लग्नातील हे अडथळे कसे दुर करावे?

Submitted by हर्ट on 12 May, 2014 - 01:40

नमस्कार जनहो.

माझी एक जवळची नातलग आहे. ती पुण्याला मास्टर्स करते आहे. तिच्याच वर्गात एक मुलगा आहे तोही मास्टर्से करीत आहे. दोघे एकमेकांना १२वी पासून ओळखतात. आणि दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आता ह्या दोघांचे वय २४ पुर्ण होत आहे. मुलीचे वय २४ म्हणजे लग्नासाठी योग्य आहे आणि शिवाय शिक्षण बर्‍यापैकी झाले आहे म्हणून आता लग्न व्हायला हवे म्हणून घरातील लोक रोज रोज तोच विषय घेऊन बसत आहेत. मुलगा आणि मुलगी घरात एकुलते एक अपत्य आहे. मुलाचे म्हणणे पडते की त्याला अजून तीन चार वर्ष हवे आहेत लग्न करायला. तोवर नोकरीमधे तो सेटल होईल. ही गोष्ट आम्हालाही पटते आहे त्या मुलाची की मुलासाठी २४ हे वय लग्नासाठी जरा कमी पडते. पण म्हणून आम्ही मुलीचे वय वाढू देण्याची जोखीम घेऊ इच्छित नाही.

मी मुलीशी बोललो की आपल्याच जातीतील अनुरुप असे स्थळ बघू का पण त्याला तिचा विरोध आहे. ती म्हणते आहे की ती त्या मुलासाठी वाट बघायला तयार आहे आणि ही वाट बघताना काय घडू शकते हेही तिला माहिती आहे. पण ती जरा जिद्दी आहे. ती असंमजस आहे असे नाही पण तिला अगदी अपरिचित मुलाशी लग्न करणे फार मोठा निर्णय वाटतो. त्यापेक्षा जो मुलगा नीट माहिती आहे त्याच्यासाठी वाट बघून पुढे त्याच्याशीच लग्न करायला ती तयार आहे. पण पालक म्हणून आम्ही खूप खोलवर विचार करतो.

हा प्रश्न कसा मिटवावा ह्या हेतूने मी हा धागा उघडला आहे. तुम्हाला जर वेगळा मार्ग सुचत असेल तर अवश्य सुचवा. मला असे वाटते की निदान मुलामुलीचा मास्टर्से पुर्ण झाल्यावर साखरपुडा करुन द्यावा. पण, तरीही पुढे साखरपुडा होऊन तीनएक वर्ष पहाणे अवघड वाटते आहे.

कृपया ह्या विषयाशी अनुसरुन उत्तरे लिहा.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी एक जवळची मैत्रीण, २४ वर्षांची. तिच्याच वयाच्या एका मुलाशी लग्न करायचे ठरवले होते. दोघेही एम्बिए करत होते त्यामुळे लग्नाची घाई नव्हती. पण मुलीच्या वडिलांनी लग्नाची घाई केली त्या दोघांची इच्छा नसताना. आता लग्न झाले आहे तरी दोघेही एम्बिए पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या शहरात राहतात. पण आता शिक्षण पूर्ण होउन लवकरात लवकर नोकरी शोधण्याची कमालीची गरज त्या दोघांना वाटते आहे कारण लग्नानंतरच्या जबाबदार्‍या पूर्ण करायला हव्यात म्हणुन खुपच प्रेशर आले आहे दोघांवर. त्यामुळे मैत्रीण बर्‍याचदा बोलते कि वडिलांनी घाई नको होती करायला. Sad

त्याचबरोबर एक जवळचे नातेवाइक, थोडेसे ऑर्थोडोक्ससुद्धा. , त्यांची मुलगी. तिचा डिप्लोमा झाल्यापासुन स्थळ बघत होते. पुढचे शिक्षण घरातुनच करत होती. आई वडिल जावयाबद्दलच्या अपेक्षांबद्दल ठाम होते. त्यासाठी असंख्य स्थळ शोधली. आता मुलगी २९ वर्षांची आहे (आमच्या समाजात बर्‍याचदा विसाव्यावर्षीच लग्ने होतात मुलींची). आता काही दिवसांपुर्वी लग्न ठरले जसे आई वडिल आणि मुलीला हव्या होत्या तशाच मुलाशी. पण तोपर्यंत समाजातले बरेच लोक बरचं काही बोलत होते मुलीला आणि घरचांना, मुलीचे वय एवढे वाढले तरी लग्न न करण्याबाबत. पण घरचे ठाम राहिले याबद्दल कौतुक वाटते.

