माझा लहान भाउ सध्या पूणे विद्यापीठात MCA च्या द्वीतीय वर्षाला आहे.
त्याला क्रीकेट अतिशय आवडतं. तो क्रीकेट उत्तम खेळतोही. कॉलेज च्या विद्यापीठ स्तरावरील सामन्यांमधे खेळलाय. गेल्या महीन्यात campus interviews आणि पूढील करीअर प्लान्स बद्दल बोलत असताना त्याने सांगितलं की त्याला फक्त आणि फक्त क्रीकेट मधेच करीअर करायचं आहे. त्याला अर्थातच विरोध केला. क्रीकेट छंद म्हणून ठीक आहे पण क्रीकेट हा करीअर म्हणून पर्याय असू शकत नाही. नोकरी मिळवल्या नंतर शनिवार रविवार सुटीच्या दिवशी,कंपनीच्या क्रीकेट संघाकडूनही तो क्रिकेट खेळू शकतो असा सरळ मार्गी पर्याय मी सुचवून बघितला. पण राजांवर मा. अमिर खान सहेबांचं भूत सवार आहे. do what you like,follow your heart etc.etc. असं सगळं सांगून तो क्रीकेट मधे करीअर करण्यासाठी कुठल्याही त्याग वगरे करण्यासाठी तयार आहे असं म्हणतोय. MCA पूर्ण करेन पण campus interviews मधे भाग घेणार नाही आणि पुढील आयुष्य क्रीकेट कार्याला वाहून घेणार असं म्हणतोय.
माझ्या अल्प मती नूसार क्रीकेट मधील करीअर म्हणजे club cricket,कींवा रणजी कींवा IPL वगरे मधून खेळणे. पण त्याच्यानूसार अजूनही बरयाच संधी या खेळाशी निगडीत क्षेत्रात आहेत जसे की समालोचन्,पंच (याच्या परीक्षा आहेत),संघ व्यवस्थापन ई.
वैयक्तीक द्रुष्ट्या त्याचा हा निर्णय मला मान्य नाही आणि त्याने नोकरी मिळवून सांभाळून क्रीकेट छंद जोपासावा असं वाटतय तरी पुढील बाबतीत कुणी मार्गदर्शन करु शकेल का?
१. क्रीकेट मधे (क्रीकेट खेळण्या व्यतिरीक्त) करीअर च्या कुठल्या संधि आहेत? त्या कीतपत सुसाध्य (feasible) आहेत?
२. या व्यवसायात संभाव्य धोके कुठले असू शकतील?
३. त्याला क्रीकेट career म्हणून न निवडता छंद म्हणून जोपासण्यास पराव्रूत्त करावे का?
की त्याला या अशा बे-भरवशी व्यवसायात पडायची अनुमती द्यावी? खरच कळत नाहीये..
४. career counselor या बाबतीत मदत करु शकतील का?
धन्यवाद..
------------------------------------------------------------------
सगळ्यांच्या सहभागाबद्दल धन्यवाद. आता पर्यंत झालेल्या चर्चेचा गोशवारा:
१. बहुतेक सगळ्या माबो.करांनूसार क्रीकेट मधे full time career करण्यापेक्षा नौकरी सांभाळून /पार्ट टाईम क्रीकेट शी संबंधित व्यवसाय करणे योग्य राहील.
२. सुचवलेले पर्यायः
१. फारएण्ड /अमि - पंच कींवा स्कोअरर करीता परीक्षा देणे. यासाठी व्यावसायिक क्रीकेट खेळलेलं असणं आवश्यक नाही.
२. उदयनः कंपनी मार्फत त्यांच्या संघात (उदा. रेल्वे,एअर ईंडीया इ.) क्रीकेट खेळणे.
३. नंदीनी: sports journalism / writing columns in print media, sports event management
४.टग्या: लहान मुलांसठी क्रीकेट कोचिंग
क्रीकेट खेळाशी संबंधीत करीअर च्या संधी !!
Submitted by श्रीयू on 23 June, 2014 - 16:32
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
स्टेडिय्म च्य बाहेर फुगे,
स्टेडिय्म च्य बाहेर फुगे, कुल्फि, पिपान्या विकने.
स्टेडिअम मधे पान्याचि बोटल २०० रु ला विकने, लाहया १०० रु ला छटाक विकने, चा २५० रु कप दराने विकने
स्टेडिअम च्या बाहेर गेलेला बोल आनुन देने.
