माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - १
http://www.maayboli.com/node/49174
माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - २
चुलत भावाने सुचवल्याप्रमाणे घरातुनच पायात अंगठा वेगळा असलेले सॉक्स त्यावर अँकल सपोर्ट व स्लीपर घालुन निघाले होते. त्याने सांगुन ठेवले होते कि जर कुठलेही कपडे जे स्कीन टाईट असतील ते नेहमी ऊलट करुन घालायचे कारण ह्या प्रवासात घामाने खुप रॅशेस येतात. घिवलीपासुन पदयात्रेला सुरुवात झाली. सगळ्यात आधी साईबाबांची पालखी निघाली आणी नंतर लोकं हळुहळु सामील व्हायला लागले. गावातुन २ पालख्या एकत्र निघाल्या . एक भंडार्यांची आणी एक कोळी लोकांची . ह्या भागात सहसा कोळी लोकांना मांगेला/ मांगेली म्हणतात. पुर्वी एकच पालखी निघायची पण आपापसातील भांडणामुळे १० वर्षांपासुन २ वेगवेगळ्या पालख्या निघु लागल्या. पालखी सगळीकडे थांबुन येत असते म्हणुन पदयात्री पुढे निघाले. २ कि.मी. पुढे आल्यावर एके ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. नाश्ता करुन पुढे चिंचणी येथे साईबाबांच्या मंदीरात आलो. हे मंदीर साईबाबांचे भक्त अण्णा चिंचणीकर ह्यांचे आहे. येथे दासगणुंनी भजन केले आहे असे मी ऐकले आहे. तिथे मला राउत यांची आई, बायको आणी इतर नातेवाईक भेटले. मी त्यांच्याबरोबरच चालायला सुरुवात केली. घिवली गावातल्या प्रत्येक घरातील सगळे जण सामील झाले होते. दुपारच्या जेवणाच्या थांब्यापर्यंत सर्व घरातल्या पदयात्रींना साथ द्यायला येतात आणी जेवुन माघारी फिरतात. गप्पा मारत मारत १५ कि.मी. वर केतखाडी येथे जेवणाच्या थांब्यावर पोहोचलो. पाय दुखू लागले होते. इथे एक भाविक सर्वांसाठी स्वखर्चाने जेवण देतात. जवळपास ७०० ते ८०० माणसे जमली होती. पाल़खी आल्याशिवाय निघायचे नसल्याने आम्ही जेवण करुन आराम करत रोडवर बसलो.
थोडया वेळाने पालखी आल्यावर जे न येणारे होते त्यांनी आपापल्या लोकांना निरोप द्यायला सुरुवात केली. माझ्याबरोबर राउतची आई आणी बायको होत्या. राउतच्या आईने एका मुलीबरोबर ओळख करुन दिली आणी त्या दोघी माघारी वळल्या. मी पुन्हा पायात सॉक्स त्यावर अँकल सपोर्ट घालुन नंतर स्लीपर्स घालुन त्या मुलीबरोबर चालायला सुरुवात केली. थोडया वेळातच कळले की बरोबरच्या मुलीला तिच्या मित्राबरोबर चालायचे होते. मी माझी वाट धरली. थोडया वेळात आम्ही वाणगावला रेल्वे लाईन क्रॉस केली. वाणगाव हे स्टेशन बोईसर आणी डहाणु या दोन
स्टेशनामधले आहे. ही रेल्वे लाईन वेस्टर्न लाईन आहे. उन भरपुर होते मागे पुढे माणसे होती पण ओळखीचे कुणीच नसल्याने एकटीच चालले होते. थोड्यावेळात राउत चा भाउ, त्याचे भाउजी मागुन आले त्यांनीच ओळ्ख दिली आणी आम्हि आहोत एकटी मागे राहीलीस तरी घाबरु नकोस असे सांगितले आणी तुला जसे चालता येईल तसे चाल असेही सांगितले. . एके ठि़काणी रोडवर तेथील एका घराकडुन पदयात्रेसाठी सरबताची व्यवस्था केली होती. ईथे पुर्ण आदिवासी एरीया आहे. गरीबी आहे पण बिचारे पदयात्रींसाठी टाकीभर सरबत करुन ठेवतात. पुढे साखरा नदी लागली २ डोंगराना वळसा घालुन खुप पुढे चहाचा थांबा होता. पाय आता खुप दुखायला लागले होते. साधारण ५ वाजता चहाचा थांबा आला. आधी पाय मोकळे केले. पायाला आयोडेक्स लावले. चहा घेतला आणी सर्व निघालो. आत्ता खुप पाय दुखायला लागले. पण बाकिच्यांनी सांगितले की आता ३-४ की.