चिकन कबाब (सोपी पा.कृ.)

Submitted by आशिका on 23 June, 2014 - 00:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन हाडांशिवाय (बोनलेस)- पाव किलो
दही - ४-५ मोठे चमचे
लसूण - १०-१२ पाकळ्या
आले - १ इंच
पुदिना पाने - २५-३०
हिरवी मिरची -४-५
कोथिंबीर- ४-५ काड्या
जीरे- १ लहान चमचा
मीठ- चवीनुसार
तेल- ३-४ मोठे चमचे
लहान आकाराचे कांदे - १ किंवा २ (हवे असल्यास)
सिमला मिरची - १ (हवी असल्यास)
कबाब काड्या - १०-१२ (बाजारात मिळतात).

क्रमवार पाककृती: 

प्रथम चिकन स्वच्छ धुवून, त्याचे बारीक तुकडे करुन त्यास दही लावावे. आले- लसणाची पेस्ट करुन ती चिकनला लावावी. पुदिना, मिरची, कोथिंबीर, जीरे थोडे पाणी घालून वाटावे व चिकनला लावावे. मीठ चवीनुसार घालुन हे मिश्रण फ्रीजमध्ये (फ्रीजर नाही) ८-१० तास ठेवावे. सकाळी कबाब करायचे असतील तर आदल्या रात्री १० वाजता फ्रीजमधे ठेवून सकाळी बाहेर काढावे.

बाहेरच्या तापमानाला आले की तव्यावर थोडे तेल सोडून शॅलो फ्राय करुन घ्यावे. दोन्ही बाजुनी कुरकुरीत करुन घ्यावेत. आवडत असल्यास लहान कांदे व सिमला मिरचीही कापून याच मसल्यात घोळवून तळून घ्यावी.

कबाब काडीला चिकन, कांदा, मिरची असे एकापाठोपाठ एक लावून सॉसबरोबर खाण्यास द्यावे.

वाढणी/प्रमाण: 
३ जणांसाठी
अधिक टिपा: 

मा.वे. मधे कन्व्हेक्शन मोडवर सुद्धा कबाब करता येतात. पण मी साध्या तव्यावरच केले आहेत, म्हणून टेंपरेचरचा अंदाज नाही.
पा.कृ.ला लागणार्‍या वेळात मॅरिनेशनचा वेळ विचारात घेतला नाही.

माहितीचा स्रोत: 
मावशी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिकन कबाब असे दिसत होते
<<
किती मिनिटे असे दिसत होते? Wink
आमच्याकडे फोटो काढायच्या आत फस्त झाले असते. कबाबचा प्रवास तव्यावरून ताटात अन मग सजवून पेश करून बोटा-ओठामार्गे पोटाकडे वगैरे आमच्यात मान्य नाही. तव्यावरून पोटात असे डायरेक्ट हवे.

मस्त पाककृती. तों.पा.सु.

मात्र पाककृती सोमवारी प्रकाशीत केल्याबद्दल तीव्र णिषेढ! Wink Wink Wink

डिप्ती, साधना, इब्लिस, जाई, वीप, आबासाहेब, मी नताशा, नरेश माने - धन्यवाद.

इब्लिस - किती मिनिटे असे दिसत होते? >> फोटो काढेपर्यंतच, फोटो काढला म्हणून नेत्रसुख तरी घेवू शकले, माझ्या वाटणीला रसनासुख नाही आले अजुन

नरेश माने-- सॉरी हं, सोमवारसाठी, काल जरा कंटाळाच केला खरा, पोस्ट करायचा

आगदि सोपि पा.कृ. आहे....

कबाब चा फोटॉ पाहात होते तेव्हा माझि ४ वर्षाचि मुलगि माझा शेजारि बसलि होति.फोटॉ बघताच लगेच तिचा प्रश्न(अमेरिकन अ‍ॅक्सेंट चा मराठी मध्ये) " आइ हे चिकन टिक्का आहे का" Happy