हिंदुस्थानचे पी.एम.ओ मंत्री जितेंद्रसिंग यांनी धारा ३७० वर चर्चा हवी असे म्हणताच जम्मु काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला यांची काश्मीर भारतात रहाणार नाही अशी तिखट प्रतिक्रिया उमटली. शेख अबदुल्ला त्यांचे जावई फ़ारुक अबदुल्ला आणि त्यांचे पुत्र व सध्याचे मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला यांना काश्मीर म्हणजे जहागिर वाटते यात नवल नाही. इतिहासच असा आहे जो आजच्या नविन पिढिने समजुन घ्यायला हवा.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर ज्या संस्थानांनी विलिनीकरणास विरोध केला त्यापैकी काश्मीर हे एक होय. इथले राजे हरिसिंग आणि ४० टक्के जनता हिंदु तर उर्वरित ६० टक्के जनता मुस्लीम. त्यांचे नेते शेख अबदुल्ला हे विलीनीकरणाच्या विरोधात होते. याच कारणाने १९४७ ला हे विलीनीकरण घडले नाही.
१९४८ ला पाकिस्थानने काश्मिरमध्ये घुसखोरी केली आणि श्रीनगरपर्यंत पाकिस्थान येऊन पोचल्यानंतर मात्र भारताची लश्करी मदत काश्मिरने म्हणजे राजा हरिसिंगाने मागीतली. ही मदत बिनशर्त देऊ केल्यानंतर भारतीय लष्कराने पाकीस्थानी सैन्याला आजच्या लाईन ऑफ़ कंट्रोल पर्यंत मागे हटवले. याच वेळी पंडितजींनी एकतर्फ़ी युध्दबंदी करुन हा प्रश्न युनायटेड नेशन्स कडे नेला आणि आजचा पाकव्याप्त काश्मिर निर्माण झाला. ही चुक इतकी महागात पडली की पंडीतजींना अपेक्शीत बफ़र स्टेट निर्माण न होता पाकिस्थानच्या नियंत्रणात हा प्रदेश राहिला आणि जो कायम पाकिस्थानच्या बाजुला झुकला तसेच दहशतवाद्यांचे प्रशिक्शण करणारा प्रदेश ठरला.
खरा इतिहास पुढे आहे की भारताने जेव्हा अशी संकटे टाळण्यासाठी काश्मीरच्या विलिनीकरणाचा हट्ट धरला कारण काश्मिरला स्वत:ची सेना नव्हती आणि तशी धमकही नव्हती. ४० टक्के हिंदुंच्या रक्शणासाठी हे विलीनीकरण आवश्यक होते. हे विलीनीकरण झाले ज्यात अनावश्यक असे ३७० कलम निर्माण करुन संसदेत विरोध असताना ते घुसडले गेले.
३७० कलमावर चर्चा आवश्यक का तर यातले प्रमुख कारण काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये जन्माला आलेला नागरीकच नवीन जमिन विकत घेऊ शकतो / हस्तांतरण त्यालाच होऊ शकते इतरांना हा अधिकार नाही. काश्मीरी मुलीने जर इतर प्रांतात लग्न केले तर तिचेही अधिकार नष्ट होतात. यात ही स्वयंनिर्णयाचा अधिकार ही एक आणखी दुर्भाग्यपुर्ण सवलत कश्मीरी जनतेने मिळवली ज्याचा उच्चार करत अलगाववाद तिथे डोके वर काढतो आणि याला हिंदुंचा विरोध होईल म्हणौन हिंदुंना मारुन, त्यांच्या स्त्रीयांना बलात्काराने अपमानीत करुन काश्मीरातुन पलायन करायला भाग पाडले गेले. आज काश्मिरात हिंदु औषधालाही शिल्लक नाही हा आमचा सेक्युलर भारत देश आहे.
