्ट सुमोला. मग दोघी जाम रडल्या ( माझे हे पण गेले, पण शेवटी जरा कळले). नन्तर एकत्र परेड झाली. आदे मेदे सर्वान्समोर अपराधी चेहेर्‍याने उभे राहुन सर्वान्ची बोलणी खात होते. अमित म्हणाला की याना म्हणले होते की काहीही प्रॉब्लेम असला तरी मला येऊन सान्गा. पण तसे यानी केले नाही.

मेदे म्हणाली की तिची चूक होती. म्हणून ती आणी आदे मित्रत्वाच्या नात्याने रहात होते, तिचा निर्णय होई पर्यन्त. मग सुमो म्हणाली की सत्यनारायण पूजा ते गोन्धळ पासुन सगळीकडे आदेची पत्नी म्हणून वावरत होतीस, मग तू तर मैत्रिण कशी? मग तू देवाला पण फसवले आहेस. आदेच्या हाताला हात लावुन मम म्हणत होतीस की वगैरे वगैरे..

मग भोचक अर्चु म्हणाली की हे दोघे एकमेकाना परके आहेत. मग सगळ्यानी काढता पाय घेतला. आदे- मेदेत काहीतरी नवरा बायकोचे बोलणे झाले. सुमो जाम रडत होती पण नाना म्हणाले की रागाच्या भरात घेतलेला निर्णय नन्तर पश्चाताप करायला लावतो.

नन्तर काय झाले काय माहीत? साबु सारखे चॅनेल बदलुन मॅच लावत होते, त्यामुळे जल्ला काय कलले नाय.

रडारड नाही.. पण ट्रेलर वरून असं वाटतय की सहळे आदे-मेदेला येता जाता हाडहाड करणार आणि तु.क. टाकणार..
मग काहीबाही घटनांनी त्यांना परत अ‍ॅक्सेप्ट करणार.. मग सुमो रडूण म्हणणार आदेला कसं रे बाबा एकट्याने पेललस हे.. वगैरे वगैरे !
म्हणजे सगळ्यांच्या गाठी परत जुळणार !!!

>>>>>आणि त्या गाठी जुळवायला आणखी किती आठवडे लागणार?
.............
आठवडे वगैरे काही नाही
आता त्या गाठी शेवटच्या भागातच जमणार (जर आद्या मेला नाही तर)
शेवटचा एपिसोड हा मातब्बर प्रेक्षकांच्या आत्म्याला शांती लाभण्या साठी असतो.
नाहीतर त्यांना चूक चूक लागून राहते, तीन वर्षाची मेहनत फुकट गेली.
.
रेफ़रन्स : कुंकू, तू तिथे मी, भाग्यलक्ष्मी, मला सासू हवी, राधा हि बेवडी, उंच माझा झोका …. यांचे शेवटचे भाग बघितलेले माझे घर

Pages