माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - १
http://www.maayboli.com/node/49174
माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - २
http://www.maayboli.com/node/49191
माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ३
http://www.maayboli.com/node/49208
माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ४
http://www.maayboli.com/node/49218
माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ५
http://www.maayboli.com/node/49247
माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ६
http://www.maayboli.com/node/49287
माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ७
८ वा दिवस उजाडला, आज पदयात्रेचा शेवटचा दिवस. आज फक्त १४ कि.मी. चालायचे होते. ५ वाजता उठलो, जिथे रात्री थांबलो होतो तिथे बाहेरच मागच्या बाजुला पाण्याची व्यवस्था असल्याने बाकीच्यांनी रात्रीच आंघोळ करुन घेतली होती. मी ५ वाजता उठले , आजारी माणुस म्हणुन मंडळाच्या अध्यक्षांनी माझ्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था केली होती. आंघोळ करुन तयारी करुन घेतली. ६ वाजता निघालो , थांबा आतल्या गावात असल्याने १० की.मी. कच्चा रस्त्यावरुन जावे लागले. पाय दुखत होते पण आज सपोर्टची गरज नव्हती, दर्शन कालच झाले असल्याने मनातली हुरहुर संपली होती. थोडावेळ हातात काठी घेतली पण अजुन हळु चालु लागले म्हणुन श्रीमामांनी ती फेकुन दिली. डावा पाय कालपासुन
आजारी असल्याने एका पायाने चालुन एक पाय ओढत नेत होते , जोडीदार सगळे हसत होते म्हणाले पोहोचेपर्यंत तु लंगडी झालीस. गंमत मस्करी करत जात होतो. १० की,मी. चालल्यावर शिर्डी मेन रोडवर आलो , तिथे लक्ष्मीवाडी येथे एके ठीकाणी थांबलो, एका घराच्या ओट्यावर पालखी सजवली जाणार होती. तिथेच सर्व पदयात्रींसाठी नाश्त्याची सोय होती. पालखी गुलाबाच्या फुलांनी सजवली. आणी ९.३० च्या दरम्यान निघालो. पालखीच्या पुढे मला आणी अजुन तिघांना साईबाबांचा फोटो घेउन उभं केलं होतं, मला तर सरळ उभंच राहता येत नव्हतं, दोन्ही बाजुंनी तोल जात होता. त्याच दिवशी परतायचं असल्याकारणाने मी घरुन गाडी बोलावली , माझे भाउजी आणी राउत घ्यायला येणार होते.
अचानक समोर पाहिलं तर माझा भाउ मोटरसायकल घेउन उभा, मला खुपच आनंद झाला, घरापासुन इतके दिवस लांब केव्हाच राहीले नव्हते. तो मला पाहुन जवळ आला, हसत होता, म्हणाला काय अवस्था झालीये तुझी, अगदि काळी ठीक्कर पडलीयेस, तुला नीट उभंही राहता येत नाहीये , मी म्हणाले त्यात काय झालं आले ना शेवटपर्यंत चालत , बास ! तो म्हणाला राउत आणी भाउजी गाडी घेउन येत आहेत , थोडं मागे आहेत , पोहोचतील. ते आले, मी अमोल ने माझं सामान
ट्र्क मधे काढुन गाडीत शिफ्ट केलं ४ की.मी. पासुन सर्व नाचत जाणार होते. रोडवर बर्याच पालख्या होत्या, डी, जे. लावले होते, सेवा म्हणुन बाकीची मंडळी सरबत , पाणी वाटत होती. त्यावेळी शिर्डीत एकुण ९५ पालख्या पोहोचल्या
होत्या. मंदीराजवळ पोहोचलो. आधी खंडोबाच्या मंदीरात दर्शन घेतलं, नंतर मंदीरात प्रवेश केला, पदयात्री असल्याकारणाने रांग लावावी लागली नाही, प्रत्येक पदयात्रींना मंडळाप्रमाणे दर्शनासाठी आत सोडत होते, आता डायरेक्ट दर्शन फक्त लालबागचा राजा पदयात्री मंडळालाच मिळ्तं बाकीच्यांना इतरांप्रमाणे दर्शनासाठी रांग लावावी लागते. दर्शन झालं.मंदीराबाहेर आलो.
