रताळ्याचे शाही गुलाबजाम [फोटो सहित]

Submitted by प्रभा on 5 June, 2014 - 08:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रताळे उकडुन किसुन तयार पल्प १ कप, मिल्क पावडर २ चमचे, काजु-बदाम पावडर २-३ चमचे,खडीसाखर किंवा चिरंजीचे दाणे ,चिमुटभर बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर. पाव कप मैदा. विलायची. पाकासाठी साखर दीड कप. ड्राय हवे असतील तर अर्धा कप पिठी साखर व पाव कप डेसिकेटेड कोकोनट , तळण्यासाठी तेल किंवा तुप.

क्रमवार पाककृती: 

१ वाटी रताळ्याचा पल्प घ्यावा. त्यात २ चमचे मिल्क पावडर,२-३ चमचे ड्राय-फ्रूट पावडर, पाव कप मैदा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालावा. २चमचे तुप घालुन गोळा मळुन घ्यावा. काही वेळाने त्याचे गोळे बनवुन घ्यावेत. गोळे बनवितांनाच त्यात [आतमधे] खडीसाखर किंवा चि. चे दाणे व विलायची घालावी. तुप किंवा तेल चांगले तापवुन घ्यावे. व मंद आचेवर गुलाबजाम तळुन टिशु पेपर वर ठेवावे.
साखरेचा एकतारी पाक करुन त्यात सर्व गु.जा टाकावेत ड्राय हवे असतील तर अर्धा कप पिठी साखर+ डेसिकेटेड कोकोनट मधे घोळवुन घ्यावेत.
स्वादिष्ट शाही गुलाबजाम तयार.. आतमधे खडीसाखर घातल्यामुळे तिचा पाक बनतो. त्यामुळे अतिशय हलके होतात. रताळ्याला स्वतःची एक चव असते. छानच होतात. ड्रायही छान लागतात. विलायचीची चव पण लागते अगदी जरुर करा. तुम्हाला नक्कीच वेगळा पण छान प्रकार वाटेल.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

फोटो १-२ दिवसात टाकते.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोगातुन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभा, मस्त झालेत गुलाबजाम Happy
मी एक चमचा कॉर्नफ्लोर आणि मिल्क पावडर घातली फक्त. बेपा, काजु पावडर, मैदा काही घातले नाही. वेलची पूड पाकात घातली. खडीसाखर नसल्याने गुलाबजाम वळतांना चिमुट साखरच घातली आणि शॅलोफ्राय केलेत. सुंदर सोनेरी रंगाचे गुजा झालेत. चव पण मस्त. थॅंक यू!

अरे वा-- खुपच छान.मी पण असेच करुन बघेल. रताळ्याचा गोळा उरला होता. [पुरणपोळ्या झाल्याच हो.त्या.] त्याच काय कराव? म्हणुन गु.जा करुन बघितले. आणि ते सर्वाना आवडलेत. त्यात आपण बदल करुन बनवलेत छान. धन्यवाद चिन्नु. मायबोलीच हेच वैशिष्ट. गोष्टी शेअर केल्याने नॉलेज वाढत हेच खर.

अय्या 'आपण' काय Happy तू म्हटलेले धावेल-पळेल!
हो, मायबोली रॉक्सच!
पुढच्या वेळेस कॉर्नफ्लोर न घालता पाहते. आत खडीसाखर घालून वळायची टीप मस्तच. पुन्हा धन्यवाद!

मस्त.

मी परवाच Good Earth च्या Tasting Room मधे रताळयाची न्योकी खाल्ली. मस्त जायफळ घालून केली होती.