पाउस आल्यवर सतरन्जि घेउन पलत जाने.
ब्रेक मधे कोल्ड्रिंगचि गाडि घेवुन मैदानावर जाने.
बेटमेनला बदलि बेट, पान्याचि बोटल घेवुन धावत जाने.
स्कोरबोर्द वरचे आनदे बदलने.
तिकिट न मिलालेल्यांना जास्ती पैशे घेवुन तिकिट देने.
बोलि / पैजा लावने
इ.
एमसीए चांगल्या ग्रेड्स ने
एमसीए चांगल्या ग्रेड्स ने पूर्ण करून मग १-२ वर्षे प्रयत्न करू देणे हा एक पर्याय आहे. आत्ता तो १८-१९ चा असेल असा अंदाज करून - २०-२१ पर्यंत क्रिकेट मधे काही प्रगती करता येते का ते पाहून त्याप्रमाणे ठरवता येइल. मात्र क्रिकेट मधे नक्की काय ध्येय गाठायचे आहे स्पष्ट हवे.
सिरीयस क्रिकेट मधे स्थानिक असोसिएशनच्या लीग गेम्स ने सुरूवात होते. त्या क्षेत्रातील लोकांशी नेटवर्किंग असणे अत्यंत जरूरीचे आहे. बाकी आयपीएल किंवा तत्सम कमर्शियल क्रिकेट मधे पुढे जायचे मार्ग काय आहेत माहीत नाही. माबोवर काही क्रिकेट मधले जाणकार आहेत ते सांगू शकतील.
ती आमिरची थ्री इडियट्स मधली थिअरी मात्र अनेकांना पोटेन्शियली चुकीच्या मार्गावर टाकणारी आहे. थ्री इडियट्स कितीही मनोरंजक असला तरी त्यातला तो कन्सेप्ट फार सिरीयसली घेणार्यांबद्दल मला आश्चर्य वाटते. आमिर ने ते फार सिम्प्लिस्टिक रीतीने दाखवले आहे त्यात. अनेकांना कॉलेज ई मधे असताना आपल्याला पुढे नक्की कोणत्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे हे माहीत नसते. जी गोष्ट छंद म्हणून करताना आवडते तीच करियर म्हणून करताना आवडेल असे नाही.
बाकी पंच, स्कोअरर च्या
बाकी पंच, स्कोअरर च्या परीक्षा असतात क्रिकेट असोसिएशन तर्फे. पुण्यात एमसीए नेहरू स्टे मधे पूर्वी घेत असे. समालोचनाचे माहीत नाही.
पंच, स्कोअरिंग वगैरे गोष्टी नोकरी करूनही करता येतात. ते करणारे बरेचसे लोक नोकरी करूनच करतात. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी, व कधी रजा टाकून "मॅचेस करतात".
सर्वात आधी शाळॅतर्फे आणि
सर्वात आधी शाळॅतर्फे आणि कॉलेजतर्फे क्रिकेट खेळायला हवे तेथील प्रमाणपत्रे कामाला येतात.. पुढे .. रेल्वे, एअर इंडीया, सारख्या कंपनीमधे जॉब करताकरता खेळता येउ शकते त्यांचे स्वतंत्र संघ असतात आणि त्यातुन पुढे मुख्य धारेत पुढे येता येते.. कॉलेज आणि या स्तरावर चमकला तर पुढे रणजी वगैरे मधे प्रयत्न करता येतात त्यांच्या स्पर्धा बहुतेक क्रॉस मैदान आझाद मैदानावर घेतात .. योग्य प्रशिक्षकाला गाठा तो तुमची पुढची वाटचाल सुकर करेल ...
सिलेक्शन व्हायला .. एकतर तर
सिलेक्शन व्हायला .. एकतर तर तो top क्लास खेळाडू हवा , नाहीतर पैसे द्यायची तयारी हवी .
माझ्या मित्राचा अनुभव !!
धन्यवाद
धन्यवाद दुर्योधन,फारएण्ड,उदयन,अमि.