ती असंमजस आहे असे नाही पण तिला अगदी अपरिचित मुलाशी लग्न करणे फार मोठा निर्णय वाटतो. त्यापेक्षा जो मुलगा नीट माहिती आहे त्याच्यासाठी वाट बघून पुढे त्याच्याशीच लग्न करायला ती तयार आहे>>>>>
She was even considering the "other" option??????? हे कुठल्या तर्‍हेचे प्रेम आहे?
त्या दोघाना वैयक्तिक रित्या ओळखत नसल्याने त्यांच्या Motive बद्दल मत व्यक्त करणे बरोबर नाही पण जे लिहिले आहे त्यावरुन दोघेही अजुन लग्नाबाबत "sure" आहेत असे वाटत नाही त्यामुळे वाट पाहणे हा एकच मार्ग योग्य दिसत आहे. त्यांची एंगेजमेंट करुन दिल्याने काही विशेष फायदा होइल असे वाटत नाही कारण ते त्यांना बंधनकारक ओझे वाटु शकते.
मुलीला त्या मुलासाठी थांबण्यातले धोके माहित आहेत असे लिहिले आहे त्यावरुन मुलगी समंजस आहे असे वाटत आहे. तीन वर्षांमधे त्यांच्यातले प्रेम किती टिकाउ आहे ते कळुन येइलच. बर्‍याच वेळा काही अ‍ॅक्शन घेण्यापेक्षा काही अ‍ॅक्शन न घेणे हेच जास्त समंजसपणाचे असते.

जाता जाता.. (आमच्या गायनॅकॉलॉजिस्टच्या मताप्रमाणे)..
स्त्रीच्या वाढत्या वयाप्रमाणे egg quality gets deteriorated. त्यामुळे वयाच्या 30 किंवा नंतर होणार्‍या अपत्यात Down Syndrome चा धोका जास्त होत जातो त्यामुळे गर्भारपणात Trisomy 21 ही टेस्ट रेकमेंड करतात.

धन्यवाद मित्रांनो.

तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचले. आणखी एकदा फावल्या वेळात वाचून काढेन. तुमची मते वाचून मला माझे विचार पडताळून बघता आले.. येत आहे.

बेफिकिर, चव्हाट्याबद्दल तुम्ही जे आणि जसे लिहिले ते खूपच खटकले. लग्न वा प्रेम ह्याविषयावर बोलणे ह्यात वाईट काय आहे? एखादी व्यक्ती जर तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल बोलत असेल तर लगेच त्या व्यक्तिबद्दल घाणेरडे विचार मनात येतात का तुमच्या? ग्रो अप!!!

>>> एखादी व्यक्ती जर तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल बोलत असेल तर लगेच त्या व्यक्तिबद्दल घाणेरडे विचार मनात येतात का तुमच्या? ग्रो अप!!!<<<

नाही बी, तुमचा गैरसमज झाला असावा. त्या व्यक्तिबद्दल माझ्या मनात घाणेरडे विचार नाही येत. Happy

काहीजणांना मी जे म्हणालो आहे ते योग्य वाटले आहे इतपत माझ्यासाठी पुरेसे आहे Happy

तरीही, त्याच प्रतिसादात मी कोणाला दुखावले असल्यास सपशेल माफी असेही लिहिलेले आहे.

ज्या कुणाला तुमचे वाक्य योग्य वाटले ती लोक तुमच्यासारखाच विचार करतात. तुम्ही आधी सगळ काही बोलून जाता आणि मग माफी सुद्धा मागता. काय उपयोग आहे अशा माफीचा?

ok B

<<स्त्रीच्या वाढत्या वयाप्रमाणे egg quality gets deteriorated. त्यामुळे वयाच्या 30 किंवा नंतर होणार्‍या अपत्यात Down Syndrome चा धोका जास्त होत जातो >>

ह्याच समजामुळे मुलींवर लवकर लग्न करायचं प्रेशर वाढत जातं. मला अशा कितीतरी बायका माहित आहेत ज्यांच्या मुलांचा जन्म त्या स्त्रिच्याच्या वयाच्या ३० नंतर झाला. सर्व मुले फिजिकली आणि मेण्टली हेल्दी आहेत. त्यामुळे डाऊन सिंड्रोमच्या भीतीने मुलीच्या लग्नाची घाई करणे अयोग्य असे मला वाटते.

kaahee baaykaanaa pahilee mul lawakar hot asatil .. zaalee paN dusara tisar mul tisinantar hot aselch kee speciaally junya kaLaat..