मुळात या जमिनीसंदर्भातल्या हक्काची निर्मीती का झाली याची कारण मिमांसा शोधली तर असे लक्शात येते की फ़ुटीरता टाळण्यासाठी सैन्यातुन निवृत्त झालेल्या कडव्या हिंदु सैनीकांना काश्मीरमध्ये जागा द्यायचा प्रस्ताव या काळात वल्लभभाई पटेलांनी आणला होता. यामुळे ४०% असलेल्या हिंदुंच्या संख्येत वाढ होऊन कालांतराने स्वयंनिर्णयाने पाकिस्थानमधे जायचे की भारतात रहायचे की स्वतंत्र राज्य निर्माण करायचे हा प्रश्न भारतातच रहायचे असा निर्णय होऊन संपला असता. पण शेख अबदुल्लांना हा डाव लक्शात आला आणि त्यांनी नेहरुंच्या मदतीने ३७० व त्यात असलेली कलमे जोडुन हा प्रश्न तसाच ठेवला. याच मुळे उमर अबदुल्ला धमकी देतो की आम्ही फ़ुटुन जाऊ.
या सगळ्यामुळे काश्मीरमध्ये जर घुसखोर आणि दहशतवादी कारवाया थांबवायला सैन्याची गरज आवश्यकच आहे. काश्मीरी युवक सैन्यात जात नाही. पर्यटनाशिवाय दुसरा व्यवसाय करत नाही किंवा नोकरीसाठी अन्य प्रांतात स्थलांतरीतही होत नाही. यामुळे प्राण जातात भारतीय सैन्यातल्या सैनीकांचे ज्याचे काश्मीरींना घेणे देणे नाही. शिवाय पॅकेजेसच्या नावाखाली मिळणारा हलवा आहेच.
काश्मीरी विचारवंत दावे करतात की काश्मीरमध्ये भुमीहिन मजुर कोणी नाही. अतिरिक्त जमिनीचे समान वाटप या कायद्यामुळे शक्य झाले आहे. पण हा एकमेव निकष राज्याच्या सर्वांगीण प्रगतीकरता महत्वाचा आहे का ? याचे भान राज्यकर्त्यांना नाही. १९५२ पासुन १९७५ पर्यंत इथे दिर्घकाळ केंद्राची सत्ता होती. इंदिराजींच्या नेतृत्वाखाली शेख अबदुल्ला मुख्यमंत्री झाले पण इंदिराजींच्या मृत्युनंतर मात्र खंदे नेतृत्व नसल्याने आणि केंद्रात बहुमताचे सरकार नसल्याने फ़ुटीर विचारांचे चांगले फ़ावले.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग म्हणायचा पण केंद्राने केलेला कायदा मात्र जो पर्यंत जम्मु काश्मीरची विधानसभा मानत नाही तो पर्यंत अस्तित्वात येऊ शकत नाही ही स्थिती चांगली आहे का ? यामुळे आर टी आय पासुन परवाच्या जनलोकपाल पर्यंत सर्वच कायदे जम्मु काश्मीरमध्ये अस्तित्वात नाहीत. १५ ऑगस्टला लश्कराच्या नियंत्रणाखाली एखाद्या ठिकाणी तिरंगा उभारायचा तर गल्लो गल्ली तो जळताना पहायचा या सारखे दुर्देव फ़क्त भारताचेच असेल.
ही परिस्थीती बदलायची चर्चा करायची नाही याला काय लोकशाही म्हणायचे ? भारतीय जनता पक्श धारा ३७० रद्द करण्याचा मागे असेल तर हा पक्शिय अजेंडा आहे असे म्हणुन इतर राष्ट्रवादी म्हणणारे पक्शांनी डोळे मिटुन घ्यायचे. खरा इतिहास नव्या पिढीला न सांगता हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे म्हणायचे. ही परिस्थीती बदलायला हवी.
खरे आहे ! हे सर्व मताच्या
खरे आहे ! हे सर्व मताच्या राजकारणासाठी अडलेले आहे. ते भाजपा शिवसेना सोडुन कोणालाच नको आहे. सध्या भाजपाकडेही राज्यसभेत बहुमत नसल्याने कदाचित तेही काही कालावधीसाठी साधारणता ३ ते ४ वर्षे पुढे ढकलले जाउ शकते.
मराठी असल्याने कलम ३७०
मराठी असल्याने कलम ३७० म्हटलेले बरे राहील.
बाकी चालू द्या.
माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे.
माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे. त्याची मावशी तिची गोष्ट. अर्थात काश्मीरमधली.
टिक्कू आडनाव तिचे. म्हणजे आपल्याकडे बडवे असतात तसे तिकडे टिक्कू. ही शिक्षिका. एका मुस्लीम सहकार्याकडे कामानिमित्त गेली असता तिकडून अतिरेक्यांनी तिचे अपहरण केले, व तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ते झाल्यावर तिला लाकूड कापायचे यंत्र असते त्यावर झोपवून तिचे दोन तुकडे केले आणि मग फेकून दिले.
या बाईची गोष्ट फेसबुकवर फिरत होती. "हे खरं आहे का?" अशी चौकशी मी करतात या मुलाने ही घटना खरी असल्याचे सांगितले. "कारण ती माझी मावशीच आहे".
असे अनेक अत्याचार काश्मीरी पंडितांनी सहन केले आहेत. त्यांच्या दुर्दैवाने ते हिंदू असल्याने मिडियात किंवा इतरत्र त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि मग फेसबुकावर वाचनात आले की त्याची विश्वासार्हता पणाला लागते. माझ्या नशीबाने तिचाच नातेवाईकाची साक्ष काढता आल्याने सत्य आहे हे समजले, पण बाकीच्यांचे काय?
फार अवघड प्रश्न आहे खरा.
फार अवघड प्रश्न आहे खरा. सैन्य तरी किती काळ तिथे तैनात ठेवायचे ? आणि पी ओ के चे काय ?
अच्छे दिन आए हैं| ज्या गोष्टी
अच्छे दिन आए हैं| ज्या गोष्टी आधी कुजबूज रूपात बोलायला लागायच्या त्या आता उघड-उघड बोलता येतील.
(No subject)
(No subject)
३७१ चे काय मग?
३७१ चे काय मग?
कलम ३७० बद्दल बहुतांशी सहमत.
कलम ३७० बद्दल बहुतांशी सहमत. पण आत्तां मुद्दा असा आहे कीं नविन सरकारच्या धोरणातला सगळ्यात अग्रक्रमाचा कार्यक्रम 'धारा ३७०' आहे का ? अजून नवीन पंतप्रधानानी देशाला उद्देशून आपला धोरणांचा अग्रक्रम सांगितलेला नसताना, कुणीतरी हा विवाद्य मुद्दा आत्तांच उपस्थित करून औचित्यभंग केला नाही का ?
जर काश्मिर विधानसभा मानणारच
जर काश्मिर विधानसभा मानणारच नसेल तर लोकसभा/ राज्यसभेत चर्चा करुन उपयोग काय?
या प्रश्नावर उपाय काय हेही सुचवलेले नाही.
विजयजी, राजकीय इच्छाशक्ती
विजयजी,
राजकीय इच्छाशक्ती असेल तर काश्मीरमधले नागरीक सुध्दा अबदुल्लांच्या डोक्यावर बसुन ३७० हटविण्याची मागणी करतील. चर्चा होणे महत्वाचे.
गामा पैलवान , धन्यवाद !
;पैलवान, दादुमिया हे कोणत्या
;पैलवान, दादुमिया हे कोणत्या संघटनेचे, पक्षाचे सर्टिफाईड इतिहास कार की डी एन ए तज्ञ आहेत ?
दादुमैयाचे लॉजिक लावले तर सर्वत्र गोंधळ उडेल. इथे कुणी कुण्याच्या पित्यासमान आहे तर कुणी कुणाच्या भावासमान ! अडवाणी, वाजपेयीजी तर पितृतुल्यही आहेत म्हणे. शेक अब्दुलाची बायको म्हणाली की बडाभाई दिल्लीमे राज करेगा तो छोटा भाई कश्मीरर्मे क्यो नही राज करेगा ? हा इतिहास आणि जेनेटिक्स तज्ञ दादुमियाच्या संशोधनाचा डी एन ए स्ट्रॅन्ड ! ::फिदी:
शिवाजीने स्वराज्यात पुण्डावा सुरू केल्यावर विजापुरच्या सुलतानाने शहाजीस रागावून हे तुझ्या मुलाने काय आमच्या विरुद्ध लावले आहे असे व्विचारता शहाजी महाराजानी स्वराज्यावर आच येऊ नये म्हणून चतुराईने माझा त्याच्याशी संबंध नाही असे सांगितल्यावर त्यावाक्याचे विकृत इन्टरप्रिटेशन करून नाही नाही त्या कंड्या परदेशी लेखकाना पुरवणार्या अवलादीना असलीच वाक्ये ऐतिहासिक सत्ये म्हणून कंड्या पिकवायला उपयोगी पडतात.....