फारएण्ड :
<ती आमिरची थ्री इडियट्स मधली थिअरी मात्र अनेकांना पोटेन्शियली चुकीच्या मार्गावर टाकणारी आहे. थ्री इडियट्स कितीही मनोरंजक असला तरी त्यातला तो कन्सेप्ट फार सिरीयसली घेणार्यांबद्दल मला आश्चर्य वाटते. आमिर ने ते फार सिम्प्लिस्टिक रीतीने दाखवले आहे त्यात. अनेकांना कॉलेज ई मधे असताना आपल्याला पुढे नक्की कोणत्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे हे माहीत नसते. जी गोष्ट छंद म्हणून करताना आवडते तीच करियर म्हणून करताना आवडेल असे नाही.>
अगदी खरयं.. आम्ही त्याला हे समजावून प्रयत्न करतोय. त्याचं वय २१ आहे. कोलेज लेवल वर तो खेळलाय. त्याचा गेम चांगलाय पण याचा अर्थ तो व्यावसायिकरीत्या खेळू शकेलच असा होत नाही.
फीटनेस म्हणावा तसा नाहीये. खेळ चांगला आहे पण extra ordinary नाहीये. असं सगळं असताना तो या करीअर मधे कीतपत पुढे जाउ शकेल याची शंका वाटते आहे.. आणि खरं सांगायचं तर काळजी सुध्दा..
शैक्षणिक द्रुष्ट्या ही त्याची महत्वाची वर्षे आहेत. उगाच व्हीम मधे त्याने ही महत्वाची वर्षे वाया घालवू नये असं वाटतं.. पुढे जाउन frustration आलं तर काय हा प्रश्न आहेच..
१. पंच,स्कोअरर साठी रणजी सामने खेळलेले असणं आवश्यक आहे का?
२. स्कोअरर ,पंच असं पुर्ण वेळ व्यवसाय कीतपत feasible आहे ?
उदयनः पुण्यात जिमखाना क्लब ला जातोय तो. पुढल्या वर्षी च्या क्लब मॅचेस मधे त्याला खेळायची संधी आहे.
बघुयात काय होतंय..
अमि१:
<एकतर तर तो top क्लास खेळाडू हवा , नाहीतर पैसे द्यायची तयारी हवी >
ह्या दोन्ही चं उत्तर negetive च आहे.
दुका:
<स्टेडिय्म च्य बाहेर फुगे, कुल्फि, पिपान्या विकने.
स्टेडिअम मधे पान्याचि बोटल २०० रु ला विकने, लाहया १०० रु ला छटाक विकने, चा २५० रु कप दराने विकने
स्टेडिअम च्या बाहेर गेलेला बोल आनुन देने.
पाउस आल्यवर सतरन्जि घेउन पलत जाने.
ब्रेक मधे कोल्ड्रिंगचि गाडि घेवुन मैदानावर जाने.
बेटमेनला बदलि बेट, पान्याचि बोटल घेवुन धावत जाने.
स्कोरबोर्द वरचे आनदे बदलने.
तिकिट न मिलालेल्यांना जास्ती पैशे घेवुन तिकिट देने.
बोलि / पैजा लावने
इ.>
वरील व्यवसायांचा तुम्हास काही अनुभव गाठीशी असल्यास क्रुपया शेअर करावा. ज्ञानात भर पडेल आणि मनोरंजन ही होईल..
वरील व्यवसायांचा तुम्हास काही
वरील व्यवसायांचा तुम्हास काही अनुभव गाठीशी असल्यास >>> चिटिन्ग.. आधि नाय सान्गितल. नायतर इथ सचिन तेन्दुलकर, गावस्क्र, राहूल द्राविड अशेच लोक यायला पायजेत.
लीग मध्ये खेळणे (कांगा लीग
लीग मध्ये खेळणे (कांगा लीग इ.), स्कोरर, statistician, पंच असे पर्याय असू शकतील.
माझ्या आत्तेभावाला क्रिकेट मध्येच करियर करायचे होते. लीग मध्ये खेळायचा, पण वय आणि संघात निवड ह्या गोष्टी टाईम करणं कठीण आहे. त्याने पंच होण्यासाठीच्या परीक्षा दिल्या (अजून देतोचे खरतर) बऱ्याच पायऱ्या आहेत त्यात. आता तो रणजी लेवलला पंच म्हणून जाऊ शकतो.
फा म्हणतोय तसं हे पार्टटाईम करणं सहज शक्य आहे. थोडा कमी डिमांडिंग जॉब आणि क्रिकेट असं बरेच लोक करतात. मुंबईमध्ये चिक्कार सामने होत असतात, ज्यांना पंच लागतात. पुण्याची कल्पना नाही.