वेल, माझ्या एका बहिणीचे लग्न ३८ व्या वर्षी झाले. पहिले मुल ४० असताना आणि दुसरे ४३ असताना. दोन्ही मुले अतिशय गोड आणि तल्लख आहेत.

वेल,
' डाऊन सिंड्रोमची कारणे अनेक आहेत. स्त्रीच्या वाढलेले वय हे त्या अनेक कारणातले एक कारण आहे. बाळ जन्माच्या वेळी गुदमरणे किंवा जन्मानंतर खूप आलेला ताप हे कारणही असू शकतात.'

तुम्ही लिहिलेले यातले गुदमरणे आणि ताप येणे हे कारण हे चूक आहे.
बाकी चालू द्या.

>>डाऊन सिंड्रोमची कारणे अनेक आहेत. स्त्रीच्या वाढलेले वय हे त्या अनेक कारणातले एक कारण आहे. बाळ जन्माच्या वेळी गुदमरणे किंवा जन्मानंतर खूप आलेला ताप हे कारणही असू शकतात.>>
वेल,
२१ व्या क्रोमोझोमचे अ‍ॅबनॉर्मल सेल डिविजन हे डाऊनसिंड्रोमचे कारण आहे. मातेचे वाढलेले वय किंवा आई/बाबा बॅलन्स्ड कॅरिअर असणे हे रिस्क फॅक्टर. आईचे वय ३५ च्या पुढे असेल तर ३५० मधे १ असलेली रीस्क, ४५ ला ३० मधे १ इतकी वाढते. आजकाल टेस्ट्स उपलब्ध आहेत आणि टेस्ट्स पॉझिटिव आल्यास बाळ न होऊ द्यायचा पर्याय असल्याने वरवर सगळे ठीक वाटते. वडीलांचे वय जास्त असेल तर इतर धोके असतातच.

मी डाऊन सिंड्रोम बद्दल चुकले का? सॉरी. मला डाऊन सिंड्रोम म्हणजे सगळ्या प्रकारचे / लेवलचे मेंटल रिटार्डेशन वाटले. >> बाप रे.

मुलेबाळे ही फारच दूरची गोष्ट झाली. पण दोन सज्ञान व्यक्तींच्या महत्वाच्या वैयक्तिक निर्णयात तुम्ही किती जरी जवळचे नातेवाईक असलात तरी किती लक्ष देणार आणि तुमची मते तिच्यावर फोर्स करणार? सर्वस्वी त्यांच्यावर सोडले पाहिजे. माहीती नस्लेल्या मुलाशी फक्त तो जातीतला आहे म्हणून लग्न करणे फारच
रिडिक्युलस आहे. तुमची ओव्हरऑल अनभिज्ञ विचार सरणी तिच्यावर थोपू नका. गिव्ह देम स्पेस. मुलीचे लग्न कर्णॅ म्हणजे एक रकाना भरून टाकून जबाबदारीतून सुटणे नाही.

बी तू तुझ्या त्या नातेवाईक मुलीला सान्गीतले आहेस का?/ कल्पना दिली आहेस का की तू तिच्या जीवनातले हे महत्वाचे प्रश्न मायबोली सारख्या पब्लिक साईटवर मान्डणार आहे म्हणून? आणी जर सान्गीतले असेल तर तिची प्रतीक्रिया काय होती? जर नसेल तर समजा तिच्या ओळखीतल्या दुसर्‍या एखाद्या व्यक्ती ने मायबोली वाचुन तिला तसे सान्गीतले तर काय होईल याचा विचार केला आहेस का?

रश्मी,

त्यांनी ह्या विषयावर मला दिलेले उत्तर वर वाचलेत का?

Happy

त्यांच्यामते एखादी व्यक्ती तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल बोलत असेल तर माझ्या मनात लगेच घाणेरडे विचार येतात. 'म्हणजे नक्की काय' हे मला समजले नाही, पण त्यांना माझ्या कोणत्यातरी कृतीला विरोध आहे इतकेच समजले.