३७० चे मुख्य उद्देश होते
३७० चे मुख्य उद्देश होते कश्मिरात सामाजिक संतूलन राखणे.
कश्मिरी पंडताना हाकलल्याने तत्कालिन सामाजिक संतूलन बिघडले असून ३७० चे उल्लंघन्च झाले.
यावर दोन उपाय आहेत...
एक तर हिंदूचे पुनर्वसन करुन बिघडलेले संतूलन परत बनवायचे
दुसरा उपाय ३७० चे ओलरेडी उल्लंघन झाले असल्यामुळे ते बाद करायचे.
आजच्या घडीला देशात १ करोड निवृत्त सैनिक राहतात. त्यातले जवळपास ५०,००,००० तरुण व लढण्या योग्य आहेत. या सर्व ५० लाखाना फेरसंतूलन कार्यक्रमा अंतर्गत कश्मिरात नेऊन बसविणे... कायमचे वास्तव्य देणे. हा एक उपाय, जे जवळपास अशक्य आहे.
शेवटचा उपाय म्हणजे राज्यसभेत बहूमत येई पर्यंत तीन् चार वर्षे थांबावे आणि एकदा बहुमत आले की ३७० चा सफाया करावा.
रॉबीनहुड, डॉ बाबासाहेब
रॉबीनहुड,
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ३७० ला विरोध असताना, काँग्रेसचेच खासदार त्यागी ( जे कधीच नेहरुंना घाबरले नाहीत ) या शिवाय वल्लभभाई पटेलांचा विरोध डावलुन नेहरुजींनी हा विषय खास आपल्या अखत्यारीत ठेवला याचे कारण काय ?
वल्लभभाई हैद्राबादचा प्रश्न एक पोलीस कारवाईने आटोक्यात आणला त्यांना हे काय कठीण होते ?
हा प्रश्न एक देशभक्त म्हणुन सुटला पाहिजे की नाही तर सांगा नाहीतर चुकीच्या धोरणाने जे हिंदु मारले गेले, ज्या स्त्रीया बलात्कारीत झाल्या, जी संपत्ती लुटली गेली यासाठी कुणाला जबाबदार धरावे ? खासकरुन सेक्युलर चा नारा देणार्या गांधी-नेहरुंच्या फॅन्स ना इतका का राग यावा ?
शेख अबदुल्लाच्या आईने आत्मचरीत्र लिहले नाही हंसा वाडकर सारखे नाहीतर पुरावाही कुणी मागीतला नसता.
एक तर हिंदूचे पुनर्वसन करुन
एक तर हिंदूचे पुनर्वसन करुन बिघडलेले संतूलन परत बनवायचे
दुसरा उपाय ३७० चे ओलरेडी उल्लंघन झाले असल्यामुळे ते बाद करायचे.
तिसरा उपाय असा की ५० लाख हातोडावाले,चायवाले,ईडलीवाले,विचारवंत,पैलवान यांना काश्मिरात जाऊन राहण्यासाठी 'प्रेरीत' करायचे! शेवटी पुण्यात राहायचं काय आणि काश्मिरात.. "आसिंधु सिंधु.." देशातच राहायचंय नाही कां?? शिवाय एकदम ५० लाख हिंदु काश्मिरात गेले (दंड वगैरे घेऊन) तर अतिरेक्यांची काय बिशाद!!
मोदीना निवडुन दिलंय ना देशाचं भलं करायला, मग त्यांना काय ते करु द्या की. उगा 'नागपुरी' अजेंडे कशाला आणताय मधे??
मुद्दा सडेतोड आहे. आपल घर
मुद्दा सडेतोड आहे. आपल घर शाबुत आहे. छ्.शिवाजी राजे महाराष्ट्रात जन्माला आले त्यामुळे अजुन ३०० वर्षे तरी आपल्याला काश्मीरी पंडीतांसारखे कुणी हाकलणार नाही मग कर्ज करा तुप प्या काश्मीर गेल तेल लावत.
