कलिंगडाच्या सालीचा आतील पांढरा गर - १ वाटी
तांदूळ - १वाटी
चिरलेला गूळ - २ टेस्पू
खवलेले खोबरे - साधारण पाव वाटी, थोडे कमी असले तरीही चालेल.
चवीप्रमाणे मीठ
पूर्वी आज्जी असताना काही अगदी टिपिकल पाकृ ती बनवत असे. कलिंगड आणले की एकदा तरी हे सुरनोळे बनत असत. असेच परवा कलिंगड आणले आणि ही पाकृ आठवली. नीटशी आठवेना म्हणून रसचंद्रिका ह्या पुस्तकाचाही आसरा घेतला. साधारण तशीच कृती पुस्तकातही दिलेली आहे. तर, ही कृती -
१. एक वाटी तांदूळ ४-५ तास भिजत ठेवावे. सकाळी तांदूळ भिजत घातले की धिरड्यासाठीचे पीठ संध्याकाळी वाटता येईल.
२.. कलिंगडाच्या सालीच्या आतील पांढरा गर काढून घेऊन अगदी बारीक चिरावा वा किसणीवर किसून घ्यावा. हा गर कापून घेताना अगदी सालीलगत कापू नये, तसे कापले की हिरव्या सालीचा कडूसरपणाही त्या गरात उतरेल आणि मग धिरडी कडू व्हायची शक्यता असते.
३. वाटताना, कलिंगडाचा गर, तांदूळ व ताजे खोबरे एकत्र वाटावे. त्यात गूळ घालावा व रात्रभर पीठ झाकून ठेवावे.
४. डोश्यासाठी पीठ असते तसे सरसरीत करावे. वाटताना खूप पाणी घालायची गरज नसते, कारण कलिंगडाच्या गरालाही भरपूर पाणी सुटते. ते वापरावे व नंतर गरजेप्रमाणे पाणी घालावे. चवीपुरते मीठ घालावे.
५. दुसर्या दिवशी धिरडी काढावी.
गूळ घालून गोडसर बनवतात तसेच आले, हिरवी मिरची घालून तिखटही बनवता येईल.
रसचंद्रिकामधील टिपा -
१. थंडीच्या दिवसांत अर्धा कप दूध व अर्धा कप ताक मिश्रणात घालावे.
२. याचप्रमाणे काकडीची धिरडी बनवता येतात.
यम्मी! आले मिरची को. घालून
यम्मी! आले मिरची को. घालून करणार. थांकु.
अरे मस्त आयडिया. आता इथेही
अरे मस्त आयडिया. आता इथेही आणली जातील कलिंगडं समरमधे. नक्की करून बघणार.
आई नेहमीच उन्हाळ्यात
आई नेहमीच उन्हाळ्यात पांढर्या भागाचे धपाटे करते, आता हे पण करुन पहावे लागेल.
कसे करायचे हे धपाटे, प्रीति?
कसे करायचे हे धपाटे, प्रीति?
एक्दम नॉस्टॅल्जिक... आई करते
एक्दम नॉस्टॅल्जिक... आई करते तिखटाचे. (इथे थंडी हू म्हणतेय त्यामुळे कलिंगडं नाहीत... नाहीतर आजच्या आज करण्याचा घाट घातला असता.)
बरं केलयस रेसिपी दिलियेस... करेन नक्की
कलिंगड रोजचं आहेच सध्या, धागा
कलिंगड रोजचं आहेच सध्या, धागा ऑफिसात आल्यावर पाहिला नाहीतर तांदूळ भिजत घालूनच आले असते..
छान खमंग लागत असणार, शंकाच नाही!
सहिये, आमच्याहीकडे धपाट्यात
सहिये, आमच्याहीकडे धपाट्यात थालिपीठात असा काकडी, कलिंगडाचा किस घालतात.
navin ahe ha prakar
navin ahe ha prakar mazyasathi...
kalingad wow!
photo taka na plz koni tari
Tandul kalingadachya
Tandul kalingadachya pandhrya garat bhijvayache mhanje wattana pani ghalave nahi lagat.
शैलजा, ज्वारीचं पीठ एक मोठा
शैलजा, ज्वारीचं पीठ एक मोठा चमचा, बेसन एक लहान चमचा, तिखट, मीठ, लसुण कुटुन, तीळ आणि थोडा गुळ मिक्स करुन, किसलेले कलिंगड्/काकडी टाकुन भिजवायचं. भाकरी थापतो तसं पीठ लाऊन थापायचं आणि तेल लाऊन भाजयचं. दही, ठेचा, शेंगदाण्याची चटणी, लोण्यासोबत खायचं. तोंडाला पाणी सुटलं
काल केले होते. छान झाले. पाणी
काल केले होते. छान झाले. पाणी फारच सुटतं कलिंगडाच्या पाठींना, थोडी पिठी मिसळली धिरडी घालताना.
आमच्या कडे आई माल्पुआ बनवताना
आमच्या कडे आई माल्पुआ बनवताना त्यात गर किसून घालते .
मला स्वताला कलि.न्गड आणि माल्पुआ दोन्ही आवडत असल्यामुळे हा प्रकार फारच आवडतो
या सालीच्या गराची पीठ पेरून
या सालीच्या गराची पीठ पेरून भाजी पण अप्रतिम होते. कृती खास नाही. हिंग हळद मोहरीच्या फोडणीवर आधी गर परतून घ्यायचा. मग तिखट मीठ घालून वाफ काढायची. शिजल्यावर बेसन घालून परत वाफ आणायची.
वर भरपूर कोथिंबीर पेरायची. फारच मस्त होते. नागपूरकडे उन्हाळ्यात खूपदा होते.
आई बहुतेक फोडणीत लसूण चिरून घालायची. नक्की आठवत नाही.
त्याची फोडी करून
त्याची फोडी करून दुध्यासारखीही करता येते भाजी मूगडाळ वगैरे घालून.
पाणीदार असल्यामुळे अवियलमधेही खपून जावं.
हो स्वाती. माझ्या सासरी करतात
हो स्वाती. माझ्या सासरी करतात डाळ घालून.
खरंतर हा गर इतका पांचट असतो पण याचे पदार्थ फार रुचकर होतात.
अरे! इथल्या नव्या पोस्टी
अरे! इथल्या नव्या पोस्टी पाहिल्याच नव्हत्या.
स्वाती, ही पिठी मिसळायची आयडियाही चांगली आहे.
सुमॉ, प्रीती तुम्ही दिलेली व्हेरिएशन्स करुन पाहते, धन्यवाद