सर्वांचा निरोप घेउन गाडीत बसले, अमोल, मामा असे जोडीला चालणारे ही बरोबरच आले. गाडीत बसलो आणि घरी निघालो, ए.सी. लावल्याने छान झोप लागली , बाकीचे जेवणासाठी थांबले होते मी तर जेवलेच नाही रस्ताभर झोपेतच होते, ५ तासात घरी पोहोचले. ८ दिवस उन्हात फीरल्याने व पाणी बदल, थंड सरबते घेतली होती त्यामुळे ५ तास ए.सी. बसल्याने घरी येईपर्यंत घसा बसुन आवाज बंद झाला होता. सर्व पदयात्री म्हणत होते की आता न चालल्याने उद्या तुमचे पाय खुप सुजुन येतील पण असे काही झाले नाही फक्त पुढे १५ दिवस तळपायाला सेंसेशन नव्हते. सारखी झोपत होते
तर अशी झाली माझी पहीली अविस्मरणीय पदयात्रा. आता दरवर्षी न चुकता जाते, अजुनही घरुन पदयात्रेला जायला विरोध होतो पण मी जाणारच हे माहीत असल्याने कुणीही अडवत नाही. आता इतका त्रास होत नाही, खास पदयात्रेसाठी वजनही कमी केले आहे. दरवर्षी गुढी पाडव्या निघतो आणी रामनवमीच्या आदल्या दिवशी पोहोचतो. आता आमच्या पदयात्रेत नवीन पदयात्रींना माझे उदाहरण दिले जाते, मी स्वतः नवीन पदयात्रींना सांगत असते की घाबरु नका , व्यवस्थीत चालत जाल, नाही झालं तर मी आहेच. सर्वांनाच अगदी माझ्याइतका त्रास होत नाही. पण इतक्या लांब पायी जायचं म्हणजे त्रास होणारच. आता मी २० मार्च २०१५ ला माझ्या ७ व्या वारी साठी जाईन त्याची तयारी आतापासुनच करायला घेतलीये, सामानाची जमवाजमव सुरु आहे. सर्व विचारतात आणखी कीती वर्षे जाणार ?? मी सांगते "मरेपर्यंत , जितकी वर्षे चालत जाउ शकेन तितकी वर्षे चालत जाईन जेव्हा पाय साथ सोडतील तेव्हा गाडीत बसुन जाईन , बायकांचे पाय चेपणे, पदयात्रींना जेवण , नाश्ता , पाणी वाटप ई. सेवा करेन".
गेल्या महीन्यात ३१ मार्च ला निघुन ७ एप्रिल ला पोहोचलो, प्रवास उत्तम झाला, बर्याच ठीकाणी नाचत गेलो. ह्यावर्षी आम्ही पोहोचलो त्या दिवशी २०० पालख्या पोहोचल्या होत्या. ह्या वेळेस सिन्नरच्या घाटाजवळ दुसर्या पदयात्री मंडळातला एक नवीन पदयात्री मुलगा भेटला, एका पायाने अधु होता , खुप मागे पडला होता पण कंटाळला नव्हता, आनंदी दिसत होता. त्याचा थांबा आमच्या थांब्याच्या पुढे होता मी आणी निलेशने त्याला आमचा थांबा येईपर्यंत त्याच्या गतीने साथ दिली. त्यालाही घरचे येउ देत नव्हते पण जिद्दीने आला होता. त्याच्या जिद्दीला सलाम. आणखी एका पदयात्रीला पाहिले , चालता येत नव्हते तीनचाकी सायकलवर बसुन इतक्या उन्हात हाताने पॅडल फीरवत होता, ह्या सर्व पदयात्रींपुढे मला झालेला त्रास काहीच मोठा नाही. ह्यांच्या श्रद्धेला आणी जिद्दीला माझा सलाम !!
