स्वयंपाकीण मावशीच्या मुलीच्या शिक्षणासाठी मदत

Submitted by आसना on 27 June, 2014 - 05:20

आमच्या स्वयंपाकीण मावशीला ३ मुली आहेत, नवरा आहे पण व्यसनी जास्त कमवत नाही. मोठ्या मुलीला दहावीत 84% मिळालेत.तर आता महाविद्यालयाचा खर्च आला आहे. तो तिला झेपणार नाही म्हणून त्या मुली साठी शिष्यवृत्तीची माहिती आवश्यक आहे.मी तिला मदत करेनच. परंतु मुम्बैत कोणी NGO अश्या गरजूना काही आर्थिकदृष्ट्या मदत देत असेल तर मला सांगू शकाल का? कोणाला अशा संस्था माहित असेल तर मला कळवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आसना, त्या मुलीला शिक्षणासाठी आवश्यक मदत मिळो, ह्यासाठी शुभेच्छा!
तिला जिथे अ‍ॅडमिशन घ्यायची आहे / घेतली आहे त्या संस्थेतही विचारून बघा. गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती किंवा आर्थिक मदत करणार्‍या ट्रस्टची यादी याबद्दल ते सांगू शकतील.

Hi, Please post this message in the known groups so that it gets circulated, thanks.

If you have come across any bright
students coming from poor
financial background who have
finished their 7th standard this
year and scored more than 80%, please ask
them to contact the NGO - Indian Students Organisation
(Supported by Educare Club).

The NGO is conducting a written
test and those who clear the test
will be eligible for financial help for
their further studies.

Date Of Exam-
6th July 2014

Please ask the students to contact
the people mentioned below to get
the form:

Indian Students Organisation
B.Garaje Line,Ramabai Ambedkar nagar,Ghatkopar(E),
Mumbai, Maharashtra 400075

Contact numbers:
Mr. Anil More
9221557859

Sudhir Keer
9757306030

Educare Club
022 2102 1516

Even if you don't know anyone, please pass on this info, someone might be in need of this.. . UR 1 MSG MAY CHANGE SOMBODY'S FUTURE

I received this as forwarded, not sure if this can help, sorry for english because replying from mobile

ओके उद्या फोन करुन बघते त्यांना. असाच एक फोरवर्ड मेसेज "प्रेरणा" एन्फोसिस फाउंडेशनचा आला होता मला, पण त्यात जे नंबर दिले होते त्यातला एक ही लागत नाही. Sad

आसना,

कृपया मला विपू किंवा कॉल करा. किती खर्च येईल ? मी आर्थिक मदत करु शकतो.

धन्यवाद

मनोज.
८९७५७५६६५४

माझ्या माहितीतल्या एका मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत हवी आहे.. दहावीत ९०%+ (? मी खात्री करुन घेउन सांगू शकेन) मर्क्स आहेत... सध्या १२ वी शास्त्र शाखेत आहे... मुलीची शिकायची इच्छा आहे पण पुढील खर्चाची कुटुंबाची आर्थिक कुवत नाही..पुढील शिक्षणासाठी (ईंजिनिअरींग) महाविद्यालयीन फी चे आकडे बघता , स्कॉलरशीप वा तत्सम मदतीच्या शोधात ती मुलगी आहे....

संस्था / मदतीचे स्त्रोत माहित असल्यास प्लिज कळवा...

केवळ आर्थिक तरतूद न झाल्यास ती ईंजिनिअरींग पासून पराव्रुत्त होईल..त्या आधिच तिला एकादा आशेचा किरण दाखवायचा प्रयत्न करते आहे.

(नवीन धागा कसा उघडायचा माहित नसल्यामुळे प्रतिसादात प्राश्न विचारते आहे.)

मुंबईत महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट आणि गिरगावातील फडके गणपती मंदिर ट्रस्ट देखील शिष्यवृत्ती देतात.

कृपया हा धागा वाहता ठेवू नका, यावर सर्वांनीच गरजू आणि मदत करणारे यांची माहिती संकलित केल्यास सर्वांनाच त्याचा उपयोग होईल. शक्यतो हेडर मधे दात्यांची माहिती संकलित केली तर इतरांना संदर्भासाठी सोपे जाईल.

धन्यवाद अंतरंगी आणि राहुल१२३ !

अंतरंगी...मी तुम्हाला फोन करेन.. !

महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट आणि गिरगावातील फडके गणपती मंदिर ट्रस्ट >> माहिती काढायचा प्रयत्न करते..
राहुल पुण्यातून आश्या काही संस्था आहेत का ?

राधीका_पी,
मीपा वरच्या विनायक प्रभूसरांना संपर्क करा. त्यांना बरीच माहिती आहे. महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता तर्फेही गुणवान गरजू मुलांसाठी फंड उभारला जातो. माहिती ते वेरीफाय करतात आणि पेपरमधे देतात. लोकं आपापल्या कुवतीनुसार देणगीचा चेक पाठवतात. माझ्या आईने त्यांच्या माध्यमातून चेक पाठवले होते.

नविन धागा उघडण्यासाठी उजव्या बाजूला माहिती हवी आहे या ग्रूपच्या नावाखाली नविन लेखनाचा धागा असे दिसेल त्यावर क्लिक करुन नवीन लेखनाचा धागा उघडता येइल. गप्पाचा धागावर क्लिक केले तर वाहता धागा तयार होतो, लेखनाचा धागा तयार केला की सर्व प्रतिसाद साठवले जातात.

लायन्स आणि रोटरी क्लबच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा. ते अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवतात.