माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ६

Submitted by कविता१९७८ on 5 June, 2014 - 11:05

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - १
http://www.maayboli.com/node/49174

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - २
http://www.maayboli.com/node/49191

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ३
http://www.maayboli.com/node/49208

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ४
http://www.maayboli.com/node/49218

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ५
http://www.maayboli.com/node/49247

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ६

आजचा ७ वा दिवस , १ एप्रिल २००९ . सकाळी १.०० च्या दरम्यान मंडळाचे सभासदांनी सर्वांना हाका मारुन उठवले.
नेहमीप्रमाणे सर्व आटपुन तयार झालो. आज पुर्ण अंग व पाय खुप दुखत होते. साधारण रात्री २.१५ ला चालायला सुरुवात केली आणी अचानक लक्षात आले की डाव्या पायाच्या अँकलची शीर खुप दुखत आहे. ५ व्या आणी ६ व्या दिवशीचे जास्त अंतर चालल्याने शीर खुप ठणकत होती. घाट उतरताना झटके बसुन बसुन कमरेची शीरही दुखत होती. पायाची मुरगळल्यासारखी अवस्था झाल्याने लंगडत लंगडत चालु लागले. जोडीदारांनी अँकल सपोर्ट बेल्ट लावला पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. मी थांबुन बेल्ट काढायला लावला. मला पुन्हा गाडीत बसायचंय का असं विचारण्यात आलं , मी नकारच दिला, उद्या तर शिर्डी पोहोचु, इतका पल्ला गाठला आता नाही बसणार. ह्ळु हळु चालायला लागले पण पाय टेकवेना, शेवटी एका बाजुने राउतचा भाउ अमोल व दुसर्‍या बाजुने राउतचे मामा ह्यांचे नाव श्रीकांत मामा ह्यानी असे दोघांनी मिळुन २ गमछाने मला सपोर्ट दिला. चालणे असह्य झाले होते. मरणप्राय वेदना सुरु झाल्या. बराच वेळ चाललो तरी खुप कमी अंतर कापले जात होते. काय करावे सुचत नव्हते. अजुन २२ ते २५ की,मी. अंतर पार करायचे होते. पदयात्रा सुरु करण्यापुर्वी एक महीना अगोदर घरच्यांबरोबर गाडीने शिर्डीला आले होते. परत येताना पदयात्री दिसत होते. एका पदयात्रीला दोघांनी सपोर्ट दिला होता आणि त्याची अवस्था अतिशय वाईट होती हे पाहुन माझे भाउजी म्हणाले होते कि आपल्या कविताला असेच आणावे लागेल असे वाटते आणि तसेच झाले. माझी अवस्था ही दयनीयच झाली होती.

खुप वेळ चालुन चालुन पाय आणखी ठणकु लागला. ईतके दिवस पुरेशी झोप नसल्याने डोळे ही जड झाले होते. खुप मागे पडलो. चालता चालता सारखे कीती वाजले असे विचारत होते , बरेच अंतर झाल्यावर ४ वाजल्याचे समजले , जोडीदार म्हणत होते आज काही सकाळचा आराम मिळणार नाही, आरामाचा थांबा बराच लांब होता , ते मला म्हणत होते कि पटापट पाउले उचल आरामाच्या थांब्यापर्यंत म्हणजे आराम करता येईल. मी शक्यतो प्रयत्न करत होते पण काही केल्या लवकर चालवेना. ते मला म्हणत होते देवाचे नाव घे, मी साईबाबांना हाका मारत होते. आजुबाजुला
का़ळाकुट्ट अंधार होता. काय करावे समजत नव्हते कारण अंधारात कुठेही आरामासाठी थांबणे रीस्की होते. कसेबसे ४.४५ ला आरामाच्या थांब्यावर पोहोचलो. मी लगेचच जागा पाहुन पडले. १५ मिनिटात सर्व उठुन निघाले, आम्हीही उठलो. आता अजुन पाय दुखत होता. २ सपोर्टवर कशी बशी चालु लागले. ५ ची आरती सुरु झाली. मी साईबाबांचे नाव घेउ लागले. आता मात्र अवसान गळु लागले होते. हुंदके द्यायला सुरुवात झाली. आजचा दिवस परीक्षेचा होता. साईबाबांची आरती मनातल्या मनात बोलायला सुरुवात केली पण कुठले कडवे आपण आता म्हंटले आहे हेही विसरुन जात होते. थोडया वेळाने मी साईबाबांना मनातच सांगितले "बस आता यातुन सुटका करा, आता मरण आले तरी
चालेल". अक्षरशः आज काही ह्यातुन वाचत नाही असेच वाटत होते आणी मरणाची वाट पाहत होते कारण मेले तर ह्या वेदनापासुन सुटका होईल त्यामुळे साईबाबांपुढे "देवा आता सुटका करा" असा धावा करु लागले पण काहीच फरक नाही. आता मात्र जोरजोरात हुंदके येउ लागले, जोडीदार बिचारे माझ्याकडे हळुच पाहत चालत होते त्यांनाही माझी ही अवस्था पाहुन खुप दया येत होती. थोडयावेळाने मी बाबांना मनातल्या मनात म्हणु लागले की आता तुम्हीच या आणि माझा हात पकडुन मला घेउन चला , आता काही सहन होत नाही. बराच वेळ असं बोलत होते. आम्ही खुप मागे पडलो होतो.

७ वाजताच्या दरम्यान एके ठीकाणी आलो येथे शिर्डी संस्थानने पदयात्रीच्या आरामासाठी मंडपाची सोय केली आहे. आमचे पदयात्रीही इथे थांबले होते पण आम्ही पोहोचेपर्यंत त्यांची निघण्याची वेळ झाली होती. माझ्या जोडीदारांनी
मंडळाच्या अध्यक्षांना सांगितले की हि खुप थकलीये आणी हिला नीट झोप सुद्धा मिळाली नाहीये हिला आरामाची खुप गरज आहे तर तुम्ही निघा आम्ही हिला घेउन येतो. तिथे मिळालेली छोटी वेफर्सची पाकीटे हातात देउन मंडळी पुढे निघाली. माझ्याबरोबर आता राउतचा भाउ अमोल, श्रीकांत मामा, निलेश आणि दिपक भाउ थांबले होते. दिपक भाउ पालघर्ला कुठल्यातरी कंपनीमधे झाडाला पाणी शिंपण्याचं काम करतात, दरवर्षी इतक्या उन्हातही शॉप फ्लोअरवर काम करताना घालण्याचे जाड सेफ्टी शुज घालुन पदयात्रा करतात. पदयात्रेत पडेल ते काम करतात मंडळ त्यांना थोडे फार पैसे देतं. थोडावेळ आराम करुन वेफर्स खाउन निघालो, उजेड झाल्याने उन जाणवु लागलं होतं , झोप मिळाल्याने थोडी हुशारी आली होती पण दुखणं कमी झालं नव्हतं, गमछाचा आधार होता. येणारे जाणारे माझ्याकडे दयेने पाहत होते. थोडया थोड्या वेळाने बसत होते. बसले तरी पायातले सॉक्स आणि अँकल सपोर्ट काढायला वाकायचेही त्राण नव्हते. थांबल्यावर अमोल माझ्या पायातले सॉक्स आणि अँकल सपोर्ट काढायचा आणी निघताना घालुनही द्यायचा. खुप मागे राहील्याने आमच्या मंडळाचा नाश्ता ही आम्हाला मिळाला नाही , खुप भुक लागली होती साईबाबांना म्हंटले बाबा भुक लागलीये काही तरी करा, थोडा वेळ चाललो तिथे दुसरे पदयात्री मंडळ नाश्ता देत होते वास्तविक प्रत्येक पदयात्री मंडळ आपापल्या पदयात्रींसाठी नाश्ता पुरवतं पण कुठल्याही पदयात्रीला खाणं पीणं
नाकारत नाही. ते रोडवरच टेंम्पोत बसुन त्यांच्या पदयात्रीना नाश्ता देत होते आणि वडापाव असल्याने सगळे हातात घेउन खात खात पुढे जात होते. आम्हीही गेलो आम्हालाही वडापाव मिळाला. आता पाण्याची पंचाईत होती तेव्हा आतासारखे कुणी मोटरसाईकलवर पाणी वाटप करत नव्हते. एके ठीकाणी बसलो. बाजुलाव ५-६ पदयात्री नाश्ता करत बसले होते. स्वतःच चालत निघाले होते , जोडिला २ कार्स होत्या सामान ठेवण्यासाठी. आम्ही उठलो आणी मी दिपक भाऊंना रस्ता क्रॉस करुन समोरच्या दुकानातुन मिनरल वॉटर घेउन यायला सांगितले, त्या पदयात्रींना ऐकु आले आणि त्यांनी लगेच त्यांच्या कडच्या बिसलरीच्या २ बाटल्या मला दिल्या. तेवढ्यात दिपक भाउंनी देखील बाटल्या आणल्या. पाणी पिउन चारही बाटल्या दिपक भाउंनी बॅगेत भरल्या व चालु लागलो. आता त्यामानाने थोडं बरं वाटत होतं . सपोर्टर्स थोड्या थोड्या वेळाने माझ्या पायांना आराम मिळावा म्हणुन मधे मधे मला एकटीला चालायला लावत होते कारण त्यांनी सपोर्ट दिला की मला फास्ट चालावे लागे. हळु हळु करत चालत होतो, उन्हाचा त्रास होत होता. आता मध्ये मध्ये दुसरे पदयात्री मंडळही जोडीने चालत होतं . मध्येच ३ मुले आमच्या पुढे पूढे चालायचे मध्येच पुढे निघुन जायचे किंवा मागे राहायचे. हे तीघेजण खुप हसत खेळत चालले होते. मला तिघांचा ही चेहरा एकदाही दिसला नाही पण जो मधला मुलगा होता तो मागुन जितक्या वेळा दिसला तितक्या वेळा म्हणत होता की "साईबाबा येतील पण ओळखलं पाहीजे", मला ऐकुन शंका यायला लागली की कदाचित आज मला साईबाबा दर्शन देतील. पण मधे मधे वाटु लागलं की ते माझ्यासाठी इथे येतील इतकी माझी कुवत नाही ती पाहु पुढे काय होतं.

पुढे उन्हाचा त्रास खुप होउ लागला आणि चालणंही अवघड झाले. आता दोन्ही गमछा सपोर्टवर चालत होते. थोड्या थोड्या वेळाने बसत होते. वावी साधारण १.५ ते २ की.मी. राहील असेल , सकाळचे ९.५० झाले होते. रोडलगतच एक छोटंसं बंद पडीक हॉटेल होतं तिथे आजुबाजुला कडप्पा लावलेले होते, बसायची सोय असल्याने थांबायचे ठरवले आणि वळलो. तिथे दोन माणसबसली होती, एका माणसाने पांढरी बनियान, पांढरी पँट , डोक्याला साईबाबांसारखा पांढरा रुमाल गुंडाळला होता तो चिलीम ओढत होता. साईबाबा चिलीम ओढायचे हे मला माहीत होते व त्यांच्या ओरीजीनल फोटोमधे त्यांच्या बाजुला चिलीम ठेवल्या असल्याने त्यामाणसाच्या हातात चिलिम आहे हे मी ओळखले. माझे जोडीदार त्या माणसाशी गप्पा मारु लागले. अमोलने त्याला विचारले कि हे तुम्ही काय पित आहात तर मीच उत्तर दिले हि चिलिम आहे त्यावर तो माणुस म्हणाला हो ही चिलीमच आहे आणि ही फक्तं शिर्डीतच मिळते, ह्याचा एक झुरका जरी घेतला तरीही माणुस उलट पायी प्रवास करु शकतो. मला राहुन राहुन वाटत होते की हे साईबाबाच असावेत पण मी कुणालाही काही बोलंले नाही. चिलमीचा धुर अगदी माझ्या पर्यंत पोहोचत होता. आता निघायचं म्हणुन उठ्लो आणी रोडवर एका पदयात्री मंडळाचा थ्री व्हीलर आला त्यात साईबाबांचा ओरीजीनल फोटो आला आणी मी दोन्ही सपोर्ट सोडुन त्या थ्री व्हींलर मागे फास्ट चालु लागले. डोळयातुन अश्रुंच्या धारा वाहत होत्या. साई ढोल ताशा हे गाणं थ्री व्हीलर मधे लावलेलं "पायी हळुहळु चाला मुखाने साईनाथ बोला..." आणि मी अतिशय ईमोशनल झाले होते. त्या भावना मी व्यक्तच करु शकत नाही. माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता, साईबाबा माझ्यासाठी आले होते, अगदी साईबाबा मला स्वत़ हाताने धरुन नेत आहेत असे वाटत होते, आणी मी बराच वेळ ईतकी फास्ट चालत होते, ढसा ढसा रडत होते , मागे वळुन पाहीले तर माझे जोडीदार माझ्याहुन अर्धा ते पाउण की. मी. मागे होते , रस्ता सरळ असल्याने आम्ही एकमेकांना पाहु शकत होतो, ते मला पुढे जा असं खुणावत होते मी पुन्हा वळले आणी साईबाबांच्या समोर हात जोडुन चालु लागले, डोळ्यातुन अश्रुधारा चालुच होत्या. मन शांत होत होते , आजही केव्हाही हा क्षण आठवला की खुप रडते, आताही हा प्रसंग लिहिताना डोळ्यात पाणी येतंय . जे त्या पडीक हॉटेलजवळ भेटले होते ते साईबाबाच होते याची खात्री पटली. जव़ळ जवळ १.५० ते २.०० कीमी अशीच चालत गेले. वावीला शिर्डी संस्थानचा पदयात्रींच्या आरामासाठी २ रा मंडप आहे तिथे जाउन हे थ्री व्हीलर थांबलं , रडतच साईबाबांसमोर डोकं टेकवलं आणि मंडपात प्रवेश केला. इथे बरेच पदयात्री मंडळ प्रवास करतात, इथे संस्थान ने मोफत चहा - नाश्ता आणि डॉक्टर्स ची सुविधा ठेवली आहे . मी नाश्ता घेतला तोपर्यंत जोडीदार आले. मला निलेश म्हणाला की तु जात असताना आम्हाला साईबाबांचा फोटो जिवंत असल्याचाच भास होत होता, त्या फोटोत एक वगळंच तेज जाणवत होतं आता काहीही झाले तरी या पुढे शेवट पर्यंत मी तुझ्याबरोबरच चालणार. आणी आज ही त्याने माझी साथ सोडलेली नाही दर वारीला तो माझ्या बरोबरच असतो मी कीतीही मागे पडले आणि कीतीही त्रास झाला तरीही तो मला केव्हाच एकटं सोडत नाही. नंतर कळले की तो माझा लांबचा नातेवाईकच आहे. नाश्ता करुन आम्ही जमलेल्या पदयात्री मंडळाच्या पालख्या पाहु लागलो. काही मंडळांनी पालखी बरोबर छान आरास केली होती, एक पालखि तर चांदीची बनवलेली होती जवळपास सर्व पालख्या मुंबई, कल्याण , डोंबीवली, नवी मुंबई ह्या भागातल्या होत्या. बाजुलाच अ‍ॅक्युपंक्चर , अ‍ॅक्युप्रेशर पद्धतीने मसाज करणे चालु होते. मला माझ्या जोडीदारांनी आधीच आधीच सांगितले होते की मसाज करुन घेउन नकोस अजुन अंग दुखेल म्हणुन मसाज कसा करतात हे पाहायला गेलो, तिथे एक माणुस ज्याला मसाज करुन घ्यायचा होता तो उताणा झोपला होता आणी जो मसाज करणार होता त्याने डायरेक्ट त्या माणसांच्या पोटर्‍यंवर उडीच मारली , मी घाबरुन जोरात ओरडले 'अय्या..." आणी सगळे मला पाहुन हसायला लागले तशी मी ही हसायला लागले, खुप मज्जा आली.

पुन्हा निघालो. बरंचसं बरं वाटत होतं पण पाय मात्र दुखत होते. उन खुपच चढलं होतं , ह्या रस्त्यावर आराम करायला सावलीचं एक झाड सुद्धा नाही सगळीकडे बाभळीची झाडे, आता मात्र चालायला त्रास होत होता. उन्हातच थांबुन थाबुन चालत होते. आणी मंडळी मला सांगत होती की आता १० मिनीटांवर आलंय आणी मी त्यांना सांगत होते की तुम्ही खोटं फसवता नेहमी असंच म्हणता , ते म्हणाले अगं असं सांगितलं नाही तर जो नवीन पदयात्री येतो त्याचं कसं होईल अजुन खुप चालायचंय असं सांगितलं तर त्याचा धीरच सुटेल. अजुन ७-८ की,मी. अंतर पार करायचं होतं. कसंतरी १.३० - २.०० च्या दरम्यान दुपारच्या जेवणाच्या थांब्याला पोहोचलो. मला अतिशय त्रास होत होता, तापासारखं जाणवत होतं. सर्वजण जेवुन आंघोळ करुन आराम करत होते. आज सर्वांच्या घरुन बरीच मंडळी एस.टी. ने या थांब्यावर पोहोचली होती कारण उद्या शिर्डीला पोहोचणार होतो. एक घर होते त्यात बायका बसल्या होत्या, मी जेवुन त्या घरात गेले, मी जवळच बसलेल्या एका मुलीच्या हातात आयोडेक्सची बाटली दिली आणी तिला सांगितलं की प्लीज माझ्या पायाला आयोडेक्स चोळुन दे मला खुप त्रास होतोय मी झोपले. ती मुलगी माझ्या पायाला आयोडेक्स चोळु लागली आणी तिला जाणवले की मला भरपुर ताप भरलाय तीने लगेचच तिच्या भावाला जयचंद्रला बोलावले जो मंडळाचा उपाध्यक्ष होता. बरीच मंडळी आत आली. जयचंद्रने लगेचच बर्फ आणला आणी माझा पाय वाकडा करुन माझ्या तळपायावर त्याने बर्फाचा तुकडा ठेवला पण मी रीस्पॉन्स देत नव्हते , मला जाणवत होते की माझ्या बाजुला बायका आणी सभासद जमलेत , उपाय करतायत पण मी डोळे सुद्दा उघडु शकत नव्हते. जयचंद्र म्हणत होता की ताप भरपुर भरलाय म्हणुन बर्फाचा तुकडा ईतका वेळ तळपायवर ठेवुन सुद्धा हिला काहीच जाणवत नाहीये. त्यांनी बायकांना माझ्याकडे लक्ष ठेवायला सांगितले आणी थोडा वेळ वाट पाहु नाहीतर हिला डॉक्टरकडे नेउ असे ठरवले.

दोनेक तासांनी माझा ताप उतरला आणि मी उठुन बसले, सगळे येउन माझ्या तब्येतीची चौकशी करु लागले. बर्फाचा शेक दिल्याने पाय दुखायचे थांबले होते. बाजुच्या घरात जाउन आंघोळ केली , आता खुपंच बरे वाटु लागले. माझ्या घरुन कुणीच आले नव्हते. संध्याकाळी फक्त पाचच की.मी. चालायचे असल्याने अध्यक्षांनी सांगितले आराम करा. ५ वाजता निघायचे आहे. ५ वाजता चालायला सुरुवात केली. जास्त अंतर चालायचे नसल्याने आरामात हळुहळु विदाउट सपोर्ट चालत होते. आता शिर्डी अवघ्या २० की,मी अंतरावर होती. ७ वाजेपर्यंत रात्रीच्या थांब्यावर पोहोचलो. जेवणं झाली, झोपलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६वा भाग आला का बघायला परत एकदा माबोवर आलो आणि ते येणे सार्थकी लागले. सुंदर अनुभव..
।।ओम साईनाथाय नम:।।

तिथे दोन माणसबसली होती, एका माणसाने पांढरी बनियान, पांढरी पँट , डोक्याला साईबाबांसारखा पांढरा रुमाल गुंडाळला होता तो चिलीम ओढत होता. साईबाबा चिलीम ओढायचे हे मला माहीत होते व त्यांच्या ओरीजीनल फोटोमधे त्यांच्या बाजुला चिलीम ठेवल्या असल्याने त्यामाणसाच्या हातात चिलिम आहे हे मी ओळखले. माझे जोडीदार त्या माणसाशी गप्पा मारु लागले. अमोलने त्याला विचारले कि हे तुम्ही काय पित आहात तर मीच उत्तर दिले हि चिलिम आहे त्यावर तो माणुस म्हणाला हो ही चिलीमच आहे आणि ही फक्तं शिर्डीतच मिळते, ह्याचा एक झुरका जरी घेतला तरीही माणुस उलट पायी प्रवास करु शकतो. मला राहुन राहुन वाटत होते की हे साईबाबाच असावेत पण मी कुणालाही काही बोलंले नाही. चिलमीचा धुर अगदी माझ्या पर्यंत पोहोचत होता. आता निघायचं म्हणुन उठ्लो आणी रोडवर एका पदयात्री मंडळाचा थ्री व्हीलर आला त्यात साईबाबांचा ओरीजीनल फोटो आला आणी मी दोन्ही सपोर्ट सोडुन त्या थ्री व्हींलर मागे फास्ट चालु लागले. डोळयातुन अश्रुंच्या धारा वाहत होत्या. साई ढोल ताशा हे गाणं थ्री व्हीलर मधे लावलेलं "पायी हळुहळु चाला मुखाने साईनाथ बोला..." आणि मी अतिशय ईमोशनल झाले होते. त्या भावना मी व्यक्तच करु शकत नाही. माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता, साईबाबा माझ्यासाठी आले होते, अगदी साईबाबा मला स्वत़ हाताने धरुन नेत आहेत असे वाटत होते, आणी मी बराच वेळ ईतकी फास्ट चालत होते, ढसा ढसा रडत होते , मागे वळुन पाहीले तर माझे जोडीदार माझ्याहुन अर्धा ते पाउण की. मी. मागे होते
<<<
वा!

खूप छान लिहिताय! जबरदस्त इच्छाशक्ती ठेवल्याने तुम्हाला साईबाबांचे दर्शन झाले! God helps those who help themselves!

खूप सुंदर. मनाला भिडलं. तुमची श्रध्दा आणि जिद्द दोन्ही कमाल. सगळे भाग सुंदर. वाचताना खूप छान वाटलं

सगळे भाग वाचले. जबरदस्त इच्छाशक्ती आहे तुमची. लेख वाचतांना जाणवतेय की किती अवघड आहे हे असे चालणं.
गेली ६ वर्ष नियमीत पदयात्रा करताय याचे कौतुक वाटले.
नर्मदा परिक्रमा नक्की कराल तुम्ही. शुभेच्छा.

एक नितांत सुंदर ईश्वरी साक्षात्कार, ज्याची प्रचिती तुम्ही घेतलीत आणि या लेखमालेमुळे आम्हीही तो अनुभवू शकलो.

जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव.

तुमच्या य पराकोटीच्या इच्छाशक्ती व श्रद्धेमुळे तो परमेश्वर आलाच, अप्रतिम अनुभव.

वाचताना अंगावर काटा येत होता.....

त्या थ्री व्हिलरमागे चालण्याचे लिहिलं आहेत तिथे तुझा भाव वाचून माझ्याही डोळ्यात पाणी तरळले.

म्हणतात ना....खर्‍या वारकर्‍यांच्या चेहर्‍यावरचे भाव निरखावेत, आपल्या हृदयातही ते संक्रमित होतात आणि मुळचा भाव वाढीस लागतो.

तसेच, ती तीन मुले तुझ्या पुढे मागे चालत होती आणि मधला मुलगा "साईबाबा येतील पण ओळखलं पाहीजे" असं सारखं सारखं म्हणत होता असं लिहिलं आहेस. ते वाचताना तर साईसच्चरितातील देव मामलेदारांची गोष्ट आठवली. आणि त्याच अनुषंगाने हेमाडपंतांनी स्वप्नात बाबांनी जे येऊन सांगितलं त्यावर पुर्ण विश्वास ठेवून होळी पौर्णिमेला सकाळी त्यांच्या भोजनाची तयारी ठेवली आणि बरोब्बर पंगतीला सुरुवात व्हायच्या जस्ट आधी त्यांच्या बंगल्यात (साई निवास) च्या जिन्यात पावले वाजली आणि कसल्याही पुर्वसुचनेशिवाय २ मुसलमान माणसं साईनाथांची तसबीर घेऊन आले...ही गोष्टही आठवली.

(एका माणसाने पांढरी बनियान, पांढरी पँट , डोक्याला साईबाबांसारखा पांढरा रुमाल गुंडाळला होता तो चिलीम ओढत होता. >>>> ह्या बद्दल काही म्हणू शकत नाही कारण कधी कधी साईबाबांसारखाच पेहराव केलेली माणसं पाहिली आहेत. डोक्याला रुमाल आणि चिलिम हे इतर कुणीही करु शकतं. साईबाबांचा पेहराव हा फकिराचा पेहराव असे.)

व्यावहारिक जगात you are judged by performance पण अध्यत्मिक जगात you are judged by faith.

एक मात्र नक्की, जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. तुम्ही देवाला चोर भामटा म्हटलंत तर तो तुम्हाला तुमच्याशी तस्सच वागून दाखवेल :डोमा:. त्याला बाप समजलात तर तुम्हाला तुमचे परिश्रम करायला लावूनच तुमच्या सोबतही तो चालेल, तुमचे पालनही करेल, धडपडलात तर हात देऊन उठवून पुन्हा चालायचं बळही देईल.

जबरदस्त इच्छाशक्ती आहे तुझ्यात. नक्की नर्मदा परिक्रमा करशील तू.

कविता शहारल वाचताना. खुप सुंदर अनुभव वर्णन केला आहेस.

ओम श्री साईनाथाय नम:

पुढचा भाग येउदे लवकर.

मी अतिशय ईमोशनल झाले होते. त्या भावना मी व्यक्तच करु शकत नाही. माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता, साईबाबा माझ्यासाठी आले होते, >>>>>>>> तुझ्या श्रद्धेला सलाम!

छान लिहिलय!!

पदयात्रा वाटते तितकी सोप्पी नाही आहे. खरंच कष्टाचा प्रवास आहे. श्रद्धा आणि सबुरी असेल तरच तारुन जाता येईल.
तुमच्या श्रद्धेला माझा सलाम!

आता २० किमीच अंतर उरलेय साईदर्शनासाठी! मनाला खरंच ओढ लागली असेल ना!

पुढचा भाग वाचायला खुप उत्सुक आहे.

अश्विनी के खुप छान लिहीलेय.
कविता आपल्या श्रद्धेला प्रणाम. साक्षात साईंचे दर्शन झाले आपल्याला.