मी सेकंड होम / गुंतवणुक साठी नविन प्रोजेक्टमध्ये शोधले असता मला नेटवर शहापुरजवळ एक प्रोजेक्टची जाहीरात दिसली. त्यांचे ऑफिस ठाण्यात माझ्या घरापासुन जवळच असल्यामुळे आम्ही तिथे गेलो. आम्हाला तो प्रोजेक्ट आवडला आहे व बजेटमध्येपण आहे पण मला कसे कळेल की तो डेव्हलपर खरा आहे कारण काही महिन्यांपुर्वी भिवंडीतील बिल्डर्स सुरवातीला आपण जी २०% रक्कम देतो ती घेऊन पळुन गेले.
तर मी जो शहापुरचा प्रोजेक्ट पाहतेय त्यांची वेबसाईट आहे तसेच त्यांचे गोवा, लोणावळा व साऊथलाही प्रोजेक्ट सुरु आहेत तर काही सुरु होणार आहेत. याचा जो CMD आहे तो चेन्नईतला नावाजलेला उद्योगपती आहे. त्याची आधी एका नावाने इलेक्ट्रॉनिक्स कंपनी होती. नंतर त्याने दुसर्या नावाने रिसॉर्ट आणि हॉटेलचा उद्योग सुरु केला आणि आता तो डेव्हलपर्स आहे. (ही सर्व माहीती नेटवरुन व त्यांच्या ऑफिसमधुन)
तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहापुर येथे त्यांनी ३२ एकर जागा विकत घेतली आहे तिथे आम्ही पाहत असलेला नविन प्रोजेक्ट ते मे महिन्याच्या शेवटी सुरु करत आहेत. त्यात ते सर्व सुखसोयी देणार आहेत जसे स्विमिंगपुल, क्लबहाऊस मेंबरशिप, सेमी फर्निश फ्लॅट तसेच शॉपिंग मॉल इ. फ्लॅटचे पझेशन ३० महिन्यात.
जर मी विकत घेणार असलेले घर मला १८ लाखाला येतोय तर २ महिन्याच्या आत २.५ लाख भरायचे. उरलेली रक्कम बँक लोन (अॅक्सिस / DHFL) अथवा बिल्डरला ७२ महिन्यात फेडायची ( याला ते In House Finance म्हणतात). २.५% रक्कम बिल्डरकडे जमा झाल्यावर ते स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन करुन देणार. सुरवातीला जेव्हा २.५ लाख देणार तेव्हा अॅग्रिमेंट बनवुन त्याला नोटरी करणार.
एव्हढेच नाही तर त्यांचे जे रिसॉर्ट आहेत तिथे फ्री मेंबरशिप, तसेच डोमेस्टिक / इंटरनॅशनल कुठे जाणार असाल तर ३ ते ५ तारका हॉटेलमध्ये ६ रात्र ४ जणांसाठी फक्त ८००० / १४०००. ( एक साईटचा पत्ता सांगितला होता आता विसरली मी www.de .......... यावर चेक करा असे सांगितले)
तर एव्हढी सगळी क्रुपाद्रुष्टी (कसे लिहायचे?) करतायत म्हणुन जाम संशय येतोय. त्यासाठीच मला या बिल्डरची सत्यता कशी पडताळुन पाहता येईल हे पाहीजे. प्लीज मदत करा.
१. सगळ्यात आधी जागेचा सातबारा
१. सगळ्यात आधी जागेचा सातबारा उतारा चेक करा … त्यावर बिल्डरचे नाव असले पहिजे. जर नसेल तर मूळ जागा मालक आणि बिल्डर ह्यांच्यामधील 'डेव्लपमेण्ट अग्रीमेंट आणि पावर ऑफ attorney' चेक करा. (बिल्डर देइल )
सातबारा तुम्हाला इथे http://mahabhulekh.maharashtra.gov.in/ बघायला मिलेल. इथला सातबारा १ वर्ष जुना असू शकतो . लेटेस्ट सातबारा तलाठी कार्यालयात मिळेल.
२. गाव नकाशा मध्ये तुम्हाला दिलेल्या सातबारा उतारयाची जागा योग्य आहे हे चेक करा . (तलाठी कार्यालयात मिळेल ).
सातबारा मध्ये जो सर्वे नंबर दिला आहे तो रहिवासी विभागात येतो काय हे चेक करा. हे डीटेल्स तुम्हाला डेव्लपमेण्ट प्लान मधील झोन बघून कळतील . डेव्लपमेण्ट प्लान चे नकाशे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेबसाईट वर मिळतात.
३. जो बांधकामाचा प्लान मंजूर झाला आहे त्याची खात्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेबसाईट वरून करून घ्या.
उदा. पुणे महानगर पालिकेची वेबसाईट किंवा पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची वेबसाईट .
http://www.punecorporation.org/pmcwebn/index.aspx
https://www.pcmcindia.gov.in/
३. बांधकाम चालू करण्याचा दाखला चेक करा. त्यावरचे सर्वे नंबर आणि बांधकामाचे क्षेत्रफळ , अनुक्रमे सातबारा आणि मंजूर नकाशा बरोबर तुलना करून बघा . (स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेबसाईट वरून घ्या. )
धन्यवाद गनोबा. खुप उपयुक्त
धन्यवाद गनोबा. खुप उपयुक्त माहिती
सातबारा, परवानग्या हे सर्व
सातबारा, परवानग्या हे सर्व बघाल, पण बिल्डर च्या नीयती ला कसे ओळखु शकाल. जी प्रोजेक्ट रखडलेली आहेत, किंवा बिल्डर नी फसवले आहे अश्या बर्याच प्रोजेक्ट साठी बँका, HDFC नी सुद्धा कर्ज मंजुर केली आहेत.
हा भारत देश आहे, इथे सर्व बेकायदेशीर गोष्टी होऊ शकतात.
म्हणुनच अनोळखी बिल्डर आणि काम सुरु झाले नाही अश्या प्रोजेक्ट मधे धाडस दाखवु नका.