बेफिकीर म्हणूनच मी त्याला असा प्रश्न विचारला आहे.:स्मित: मला त्याने तुम्हाला दिलेले उत्तर अजीबात पटले नाही. तुम्हालाच काय कुणालाही अशा पद्धतीने उत्तर द्यायला नको.

आता तो म्हणेल की हे चव्हाट्यावर कसे? तर चार लोकात आपल्या खाजगी जीवना विषयी बोलणे म्हणजे चव्हाट्यावर आणण्यासारखेच होते. चव्हाटा हा ग्रामिण शब्द तर पब्लिक साईट हा मॉडर्न शब्द.

दुसरी गोष्ट वडिल जरी असुन नसल्या सारखे नाहीत, तरी घरात कुणी इतर वडिलधारी मन्डळी नाहीत का? बी च्या माननीय आई ( ज्याना आपण आदराने काकु/ मावशी म्हणू शकतो), बी ची बहिण किन्वा इतर मन्डळी?

बी तुला माझाही राग येईल पण ठामपणे सान्गते की असे महत्वाचे निर्णय हे बाहेरच्यान्वर सोपवु नये. इथे तुला सगळ्यानी बरे वाईट ( तुझ्या मते ) सल्ले दिले आहेत. ते देखील त्यान्ची वैयक्तीक मते आहेत.

ते दोघे जर सुज्ञ आहेत तर त्यानी मुलाच्या आई वडिलान्शी आणी बाकी वडिलधार्‍यान्शी बोलावे हे अत्युत्तम!

बी, मला असे वाटते की लग्नाविषयीची चर्चा मुलाबरोबर आणि त्याच्या पालकांबरोबर करावीत. आणि दोन्ही बाजूंनी तडजोडीचा प्रयत्न करावा. मुलीला जसे त्याच मुलाशी लग्न करायचे आहे तसेच त्या मुलालाही ह्याच मुलीशी लग्न करायचे असल्यास तो , त्याच्या घरचे पण थोड्याफार तडजोडीस तयार होतील.
जसे की अगदी ४/५ एवेजी २-३ वर्षात दोघांनाही बर्यापैकी नोकरी असेल तर लग्न करता येऊ शकेल.

कर दी ना फिरसे छोटी बात तुने बी!! कुठ्ठे म्हणून न्यायच्या लायकीचा हा माणूस.

ह्याला आपलंच आवरेनासं झालंय, अंगणातून परसात जाईस्तोवर ह्याला सतराशेसाठ प्रश्न पडतात आणि मग हा बत्तेचाळीसशे त्रेचाळीस धागे मायबोलीवर ऊघडतो, माहिती देणार्‍या, मदत करणार्‍या लोकांनाच घालून पाडून बोलतो. आणि हा म्हणे हा पालकत्वाच्या नात्याने ईतरांचे गहन प्रश्न सोडवणार?
देव त्या पाल्यांचं रक्षण करो.

ह्याला आपलंच आवरेनासं झालंय, अंगणातून परसात जाईस्तोवर ह्याला सतराशेसाठ प्रश्न पडतात आणि मग हा बत्तेचाळीसशे त्रेचाळीस धागे मायबोलीवर ऊघडतो, माहिती देणार्‍या, मदत करणार्‍या लोकांनाच घालून पाडून बोलतो. आणि हा म्हणे हा पालकत्वाच्या नात्याने ईतरांचे गहन प्रश्न सोडवणार?>>>>>>>>>>>>>>>+११११११११११११११

हल्लीच सगळच अवघड आहे!
व्यक्तिस्वातंत्र्यापुढे लग्न/कुटुम्ब/अपत्ये/वंशविस्तार वगैरे बाबी/व्यवस्था क्षुल्लक आहेत.
त्यामुळे, मुळात ती दोघे "लग्न तरी का करणार" आहेत हेच समजुन घ्यायला आवडेल, अन तरच काही मार्ग काढता येईल !

सेटल व्हायची वाट पहाणारा मुलगा असेल तर एकतर त्याची स्वतःची भक्कम कुटुम्बव्यवस्था अस्तित्वात नाही म्हणून वाट बघायची असे म्हणू शकतो, किन्वा लग्नाची बाईल म्हणजे काहीतरी फार मोठी जबाबदारी वा करिअर मधला अडथळा असे मानणारी पुरुषी व्रुत्ती असू शकते, या दोन्ही बाबी सेटल झाल्यानन्तरही पोरीला घातकच!

