गेली तीन वर्षं आपण सातत्यानं मायबोलीवर लेखनस्पर्धा आयोजित करत आलो आहोत. या वर्षीही भरघोस बक्षिसांसह, तुम्हांला लिहितं करण्यासाठी घेऊन येत आहोत - मनोविकास प्रकाशन व मायबोली.कॉम आयोजित लेखनस्पर्धा - २०१४.
तुमच्यातल्या ललितलेखकाला वाव मिळावा, तुम्हांला भावलेल्या व्यक्तीचं शब्दचित्र रेखाटता यावं, यासाठी यंदा स्पर्धेसाठी एक विषय आहे - 'व्यक्तिचित्रण'.
नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि श्री. नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. काहींना आनंद झाला, तर काहींना ’या देशाचं आता काय होईल?’, अशी चिंता वाटू लागली. काहींच्या मते ’अच्छे दिन आ गये’, तर काहींना ’लोकशाही’, ’सर्वधर्मसमभाव’ ही तत्त्वं नाहीशी होण्याची भीती...
याबद्दल तुम्हांला काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी दुसरा विषय आहे - 'मोदी जिंकले; पुढे काय..?'
४ जून - ४ जुलै, २०१४ या कालावधीत ही स्पर्धा मायबोली.कॉमवर आयोजित केली जाणार आहे.
स्पर्धेचे विषय पुन्हा एकदा -
१. मोदी जिंकले; पुढे काय..?
२. व्यक्तिचित्रण
या स्पर्धेतील विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं!!!
स्पर्धेतील विषयांचा आवाका, परीक्षकांची नावं, स्पर्धेचे नियम, बक्षिसं इत्यादी महत्त्वाचे तपशील लवकरच जाहीर केले जातील.
रसग्रहण स्पर्धा, गाथाचित्रशती लेखनस्पर्धा आणि गेल्या वर्षीची लेखनस्पर्धा यांना मायबोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसाच प्रतिसाद या स्पर्धेलाही मिळेल, ही खात्री आहे.
विषय उत्तम आहेत. स्पर्धे
विषय उत्तम आहेत.
स्पर्धे च्या नियमांची वाट बघत आहे.
दोन्ही विषय मस्त आहेत. बरेच
दोन्ही विषय मस्त आहेत.
बरेच लेखक आणि चालू घडामोडीतज्ज्ञ मायबोलीवर आहेत, त्यामुळे लेखनस्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळेल.
सर्वांना शुभेच्छा!!
दोन्ही विषय मस्त आहेत. बरेच
दोन्ही विषय मस्त आहेत.
बरेच लेखक आणि चालू घडामोडीतज्ज्ञ मायबोलीवर आहेत, त्यामुळे लेखनस्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळेल.>>>>+१