तुम्हा सर्वांनी माझे अनुभव कौतुकाने वाचले त्याबद्दल मनापासुन आभार !!!!!!!!!!!!!!
ह्यावर्षी काही रस्त्यात जे जे पदयात्री मंडळ भेटले त्यांचे फोटो काढले आहेत.
उत्तम समारोप. पुढिल
उत्तम समारोप.
पुढिल पदयात्रांकरिता शुभेच्छा.
नेहेमीप्रमाणेच सुंदर. तुमची
नेहेमीप्रमाणेच सुंदर. तुमची जिद्द खुप महत्वाची वाटते. आणि आता सातवी वारी करणार आहात
ग्रेट
शुभेच्छा!!!
पुढिल पदयात्रांकरिता
पुढिल पदयात्रांकरिता शुभेच्छा.
छान समारोप केला
छान समारोप केला लेखमालेचा.
पुढील पदयात्रा व नर्मदा परिक्रमेसाठी शुभेच्छा. नर्मदा परिक्रमेचीही लेखमाला येऊ द्या.
अभिनंदन
आपण जेव्हा इथून
आपण जेव्हा इथून जाऊ....
म्हणजे पाऊलवाट होईल
आणि पून्हा इथे येऊ तेंव्हा
त्याची वहीवाट होईल............................
शिर्डीचा रस्ता तुमची वहिवाट झालाय...
कविता, अप्रतिम. शालीवरुन विषय
कविता, अप्रतिम. शालीवरुन विषय सुरु झाला आणि आम्ही ही जणु तुझ्याबरोबर पदयात्रा करत शिर्डीला गेलो. साईबाबांचे दर्शन आम्हालाही मिळाले.
खूप छान वाटलं वाचताना. तुझी लेखन शैली ही ओघवती आहे.
तुला पुढील पदयात्रांसाठी खूप खूप शुभेच्छा.
सुरेख!! ते खंडोबाचं मंदिर
सुरेख!!
ते खंडोबाचं मंदिर म्हणजे जिथे साईनाथ शिरडीत आल्यावर म्हाळसापतींनी त्यांना "आओ साई" म्हणत स्वागत केले तेच का?
कविता, तुझ्या जिद्दीला आणि
कविता, तुझ्या जिद्दीला आणि श्र्द्धेला मन:पूर्वक अभिवादन!
खुप छान लिहीलं आहेस! एकदम मनापासून आणि साध वर्णन त्यातल्या भावामुले भावलं! नर्मदा प्रद्क्षिनेसाठी खुप शुभेच्छा!
थंडीच्या दृष्टीने शाल/ब्लैंकेट पेक्षा स्लीपिंग bag बरी पडेल का?
अश्विनी के : <<<ते खंडोबाचं
अश्विनी के :
<<<ते खंडोबाचं मंदिर म्हणजे जिथे साईनाथ शिरडीत आल्यावर म्हाळसापतींनी त्यांना "आओ साई" म्हणत स्वागत केले तेच का?>>
होय तेच मंदीर, सर्वच पदयात्री आधी खंडोबाच्या मंदीराचे दर्शन घेउन नंतरच साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतात.
वत्सला :
स्लीपींग बॅग कॅरी करणं अवघड जाईल, सामान गाडीत ठेवल्यावर अस्ताव्यस्त पसरलेलं असतं ३५० जणांचं सामान म्हणजे आपल्या बॅग्ज वर - खाली कुठेही असु शकतात, स्लीपींग बॅग व्यवस्थीत राहील ह्याची खात्री नाही.
फारच सुरेख लिहिलंय. सगळी
फारच सुरेख लिहिलंय. सगळी मालिकाच आवडली.
तुम्हाला या पदयात्रेत दिव्यत्वाच्या अनुभुतीचा खास ठेवाही मिळाला.
शुभेच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वच लेखमाला छान झालीय.
सर्वच लेखमाला छान झालीय. सर्वांना हुरुप येईल ही वाचून.
धन्यवाद .
धन्यवाद .
