Submitted by कविता१९७८ on 28 May, 2014 - 03:26
मी आणि माझी भावंडे दरव र्षी शिर्डी पदयात्रेला जातो. रस्ता घाटाचा अस ल्याने मार्च - एप्रिल मध्ये जाउन सुद्धा रात्री खुप थंडी असते. मी ईथे वुलनच्या चादरीच्या साईजच्या शॉल्स शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही मिळाल्या. कुणी बनवुन देउ शकतं का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Contact Aval and her students
Contact Aval and her students please
मायबोलीवरच्या अवलला
मायबोलीवरच्या अवलला संपर्कातून कॉण्टॅक्ट कर. मायबोलीवरच्या अवलला संपर्कातून कॉण्टॅक्ट कर. ती आता माबो वर ययेत नाही फारशी त्यामुळे संप्र्कातून मेसेज गेला की तुला तिच्याशी बोलता येईल.
धन्यवाद
धन्यवाद
इथे आहे अवल
इथे आहे अवल http://www.maayboli.com/user/10778
तुम्हाला हाताने विणलेली शाल
तुम्हाला हाताने विणलेली शाल हवी आहे की मशीनवरची पातळशी लोकरीची मिळते तशी हवी आहे? दादरच्या दुकानांमध्ये चौकशी करा किंवा मंगळदास मार्केटमध्ये जामामशिदीसमोर एक बोर्ड बघितला होता की पहिल्या मजल्यावर शालींचं दुकान आहे म्हणून. तिथे चौकशी करा.
अवलला विचाराच, पण मला वाटतं हाताने विणलेल्या शालींचा बोंगा मोठा होतो घडी केली की. तुम्हाला पदयात्रेसाठी हवी असेल तर हलकी आणि बारीक घडी होणारी हवी म्हणजे सामानात जास्त जागा व्यापणार नाही. माझ्याकडे एक खूप जुनी (माझ्या आजोबांची) पांघरुण म्हणून वापरायची अत्यंत पातळ पण खूप ऊब असलेली शाल होती काश्मिरी बॉर्डर असलेली. तिची घडी सिल्कच्या साडीच्या घडीसारखी छोटी व्हायची.
अश्वे पश्मिना शॉल म्हणून
अश्वे पश्मिना शॉल म्हणून कश्मिरला मी अशा शॉल पाहून आले. ह्या शालींना वजन नसते. अगदी ग्रॅम मध्ये असेल पण किंमत ५ हजारांपासून सुरवात होउन ती २० हजारांपर्यंत.
बाकी साध्या शॉल ३०० पासुन होत्या.
कश्मिरी लोक सांगत होते की दादरला त्यांच्या लोकांची काही दुकाने आहेत म्हणून.
अगं अगदी पश्मिना नसली तरी
अगं अगदी पश्मिना नसली तरी चालेल बहुतेक. प्रवासात पादडायला हवी आहे तिला. जरा उबदार असली तरी चालेल. आजोबांची बहुतेक पश्मिना होती. ६० वर्षं टिकली. नंतर कसर लागली तिला
अग मी पश्मिना बद्दल सांगितल.
अग मी पश्मिना बद्दल सांगितल. तिला घ्यायला नाही म्हणत. तिला सततच्या प्रवासाला म्हणजे साधीच आणि मळखाऊच बरी.
नक्कीच पश्मिना असेल ग ती अश्वे.
होय. मला साधीच हवीये कारण ८
होय. मला साधीच हवीये कारण ८ दिवसाच्या धुळीच्या प्रवासात महागडया वस्तुंचे बारा वाजतात. फक्त साईज मोठी हवीये.
कविता तुझा निरोप अवल ला
कविता तुझा निरोप अवल ला पोहोचवलाय. तिला विपु कर किंवा मेल कर. तुला तिचा नंबर हवा असेल तर संपर्कातून देते.
मी अवल ला विपु केली. मला
मी अवल ला विपु केली. मला नंदीनी कडुन मेल आलंय. मला वाटलं नंदीनी अवलच्या स्टुडंट आहेत.
बरं जागु मला अवल चा नंबर द्या.
धन्यवाद जागु माझं बोलणं झालंय
धन्यवाद जागु
माझं बोलणं झालंय आरती ताईशी. खुपंच छान वाटलं त्यांच्याशी बोलुन.
मला नंदीनी कडुन मेल आलंय. मला
मला नंदीनी कडुन मेल आलंय. मला वाटलं नंदीनी अवलच्या स्टुडंट आहेत.>>>> ?? आं??? मी नाहीये अवलची विद्यार्थिनी. दुसरी नंदिनी असेल तर माहित नाही, पण बहुतेक नलिनी असावी.
Bandra W - Elco market मधे
Bandra W - Elco market मधे Afreen म्हणून एक दुकान आहे. तिथे पण shawls, stoles, pashminas (probably fake) पण सोफ्ट आणि उबदार + हलक्या २०० ते ४००-५०० च्या range मधे पण चान्गल्या मिळ्तील. जास्ती भारीतल्या हव्या असल्यास पण आहे त्याच्याकडे माल.