मी. वर ऐना या गावी रात्रीचा थांबा आहे. चाल मंदावली, ह्ळुह्ळु सर्व पुढे निघुन गेले. आणी राउतचा भाउ, भाउजी, आत्यावा मुलगा आणी एक आणखी एक जण माझ्या बरोबर चालु लागले. हे सर्वजण पदयात्रा मंडळाचे सभासद होते. ही मंडळी सर्वात शेवटी चालतात व जो कोणी मागे पडेल त्याला बरोबर घेउन जातात. मी थकले आणी पाय खुपच दुखायला लागले. कधी तो थांबा येतो असे झाले. बरोबरची मंडळी म्हणाली आता १० मिनिटांबर थांबा आलाय फास्ट चाललीस तर लवकर येईल. मी थोडया फास्ट चालु लागले. अर्धा तास झाला तरीही थांबा आलाच नाही . अंधार पडू लागला. मी पुन्हा विचारले तर तेच उत्तर आता मोजुन १० मिनिटे राहीलीत पण पाय दुखत असल्याने मला काहि फास्ट चालता येत नव्हते. पायाचे तुकडे पडतील असे वाटत होते. शेवटी कसेबसे ७ वाजता पोहोचलो.
एका राईस मिलच्या पटांगणात थांबलो होतो. पाठीमागेच ओढा होता. गारठा जाणवत होता. पदयात्रींसाठी मोठ्या सतरंजी अंथरल्या होत्या. बायकां आणी पुरुषांसाठी वेगवेगळ्या सतरंज्यांची सोय होती. प्रत्येकाने स्वत:च्या जागा पकडुन ठेवल्या होत्या. कुणी फ्रेश होत होतं, कुणी दुसर्या दिवशीच्या आंघोळीचं सामान काढुन ठेवत होतं. मी उशिरा पोहोचल्याने माझं सामान गाडीतुन काढुन एके ठीकाणी ठेवण्यात आलं होतं ते घेतलं आणी जागा शोधली. बसल्यावर पायातलं सामान काढल्यावर जरा बरं वाटलं . अंग खुपच दुखत होतं आणी तापासारखं वाटत होतं. मी थोडावेळ स्वस्थ पडुन राहीले. पालखीच्या आरतीला सुरुवात झाली. सर्वांनी आरती घेतली. ह्या लोकांना साईबाबांच्या सर्व आरत्या येत नाहीत. "आरती साईबाबा ..." ह्या आरती नंतर सर्व गणपतीच्या आरत्या झाल्या. मंडळाची माणसे पदयात्री मोजत होती, बरेचण आयत्यावेळी सामील झाल्याने त्यांची फी जमा करायला घेतली होती, साधारण ३५० जण पदयात्री होते, २५-३० जण पदयात्री कम मंडळाचे सभासद होते. १० जण आचारी होते जे फक्त जेवण बनवणे आणी चहा नाश्ता बनवुन देण्याचे काम करणार होते. बाजुलाच जेवणाची तयारी चालु होती. जेवणाची रांग लागली प्रत्येकाने स्वतः रांगेत उभे राहायचे आणि स्वतःचे ताट स्वतः धुवायचे. रात्री एक नर्स बाई होत्या सर्व जण त्यांच्या कडुन पेनकीलर्स (गोळ्या आणी ईंजेक्शन्स ) घेत होते. कुणी फोडात झालेले पाणी सीरींज ने काढायला येत होते. मला ही राउतच्या भावने ईंजेक्शन घ्यायचे सुचविले, मी आधी नर्सला ईंजेक्शन बद्द्ल विचारले ती म्हणाली साधं पेन कीलर आहे, बाकि काही नाही मग मी सुदधा एक घेतलं. दुसर्या दिवशीचे आंघोळीचे सामान आधीच काढुन ठेवायचे होते कारण दुपारी फक्त छोट्या बॅग्ज / बॅकपॅक्स मिळणार होत्या व मोठ्या बॅग्ज फक्त संध्याकाळी झोपताना मिळणार होत्या. पहील्या दिवशी २८-३० की.मी. चाललो होतो. दुस-या दिवशी ३०-३२ की.मी. असल्याने ४ वाजता निघण्याचे ठरले. त्याकरीता ३.३० ला उठावे लागणार होते. २ चादरी अंथरुन पहुडले. खुप झोप आली होती आणी थंडीही वाजत होती.