>>. शेख अबदुल्ला त्यांचे जावई
>>. शेख अबदुल्ला त्यांचे जावई फ़ारुक अबदुल्ला <<
शेख अब्दुल्लांचे चिरंजीव फारुक अब्दुल्ला, जावई नव्हे.
रॉबीनहूड, >> दादुमैयाचे लॉजिक
रॉबीनहूड,
>> दादुमैयाचे लॉजिक लावले तर सर्वत्र गोंधळ उडेल.
कसाकाय? लोकशाहीत सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांची माहीती जनतेला मिळायलाच पाहिजे. मग ते मानलेले नातेवाईक असोत व खरे.
आ.न.,
-गा.पै.
सडेतोड, >> तिसरा उपाय असा की
सडेतोड,
>> तिसरा उपाय असा की ५० लाख हातोडावाले,चायवाले,ईडलीवाले,विचारवंत,पैलवान यांना काश्मिरात जाऊन
>> राहण्यासाठी 'प्रेरीत' करायचे!
उत्कृष्ट उपाय. मात्र हातोडावाला, चायवाला, ईडलीवाला, विचारवंत आणि गामा_पैलवान मिळून फक्त ५ माणसे होतात. म्हणूनच त्यांची संख्या वाढायला पाहिजे. तोच माझा प्रयास आहे.
आ.न.,
-गा.पै.
सरकार स्थापण झाल्या झाल्या
सरकार स्थापण झाल्या झाल्या ३७० सारखा वादग्रस्त मुद्दा घ्यायला नको होता. ३ ते ४ वर्षे सरकार ने पायभूत सुविधांवर चांगले काम करुन दाखवले असते नंतर हा मुद्दा घेतला असता तर बरे झाले असते.
बाकी ३७० हटवायला हवे याला पाठिंबा.
एकदा हे कलम हटवले कि आपण तर जाणार बुवा तिकडे एक घर बांधायला.
हातोडावाला, चायवाला,
हातोडावाला, चायवाला, ईडलीवाला, विचारवंत आणि गामा_पैलवान मिळून फक्त ५ माणसे होतात. म्हणूनच त्यांची संख्या वाढायला पाहिजे. तोच माझा प्रयास आहे.
>>
वाढवा वाढवा , लाख दोन लाख डुप्लिकेट आय डी क्लोनसारखे तयार करा आणि पाठवा म्हणजे तिथल्या हिंदूंची संख्या वाढेल. रोबो सिनेमासारखी::फिदी:
<< सरकार स्थापण झाल्या झाल्या
<< सरकार स्थापण झाल्या झाल्या ३७० सारखा वादग्रस्त मुद्दा घ्यायला नको होता. >> नशीब, औरस/ अनौरसच्या गदारोळात कुणालातरी माझ्यासारखं वाटतंय !
अहो राज्यसभा कसली डोंबलाची ,
अहो राज्यसभा कसली डोंबलाची , आधी काश्मीर मधल्या विधानसभेने बहुमताने ठराव पास करावा लागेल ही त्याची प्रि कंडिशन आहे. तिथल्या मुसलमानानी भाजपला बहुमत मिळवून दिले तरच हे शक्य आहे आणि एकदा का तिथल्या मुसलमानानी भाजपला बहुमत दिले की त्यांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी किंवा अनुनय का काय म्हणतात त्यासाठी तिथली सत्ता जाऊ नये म्हणून भाजप देखील असा ठराव करणार नाही::फिदी:
मेजर धर,यांना मिळालेली
मेजर धर,यांना मिळालेली अज्ञात काश्मिरी व्यक्तीच्या डायरीचा अनुवाद वाचला होता.
१) तिथले एक हिंदू मास्तर होते.सुरवातीच्या काळात त्यांच्याकडे जबरदस्तीने येणार्या काश्मिरी तरुणांना, त्यांनी सांगितले की आता आम्ही गाव सोडून जातोय.तर त्यांनी सांगितले की तुम्ही खुशाल जा.पण शीलाला (मास्तरांची मुलगी)इथे ठेवून जायचे.नंतर ती शीला कालांतराने वेडी झाली.