अमितवः <पण वय आणि संघात निवड
अमितवः
<पण वय आणि संघात निवड ह्या गोष्टी टाईम करणं कठीण आहे.> खरय.. भावाचं वय २२ आहे. त्याला व्यावसायिक खेळात (क्लब लेवल) उतरायला कीमान ३ वर्ष लागतील. म्हणजे २५. २५ व्या वर्षी संघात स्थान मिळवणं कीतपत शक्य आहे?
पंच कींवा स्कोअरर व्हायला व्यावसायिक खेळ केलेला असणं अनिवार्य आहे का?
नाही.
नाही.
स्टेडिय्म च्य बाहेर फुगे,
स्टेडिय्म च्य बाहेर फुगे, कुल्फि, पिपान्या विकने.
यार,तुम्ही फार कळीचा विषय
यार,तुम्ही फार कळीचा विषय उचललात.मला वाईल्ड लाईफ फोटॉग्राफर व्हायचंय..अशीच एक अॅडोलसन्स करीअर क्रेझ. कॅम्पस देऊन थोडा जॉब वगैरे करुन (किंवा पार्टाईम) मग क्रिकेट चालू ठेवावा असं वाटतं.
< सचिन तेन्दुलकर, गावस्क्र,
< सचिन तेन्दुलकर, गावस्क्र, राहूल द्राविड अशेच लोक यायला पायजेत.>
दु.का. यात चिटींग चा प्रश्न कुठे आला? सचिन्,सुनिल यांनि ग्राउंड बाहेर पिपानि कींवा कुल्पी विकल्याचं माझ्या तरी ऐकीवात नाही. तुम्ही विकली असल्यास तुमचा अनुभव आनंदाने ऐकू.. इथे जमत नसल्यास विपू केलीत तरी चालेल.
गुर्जी मास्तुरे तुम्हि काय
गुर्जी मास्तुरे
तुम्हि काय लिवलय ते एकदा वाचुन बघा. स्टेडियमच्य बाहेर फुगे विकायच सुचवायल अनुभव लागतो अन स्टेडियमच्य आतल सुचवायल अनुभव नसला तरि चालल हे चिटिन्ग आहे. तुम्हि तस लिह्यल नाहि आधि. घुस्ल तर बर नाहितर सोडुन द्या.
हे पन करिअर आहे. एमसिए / सोफ्टवेअर करुन काहि काहि लोक अप्पा बलवन्त चौकात डिटिपि, लग्नपत्रिका असा धन्दा करतात. तस्च क्रिकेटच्या म्याच चालु असताना बाहेर काहि लोक धन्दा करतात ते पन करिअर आहे. तुम्ही फार मनाला लावुन घेत आहात.
अनुभव नशेल तर काही उपयुक्त
अनुभव नशेल तर काही उपयुक्त माहीती अशेल पिपान्या, फूगे ई. विकन्याबद्दल तर ती शेअर केली तरी चालेल. असेल चांगला पर्याय तर विचार करायला काहीच हरकत नाही काय?
लिखाण वाचनाची आवड असेल तर
लिखाण वाचनाची आवड असेल तर क्रिकेटचे चांगले टेक्निकल नॉलेज असेल तर स्पोर्ट्स जर्नालिझमचा विचार करता येईल. त्यासाठी आधी जर्नालिझमचा कोर्स करून एखाद्या चांगल्या न्युजपेपरमध्ये दोन वर्षे जनरल करावं लागेल आणि मग स्पोर्ट्स मध्ये जाता येईल. परंतु त्यासाठी "निव्वळ" क्रिकेटचे ज्ञान पुरेसे नाही. इतरही खेळांब्द्दल माहिती आणि अपडेटस सतत अद्ययावत ठेवावे लागतील.
एखाद्य क्रीकेट टीमचा व्यवस्थापन, मीडीया मॅनेजर, एव्हेंट मॅनेजर म्हणून काम करता येईल.
तुम्ही लैच मणाला लावुन
तुम्ही लैच मणाला लावुन घेतल्यान आता नको. तुम्हि अजुन पन स्टेडियमच्य बाहेरच्य करियर बद्दल अनुभव पायजे आनि क्रीकेट खेलाबद्दल नको अस् लिवा बर पयल्यान्दआ . नायतर क्रीकेट बद्धल लोक लिवतिल अन लास्टला तुम्हि इचाराल काय अनुभव ?