दुसराही भाग सुरेख जमलाय.
दुसराही भाग सुरेख जमलाय. पुढच्या प्रवासाबद्दल वाचण्याची उत्सुकता वाढली आहे.
चिंचणी हे माझे गाव
त्यामुळे हा भाग जास्तच आवडला ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा. चांगली चालली आहे
वा. चांगली चालली आहे पदयात्रा.
पुढचे भाग वाचायला आवडतील.
अरारारा अँकल सपोर्ट काय,
अरारारा अँकल सपोर्ट काय, आयोडेक्स, इंजेक्शनं, सामान आणायला गाड्या काय. मज्जा आहे बुवा.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बाकी एक ब्याटरी वर चालणारी सायकल ही घ्यायची की.
तुर्रमखानजी आपले संपुर्ण
तुर्रमखानजी
आपले संपुर्ण सामान घेउन कुठलाहि पदयात्री चालत नाही आणी चालुही शकणार नाही. प्रत्येक पदयात्री मंडळ हे आपापल्या पदयात्रींचे सामान ठेवण्यासाठी गाडीची व्यवस्था करते मग ती पदयात्रा एक दिवसाची का असेना. बरोबर चालताना प्रत्येक पदयात्री दिवसभरासाठी स्वत:ला आवश्यक तेवढे सामान घेउन चालतो.
मुंबईहुन येणार्या बहुतकरुन सर्व पालख्यांजवळ अॅम्बुलन्स असते. पेनकीलर्स , फोडातील पाणी काढुन ड्रेसींग करणे हे प्रत्येक पदयात्रेत होतं . कुणाला चक्कर येणं असले प्रकार होतात.आमच्या भागातील पालख्यांना जास्त वर्गणी नसल्याने ते अॅम्बुलन्स पुरवु शकत नाहीत.
पुढचा भाग येउ दे लवकार. हा
पुढचा भाग येउ दे लवकार. हा भागही छान.
छान सुरुवात !
छान सुरुवात !
तुर्रमखान, आजकाल प्रत्येक
तुर्रमखान, आजकाल प्रत्येक यात्रेला, अगदी पंढरपूरच्या वारीलाही स्वतःची गाडी असते सामान ठेवायला.
त्यात चुकीचे काही नाही.
अँकल सपोर्ट, आयोडेक्स, ईंजेक्शने यातही चुकीचे काही नाही.
गिर्यारोहकांबरोबरपण शेर्पा असतातच ना सामान वहायला?
वेगळा अनुभव.. आधी थोडा
वेगळा अनुभव.. आधी थोडा चालायचा सराव करायला हवा होता.
पुढला भाग लवकर येउदेत
पुढला भाग लवकर येउदेत
छान लिहिलेय. माझा एक मित्रही
छान लिहिलेय.
माझा एक मित्रही दरवर्षी मुंबई ते शिर्डी पदयात्रा करतो.
दहिसर हायवेवरुन अनेकदा शिर्डीला जाणार्या पालख्या पाहिल्या आहेत. कौतुक वाटते त्यांचे इतके अंतर पायी कसे पार करत असतील!
कविता, खूप छान लिहिते आहेस.
कविता, खूप छान लिहिते आहेस. तुझी जिद्द दिसतेय. आता तुला ह्यापेक्षा खूपच कमी त्रास होत असेल :-). श्री राम.
साती +१.
कविता, पदयात्रा करणारे बरेच
कविता, पदयात्रा करणारे बरेच लोक आजूबाजूच्या निसर्गाची काहीच व्यवस्था ठेवत नाही असे पाहिले आहे बरेच वेळा.