अप्रतिम लेख… तुमच्या प्रत्येक
अप्रतिम लेख… तुमच्या प्रत्येक लेखाची मी मूक साक्षीदार होते… जणू तुमच्याच सोबत चालत होते… दमत होते… पण मनापासून सांगावेसे वाटते याचा शेवट अगदी उत्तम झाला आहे. आपल्या अप्रतिम ओघवत्या शैलीतील लिखाणाबद्दल आणि अनुभवांबद्दल मनापासून धन्यवाद… ओम साईनाथाय नमः ___/\___
संपूर्ण लेखमाला छान झाली
संपूर्ण लेखमाला छान झाली आहे..
धन्यवाद .. आमची पण पदयात्रा
धन्यवाद .. आमची पण पदयात्रा झाली तुमच्याबरोबर .. virtually !!
|| ओम श्री साईनाथाय नमः ||
व्वा! छान लिहिलय. पुढच्या
व्वा! छान लिहिलय. पुढच्या यात्रेसाठी खूप शुभेच्छा!
छान समारोप! पुढच्या
छान समारोप!
पुढच्या यात्रेसाठी खूप शुभेच्छा!
अभि१ ++१ महामार्गावरून
अभि१ ++१
महामार्गावरून चालतांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायला हवे.
आपल्या माध्यमातून साईबाबांना येथील सार्यांचे प्रणाम सांगा पुढल्या वेळी.
पुढील पदयात्रेस शुभेच्छा!
तुमच्या प्रत्येक लेखाची मी
तुमच्या प्रत्येक लेखाची मी मूक साक्षीदार होते… जणू तुमच्याच सोबत चालत होते >>>>> अगदि मनातले बोललात अगदि तुमच्या बरोबरच चालत आहे मी असाच फील आला मला.
बापरे!!! तुमच्या जिद्दीची
बापरे!!! तुमच्या जिद्दीची कमाल आहे.......
माझा पूर्वी कोणत्याच बाबा/साधु/ महाराज ह्यांच्यावर विश्वास नव्हता... अजुनही नहिये.... मी कधीच लाइन लावुन देवळात जात नाही.... तरीही एका अगम्य शक्तिवर माझी नितांत श्रध्दा आहे. "तो" जो कोणीतरी आहे तो अशा अचाट साहसांना मदत करतो. "तो" आपल्या बरोबर सतत असतो. "तो"च आपल्या दुर्दम्य इच्छा शक्तिला खत पाणी घालत असतो. आपल्या अंतर्मनाला जागृत करतो.
असा "तो" तुम्हाला यात्रेत भेटला.... खरच भाग्यवान आहात..... मनापासून श्रद्धा ठेवली की ही अशी अचाट कामे होतात.......
प्रतिसादात यात्रेचे फायदे पण लिहा.... कारण मला वाटतय की यात्रा करायला लागल्यापासुन निश्चितच तुमच्या वागण्यात, आचार विचारात फरक पडला असेल......
सर्व लेख वाचले . खूप आवडले .
सर्व लेख वाचले . खूप आवडले . तुमच्या जिद्दीला आणि श्रद्धेला मनापासून सलाम!
खुपच छान.... || जय साईराम ||
खुपच छान....
|| जय साईराम ||
सर्व विचारतात आणखी कीती वर्षे
सर्व विचारतात आणखी कीती वर्षे जाणार ?? मी सांगते "मरेपर्यंत , जितकी वर्षे चालत जाउ शकेन तितकी वर्षे चालत जाईन जेव्हा पाय साथ सोडतील तेव्हा गाडीत बसुन जाईन , बायकांचे पाय चेपणे, पदयात्रींना जेवण , नाश्ता , पाणी वाटप ई. सेवा करेन".
>>
खुपच छान विचार!! संपूर्ण लेखमाला आवडली.
कविता वंदन तुम्हाला.
कविता वंदन तुम्हाला. तुमच्यासोबत आम्हीपण शिर्डीला पोचलो आणि साईबाबांचे दर्शन घेतले. धन्यवाद.
छान लिहिलं आहात.
छान लिहिलं आहात.