२) काश्मिरमधे हिंदू लोक घरे बांधताना तिथल्या मंत्र्याने खाजगीत सांगितले होते की बांधू दे त्यांना घरे! त्यामुळे आज आपल्याला रोजगार मिळतो आहे.उद्या त्यांना हाकलून दिले की घरासकट जमिनी मिळतील.
----------------------------
अशोक पंडित यांनी काश्मिरी पंडितांना हाकलतांना काय हाल केले हे म.टा.मध्ये मुलाखतीत लिहिले होते.
सरकार स्थापण झाल्या झाल्या ३७० सारखा वादग्रस्त मुद्दा घ्यायला नको होता. ............असं मलाही वाटलं होतं.
मोदीसरकारसमोर आधीच भरपूर आव्हाने आहेत.पण ३७० कलम रद्द केले तर खरं उत्तम होईल.कवीमनाच्या वगैरे नेत्याने केलेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न कोणी खरोखर करीत असेल तर सर्व पक्षांनी एकत्र
यायला हवे.मला माहीत आहे, हे माझे स्वप्नरंजन आहे.तरीही वाटते हे खरे!
रॉबीनहूड >> वाढवा वाढवा , लाख
रॉबीनहूड
>> वाढवा वाढवा , लाख दोन लाख डुप्लिकेट आय डी क्लोनसारखे तयार करा आणि पाठवा म्हणजे तिथल्या हिंदूंची
>> संख्या वाढेल. रोबो सिनेमासारखी
त्याची काळजी तुम्हाला नको. आमचं आम्ही बघून घेऊ.
तुम्ही फक्त मानलेले नातेवाईक मोजत बसा.
आ.न.,
-गा.पै.
आपल घर शाबुत आहे. छ्.शिवाजी
आपल घर शाबुत आहे. छ्.शिवाजी राजे महाराष्ट्रात जन्माला आले त्यामुळे अजुन ३०० वर्षे तरी आपल्याला काश्मीरी पंडीतांसारखे कुणी हाकलणार नाही >> म्हणतात न शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी
मात्र हातोडावाला, चायवाला,
मात्र हातोडावाला, चायवाला, ईडलीवाला, विचारवंत आणि गामा_पैलवान मिळून फक्त ५ माणसे होतात. म्हणूनच त्यांची संख्या वाढायला पाहिजे. तोच माझा प्रयास आहे.>>> काय कठीण. 'उनके पच्चीस' मग तुम्ही आणि तुमच्यासारखे 'दक्ष' मिळुन ५० लाख सहज जमवु शकाल. फक्त ईब्लिस यांनी दिलेला धोक्याचा ईशारा लक्षात घ्या.
मग कर्ज करा तुप प्या काश्मीर गेल तेल लावत.>> हायला, मग मागची १० आणि सत्तेत असतानाची ५ वर्ष काश्मीरला काय लावत होता??
ह्या धाग्याची लिंक पी आय बी
ह्या धाग्याची लिंक पी आय बी ला द्यावी का या विचारात आहे.
सडेतोड, १. >> काय कठीण. 'उनके
सडेतोड,
१.
>> काय कठीण. 'उनके पच्चीस' मग तुम्ही आणि तुमच्यासारखे 'दक्ष' मिळुन ५० लाख सहज जमवु शकाल.
ये हुई ना बात. तसंही पाहता वायव्य सीमाप्रांती पठाण पाकिस्तानात जायला नाखूष होतेच. त्यांना भारतात राहायचं होतं. 'उनके पच्चीस' आणि माझ्यासारखे 'दक्ष' मिळून अर्धा कोटी बनवायची कल्पना आकर्षक आहेच.
२.
>> फक्त ईब्लिस यांनी दिलेला धोक्याचा ईशारा लक्षात घ्या.
तो इशारा इंग्लंडच्या संदर्भात आहे. मी इंग्लंडला जोडून घ्यायची भाषा केली नाहीये. ती कल्पना उदयन.. यांची आहे.
आ.न.,
-गा.पै.
किती देशभक्तांनी ,
किती देशभक्तांनी , धर्मनिष्ठांनी पाकिस्तानात जाऊन जिवावर उदार होऊन बॉम्बस्फोट घडवून आणलेत. ?
यांच्या केकाटण्या फक्त चुलीपुढेच !
Pages