<यार,तुम्ही फार कळीचा विषय
<यार,तुम्ही फार कळीचा विषय उचललात.मला वाईल्ड लाईफ फोटॉग्राफर व्हायचंय..अशीच एक अॅडोलसन्स करीअर क्रेझ. कॅम्पस देऊन थोडा जॉब वगैरे करुन (किंवा पार्टाईम) मग क्रिकेट चालू ठेवावा असं वाटतं.>
विज्ञानदासः अॅडोलसन्स करीअर क्रेझ हे मात्र खरं आहे. मुद्दा हा आहे की ती क्रेझ ब्लाईंडली फॉलो करावी का?
वर फारएण्ड नि लिहील्या प्रमाणे छंद म्हणून आवडलेलं एखादं क्षेत्र व्यवसाय म्हणून तेव्हढं आकर्षक असेलच असं सांगता येत नाही..
@नंदीनी: छान पर्याय सुचवलात..
@नंदीनी:
छान पर्याय सुचवलात.. धन्यवाद.
क्रि़केट आणि इतर खेळांचं टेक्नीकल नॉलेज त्याचं नक्कीच चांगलं आहे. आणि जर हा पर्याय निवडायचा असेल तर तो नक्की त्या दीशेने प्रयत्न करेल. स्पोर्ट्स ईव्हेंट मॅनेजमेंट कींवा मीडीया मॅनेजमेंट मधे काही स्पेशलाईझ्ड कोर्सेस आहेत का? पूणे,मूंबई इथे चालतील...
दु.का. मला काय पायजे थे मी
दु.का.
मला काय पायजे थे मी वरे लिवलस आय. क्रीकेट संबंधी करिअर.. ते मैदानात अशेल तरी चालते बाहेर अशेल तरी चालते.. मला वाटते थे वाचूनच तुमी मैदाना बाहेर पिपानि,फुगे ई. विकायची अशी यादी देल्ली..
आता तुमाले इचारलं का बा काही अधिक माहीती अशेल तर द्या तर तुमी ढेप खाऊन म्हन्ता का अलग धागा काडा..
सांगायचं नाई थ रायलं बापा..
गुर्जि तुम्हि चिडल्याल कलाल
गुर्जि
तुम्हि चिडल्याल कलाल म्हनुन म्हनल राहु द्या तर तुम्हिच थाम्बायच नाव घेईना. आता तुमच्य थोद थोद दोस्क्यात घुसाय लागल. तुमि आता बरोबर म्हनला यादि का दिली ते. तर तुमि म्हनला अनुभव पायजे. तर तुम्हि म्हनला कसलि चिटिन्ग ? म्हनुन तुम्हाला म्हनल मैदानाच्य आत काय करायच ते लिवना-याना अनुभव लागत असल तर मग कोन लिवनार ? म्हनुन अनुभवि लोकान्चि नाव सान्गितलि. तर तुम्हि भल्तच काय बोलाय लागला. यावरुन मि ओलखल कि तुम्हि चिडुन इनोद करताय. मंग म्हनल जाऊ द्या. यान्नी लैच मणाला लावुण घेत्ल. तर आता तुम्हि म्हनता कि लिवाच. लिवायला अनुभव पायजे अशि अट नाहि हे आता म्हनताय तर आमच पन काई म्हनन नाहि. आजुन लिहु.
लिखाण वाचनाची आवड असेल तर
लिखाण वाचनाची आवड असेल तर क्रिकेटचे चांगले टेक्निकल नॉलेज असेल तर स्पोर्ट्स जर्नालिझमचा विचार करता येईल. >>> नंदिनी, हा option मस्त आहे. लेक पुढे करीअरचा हा पर्याय निवडेल असे वाटते. ती अॅथलेट आहे पण त्यात करीअर करावी एवढी कुवत नाही. पण भाषेवर प्रभुत्व आहे. अर्थात ती अजून खूप लहान आहे. आठवीत गेली आहे आता
मी नताशा, तसे असेल तर थोडेफार
मी नताशा, तसे असेल तर थोडेफार लिहायला सांगत जा कोणत्याही खेळाबद्दल किंवा कशाबद्दलही. आणि इंग्रजी लिहीण्याचाही.
