भगरीचे पाव
साहित्य: 2 वाट्या भगर, 1/4 वाटी दही, 4/5 हीराव्या मिरच्या, 1 चमचा जीरे, 1/2 वाटी शेंगदाणे कूट, मीठ, साखर चवीनुसार, 1/4 चमचा खाण्याचा सोडा, पाणी, तेल.
कृती:
1. भगर धुवून, 4-5 वाट्या पाण्यामाधे 4 तास भीजत घालावी.
2. नंतर मिक्सर मधे दोश्यासारखी चांगली वाटावी.
3. जीरे, मिरची वाटून पीठामधे मिक्स करावी.
4. चवीपुरती साखर मिक्स करावी.
5. दही घालून पीठ मिक्स करावे आणि झकून 2 तास ठेवून द्यावे.
6. पाव करायच्या आद्धे 1/2 चमचा खाण्याचा सोडा पीठामद्धे मिक्स करावा.
7. नॉन-स्टिक तव्यावर तापला की तेल टाकून पळीने पीठ टाकावे.
8. दोन्ही बाजूने पाव चांगला भाजला की काढून घ्यावा. हा पाव चांगला फुगतो आणि जळी पडते. (अगदी आपल्या पाव-भाजी च्या पावसारखा नाही :))
सोबत उपवासाची बटाटा भाजी, शेंगडाण्याची आमटी (उपासाची) , एखादी चटणी सर्व करावी.
एकदम मस्त बेत होतो आणि पुन्हा पुन्हा उपास करावा वाटतो
दही घातळयानंतर 2-3 तास पीठ भीजले की पाव चांगले होतात.
नॉन-उपास डे ला कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट घालू शकता.
भगर म्हणजे वरीचे तांदूळ का?
भगर म्हणजे वरीचे तांदूळ का? तसे असल्यास वेगळीच कृती म्हणावी लागेल ही वरीची
थोडंसं कुलचासारखं वाटतंय का?
थोडंसं कुलचासारखं वाटतंय का? (कुलचा कसा करतात हे माहित नाहीये)
नविनच प्रकरण दिसतयं. नॉन
नविनच प्रकरण दिसतयं. नॉन उपवासाच करुन बघेन. ह्याचे उपासाचे डोसेही बनवता येइल की..
हो भगर म्हणजे वरीचे तन्दूळ
हो भगर म्हणजे वरीचे तन्दूळ
ही पाव उप्वासाच्या मिसळी
ही पाव उप्वासाच्या मिसळी बरोबर चालतील का
मी चुकुन मगरीचे पाव
मी चुकुन मगरीचे पाव वाचलं.
पाव का म्हटलय? डोसा का नाही?(उगाच विचारात पडलेय)
फोटो टाका की
फोटो टाका की
छान आहे प्रकार. फोटो? >>>>
छान आहे प्रकार. फोटो?
>>>> थोडंसं कुलचासारखं वाटतंय का? (कुलचा कसा करतात हे माहित नाहीये) >>>> किती confidence तो, वरदे.
>> वरदा खाण्याचा सोडा
>> वरदा
खाण्याचा सोडा उपवासाला चालेल का?
हा घ्या फोटो
हा घ्या फोटो
हा पाव करताना दोस्यसरख
हा पाव करताना दोस्यसरख पसरायचा नाही. त्यामुले तो जाड होतो अनि फुगतो
मग ह्याला पाव का म्हणायचं? हे
मग ह्याला पाव का म्हणायचं?
हे इंग्रजीतलं फ्लॅट ब्रेड चं भाषांतर का?
मस्तच! टण्याभौ आपल्या सांगली
मस्तच!
टण्याभौ आपल्या सांगली मिरजेकडे वरी तांदुळ ज्याला म्हणतात त्यालाच आमच्या नगरात भगर म्हणतात.
आमच्याकडे दोन्ही नावे आहेत,
आमच्याकडे दोन्ही नावे आहेत, पण भगरच जास्त म्हणले जाते.
स्वप्नाली झकास कृती. फोटो पण मस्त.
भगरीचा शिरा पण मस्त लागतो. फक्त मिक्सर मधुन कोरडा दळुन घ्यावा.
मस्त रेस्पी! उपवासाला नाही पण
मस्त रेस्पी! उपवासाला नाही पण एरवी करून पाहणार.
भगरीचं पीठ चालेल का?
मस्त.. मि करते ...
मस्त..
मि करते ... त्याच्यात अजुन मुग पन टाकते...[ रात्री दोन्हि भीजत घालते ] मस्त होतो डोसा...
छान आहे पा क्रु.. पण पाव का
छान आहे पा क्रु.. पण पाव का म्हणटले आहे? घवन किंवा डोसे म्हणता येईल...
छान आहे पाककृती. मला नाव
छान आहे पाककृती. मला नाव वाचुन वाटले एकदम पावासारखे असतील पण हा प्रकार साधारण डोश्यासारखा दिसतोय. डीविनिता यांच्या प्रमाणे मला ही प्रश्न पडलाय खाण्याचा सोडा उपवासाला चालेल का?
भगर-वरीचे तांदुळ-उपवासाचे
भगर-वरीचे तांदुळ-उपवासाचे तांदुळ-श्यामकके चावल-मोरयु .....
मामे माझा माझ्या
मामे माझा माझ्या 'असुगरण'पणाबद्दल ठाम आणि व्यवस्थित आत्मविश्वास आहेच.
पण बघ की तो पाव कुलचासारखाच दिसतोय.कुलचापण आतून मस्त जाळीदार असतो म्हणून मला आठवला.
मामे माझा माझ्या
मामे माझा माझ्या 'असुगरण'पणाबद्दल ठाम आणि व्यवस्थित आत्मविश्वास आहेच.
पण बघ की तो पाव कुलचासारखाच दिसतोय.कुलचापण आतून मस्त जाळीदार असतो म्हणून मला आठवला.
भगर म्हणले की राजगिर्याचे
भगर म्हणले की राजगिर्याचे लाडु करताना ते फसले की जे काही होते तेच आठवते. नुसत्याच लाह्या रहातात लाडु वळलाच जात नाही. (लहानपणी ते तसे फसावे असे कायम वाटायचे. कारण वळलेला लाडु विकला जात असे, भगर घरातच खावी लागायची)
असो. थोडक्यात वर्याच्या तांदुळाचे डोसे/घावन दिसतंय हे. भारी लागेल की. त्यात नॉन उपासाला आले लसुन पेस्ट घालुन आणखी चांगले लागेल.