शालींबद्दल बरीच माहिती दिली
शालींबद्दल बरीच माहिती दिली गेली आहे. पण शिर्डीला चालत !! ग्रेट आहात. तुम्हाला पदयात्रेसाठी शुभेच्छा.
श्री साईबाबांना माझा नमस्कार सांगा.
मनीमोहोर धन्यवाद, गेल्याच
मनीमोहोर धन्यवाद,
गेल्याच महिन्यात ३१ मार्च ते ७ एप्रिल अशी मी माझी ६ वी वारी पुर्ण केली. आता पुढल्या वर्षी २० मार्च २०१५ ला गुढीपाडव्याच्या दिवशी ७ वारीला निघेन. माझे भाउ डिसेंबर महीन्यात जातात.
मी काही ग्रेट नाही हो, आमच्या ग्रुप मध्ये ७५ वर्षाच्या बाई माझ्या पुढे चालत असतात. मी पायात स्पोर्टस् शुज घालुन, अँकल सपोर्ट घालुन चालते आणि त्या फक्त साध्या स्लीपर्स घालुन चालतात. फरक मात्र इतकाच की आयुष्यभर त्यांनी खुप कष्ट केलेत म्हणुन त्या काटक आहेत. आणी माझे जीवन त्या मानाने ऐषोआरामाचे आहे. चालायची सवय नाही, उन्हाची सवय नाही. सकाळी ७.३० वाजले कि चाल कमी होते म्हणुन आम्ही रात्री केव्हाही १२.३० / १.०० / १.३० / २.०० ला उठुन चालतो , झोप फक्त २-३ तासांची मिळ्ते. आम्ही चारोटी - जव्हार मार्गे जातो म्हणुन नाशिक येइपर्यंत आम्हाला सतत घाट लागतात व नंतर सिन्नरचा घाट पार करावा लागतो. जव्हार मार्ग पुर्ण जंगलाचा आहे म्हणुन बाहेरचे खायला प्यायला काही मिळ्त नाही. अगदी मिनरल वॉटरही ५ व्या दिवशी नाशिक आल्यावर पाहायला मिळतं. नाशिकला मुंबईच्या पालख्या आमच्या भागातल्या पालख्यांची भेट होते. लिहायला गेले तर खुप वेळ लागेल त्यामुळे जास्त बोर करत नाही पण हा अनुभव खुपच वेगळा आहे. संधी मिळेल तर सोडु नका.
ह्या वर्षी सिन्नरच्या घाटाजवळ एक मुलगा भेटला होता. एका पायाने अधु होता. पहिल्यांदाच वारीला आला होता. खुप मागे पडला होता कारण फास्ट चालता येत नव्ह्ते. उन तर ११ -३० झाले होते आणि उन खुप जास्त होते पण कंटाळला नव्ह्ता. आमचा दुपारच्या जेवणाचा थांबा त्याच्या थोड्या आधी होता आम्ही तिथपर्यंत त्याला त्याच्या गतीने साथ दिली. एका माणसाला पाहिले तो दोन्ही पायाने चालु शकत नव्हता तीन चाकी सायकलवर बसला होता व स्वतःच सायकल चे पायडल हाताने फिरवत चालला होता. उनही भरपुर होते. त्याची इच्छाशक्ती वाखाणण्याजोगी होती . हि माणसे खरी ग्रेट.
कविता, स्वतंत्र धाग्यावर
कविता, स्वतंत्र धाग्यावर तुमच्या या पदयात्रेचे अनुभव नक्की लिहा. प्रेरणादायी आहेत.
कविता, तुझ्या शिरडी पायवारीचे
कविता, तुझ्या शिरडी पायवारीचे अनुभव एक वेगळा धागा उघडून लिही ना
मंजू, ग्रेट माईंड्स!!!
मंजू, ग्रेट माईंड्स!!! माझ्या सर्वरने मधेच डोळे मिचकावले...नाहीतर एकाच वेळी पडली असती पोस्ट
अय्याकेश्वेग्रेमा!!!
अय्याकेश्वेग्रेमा!!!
पुन्हाग्रेमा
पुन्हाग्रेमा
अय्या! परत !!!!
अय्या! परत !!!!
नक्की लिहेन.
नक्की लिहेन.
३ वेळा ग्रेमा
३ वेळा ग्रेमा
कविता, मी मंगळदास मार्केट
कविता, मी मंगळदास मार्केट किंवा दादरला गेले तर शालीची चौकशी करुन ठेवते. ठाण्यातही विचारते.
कविता, हाय तुमचे अनुभव नक्की
कविता, हाय तुमचे अनुभव नक्की लिहा...जसे नर्मदा परिक्रमेचे अनुभव सौ. चितळेनी youtube वर सांगितला आहे...खूप आवडेल वाचायला.
