मला ह्या वर्षी कापा, बरका दोन्ही मिळाले. काल बरका मिळाला त्याचा रस काढून हि धिरडी केली. आईला खूप आवडते म्हणून मी केली. अर्थात आईनेच शिकवली आहे.
अडीच वाटी तांदूळाची बारीक पीठी,
एक लहान चमचा कच्चा बारीक रवा,
एक वाटी बरका फणसाचा रस,
पाव वाटी खोवलेले ओले खोबरे,
गरा जितका गोड त्यानुसार व तुमच्या आवडीनुसार गूळ किसून घालावा.
शहाळ्याचे पाणी लागेल तसे.
चवीला मीठ
वेलची पूड,३-४ केसर काडया
अगदी लहान चिमटी लवंगाची पूड
१) सुवासिक तांदूळ धूवून वाळवून त्याची अतिशय बारीक पीठी काढावी
२) त्यातली अडीच वाटी पीठीत सर्व जिन्नस एकत्रित करून सरसरीत पण पातळ नाही असे पीठ बनवावे. जे काही पाणी लागेल ते शहाळ्याचे वापरावे. सर्व मिश्रण एकदाच मिक्सर मध्ये घुसळून एकजीव करावे
३) रात्रभर आंबवावे. मुंबईची हवा दमट आहे तेव्हा रात्रभर नाहि ठेवले तरी चालेल. पण कमीतकमी ५-६ तास आंबवावे.
४) रात्री पीठ ठेवले असेल तर सकाळी हळदीच्या पानावर साजूक तूप सोडून हे मिश्रण त्या पानावर घालून लहान लहान धिरडी कराव्या. पानं नसली तर रोजच्या धिरडीच्या तव्यावर घालून काढाव्या.
५) साजूक तूप आणि नारळाचं दूधाबरोबर द्याव्या. अप्रतिम लागतात.
विसराळू असल्याने फोटो काढायला राहून जातो.
रोजचं पाणी घालून आंबवू नये. खूप पातळ असु नये. मी बाहेरची पीठी नाही वापरली. हा शाकाहरीच पदार्थ असल्याने शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही लोकं खाउ शकतात (असा माझा अंदाज आहे) व ह्याच्याएवजी काय घालू असे बहुधा नाही विचारणार हि आशा. तुम्हाला तुमच्या कल्पना प्रमाणे मुभा आहेच.
मस्त.....
मस्त.....:)
छानच लागेल हा प्रकार !
छानच लागेल हा प्रकार !
canned फणस चालेल का?
canned फणस चालेल का?
वा मस्त, वेगळा प्रकार.
वा मस्त, वेगळा प्रकार.
एकदम पारंपारिक पदार्थ,
एकदम पारंपारिक पदार्थ, मस्तच!, पुढच्या वेळेस फोटो न दिल्यास सर्व माबोकर तुमच्या घरी हल्ला बोल करणार!
मी उदया करेन तेव्हा फोटो
मी उदया करेन तेव्हा फोटो टाकेन.
मस्त! याच रसाचा ( मला
मस्त!
याच रसाचा ( मला फण्साच्या रसाच्या बाटल्या आयत्या येतात कोकणातून!) रवा, दही, दूध, तूप ़ किंवा लोणी, साखर आणि बे. पावडर घालून केक खूप छान होतो. सांदणाचा नवा अवतार. सांदणात तांदळाचा रवा + फणस असतो इतकाच फरक.
>>>याच रसाचा ( मला फण्साच्या
>>>याच रसाचा ( मला फण्साच्या रसाच्या बाटल्या आयत्या येतात कोकणातून!) रवा, दही, दूध, तूप ़ किंवा लोणी, साखर आणि बे. पावडर घालून केक खूप छान होतो. सांदणाचा नवा अवतार. सांदणात तांदळाचा रवा + फणस असतो इतकाच फरक.<<
मी केला होता हा प्रकार एकदाच. मी ह्यावेळी सगळा रस धिरडी,सांदणं आणि आईसक्रीम करण्यात वापरला. परत बरका मिळाला तर केक करेन. धन्यवाद आठवणीसाठी.
वत्सला, मी कॅन्ड वापरला नाही
वत्सला, मी कॅन्ड वापरला नाही कधी. पण तुम्ही वापरून केलात तर तुमचा अनुभव लिहाल का?
गरे पिकलेले हवेत तरच पल्प मिळून येइल.
मस्त पदार्थ.
मस्त पदार्थ.
देविका विपु पाहिलीस का?
देविका विपु पाहिलीस का?
मानुषी, धन्यवाद. रसाळ फणसाचा
मानुषी, धन्यवाद. रसाळ फणसाचा गर बराच आहे. तेव्हा कधी तरी मध्येच करेन. उदयाला सांदणं करायला ठेवलीत.
व धिरडी सुद्धा. इथे फणस सोहळाच चालू आहे.