दुसरे म्हणजे पोरगा अगदीच "शेळपट" असू शकतो, तसेच जातिबाह्य लग्नामुळे येऊ शकणार्‍या अडथळ्या/अडचणीन्चा सामना करायची वैचारिक/मानसिक/शारिरीक कुवत नसल्याने तो प्रश्नच टाळण्यासाठी करिअर/सेटलमेण्टची ढाल पुढे करु शकत असेल. कारण संसार हा जर दोघाम्चा मानला, तर एकेकट्याची किन्वा केवळ पुरुषाचीच सेटलमेण्ट होइस्तोवर स्त्रीने कितीही वय वाढेस्तोवर थाम्बणे हेच पटू श्कत नाहि, व त्या शिवाय शारिरिक सुखाचा इतकी वर्षे "त्याग" करण्यामागे पोराच्या "(मानसिक/शारिरिक) पुरुषत्वावरही" शन्का येणे साहजिक होते.

जर खरखुर जीवापाड प्रेम नसेल वा "लग्नाची" गरजच भासत नसेल, वा लग्न म्हणजे केवळ "व्यवहार" वाटत असेल तर अन तरच असली वाट वगैरे बघणे अन लग्न लाम्बवित नेण्याकरताच्या असन्ख्य सबबी/कारणे सुचू शकतात. जर खरखुर प्रेम असेल, वा लग्नाची गरजही वाटत असेल, तर वरील कोणतीही कारणे लग्न होण्या/करण्या आड येऊ शकत नाहीत.

तेव्हा मुळात ती दोघे "लग्न तरी का करणार" आहेत हेच समजुन घ्यायला आवडेल, त्याशिवाय काही सुचविता येणार नाही!

बाकी कुन्डली बिन्डली बघितल्यास त्यातुन बरेच काहि अंदाज बान्धता येतात, पण तो या धाग्याचा विषय नाही, अन अन्निस/बुप्रावाद्यान्च्या तोन्डी लागण्याइतके त्राण सध्या माझ्यात नाही! Wink

<<मुळात ती दोघे "लग्न तरी का करणार" आहेत हेच समजुन घ्यायला आवडेल, अन तरच काही मार्ग काढता येईल ! >> ह्याला पूर्ण अनुमोदन

मी इथे थोडं वेगळं आणि कठोर suggesion देत आहे. कृपया गैरसमज नसावा . परंतु मुलीचा पुढचा विचार करता ते आवश्यक आहे .
27 हे आजकाल फार जास्त वय नाहीये . त्या मुलाला स्पष्ट सांगावं . कि मास्टर्स पूर्ण झाल्यावर तुला settle व्हायला ३ वर्षे पुरेशी आहेत . त्या पेक्षा जास्त वेळ आम्ही नाही देवू शकत. मुलीलाही हेच सांगावं .मुलाला घरी बोलवून त्याचाशी डिटेल मध्ये सगळं बोलाव . ह्या सगळ्याच video रेकॉर्डिंग करून ठेवावं. ३ वर्षानंतर मुलाने त्याचे शब्द बदडले तर हा पुरावा म्हणून असेल .
साखरपुडा करून ठेवायचा असेल तर त्याचे पुरावे जपून ठेवावेत .
settle व्हायला लग्न हा अडथला नाही ठरू शकत .केवळ मुलाच वय २४ आहे हे कारण न पटण्या सारखं आहे. २४ व्या वर्षी प्रेम करता ना. मग लग्नही करा म्हणावं .

सेटल व्हायची वाट पहाणारा मुलगा असेल तर एकतर त्याची स्वतःची भक्कम कुटुम्बव्यवस्था अस्तित्वात नाही म्हणून वाट बघायची असे म्हणू शकतो, किन्वा लग्नाची बाईल म्हणजे काहीतरी फार मोठी जबाबदारी वा करिअर मधला अडथळा असे मानणारी पुरुषी व्रुत्ती असू शकते, या दोन्ही बाबी सेटल झाल्यानन्तरही पोरीला घातकच!