तुमच्या वारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा
गंधा
धन्यवाद गंधा, मला जसे लिहायला
धन्यवाद गंधा,
मला जसे लिहायला जमेल तसे लिहायचा प्रयत्न करेन म्हणजे कदाचित ६ वर्षांचे अनुभव मागे पुढे होतील लिहिताना.
अश्विनी के : - धन्यवाद , माझं अवल शी बोलणं झालंय आणी त्यांनी शॉलचं पॅटर्न मनात ठरवलंही असेल.
खरचं कविता, स्वतंत्रपणे लिहा
खरचं कविता, स्वतंत्रपणे लिहा तुमचे अनुभव. वाचायला खूप आवडेल. झलक ही खूप छान वाटली वाचताना.
प्रथमत:सर्वांना धन्यवाद,
प्रथमत:सर्वांना धन्यवाद, ज्यांनी माझं नाव सुचवलं आणि कविता, जिने एव्हढा विश्वास टाकला.
पाच बाय साडेसहा फूट इतकी मोठी लोकरीची शाल मी पहिल्यांदाच विणली. बरं कविताला ती प्रवासात न्यावयाची असल्याने फार जडपण व्हायला नको म्हणून बारीक लोकर आणि दोन सुयांवर विणली शाल. प्रत्यक्षात तीन वेगवेगळे पदर विणून मग एकत्र शिवली.बॉर्डर मात्र सलग विणली.
कविताने सांगितल्या प्रमाणे मळखाऊ पण फ्रेश कलर वापरला आणि प्लेनच विणली. पहा आवडते का
अवल, खूप सुंदर झाली आहे शाल
अवल, खूप सुंदर झाली आहे शाल दोन सुयांवर म्हणजे फार हळू वाढते. कितीतरी मेहनत आहे. तीन पदर म्हणजे काय? ३ शाली विणून बॉर्डर विणताना एकत्र केल्यास का? आता तुझी शाल पण शिर्डीच्या वार्या करेल
क्लोज अप
क्लोज अप
हो ग अश्विनी धन्यवाद
हो ग अश्विनी धन्यवाद
दिवस रात्र विणतच बसलीस की
दिवस रात्र विणतच बसलीस की काय?
दिवस रात्र विणतच बसलीस की
दिवस रात्र विणतच बसलीस की काय? अ ओ, आता काय करायचं>>>>>:हाहा: सॉरी अश्विनी हसू आवरलच नाही मला.
अवल ग्रेट! फोटो पाहुन नजरेला पण एखादी गोष्ट इतकी मऊ लागु शकते हे पहिल्यान्दा बघीतले. रन्ग पण खूप सुरेख आहे.:स्मित:
कविता आज गुरुपौर्णिमा आहे.:स्मित: तुला खूप शुभेच्छा आणी साईबाबाना पण आमचा नमस्कार सान्ग.
काळजी घे.
खुपच छान आहे , खुप खुप
खुपच छान आहे , खुप खुप धन्यवाद, खुपच मेहनत घेतली तुम्ही माझ्यासाठी
धन्यवाद रश्मी
धन्यवाद रश्मी
अवल, शाल अव्वल झाली आहे. रंग
अवल, शाल अव्वल झाली आहे. रंग ही सुरेख आहे. नजरेलाच मऊपण जाणवते आहे. किती मेहनत झाली असेल ना?
रंग सुद्धा छान आहे. घरातल्या
रंग सुद्धा छान आहे. घरातल्या सर्वांना आवडली.
हॅट्स ऑफ टू यू अवल जी.
हॅट्स ऑफ टू यू अवल जी. उत्तम झाली आहे. तुमच्या कौशल्या ला सलाम.
ग्रेटच अवल!!!
ग्रेटच अवल!!!
ग्रेटच अवल!!!=+१००
ग्रेटच अवल!!!=+१००
मस्तच!
मस्तच!
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
अवल, तुझ्या पायांचा एक फोटो
अवल, तुझ्या पायांचा एक फोटो पाठवून दे.
क्रोशाचं सामान बासनात भरून ज्या फडताळात ठेवलंय त्याच्या दरवाजावर लावेन म्हणते.
काय कमालीची वीणकर आहेस तू!
चुकून दोनदा आला
चुकून दोनदा आला प्रतिसाद.
दोन्ही पावलांचा फोटो पाठव.
बापरे वर्षभराच काम दिसतय.
बापरे वर्षभराच काम दिसतय. ग्रेट..
अदिति, तिने एका महिन्यात
अदिति, तिने एका महिन्यात पूर्ण केलंय.
एकदम सोप्पं होतं म्हणे!
मी तर कल्पनाच करु शकत नाही की
मी तर कल्पनाच करु शकत नाही की हे विणकाम मला जमेल.
मस्त झाली आहे शाल.
मस्त झाली आहे शाल.
सुंदरच झालीय ! ...अवल, तू
सुंदरच झालीय ! ...अवल, तू ग्रेट आहेस
Pages