मां की दाल अर्धी वाटी, चने की दाल अर्धी वाटी, दोन कांदे बारिक चिरुन, २ टोमॅटो बारिक चिरुन, आले चिरुन २ चमचे, ७-८ पाकळ्या लसुण बारिक चिरुन, १ चमचा धण्याची पुड, १ चमचा जीरेपुड, १ चमचा गरम मसाला, ३-४ हिरव्या मिरच्या बारिक चिरुन, हिंग, मेथ्या, जीरे, अर्धा चमचा मीर्याची पुड, १ चमचा हळ्द, चवीप्रमाणे मीठ, फोडणीसाठी तेल
दोन्ही डाळी धुवुन मीठ, हींग घालुन कुकरमध्ये शिजवुन घ्याव्यात. अंदाजे ४-५ शिट्ट्यांमध्ये शिजतात..
फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेवुन जीरे, मेथ्या घालावेत.. नंतर त्यात आले, लसुण व हिरवी मिरची घालुन परतावे... गॅस बारीक असु द्यावा. लसुण थोडा लालसर झाला आणि मिरचीचा ठसका यायला लागला की त्यात कांदा घालाव.. भरपुर परतावे.. नंतर हळ्द, टोमॅटो व उरलेला मसाला घालावा... सगळा मसाला तेल सुटेपर्यंत व मसाला छान शिजेपर्यंत बारीक गॅसवर परतावे... थोडावेळ झाकण ठेवुन मसाला शिजू द्यावा.. नंतर त्यात शिजलेली डाळ घालुन उकळावे.. गरज असल्यास थोडेसे पाणी घालावे..पण ही डाळ दाटसर चांगली लागते.
गेल्या वेळी मी बाकी मसाल्याबरोबर आईनी केलेला पाव भाजी मसाला पण एक चमचा घातला....नवर्याने पहिल्यांदाच मला रेसेपी विचारली. नाहीतर पंजाबी पदार्थ त्याने करायचे व मी रेसेपी विचारायची असे आमचे रुटीन आहे.
अश्याच पद्धतीने मुंगी मसर की दाल किंवा मिक्स दाल पण करता येते... राजमा, छोले, काले चने किंवा इतर टोमॅटो बेस ग्रेव्हीच्या पंजाबी भाज्या पण ह्याच मसाल्यात थोडाफार बदल करुन करता येतात...
रेसिपी
रेसिपी वाटतेय तरी चांगली. पण मां की दाल म्हणजे मराठीत कुठची डाळ??
साधना.
ऍशबेबी, आपल
ऍशबेबी,
आपली आई जी जास्तीत जास्त वापरते, ती आपल्यासाठी 'मां की दाल' असते. अर्थातच ती प्रत्येकीसाठी वेगवेगळी असणार. कुणाची आई मूग जास्त वापरत असेल तर कुणाची आई तूर...
विनोद बाजूला ठेवून,
मा (मां नाही!) की दाल म्हणजे अख्ख्या उडदांची डाळ.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बेबस पे करम कीजिये सरकार-ए-कविता...
श्रद्धा
श्रद्धा म्हणतेय ते बरोबर आहे...अख्ख्या उडदाची डाळ किंवा काळी साल असलेली उडदाची डाळ...
ए पण माझी आई तुरीची डाळ वापरते जास्त...
अल्पना, रेसिपी छान आहे. एक
अल्पना, रेसिपी छान आहे.
एक शंका/प्रश्न आहे, डाळ घोटायची का थोडीफार अख्खी दिसायला हवी?
हि मा कि दाल शिजवल्यावर चिकट
हि मा कि दाल शिजवल्यावर चिकट आणि थोडी बुळबुळीत होते न.. मागे उडदाच वरण केलेल पण फारस आवडल नाही .
पण हि मा चनेकि दाल एकदा ट्राय करेन.
हि मा कि दाल शिजवल्यावर चिकट
हि मा कि दाल शिजवल्यावर चिकट आणि थोडी बुळबुळीत होते न.. मागे उडदाच वरण केलेल पण फारस आवडल नाही .
>>> नुसती उडिद डाळ चिकट्च होते त्यासाठी इतर डाळि जस तुर्,मुग्,हरभरा डाळी (शक्य असल्यास सालिसहित घ्याव्या) घालुन करावे. 'मिसळिचे वरण' करता येईल, ते जरा कमि चिकट होते.
उडीद, मूग यांच्या डाळी तांबूस
उडीद, मूग यांच्या डाळी तांबूस भाजून घेऊन मग शिजवल्या तर बुळबुळीत होत नाहीत.
धन्यवाद सुगरणींनो
धन्यवाद सुगरणींनो
थोडीशी घोटायची, नेहेमीच्या
थोडीशी घोटायची, नेहेमीच्या वरणाप्रमाणेच.
हाय अल्पना करून बघणार.
हाय अल्पना करून बघणार.
रेसिपी मस्त.. करून बघेन..
रेसिपी मस्त.. करून बघेन..
काळी साल असलेली उडदाची डाळ.. माझी आई (बहुतेक) यालाच उड्दाचा डोळ म्हणते.
साल असलेल्या डाळीला, डोळ असा
साल असलेल्या डाळीला, डोळ असा शब्द वापरतात.
धन्यवाद अल्पना, आजच करुन बघते
धन्यवाद अल्पना, आजच करुन बघते
आज केली होती, छान झाली.फक्त
आज केली होती, छान झाली.फक्त मी स्लो कुकर मधे शिजवून घेतली, आणि गरम असतानच थोडी हॅन्ड ब्लेंडर ने घोटून घेतली. ह्यालाच दाल माखनी म्हणतात ना?
नाही.. दाल माखनी वेगळी. इथे
नाही.. दाल माखनी वेगळी. इथे दाल माखनीच्या बर्याच कृती आहेत जुन्या माबोवर.
अशात करणं झालं तर माझी कृती पण टाकेन.
उडीद, मूग यांच्या डाळी तांबूस
उडीद, मूग यांच्या डाळी तांबूस भाजून घेऊन मग शिजवल्या तर बुळबुळीत होत नाहीत.>>> मी नेहमी मुगाची करते, पण उडदाची बुळबुळीत होत नाही ?? का?
अल्पना यात चण्याच्या
अल्पना यात चण्याच्या डाळिऐव़जी राजमा सुद्धा पहिला आहे बर्याचदा.