र्ट्स ईव्हेंट मॅनेजमेंट कींवा
र्ट्स ईव्हेंट मॅनेजमेंट कींवा मीडीया मॅनेजमेंट मधे काही स्पेशलाईझ्ड कोर्सेस आहेत का? पूणे,मूंबई इथे चालतील...>> त्याला जर्नालिझमचा कोर्स करायला सांगा. तिथून कुठेही एंट्री घेता येते. ईव्हेंट मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत, पण मला मुंबईमधले जेवढे कोर्सेसआमाहित आहेत त्याची फी प्रचंड आहे. त्यापेक्षा मासकॉम किंवा जर्नालिझमचा ऑप्शन बरा.
नताशा, लेकीला आतापासून खेळाबद्दल ज्ञान वाढव्त रहायला सांग, त्याचबरोबर लिहिण्याची सवयसुद्धा राहू देत. एखादा ब्लॉग व्गैरे चालू करायला सांग.
अरे भांडताय काय... श्रीयू
अरे भांडताय काय... श्रीयू तुम्ही विचारलत सहजपणे क्रिकेट खेळशी संबंधीत करीअरच्या संधी... दुकांनी बरोबर पण थोडं कॉमेडीच उत्तर दिलं... असो सोडून द्या.
मुद्दा हा आहे की ती क्रेझ ब्लाईंडली फॉलो करावी का?<<< याला काही कारणं आहेत.
>> शाळेत इतर मित्रांच्या चर्चा असतात. त्यातून उफाळून येणारी मानसिकता.
>>हार्मोन्स्,काहीतरी जगावेगळं करायचं,साहस्,धाडस करायचं.
>>'थ्री इडीयट्स' किंवा इतर बरेच चित्रपट... अंमल नशा ...(इडियट्स थीम चांगली होती, पण पोरांनी वेगळा अर्थ काढला )
>> टिव्ही... स्पोर्टस फिवर आणि काय काय...
>>कधी कधी खुद्द पालकांचे लाड आणि अज्ञान.उद.वाढदिवसाला क्रिकेटचा कीट गीफ्ट....
मुळात मुलांना त्यापाठचं सत्य सांगणं आवश्यक आहे.
उदा.वा.ला.फो. होण्यासाठी जंगलात जाऊन रग लावून बसता येणं,किंवा अॅनिमल दिवसचे दिवस आठवडे फॉलो करणं याची माहीतीपासून पोरं कोसो दूर असतात.
क्रिकेट्चं म्हणाल तर, त्यातला पैसा,खर्च्,अंगमेहनत आणि बर एवढं सगळं समजा केलंच...राहतं महत्वाचं म्हणजे पॉलीटीक्स,त्यानंतर आजकाल दर मॅचला नवी मुलं दिसतात.सतत चेंजेस असतात एवढी स्पर्धा...
स्वसंपादित...
स्वसंपादित...
फारएण्ड आणि नंदिनी, चांगली
फारएण्ड आणि नंदिनी, चांगली कल्पना आहे. ती इतर बर्याच विषयांवर लिहिते पण खेळावर कधी लिहीले नाही.
आता ह्या week-end ला तिच्या competitions आहेत. तिला त्याचा व्रुत्तांत लिहायला सांगते
तुमचा भाऊ लहान मुलांना
तुमचा भाऊ लहान मुलांना क्रिकेट शिकवू शकेल.
किंवा संगणकाच्या सहाय्याने टीम strategy बनवणे अशा कामात मदत करू शकतो.
अर्थात योग्य ठिकाणी ओळखी असणे फार गरजेचे आहे.
आता पर्यंत सुचवलेले पर्याय वर
आता पर्यंत सुचवलेले पर्याय वर मूळ लेखात लिहीले आहेत. शिवाय वरील पर्यायांवर आवश्यक ती माहीती भावला काढायला सांगितले आहे. ती माहीती मिळेल तशी वर लिहीत जाइन.
विज्ञानदास <क्रिकेट्चं म्हणाल
विज्ञानदास
<क्रिकेट्चं म्हणाल तर, त्यातला पैसा,खर्च्,अंगमेहनत आणि बर एवढं सगळं समजा केलंच...राहतं महत्वाचं म्हणजे पॉलीटीक्स,त्यानंतर आजकाल दर मॅचला नवी मुलं दिसतात.सतत चेंजेस असतात एवढी स्पर्धा...>
खेळातील कींवा कला क्षेत्रातील राजकारण हा महत्वाचा मुद्दा आहे. मुलांना अशा करीअर पासून या कारणांमूळे बर्याचदा परव्रुत्त करण्यात येतं.