दहावीनंतरचे मार्गदर्शन

Submitted by varsha11 on 8 May, 2014 - 07:02

बर्‍याच मायबोलीकरांच्या मुलांनी यंदा दहावीची परिक्षा दिली असेल. माझ्या लेकीने पण दिली आहे. आता पुढे काय हा मोठा प्रश्न आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी काय निवडायचे, कोणते विषय घ्यायचे ह्याचे थोडेसे मार्गदर्शन मिळाले तर ह्या मुलांना व आपल्याला पण खुप उपयोगी पडेल. ह्याविषयी ईथे चर्चा करुयात.

* ह्या विषयावर जर ईथे आधीचा धागा उपलब्ध असेल तर तिकडे चर्चा करुयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा,
अजून एक सल्ला. कॉलेज शॉर्टलिस्ट केल्यावर एकदा तुमच्या मुलीला ते सगळे कॅम्पस दाखवून आणा. दोनतीनदा. जिथे तिला सर्वांत जास्त कम्फर्टेबल वाटेल, त्या कॉलेजात प्रवेश घ्या.

हॉटेल मॅनेजमेंटबद्दल तुला मायबोलीकर काशी अधिक माहिती देऊ शकेल.

वर्षा मुम्बई विषयी आता मला पण माहित नाही, पण के सी कॉलेजचे नाव हॉटेल मॅनेजमेन्टविषयी ऐकले आहे. हो सन्स्कृत उत्त्म आहे तर जर्मन भाषा शिकणे अती उत्तम. जरुर घेऊ दे. चौकशी कर के सी विषयी. पण हॉटेल मॅ. पुण्यात चान्गले.

हा वाहता बाफ आहे काय ??
तरीच म्हटल आधीचे प्रतिसाद कुठे गेले

वर्षाताई तुम्ही सेव्ह केलेत ना आधीचे सर्व जे उपयोगी आहे ते ??

हे भगवान ! मघाशीच मी ओळखीच्या दोघातिघांना या धाग्यावरची चर्चा वाचायची सूचना केली होती....अभ्यासाच्या दृष्टीने....पण आत्ता दिसत्ये की पुन्हा १५ प्रतिसाद गेले वाहून.

<<पण तीचे मित्र मैत्रीणी तीला साठ्ये नको असे सांगतायत.>> का ग Happy
भवन्स च्या बरोबरीने. कांदिवलीच्या ठाकूर कोलेज चा हि विचार करू शकतेस . आणि गोरेगावला पाटकर कोलेज आहेच . बोरीवली ( वेस्ट) ला पण एक कोलेज आहे .झालंच तर पार्ला वेस्ट ला रेल्वे गेट च्या जवळ पण एक ज्युनियर कोलेज आहे . ते पण चांगले आहे . आणि नाहीतरी तिला १२ वि नंतर वेगळ्या कुठल्याही विषयात डिग्री घ्यायची असेल तर ज्युनियर कोलेज चाही विचार करू शकतेस

जवळपासच्या सगळ्या कोलेज मध्ये तिला जे विषय घ्यायचे आहेत ते आहेत का त्याची चाचपणी कर. आणि कोलेज कुठलेही असुदे शेवटी मार्क व्यवस्थित काढणे हे प्रत्येक मुलावर अवलंबून असते Happy

आणि कोलेज कुठलेही असुदे शेवटी मार्क व्यवस्थित काढणे हे प्रत्येक मुलावर अवलंबून असते स्मित>>>. सुजा भरपुर्र अनुमोदन.:स्मित:

मामा.:अरेरे:

@ जाई, अग, आधीचे सगळे वाहुन गेले. मला माहितच नव्हते की तो वाहता धागा झाला आहे ते कारण मी पहिल्यांदाच धागा काढला आहे. Happy मी ईथे खुप कमी येते आणि आले तरी रोमातच असते. मी धागा चालू केला तर दोन दिवस कोणाचेच प्रतिसाद नव्हते मी थोडीशी निराशच झाले होते आणि काल माझ्या नणंदेच्या मुलाचे लग्न होते त्यामुळे खुप बिझी होते आज दुपारी निवांत झाले म्हणुन ईकडे आले तर हे भगवान खुप सगळी चांगली चर्चा वाहुन गेली. असुदे पण मी जिथुन वाचले ते सगळे उपयोगीच होते. Happy आता रश्मी म्हणते तसे उद्याच हा धागा वहायचा बंद होईल बहुतेक तर एक विनंती सगळ्यांना की बाकीची चर्चा आपण उद्या करुयात का? (धागा वहायचा बंद झाल्यावर) Happy

कोलेज कुठलेही असुदे शेवटी मार्क व्यवस्थित काढणे हे प्रत्येक मुलावर अवलंबून असते स्मित>>> सुजा अगदी बरोबर. तीला सगळे सांगतायत की साठ्ये एकदम बोअर कॉलेज आहे. (हल्लीच्या मुलांच्या बोअरच्या संकल्पनाच कळत नाहीत, काहीही झाले की ते बोअर आहे.) त्यापेक्षा पुण्याला जा म्हणे. Happy मीही तीला हेच सांगत असते की तू कोणत्याही कॉलेजला जा पण अभ्यास तुझा तुलाच करायचा आहे. Happy