दुसरे म्हणजे पोरगा अगदीच "शेळपट" असू शकतो, तसेच जातिबाह्य लग्नामुळे येऊ शकणार्‍या अडथळ्या/अडचणीन्चा सामना करायची वैचारिक/मानसिक/शारिरीक कुवत नसल्याने तो प्रश्नच टाळण्यासाठी करिअर/सेटलमेण्टची ढाल पुढे करु शकत असेल >>>

१००% अनुमोदन . अशी मुले घरच्यांना काही सांगत नाहीत. आणि मग वेळ आल्यावर घरचे नको म्हणतात , जातंच वेगळी आहे . माझी आजी मारायला टेकलिये तिची शेवटची इच्छा म्हणून मला तिच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करण भाग आहे , माझ्या आईने मला शपथ घातलीये , माझा बाप हे सहन करू शकणार नाही अशी हजार कारणं पुढे करतात . तोपर्यंत मुलीसोबत जी मजा करून घ्यायची असते ती करून झालेली असते .
सगळ्यात महत्वाच म्हणजे मुलाच्या आई आणि वडील दोघांसमोर बोलणी करा . वडील असलेच पाहिजेत.
मुलीला ह्या सगळ्या गोष्टी समजावायचा प्रयत्न करा. तरीही ती ठाम असेल तर योग्य तो निर्णय घ्या

वेरी कॉमन प्रॉब्लेम ! मी स्वता फेस करतोय ! पण खरेच हा प्रॉब्लेम आहे का?

कॉलेजमधील सेम क्लास वा सेम बॅचमधील मुलामुलींचे प्रेमप्रकरण जुळले आणि विचार लग्नापर्यंत नेला की हे सेम सेम वय होतेच.

स्पष्टच बोलतो, कोणी रागाऊ नये, पण मागच्या जनरेशनला आजच्या जमान्यातील मुलांमुलींबद्दल निर्णय घेण्याची योग्य क्षमता असते का? बहुतांश वेळा ते फक्त आपलीच सोय बघून निर्णय घेतात.

अरे कॉलेजमधून बाहेर पडल्यावर काही वर्षे बॅचलर लाईफ एंजॉय करायची की लग्नाच्या बेडीत अडकायचे ??
मुलगा मुलगी दोघांनाही थांबायचे आहे तर थांबतील ना ते.
जर एकाला थांबायचे आहे आणि एकाला नाही तर करतील तडजोड नाहीतर होतील वेगळे.

हे मी पालकांच्या नाही तर पाल्याच्या दृष्टीकोनातून बोलतोय, जमल्यास पालकांनीही तिथे जाऊन विचार करायची गरज .

अवांतर - धागा मे महिन्यातील आहे, निर्णय जर घेतला गेला असेल तर तो काय घेतला आणि कोणत्या बेसिसवर घेतला हे जाणून घेण्यास उत्सुक, भविष्यात कामाला येईल. Happy

पण मागच्या जनरेशनला आजच्या जमान्यातील मुलांमुलींबद्दल निर्णय घेण्याची योग्य क्षमता असते का? बहुतांश वेळा ते फक्त आपलीच सोय बघून निर्णय घेतात. >> जनरलाईज्ड स्टेटमेंट!
आणि जर तसे असेल तर आपली बाजू मुलगा आणि मुलगी यांनी दोघांच्याही पालकांना एकत्र बसवून मांडून पटवून देणे श्रेयस्कर! एवढ्यात लग्न करायचं नाहीये, करियर करायचं आहे, सेटल (याचा अर्थ व्यक्तीनुसार बदलतो) व्हायचंय असं मोघम बोलल्यावर गैरसमज आणखी वाढणार नाहीत का? तसंच दुसर्‍या बाजूने पाहीलं तर मुलीचं वय २४ म्हणजे काही फार नाहीये. एवढा बाऊ का केला जातोय? निर्णय घ्यायला जनरेशन गॅप किंवा स्वतःची वैयक्तिक कारणं आड येत असतील तर मॅरेज काऊन्सिलींग करून घ्यावं, पालकांसह मुलीने आणि मुलाने! त्यात जर एकमेकांशीच लग्न करायचं आहे इतकं एकमेकांनी ठरवलं आणि त्यासाठी ३-४ वर्ष वाट पाहण्यास तयार आहोत सांगितलं तर इतरांनी त्यांना भरीस पाडू नये!

अमा | 13 May, 2014 - 15:26, डेलिया | 15 May, 2014 - 05:29 प्रचंडच पटली पोस्ट!!

Pages