मायबोली गणेशोत्सव २०१४ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by admin on 8 July, 2014 - 23:24

मायबोली गणेशोत्सव २०१४ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी Happy

गणेशगीतांना चाली लावून हव्या असल्या तर मी ते काम आनंदाने करेन...बाकी प्रत्यक्ष समितीत काम करणे नाही जमणार.

भावी गणेशोत्सव संयोजक मंडळास शुभेच्छा !
ह्या वर्षी काही घरगुती कारणांमुळे संयोजनात सहभाग शक्य नाही.
पण तरीही काही मदत लागल्यास वि.पु/ संदेश केलात तर माझ्या परीने प्रयत्न जरूर करेन.

साती,
लक्षात आणून दिल्याबद्द्द्ल धन्यवाद. २०१३ चा दुवा टाकला आहे. २००२ चा दुवा जुन्या हितगुजवर होता आणि काही तांत्रीक अडचणींमुळे तो साठवून ठेवता आला नव्हता.

रद्दबिद्द करू नका गणेशोत्सव प्लीज. Sad

मंडळ तयार करायला लोकं कमी पडत असतील तर मी काम किंवा लागेल ती सगळी मदत करायला तयार आहे...

सिरिअसली?????????

लोकहो का नाही देत आहात नाव?
मज्जा येते
अनुभव घेऊन बघा.

अ‍ॅडमिन, कोणीच तयारी न दाखवल्यास माझं नाव घ्या Happy

साती मोड ऑन
२०१३ चा गणेशोत्सव संयोजकांशिवायच पार पडला वाटतं... संयोजकांचा नामोल्लेखही फ्रंटपेजवर दिसत नाही, इतर वर्षींचा दिसतो तसा!!! Wink
साती मोड ऑफ

अल्पना, २००९ पासून सगळ्या गणेशोत्सवांच्या लँडिंग पेजवर तळाशी संयोजक मंडळतील सदस्यांची नावं आहेत. २००९ ला तुझं पण आहे Lol
फक्त गेल्यावर्षीचा गणेशोत्सव सोडून. Proud

ते वाचलं मी... Wink

लोकांनी बदनाम करू नये म्हणून आपण आधीच काळजी घ्यायला हवी असं माझं म्हणणं Proud
(पळा! साती मारणार आहे मला.)

मंडळात काम करायची खूप इच्छा आहे आणि लोक कमी आहेत कळल्यावर तर ती जास्तच तीव्र होतेय. पण ऑफिस आणि बाळ आणि घरचा गणपती यांत पुरेसा वेऴ नाही देता येणार म्हणून कमिट करत नाही. पण माझे फुल ऐवजी हाफ तिकीट धरले तर टेन्शन न घेता काम करेन. Happy

साती, तुला बदनाम कुठे केलं? उलट श्रेय दिलं ना तुला, तुझी शैली वापरल्याचं? ज्याला त्याला ज्याचं त्याचं श्रेय देणं, ही चांगली गोष्ट आहे, नाही का? Wink

Pages