वर्षा, कॉलेजमधे फक्त अभ्यासच महत्वाचा नसतो गं. आसपासचे वातावरण, विद्यार्थी, त्यांच्या अ‍ॅक्टिव्हिटीज, कॉलेजमधे होणार्‍या इतर शैक्षणिक घडामोडी, चांगले जाणते शिक्षक हे सगळंच महत्वाचं असतं. शिक्षणाइतकाच व्यक्तिमत्व विकासही कॉलेजमधे होतो, व्हावा. थोडंसं अधिक सजगपणे आसपासच्या जगाकडे बघायला शिकावं.

आसपासचे वातावरण, विद्यार्थी, त्यांच्या अ‍ॅक्टिव्हिटीज, कॉलेजमधे होणार्‍या इतर शैक्षणिक घडामोडी, चांगले जाणते शिक्षक हे सगळंच महत्वाचं असतं. शिक्षणाइतकाच व्यक्तिमत्व विकासही कॉलेजमधे होतो, व्हावा.......+१

हॉटेल मॅनेजमेंट बारावीनंतर निवडावे लागते (बहुतेक) माझ्या नात्यातल्या एका मुलीने आत्ताच(६ महिन्यांपूर्वी) हॉटेल मॅनेजमेंटसाठी गोव्यातल्या एका संस्थेत प्रवेश घेतला. तिने रुपारेलमधून बारावी आर्ट्स केले. हॉ.मॅ.च्या प्रवेशालाही प्रचंड स्पर्धा आहे.

साठे कॉलेज ज्या अर्थाने बोअर म्हटले जाते त्या अर्थाने मला आवडते. मी PTVA च्याच डहाणूकरचाच विद्यार्थी. ते साठ्येच्या शेजारीच आहे. मी शिकत होतो तोवर साठ्येचे नाव पार्ले कॉलेज होते. इमारत, कॅम्पस जुनाट आताही वाटतात. आमच्या कॉलेजचा मात्र कायापालट झालेला दिसला.

मिठिबाई कॉलेज टीव्ही मालिकांमधल्या कॉलेजसारखे वाटले.

रेल्वे प्रवास नको असेल तर गोरेगावातच पाटकर कॉलेज आहे.

वर्षा, तुम्ही अ‍ॅडमिनना मदतपुस्तिकेत लिहिले आहे. त्यांच्या विचारपुशीत इथे http://www.maayboli.com/user/3/guestbook लिहा

अगदी बरोबर वरदा. व्यक्तिमत्व विकास व्हायला पहिजेच पण एखाद्या कॉलेजचे नाव मोठे आहे किंवा अगदीच लहान कॉलेज आहे म्हणुन एखादे कॉलेज नाकारु नये म्हणुन असे म्हटले ग.

लोकसत्ताच्या 'मार्ग यशाचा' या सदरातून सध्या दहावी-बारावीनंतरच्या पर्यायांची माहिती दिली जात आहे.
३० एप्रिल रोजी हॉटेल मॅनेजमेंट संबंधी माहिती दिली गेली. त्या दिवशीच्या इ-पेपरची लिंक.
http://epaper.loksatta.com/265397/indian-express/30-04-204#page/4/2
प्रवेशासाठी किमान पात्रता : कोणत्याही शाखेतून बारावीची परीक्षा इंग्रजी या विषयासह किमान ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण

या सदराच्या लिंकमध्ये नेमका ३० एप्रिलचा लेख दिसला नाही. http://www.loksatta.com/upakram-category/way-to-success/
पण इतरही पर्यायांची माहिती मिळेल.

वर्षाताई अभिनंदन
दोन तीन ठिकाणी फॉर्म भरुन ठेव
आणि डिग्री कॉलेज असलेल्या कॉलेजला प्राधान्य दे

अभिनंदन. डहाणुकर अस्मादिकांचे कॉलेज. Happy एक्स्ट्राकरिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीजसाठीही भरपूर स्कोप असेल. एकांकिकास्पर्धांमध्ये अलीकडे नेहमी नाव असते.

आता (गेल्या वर्षीपासून) बारावीनंतरही सेन्ट्रलाइझ्ड ऑनलाइन अ‍ॅडमिशन आहे.

थंड तुझे आणि लेकीचे अभिनंदन.

धन्यवाद सगळ्यांना

जाई, डहाणुकरला हवी आहे अ‍ॅडमिशन पण बघुयात आता ऑनलाईन पद्धतीने कुठे मिळतेय ते. पण सगळी डिग्री कॉलेजेसची नावे दिली आहेत. शेवटची पाच ज्युनियर कॉलेजची द्यावीच लागतात म्हणुन ती दिली आहेत. Happy

पालक आणि पाल्यांचे अभिनंदन. सायन्सला जाउन संशोधनाची आवड असेल तर १२ वी नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च चा नक्की विचार करा.

Pages