रस्त्यातच कडेला मलमूत्र विसर्जन करणे, जेवण जाल्यावर ते थर्माकोलचे / फोनचे कप, प्लेटस असेच रस्त्याच्या कडेला फेकून देणे हे प्रकार कर्नाटकातून इकडे येते तेव्हा तुळ्जापूर/ पंढरपूरच्या वार्यांमध्ये दिसतात.
तुमच्या पदयात्रेत या सगळ्याची काय व्यवस्था होती ते लिहा.
स्त्रियांना आह्निके उरकायला पूरेशी प्रायवसी होती का ते ही लिहा.
कविता मी मला तुमच्या जागी
कविता मी मला तुमच्या जागी ठेवून पाहिले, मी एवढेही चालणे शक्य नाही. शहरी स्त्रीला अशा कष्टांची फारशी सवय नसते. निश्चयाची कमाल आहे तुमच्या.
चांगलं लिहीताय.
चांगलं लिहीताय.
साती, +१ नाशिकला हे पदयात्री
साती, +१
नाशिकला हे पदयात्री नेहमी दिसायचे. खुप उत्सुकता वाटायची या पदयात्रेच्या नियोजनाब्द्द्ल. तुमच्या लेखमालिकेमुले बरीच माहिती मिळ्ते आहे!
खूप छान वाटतय वाचताना.
खूप छान वाटतय वाचताना.
मानलं ग तुला! माझ्या बाईचा
मानलं ग तुला! माझ्या बाईचा मुलगा तिसरीपासून मुंबई-शिर्डी पदयात्रा वडलांबरोबर करीत असे.त्याची आठवण आली.
कविता, पदयात्रा करणारे बरेच लोक आजूबाजूच्या निसर्गाची काहीच व्यवस्था ठेवत नाही असे पाहिले आहे बरेच वेळा.
रस्त्यातच कडेला मलमूत्र विसर्जन करणे, जेवण जाल्यावर ते थर्माकोलचे / फोनचे कप, प्लेटस असेच रस्त्याच्या कडेला फेकून देणे
स्त्रियांना आह्निके उरकायला पूरेशी प्रायवसी होती का ते ही लिहा.>>>>> खरंच!
छान लेख
छान लेख
छान लेख. सर्व पदयात्री ग्रेट.
छान लेख. सर्व पदयात्री ग्रेट.
हा ही भाग छान! साती यांनी
हा ही भाग छान! साती यांनी म्हटल्याप्रमाणे पदयात्रेतल्या नियोजनाविषयी पण विस्ताराने लिहा.
दोन्ही भाग छान लिहलेत
दोन्ही भाग छान लिहलेत ..
पुढला भाग लवकर येउदेत +१
कौतुकास्पद !
कौतुकास्पद !
खरेच कौतुकास्पद आहे. पाय फार
खरेच कौतुकास्पद आहे. पाय फार दुखले असतील तुमचे. मी हे यात्री दरवर्षी बघते. ते हायवे वर कचरा फार करतात मात्र. पाण्याचे ग्लासेस, बॅनर्स इतयदी पसरलेले असते.
पहिल्या वर्षी पायच काय अख्खं
पहिल्या वर्षी पायच काय अख्खं अंग दुखलं, शेवटी शेवटी आता मेले तरी चालेल असं झालं होतं कारण माझं वजनही जास्त होतं, चालायची सवय नव्हती, पहीले २ दिवस ३०-३२ की.मी दिवसाला चालायचं होतं नंतर अंतर वाढतच गेलं , रात्री लवकर उठुन चालायचे त्यामुळे फक्त २-३ तासांचीच झोप मीळायची, उन खुपच जास्त होतं, सुरुवातीपासुन ४ दिवस डोंगर - घाटच पार करावे लागतात. पाय तसे दरवर्षी दुखतातच पण स्लीपर्स घालुन जास्त दुखतात आता मी स्पोर्ट्स शुज घालुन जाते म्हणुन कमी दुखतात. कचर्याबद्द्ल पुढील भागात लिहिते.
आज सापडला हा धागा! एकेक भाग
आज सापडला हा धागा! एकेक भाग वाचतेय. मस्तच चाललीये पदयात्रा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)