२ कप दूध
२ कप मिल्क पावडर
१ कप अमूल फ्रेश क्रिम
ओरीओ बिस्किटांचा व्हॅनिला फ्लेवरचा मोठा पुडा (२० रुपयेवाला)
चवीप्रमाणे साखर
२-३ थेंब व्हॅनिला एसेन्स
दूध आणि मिल्कपावडर एकत्र करून एकदम गुळगुळीत ब्लेंड करून घ्या. ओरीओ बिस्किटं एकेक उघडून त्याचं क्रिम काढून या मिश्रणात घाला. ब्लेंड करा. आता अमूलचं फ्रेश क्रिम आणि व्हॅनिला इसेन्स घालून मस्तपैकी पाच-सहा मिनिटं ब्लेंड करा. मिक्सरपेक्षा ब्लेंडरने केलं तर आईसक्रिमचा पोत जास्त छान येईल. मिश्रणाची चव बघून आवडीप्रमाणे साखर मिसळा. ओरिओ बिस्किटांचा ओबडधोबड चुरा यात घालून चमच्याने ढवळून डीप फ्रिजमधे सेट व्हायला ठेवा. थोडा चुरा वरून टॉपिंगसाठी घाला.
सेट झाल्यावर गारेगार क्रिमी आईसक्रिम चाटूनपुसून खा. हा फ्लेवर अगदी अमूलच्या कूकिज् एन् क्रिम फ्लेवरसारखा लागतो.
मुग्धटलीच्या लोकप्रिय धाग्यावर प्रतिसादांनी ४०० चा टप्पा ओलांडलेला आहे. तिथे प्रतिसादात ही पाककृती लिहिली तर पुढच्या प्रतिसादांमधे हरवून जाईल. आणि मग मागची पानं शोधत बसावी लागतात. म्हणून हा वेगळा धागा. बाकीचेही मायबोलीकर जे असा वेगळा फ्लेवर करून पाहतील त्यांनी स्वतंत्र धाग्यावर त्याची पाककृती लिहावी ही विनंती.
मी पहिली बॅच केली तेव्हा त्यात फ्रेश क्रिम घातलं नव्हतं. त्यामुळे ते सेट व्हायला खूपच (२४ तास) वेळ लागला. मग पुढची बॅच केली तेव्हा कविन, मेधा२००२ सावलीने सुचवल्याप्रमाणे फ्रेश क्रिम घालून केली आणि ती फारच छान झाली.
मस्तच
मस्तच
Mast
Mast
कविता, चॉकलेट स्लाईस केक
कविता, चॉकलेट स्लाईस केक मावेमध्ये किंचीत गरम करून त्यावर पहिल्या बॅचमधलं लिक्विड आईसक्रिम आणि चॉकलेट सॉस घालून खाल्ला... सॉलिड मस्त डेझर्ट झालं
छानच
छानच
ग्रेट मंजुडी.. मलाही एक नवीन
ग्रेट मंजुडी.. मलाही एक नवीन आयडीया मिळाली...
मस्तच की.
मस्तच की.
मंजू, झक्कास !!
मंजू, झक्कास !!
मंजुडी ,मस्त मस्त आणि मस्त.
मंजुडी ,मस्त मस्त आणि मस्त.
यम्मी
यम्मी
वॉव. मस्त आयडिया. जरा घसे
वॉव. मस्त आयडिया.
जरा घसे ठिक झाले की मग करुन बघू.
कविता, चॉकलेट स्लाईस केक
कविता, चॉकलेट स्लाईस केक मावेमध्ये किंचीत गरम करून त्यावर पहिल्या बॅचमधलं लिक्विड आईसक्रिम आणि चॉकलेट सॉस घालून खाल्ला... सॉलिड मस्त डेझर्ट झालं>> सहीच आयडीया आम्ही मिसली म्हणायची
आम्ही मिसली म्हणायची>>
आम्ही मिसली म्हणायची>>
यम्म यम्म!!
यम्म यम्म!!
मस्तय
मस्तय
अरे वा. मस्त.
अरे वा. मस्त.
अर्रे व्वा, मस्त मस्त. करून
अर्रे व्वा, मस्त मस्त. करून बघायच्या पदार्थांच्या लिस्टमध्ये अजून एकाची भर पडली
मंजुडी , मस्त यम्मी
मंजुडी , मस्त यम्मी
वॉव ,भलतीच सोपी आहे. आणि हा
वॉव ,भलतीच सोपी आहे. आणि हा फ्लेवर माझ्या मुलांचा प्राणप्रिय !! या शनिवारी नक्की!!
छान.. अमूल फ्रेश क्रीमचे
छान.. अमूल फ्रेश क्रीमचे डीटेल्स ( फॅट कंटेंट ) काय आहेत, म्हणजे सिमिलर प्रॉडक्ट शोधता येईल. बिस्किटे मात्र मिळतात.
दिनेशदा -
दिनेशदा - http://www.amul.com/products/amul-freshcream-info.php
ऑस्समेस्ट!! नवीन फ्लेवरचं
ऑस्समेस्ट!! नवीन फ्लेवरचं आईसक्रीम मिळालं. उन्हाळा संपायच्या आत बहुतेक ५० - ६० प्रकारचे आईस्क्रीम्स तरी होतील मुग्धटलीच्या या रेसीपीने
सही मंजूडी. - ब्रिटानियाच्या
सही मंजूडी. - ब्रिटानियाच्या संत्र्याच्या बिक्कीटाचं आक्कीम पन काय मश्त होईल... कोनी तली बनवा ना फोटो टाका मी समाधान मानेन त्यात..
wow! सही!!!
wow! सही!!!
खुपच सोपी रेसिपी. नक्की करुन
खुपच सोपी रेसिपी. नक्की करुन बघेन.साखरेची आवश्यकता आहे का?
राहुलतेज, मिश्रणाची चव बघून
राहुलतेज, मिश्रणाची चव बघून साखर घाला. मी पाककृतीत अपडेट करते. मी वापरलेल्या मिल्कपावडरमधे साखर असल्याने मी आईसक्रिममध्ये घातली नव्हती.
एक शन्का आइस्क्रिम प्लासतिक
एक शन्का आइस्क्रिम प्लासतिक बोक्स मध्ये सेट होइल का? की अल्युमिनीयम चे भान्दे लागेल?
फोटोतलं आईस्क्रीम एकदम मस्त
फोटोतलं आईस्क्रीम एकदम मस्त दिसतंय. अगदी बाहेर मिळतं तसं
हा फ्लेवर अगदी नावडता आहे पण त्यामुळे आता वेगळ्या फ्लेवरमध्ये करावी लागेल ही रेसिपी.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्त दिसतंय. मुलांचा आवडता
मस्त दिसतंय. मुलांचा आवडता फ्लेवर आहे. त्यामुळे ट्राय करेन. बिस्किटांमधलं क्रिम काढून ते ब्लेंड करायचं काही खास कारण आहे का?
मंजुडी भारी. मस्त आहे कृती
मंजुडी भारी. मस्त आहे कृती एकदम. आईसक्रीम अगदी विकत मिळत तसच दिसतय.
Pages